चुना व सोड्याने पाणी मृदू करावयाच्या पद्धतीत होणारे फेरबदल:-
पाण्यातील कॅलशियम, मॅग्नेशियम तसेच कार्बोनेट व बायकार्बोनेट कठीणपणा नाहीसा करण्यासाठी चुना व सोडा यांचा वापर कसा करावा याविषयी वर माहिती दिलेली आहे. तथापि जर फक्त कॅलशियम बायकार्बोनेटमुळे पाण्यास कठीणपणा आला असेल तर केवळ चुन्याची प्रक्रिया करून पाण्याचा पी.एच. ९.४ या योग्य मर्यादेपर्यंत आणला तरी चालतो. जर कॅलशियम व मॅग्नेशियम बायकार्बोनेट पाण्यात असतील तर सोड्याचा वापर केला नाही तरी चालतो मात्र यावेळी पाण्यातील मॅग्नेशियाचे निष्कासनासाठी पी.एच. १०.६ होण्यासाठी जास्त चुन्याची प्रक्रिया करावी लागते. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर फक्त कार्बोनेट राहील कठीणपणा नाहीसा करावयाचा असे तरच फक्त ५ व्या व ६ व्या विक्रीयांप्रमाणे सोड्याची आवश्यकता असते. जास्त तांत्रिक भाषेत सांगायचे तर कॅलशियम व मॅग्नेशियम धनायनांचे सममूल्य अल्कतेच्या ऋनायणांपेक्षा जास्त झाले तरच सोडा वापरावा लागतो.
चुना व सोडा वापरून पाणी मृदू करण्याच्या पद्धतीचा वापर:-
वरील विक्रिया होण्यासाठी जी मृदूकरण यंत्रणा बांधली जाते त्यांचे आभिकल्पन मूलतः नेहमीच्या जलशुद्धीकरण यंत्रनेप्रमाणे असते फक्त बऱ्याच जास्त प्रमाणात रसायनांचा पुरवठा करावयाचा असल्याने रसायनांची सोय / पोषक यंत्रणा धारणक्षमता भरपूर असावी लागते व गाळ काढण्यासाठी यांत्रिक साधनांचा वापर करणेही योग्य ठरते. ऊर्ध्वगामी प्रवाहाच्या अवसादन टाक्यांत पदार्थांचा संपर्क चांगला होत असल्याने मृदूकरण प्रक्रियासाठी या टाक्या सहाय्यकारक ठरतात.
रसायने:-
प्रक्रियेसाठी विरीचा किंवा कळीचा चुना वापरता येतो रसायनीची उपलब्धता, किंमतीतील फरक व विरीचा चुना वापरण्यातील थोडीफार सुलभता यावर रसायनाची निवड अवलंबून असते. सर्वसाधारणपणे कळीचा चुना स्वस्त असतो तो विरवावा लागतो. कळीचा विरविताना त्यातील काही भाग कोरडा राहू नये किंवा त्यात डिकळे राहू नयेत यासाठी आवश्यक तेवढे जास्त तापमान निर्माण व्हावे. म्हणून चुन्यात बरोबर किती पाणी घालावे घ्याचे मोजमाप करणे पूर्वी अवघड असते. लगेच विरणारा दाणेदार चुन्याचा व विरण्याची क्रिया सतत चालू ठेवणाऱ्या या यंत्रणेत नवीनच वापर सुरु झाला आहे. या यंत्रणेत विरण्याच्या क्रियेस ६६ अंश ते ७७ अंश सें तापमान मिळेल अशा रितीने पाण्याचा प्रवाह नियंत्रित केलेला असतो. जर कळीच्या चुन्याची भुकटी केली तरी विशिष्ट शुष्क पोषक यंत्रणेतून त्याचा पाण्याला पुरवठा करता येतो.
