काल विजयनगरमधील प्रसिद्ध उद्योजक श्री. अरुण म्हसकर यांची मुलाखत घेतली. त्यांनी मला आपल्या आईविषयी लिहिलेली यशोगाथा मला सांगितली. प्रत्येक यशस्वी उद्योगाच्या मागे एक स्त्री असते हे सत्य मला उमगले. मात्र या स्त्रिया स्वतःहून पुढे येत नाहीत त्याना प्रकाशात आणण्याचे काम ज्ञानदीप करणार आहे.
Wednesday, August 17, 2022
Friday, December 18, 2020
थोडसं जुन्या सांगली हायस्कूल विषयी
थोडसं जुन्या सांगली हायस्कूल विषयी .......
कृष्णा नदीच्या काठी एका उंचावटयावरील सहा गल्ली असलेलं गाव म्हणजे सांगली. १८०१ साली मूळ मिरज जहागिरीतून फूटून पहिल्या चिंतामणराव आप्पासाहेब पटवर्धन यांनी वेगळं राज्य बनवलं तेव्हापासून या गावाचा ख या अर्थांनं इतिहास सुरु झाला. शिक्षण हेच आर्थिक, सामाजिक, सांकृतिक विकासाचा पाया असल्याने शिक्षणाचे महत्व ओळखून श्रीमंत धुंडीराज उर्फ तात्यासाहेब पटवर्धन यांच्या काळात सांगली संस्थानात शिक्षणाला सुरवात झाली. १८६४ साली सांगली इंग्लिश स्कूलची स्थापना झाली. सांगलीत इ.१८६४ मध्ये सुरु झालेल्या इंग्लिश स्कूललाच नंतर इंग्रजी माध्यमांचे स्वरुप आले असावे. तत्कालीन संस्थानाधिपदी धुंडिराज तात्यासाहेब पटवर्धन यांच्या कारर्किदीत सुरु झालेल्या या पहिल्या इंग्लिश स्कूलमध्ये इ.स. १८७८ पर्यंत हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच विद्यार्थी होते. या शाळेच्या इ.स. १८८२ मध्ये झालेल्या पुर्नरचनेनंतर सहाव्या इयत्तेपर्यंतच्या विद्यार्थ्यांची संख्या शंभरावर पोहोचली त्यावेळी ही शाळा राजवाडयातील एका भागात भरत होती. क्रिकेट आणि गायनाचे शास्त्रशुध्द प्रशिक्षण देणारी ही सांगलीतील पहिली शाळा म्हणता येईल. त्या काळात इंग्लिश स्कूल ही एकमेव सरकारी शाळा होती. याच शाळेची पुढे १८८४ साली सांगली हायस्कूल, सांगली या नावाने शाळा सुरु झाली. हणमंतराव भोसले या प्रख्यात क्रीडाशिक्षकामुळे क्रिकेटपटू विजय हजारे, बॅडमिंटन पटू नंदू नाटेकर यांच्यासारखे क्रीडाक्षेत्रातील नामवंत या शाळेला देता आले. ड्रॉईंग, गायन, तालिम, क्रिकेट अशा विषयांसाठी वेगवेगळा शिक्षक नेमण्याची प्रथा एकेकाळी या शाळेत होती. स्वातंत्र्योत्तर काळात शासनाने ही शाळा १ एप्रिल १९५३ साली तंत्रशिक्षण सुरु करण्याच्या अटीवर लठ्ठे एज्युकेशन सोसायटीकडे हस्तांतरीत झाली. शास्त्र शाखेचा उच्च माध्यमिक विभाग १९७५ मध्ये आणि १९८८ मध्ये व्यावसायिक शिक्षण (एम.सी.व्ही.सी.) विभाग सुरु झाला. लठ्ठेतंत्रनिकेतनची सुरवात या शाळेच्या आवारातच झाली. तंत्रशिक्षणासह या शाळेला आधुनिक स्वरुप देण्यात नेमगोंडा दादा पाटील, आमदार कळंत्रेआक्का, अड.केशवराव चौगुले, जी.के. पाटील, टी.के. पाटील, अड एस.एस. पाटील. बापूसाहेब कुंभोजकर आदी मंडळीचा मोठा सहभाग आहे.वास्तूशिल्प कलेचा उत्कृष्ठ नमुना
सांगली हायस्कूलची भव्य इमारत ब्रिटीश कालीन असुन गोथीक वास्तुशिल्पाचा उत्कृष्ट नमुना आहे. दुसरे चिंतामणराव पटवर्धन यांच्या काळात संस्थानचे प्रशासक कॅप्टन बर्क यांच्या कारकिर्दीत इ.स. १९०७-०८ मध्ये निसर्गसंुदर अशा आमराईच्या सान्निध्यात सांगली हायस्कूल बांधण्यात आले आणि सांगलीच्या ऐतिहासिक वैभवात भर पडली. सांगली हायस्कूलच्या इंग्रजी स् (एल) आकाराच्या इमारतीची रचना ब्रिटीश वास्तुशास्त्रानुसार आहे. क हाडचे मक्तेदार देवी यांच्या वतीने सांगलीतील ज्यून्या पिढीतील बांधकाम व्यावसायिक गोविंददास आणि केशवदास शेडजी या बंधुनी ती बांधली आहे.
