क्लोरिन व अमोनिया यांची प्रक्रिया
क्लोरिनची चव येणार नाही पण जास्त कायम स्वरूपाचा शेषक्लोरिन पाण्यात या दृष्टीने बऱ्याच वर्षापूर्वी पद्धती विकसीत झाली. क्लोरिन व अमोनिया यांच्यातील विक्रीयेमुळे क्लोरामाईनच्या स्वरूपातील शेषक्लोरिन संयुग तयार होतात रासायनिक दृष्ट्या कमी क्रियाशील असल्याने त्यांची जंतुनाशक शक्ती सौम्य असते व क्लोरिनची चव आणणारे पदार्थही यामुळे तयार होण्याची कमी शक्यता असते तथापि क्लोरिनची चव न येणे हा गुण असला तरी जंतुनाशक क्रियेमुळे क्लोरीमाईन विशेष उपुक्त ठरत नाही.
म्हणून, मुक्त शेष क्लोरिनीकरणाच्या पद्धतीचा उगम झाल्यापासुन क्लोरिन अमोनियाची प्रक्रिया विशेष प्रमाणात कोठेही वापरली जात नाही असा कल दिसण्याचे दुसरे एक महत्त्वाचे कारण म्हणजे रसायनांची व यंत्रणेची बरीच जास्त किमत जलहीन अमोनिया वायू पुरवण्यासाठी वायूपोषक क्लोरिनकारक इतका खर्च येतो. हा खर्च न करता त्याऐवजी मुक्त शेष क्लोरिनीकरण करायचे ठरविले तर नेहमी लागेल त्यापेक्षा जास्त प्रमाणात क्लोरिन वापरून देखील पैसा शिल्लक राहील व क्लोरिनीकरणाच्या या नव्या पद्धतीचे सर्व फायदेही मिळतील.
तरीसुद्धा अशी पुष्कळ पाणी पुरवठा केंद्रे आहेत की जेथे पाण्याचा पी. एच.कमी आहे व जीवाणू आणि जंतुनाशक रसायन यांचा संपर्क येण्यासाठी बराच कालावधी उपलब्ध आहे शिवाय सर्व वितरण व्यवस्थेत शेष क्लोरिन ठेव्यासाठी आवश्यक ते तांत्रिक नियंत्रण करणे तेथे शक्य नाही अशा ठिकाणी क्लोरिन अमोनिया प्रक्रियेचा वापर करावयास हवा मात्र ही पद्धती वापरताना पान क्र. १४२ वरील कोष्टक क्र. ७ वर दाखविल्याप्रमाणे क्लोरामाईनची जंतुनाशक क्रिया सावकाश चालते हे लक्षात ठेवणे आवश्यक असते. जर फक्त तास विक्रिया कालावधी उपलब्ध असेल तर किमान १ भा/ दलभा प्रमाणात शेष क्लोरिन राहील अशा रितीने क्लोरिन पाण्यात मिसळला लागतो. व ज्या पाण्याचे पी.एच.८.५ ते ९.० पेक्षा जास्त असेल त्या पाण्यासाठी या पद्धतीचा वापरू करू नये जलशुद्धीकरण केंद्रात पाण्यातील संयुक्त शेष क्लोरिनचे वा क्लोरामाईनचे प्रमाण १ भा/दलभा वा त्याहून अधिक असले तर सर्व वितरण व्यवस्थेत ०.३ ते ०.६ भा/ दलभा प्रमाणात संयुक्त शेष क्लोरिन राहू शकतो. या ठिकाणी सुद्धा या क्लोरिनच्या जंतुनाशक क्रियेचा वेग मुक्तशेष क्लोरिन कमी च्या वेगापेक्षा कमी असतो म्हणून वितरण व्यवस्थेत पाण्यात दुय्यम स्वरूपाचे जीवाणू प्रदुषण झाले तर त्या जिवाणूंचा या संयुक्त शेषक्लोरिनमुळे जलद नाश होत नाही.
यंत्रणा:- संकोचित अमोनिया वायू, अमोनिया पाणी, अमोनिया क्लोराईड किंवा अमोनिया सल्फेट यांच्या स्वरुपात पाण्यात मिसळता येतो. अमोनिया वायूची लोखंडी नळकांडी विकत घेतली तर कोरडया वायू पोषक क्लोरिनीकारकाप्रमाणे, कोरडया पोषण यंत्रणेच्या सहाय्याने अमोनियम वायू पाण्यात मिसळता येतो. क्लोरिनीकारकाचा या कमी उपयोग करता येत नाही कारण त्यात जोडलेल्या चांदीच्या भागांवर अमोनियाची क्रिया होते. किलाटन किंवा हायपोक्लोराईट द्रावणे पाण्यात मिसळण्यासाठी कोरडया स्वरुपात व द्रावण स्वरुपात पुरवठा करणाऱ्या ज्या यंत्रणा वापरल्या जातात त्यांचाच उपयोग अमोनियाचे क्षार पाण्यात मिसळण्यासाठी करता येतो.
No comments:
Post a Comment