मात्र ठराविक प्रमाणात पाण्याचा वापर करावा लागतो. द्रावण टाकीत आंदोलन क्रिया जलद व्हावी लागते. चुन्याची रिबडी तयार झाली की ती होजच्या द्रावण नळीतून पुरेशा वेगाने सोडावी लागते. अन्यथा तेथे चुना साचून राहण्याची शक्यता असते. होज नळी जर फार लहान आकाराची असेल तर ती चोंदते व फार मोठया आकाराची असेल तर त्याच अवसादन होण्याची शक्यता असते. सर्व होजनळी दाबयुक्त पाण्याने धुवून काढता यावी यासाठी होजनळीला पाण्याचा नळ जोडून ठेवावा. सर्वात लहान उत्तम पद्धत म्हणजे प्रक्रिया करावयाच्या पाण्याच्या पातळी पेक्षा जास्त उंचीवर उघडया नालीमध्ये हे चुन्याचे द्रावण सोडणे.
सोडा चुण्याबरोबर वा स्वतंत्रपणे पाण्यात मिसळला तरी चालतो. तो अतिशय विद्राव्य असल्याने त्यासाठी द्रावण पोषकाचाही उपयोग करणे शक्य असते वस्तुतः ३०o ते ४०o सें. तापमान असणाऱ्या गरम पाण्यात ३० टक्के तीव्रतेचे द्रावण किंवा १०o – १५o सें. तापमान असणाऱ्या थंड पाण्यात ८ टक्के तीव्रतेचे द्रावण तयार होऊ शकते. तरी बहुधा शुष्कपोषक यंत्रणाच जास्त सोयीचा पडते.
पुंजकीकरण:- संकणन मृदूकणातील खर्च व जास्त असल्याने महत्त्वाच्या विक्रिया यात होत असल्याने ३० ते ६० मिनिटे अवरोधन कालावधी राहील इतकी भरपूर संकणन व्यवस्था ठेवणे यांत्रिक साधनांनी क्रिया होऊ देणे इष्ट असते. जर तळाशी बसणारा गाळ सतत बाहेर काढला जात असेल तर या गाळातील काही भाग असंस्कारित पाण्यात मिसळल्यास संकणन चांगले होते अर्थात गाळाचा किती हिस्सा असंस्कारित पाण्यात मिसळणे योग्य असते ते अनुभवाने कळू शकते.
किलाटन:- चुना व सोडा वापरून पाणी मृदू करीत असताना पाण्याचे पी.एच. बरेच जास्त असतो. तरीही तुरटी पाण्यात मिसळल्यावर अल्युमिनेट संयुगे तयार होत असल्याने तिचे कार्य व्यवस्थित चालले. पुंजके तयार होण्यासाठी सहाय्यक म्हणून फेरिक सल्फेट, फेरस सल्फेट, सोडियम अल्युमिनेट किंवा कार्यप्रेरित सिलिका यांचाही वापर करता येतो. बहुधा लहान केंद्रासाठी सोडियम अल्युमिनेट वापरले जाते. परंतु मृदूकरणासाठी किलाटन म्हणून कार्यप्रेरित सिलिका विशेष योग्य असते कारण तिचे २ भा/दलभा इतके कमी प्रमाण वापरले तरी ते प्रभावी ठरते. ज्या ठिकाणी थंड पाण्याचे मृदूकरण केले जाते त्या कणसंपर्क टाक्यांमध्ये ही गोष्ट प्रकर्षाने जाणवते.
या प्रक्रीयेवरील नियंत्रण नेहमीच्या किलाटन पद्धतीप्रमाणे असते. तुरटी, फेरिक सल्फेट किंवा फेरस सल्फेट यांचा किलाटन म्हणून वापर केला असेल तर किलाटकांची आम्लता नाहीशी करण्यासाठी चुना खर्च होत असल्याने पाण्यात मिसळावयाच्या चुन्याचे प्रमाण त्यानुसार वाढवावे लागते. चुना व किलाटन खालील विक्रीयेमुळे कॅलशियम सल्फेट तयार होते व त्यामुळे पाण्यास किलाटकांबरोबर चुण्याऐवजी सोडा मिसळावा म्हणजे पाण्यास कठीणपणा न येता किलाटन होऊ शकेल.
No comments:
Post a Comment