इमारतीचे नुतनीकरण
१०० वर्षांचा साक्षीदार - ज्ञानवृक्ष
एक प्रेरणा - हुतात्मा आण्णासाहेब पत्रावळे
सांगली हायस्कूल म्हणजे स्वातंत्र्य चळवळीचे केंद्रच होते. जेष्ठ नेते वसंतदादा पाटील यांच्या पुढाकाराने झालेल्या जेल फोडो मोहिमेत हुतात्मा झालेले आण्णासाहेब पत्रावळे या शाळेचेच विद्यार्थी होते. आण्णासाहेब पत्रावळे म्हणजे देशभक्तीचा धगधगता निखाराच होता. 'जेल फोडो' च्या आधीही ते एकदा तुरुंगात जाऊन आले होते. त्यामुळे त्यांची लढाऊ वृत्ती आणखी वाढली होती. 'तुरुंगातून सुटलास बुवा' असे त्यांचे मित्र त्यांना म्हणाले. त्यावर 'मी पुन्हा तुरुंगात जाईन आईएवढीच भारतमाता मोठी आहे. तिच्या मुक्तीसाठी मी मरणार आहे.' असे उत्तर पत्राावळे यांनी दिले होते.ड्रॉईंग हॉललगतच्या वर्गात ते शिकले जेल फोडो मोहिमेत ते हुतात्मा झाले ही बातमी सांगली हायस्कूल मध्ये पोहोचताच विद्यार्थ्यांमध्ये ब्रिटिशांबद्दल संतापाची लाट उसळलेली होती.सांगली हायस्कूल भूषण - माजी विद्यार्थी
प्रख्यात ज्ञानपीठ परितोषिक विजेते थोर साहित्यिक वि.स.खांडेकर, कविवर्य यशवंत, उदयोगपती आबासाहेब गरवारे, स्वातंत्र्यसेनानी हुतात्मा आण्णासाहेब पत्रावळे बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर, साहित्यिक श्रीनिवास शिंदगी स्व.आण्णासाहेब लठ्ठे गुरुनाथ गोंविद तोरो, शीघ्र कवी गोपाळ गोविंद मुजुमदार उर्फ साधुदास, शास्त्रीय संगीताचे गाढे संगीतज्ञ प्रा.ग.ह.रानडे, केशवसुत संप्रदायाचे अध्वर्यु धोंडो वासुदेव गद्रे तथा कवि काव्यविहारी अशी या शाळेची माजी विद्यार्थ्यांची परंपरा आहे.परदास्याची बेडी होती पायी तव जेधवा
पुत्रं शहाणे तुझे दंगले संसारी तेधवा
काही वेडी तयाची भडकुनी गेली मने
क्रांती पूजा केली त्यांनी रुधिराच्या तर्पणे
राष्ट्रयोगिनी माजी आमदार कळंत्रेआक्का, स्वातंत्र्य आंदोलनात प्राणाची आहुती देणारे हुतात्मा आण्णासाहेब पत्रावळे, देशरक्षणांर्थ देशाच्या सदहद्दीवर कर्तव्य बजावताना वीरमरण पावलेल्या हुतात्मा स्कॉड्न लिडर अनिल घाडगे, कवी गिरीश, प्रसिध्द कायदेतज्ञ केशवरावजी चौगुले, स्वातंत्र्य सैनिक स्व. आण्णासाहेब पाटील सिंहगड एज्यु. संस्थेचे संस्थापक प्राचार्य श्री.