Thursday, November 16, 2017

मुक्त शेष क्लोरिन नियंत्रण

कार्बनी पदार्थाचे ऑकसीजन करणे मुक्त अमोनिया नाहीसा करणे व आवश्यक तेवढा प्रमाणात मुक्त शेष क्लोरिन पाण्यात ठेवणे या सर्व गोष्टीसाठीलागणाऱ्या क्लोरिनपेक्षा गृहीत धरलेले संभाव्य कमाल प्रमाण कमी पडू नये म्हणून सर्व प्रतिकूल परिस्थिती असताना क्लोरिन गरज ठरवावी लागते क्लोरिन डाय ऑक्साईड हा तीव्र जंतुनाशक असून पाण्याचे पी.एच.सुमारे ७.५ पेक्षा जास्त असताना त्या सममूल्य प्रमाणात मुक्त क्लोरिनपेक्षा तो जास्त क्रियाशील असतो. चुना व धुण्याचा सोडा वापरून पाणी मृदू केले असल्यास पाण्यात अल्कता जास्त असते. अशावेळी क्लोरिन डाय ऑक्साईडची कार्यक्षमता विशेष तीव्र असते. या प्रक्रिया पद्धतीचा एक तोटा म्हणजे क्लोरिन डाय ऑक्साईड तयार करण्यासाठी लागणाऱ्या सोडियम ऑक्साईटचा या पद्धतीत वापर करावा लागतो या रसायनांची किंमत बरीच जास्त  असते.
वायूपोषक क्लोरिनीकारक बहिर्गम होज नळातून क्लोरिनचे जे संहत द्रावण वहात असते त्यात सोडियम क्लोराईडचे द्रावण मिसळले की क्लोरिन डाय ऑक्साईड तयार होते. शास्त्रीय दृष्ट्या क्लोरिनची मात्रा व सोडियम क्लोराईटची मात्रा याच्यात एकास २.५ एवढे गुणोत्तर पुरते पण प्रत्येक्षात त्यामानाने जास्त प्रमाणात क्लोरिन मिसळला जातो गुणोत्तर एकास दोन किंवा एकास एक एवढे ठेवले जाते काचेच्या एका विशिष्ट पेटीत दोन्ही रसायनांचा विक्रिया होते व रसायने चांगली मिसळली जावीत यासाठी त्या काचेच्या पेटीत सिरॅमिक चे लहान लहान गोळे भरलेले असतात तयार झालेले क्लोरिन डाय ऑक्साईड फिकट पिवळ्या रंगाचे असते. जर द्रावण पेटीतून बाहेर पडेपर्यत त्याला हा विशिष्ट रंग आला नाही तर रंग येईपर्यत क्लोरिनची मात्रा वाढवावी लागते. क्लोरिनच्या संहत द्रावणाचा पी.एच.३.५ असतो व विक्रीयेसाठी तेवढ्या पी.एच. ची आवश्यकता असते. विक्रिया खालीलप्रमाणे होते. 
2NaClO2+Cl2=2ClO2+2NaCl
क्लोरिन डाय ऑक्साईडची आर्थोटोलिटीन द्रावणाशी विक्रिया होऊन विशिष्ट हिरवट पिवळा रंग तयार होतो पण या रंगाची तीव्रता क्लोरिन डाय ऑक्साईडच्या संहतिची निदर्शने नसते तर त्यामुळे असेल त्यापेक्षा कमी संहतीचा भास होतो. प्रत्यक्ष वापर करताना क्लोरिन डाय ऑक्साईडचे आथोटोलिजन परिक्षेप्रमाणे ०.२ ते ०.३ भा /दलभा एवढी दर्शनी संहती असली तरी प्रक्रिया पद्धती प्रभावीपणे नियंत्रीत करता येते कारण एवढयाचा क्लोरिनडाय ऑक्साईडची ऑक्सिकरण क्षमता त्याच्या जवळजवळ दुप्पट संहती असलेल्या मुक्त शेष क्लोरिन इतकी असते. 
विद्युत प्रवाहावर चालणारे उदासीनीकारक वापरल्यास अगदी या पद्धतीवर अचूक नियंत्रण ठेवता येते प्रयोगशाळेत सामान विकणाऱ्या काही दुकानांत वा क्लोरिनीकारकाच्या उत्पादकांकडे हे उपकरण मिळू शकते. 
नवीन दुरुस्ती केलेले पाण्याचे नळ निर्जंतुक करणे:- प्रदुषित पाण्याच्या निर्जंतुकीकरणापेक्षा नव्या व दुरुस्त केलेल्या पाण्याच्या नळांच्या पृष्ठभागावरील कार्बनी पदार्थाच्या थरात तळापर्यंत जावा लागतो क्लोरिनच्या चांगली प्रभावी दिसण्यासाठी पाण्याचे नळ प्रथम साफ करणे व स्वच्छ धुणे आवश्यक असते. 
नळ जोडणीसाठी वापरायचे ताग, यान किंवा इतर पदार्थ ५० भा /दलभा तीव्रतेचे क्लोरिन द्रावण असणाऱ्या भाड्यात कमीत कमी ३० मिनिटे ठेवावे लागतात. पाण्याचे क्लोरिनीकरण करण्यासाठी क्लोरिनच्या नेहमी ज्या मात्रा वापरल्या जातात त्यापेक्षा बऱ्याच जास्त प्रमाणात (१० ते २०० भा / दलभा ) क्लोरिन वापरावा लागतो. ज्यावेळी क्लोरिन १२ ते २४ तास नळाच्या संपर्कात रहातो. त्यावेळी १० भा / दलभा हे किमान प्रमाण वापरावे मात्र ज्यावेळी नळांतील कार्बन पदार्थ धुवून निघणार नाहीत हे माहीत असेल किंवा जंतुनाशक काल अगदी कमी ठेवणे भाग पडत असेल तर बऱ्याच जास्त प्रमाणात क्लोरिनचा वापर करावा लागतो. जंतुनाशनासाठी कमीतकमी ३० ते ६० मिनिटे संपर्क काल असावा लागतो. 

नळ निर्जंतुक करण्यासाठी निरनिराळ्या पद्धती वापरात आहेत. पण सर्वात चांगला परिणाम साधायचा असेल तर सुवाह्य क्लोरिनीकारकाद्वारा नव्या वा दुरुस्त केलेल्या नळातील पाण्यात क्लोरिन वायू वा हायपोक्लोराईट द्रावण आवश्यक त्या प्रमाणात सोडावे. नळातील पाणी जवळच्या उघडया जलस्तंभातून ठराविक वेगाने बाहेर सोडून नळ धुवून काढावा. 

No comments:

Post a Comment