एम.एन. नवले तसेच मुंबईचे प्रसिध्द स्त्री रोग तज्ञ डॉ. महेंद्र परीख, पद्मश्री डॉ. विजयकुमार शहा, प्रसिध्द ग्रंथीतज्ञ डॉ. वसंतराव खाडीलकर मा.खाजदार प्रकाश बापू पाटील, माजी आमदार प्रा.शरद पाटील आंतराष्ट्रीय क्रिकेटपटू विजय हजारे, प्रसिध्द बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर, कबड्डीपटू शंकर गावडे, अर्जुन पुरस्कार प्राप्त कबड्डीपटू राजू भावसार, वेटलिफ्टींग चॅम्पियन अनिल पाटील, राष्ट्रीय व्हॉलीबॉलपटू आसिफ मुल्ला यांच्या सारखे किर्तीमान माजी विद्यार्थी याचा हायस्कूलचे विद्यार्थी आहेत.
सांगली हायस्कूलला नामवंत मुख्याध्यापक/शिक्षकांची परंपरा आहे. लोकमान्य टिळकांचे सहाध्यायी असलेले हरी गणेश करमरकर या शाळेचे पहिले मुख्याध्यापक होते नाटयाचार्य कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर, राजकवी साधुदास, चित्रकार देवल, पाटीलशास्त्री, श्रीपादशास्त्री देवधर, शंकरशास्त्री केळकर, मुदगलकर असे नामवंत शिक्षक या संस्थेला जुन्या काळात लाभले. तालीम मास्तर लिमये यांनी मुलांकडून व्यायाम आणि गायन मास्तर गोडबोले यांनी संगीताची तालिम करुन घेतली. प्रख्यात क्रीडाशिक्षक हणमंतराव भोसले यांच्या तालमीतच विजय हजारे सारखे क्रिकेटपटु येथे तयार झाले.
Thursday, November 26, 2020
उद्योगरत्न वि. रा वेलणकर
सांगलीत उद्योगाची मुहूर्तमेढ रोवणारे श्री गजानन मिल्सचे संस्थापक उद्योगरत्न वि. रा वेलणकर आणि त्यांची परंपरा तेवढ्याच हिमतीने चालविणारे सांगली भूषण श्री रामसाहेब वेलणकर यांच्या कार्याची ओळख व्हावी या हेतूने मी जानेवारी २०२० मध्ये श्री रामसाहेब व संचालिका श्रीमती अंजुताई वेलणकर यांची भेट घेतली आणि ज्ञानदीपतर्फे त्यांची वेबसाईट करण्याची इच्छा प्रदर्शित केली. त्यास त्यांनी आनंदाने मान्यता दिली.मात्र नंतर मी अमेरिकेला आल्याने आणि कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे आम्हाला त्यांच्याकडून सर्व माहिती मिळण्यात व्यत्यय आला.
तरी त्यांच्या कॅलेंडरवरून उपलब्ध झालेली काही माहिती खाली देत आहे.
सुदामपुरी
७ मार्च १९१४ रोजी दादासाहेब पुण्याहून माग घेऊन सांगलीच्या पटवर्धन सरकारांच्या मुळे त्यांच्या गणपतीमळ्यात आले. सांगलीत येण्याचा हा दिवस गुढी पाडव्याचा- वर्षप्रतिपदेचा दिवस होता. त्यामुळे सांगलीच्या नागरिकांनी गुढ्यातोरणे उभारली होती. दादासाहेबांनी ती आपल्यासाठीच असल्याचा शकुन मनाशी बाळगला. गणपती मळ्यातील सोपा, पाण्याने भरलेली विहीर, नारळीची बाग हे सारे पाहून दादासाहेबांना अत्यंत आनंद वाटला. पुढे या जागेतच त्यांनी आपला कारखाना सुरू केला. तीन मागांवर सुरू झालेला कारखाना पुढे १0 मागांचा झाला. प्रत्येक मागासाठी एक मागवाला लागायचा. हे मागवालेही दादासाहेबांनी स्वतःच्या तालमीत मोठ्या मेहनतीने तयार केले. १० मागाचे १८ माग झाले. राजेसाहेबांकडून घेतलेले ७००० रुपयांचे कर्ज दादासाहेबांनी मुदतीच्या वर्षभर आधीच फेडले होते. त्यामुळे १९२६ साली ते जेव्हा स्वत:च्या जागेत आले, तेव्हा त्यांना एका पैशाचेही कर्ज नव्हते.
गणपती मळ्यात गरज पडेल तसे दोन तीन सोपे बांधून झाले होते आणि आता पुढील वाढीस अनुलक्षून दुसरी जागा शोधणे क्रमप्राप्त होते कारण गणपती मळ्यातल्या कारखान्याला जागा अपुरी पडू लागली. १९२६ साली ही जागा तर खाली करून द्यावी लागणार होती. त्यामुळे स्वतःची जागा असावी असे त्यांच्या मनाने घेतले. त्याप्रमाणे त्यांनी जागा घेतली आणि म्हणूनच त्यांना मोठा पसारा मांडता आला.
जागा घ्यायची हे ठरले परंतु ती कुठे मिळणार आणि कशी मिळणार हे प्रश्न होते. तिच्यासाठी ठरलेले निकष कोणते? कोरडी जागा हा पहिला निकष आणि पाया कमी खणायला लागावा त्यामुळे खर्च कमी होईल हा दुसरा निकष. अशी जागा. कुठेतरी सांद्रीकोंद्रीत नसावी. १९२२ साली अशी जागा मिळाली. मग दादासाहेबांनी राजेसाहेबांना मोठ्या हिकमतीने राजी करून त्यांच्या संमतीने ही जागा जमीन मालकाकडून मिळवली. उत्तराभिमुख इमारत बांधण्यासाठी ती सोयीस्कर होती. कारखान्यासाठी घेतलेली सर्व जागा दादासाहेबांनी राजेसाहेबांकडून फॅक्टरी एरिया करून घेतली. ही त्यांची दूरदृष्टीच नव्हे का? नंतर पहिले काम कोणते केले असेल तर तिथे विहीर खणली. १९२३ साली या विहिरीला पाणी लागले तेव्हा ते बेताचेच होते, पण पुढे ते वाढत गेले. विहिरीला असलेल्या भरपूर पाण्यामुळे कारखान्याचे रंगखाते जोमाने कार्यरत राहू शकले. विहीर, पाण्याची टाकी, विहिरीच्या आत तळघरासारखे जलमंदिर व हवा खात बसावयाची गच्ची. या सर्वांना मिळून नाव मिळाले 'आनंद भवन”. तालमीचे काम पूर्ण होईपर्यंत दादासाहेब तिथेच रोजचा व्यायाम करायचे.
श्री गजानन मिल्सच्या आकाशमंदिराची (टॉवरची) इमारत १९२५ च्या श्रावण महिन्यात पूर्ण झाली. १९२६ साली.गणपती मळ्यात १८ लूम होते. ते सगळे नवीन इमारतीत आणले.
कारखान्याची इमारत बांधायला गोकाकचा दगड मागवला. समोर उभे राहून, गवंडी हाताखाली घेऊन दादासाहेबांनी हा कारखाना बांधला. आतासारखे आर्किटेक्ट, सिव्हिल इंजिनिअर वगैरे कोणीही हाताशी नव्हते. विहिरीपासूनची इमारत, पोर्च, पाठीमागे मागासाठीची इमारत एवढा पसारा त्यांनी बांधून पूर्ण केला.
पोर्चसमोर रेल्वेलाईन असल्यामुळे कारखान्याची जाहिरात उत्तम प्रकारे .करता येत असे. दोही बाजूंना ऑफिस, मध्यभागी सायझिंग-वापिंग, मागे मागखाते असे इमारतीचे सर्वसाधारण स्वरूप होते गणपती मळ्यातले जुने घर जसेच्या तसे उकरून आणून इथे लावले. घर म्हणायचे त्याची इमारत म्हणजे कुडाच्या भिंती, कडेला लाकडी खांब आणि वर छप्पर. ही अशी!
कारखान्याची इमारत ही दादासाहेबांच्या आयुष्यातली पहिलीच इमारत पण अतिशय अभ्यास करून आणि हौसेने ती बांधलेली. एक सुंदर टॉवर, पोर्च यांचा समावेश असलेली १२० > ४० फुटांची ही सुंदर इमारत. त्यात मग १८ मागांचा कारखाना दिमाखात सुरू झाला. जवळूनच आगगाड्यांच्या येरझाऱ्यांमुळे उत्पादनाची जाहिरात करणे हेही आयतेच जमून गेले.
दादासाहेब जेव्हा जेव्हा आपल्या आयुष्याच्या कृतार्थतेचा विचार करत तेव्हा सांगलीच्या राजेसाहेबांचे उपकार व प्रेम त्यांना आठवल्याखेरीज रा॒हूत नसे. पुराणकाळात कृष्णाच्या सुदाम्यावरील मित्रप्रेमाची आणि सुदाम्याच्या कृष्णावरील भक्तिप्रेमाची परिणती कशी झाली याची तुलना त्यांच्या मनात सुरू होई. आपल्या श्रमांचे सार्थक करण्यामध्ये राजेसाहेबांचा फार मोठा आधार होता
या वास्तविक समजामुळे राजेसाहेबांच्या विषयी दादासाहेबांच्या मनात आदर आणि प्रेमाचा भाव नेहमीच वसत असे. त्यातूनच स्वतःला सुदाम्याच्या जागी कल्पून त्यांनी आपल्या कारखान्याच्या लहानग्या वाडीला सुदामपुरी हे नाव देऊन टाकले. .
रामभरोसे माग शेड
१९१४ साली दादासाहेब सांगलीत आले तेव्हा सांगलीत एकाही कोष्ट्याचे घर नव्हते. दादासाहेबांनी प्रयत्नांची शिकस्त करून तीन मागांच्या कारखान्याला सुरुवात केली. त्यावेळी यांत्रिक मागावर काम करणारी माणसे सांगलीत अजिबात नव्हती. प्रत्येक मागवाला ती. दादासाहेबांना प्रयत्नपूर्वक तयार करावा लागला. कारखान्यातला प्रत्येक प्रोसेसचा कारागीर त्यांना अगदी शून्यातून तयार करावा लागला. सांगलीत सुताशी संबंध आलाय असे दोनच समाज होते ते म्हणजे एक तर ब्राह्मण समाज- त्यांना जानव्याकरता आणि दुसरा भुई समाज- त्यांना मच्छी पकडण्यासाठी सुताचा वापर करायला लागायचा. यातील भुईगल्ली जवळ असल्याने त्यांना माग आणि इतर प्रोसेसिंगची कामे शिकवण्याचे काम ती. दादासाहेबांनी सुरू केले. असे तयार केलेले कामगार फोडणे आणि त्यांच्या साह्याने आपले माग चालवणे हा मार्ग स्पर्धकांना मोकळा होता.
गजानन मिल्सच्या टॉवरची घंटा वाजू लागलेली घंटा ऐकून का कोण जाणे, पण एका उद्योजकाला विणकामाच्या धंद्यात शिरावे असे वाटू लागले. वेलणकरांशी स्पर्धा करू पाहणाऱ्या या माणसाने वेलणकरांच्या कारखान्यातील माणसे फोडून स्वतःचा कारखाना सुरू करण्याची योजना केली. त्यावेळी संस्थानातील अधिकाऱ्याला मुख्य पाहुणा म्हणून बोलवून या प्रतिस्पर्ध्याने त्याच्या उद्घाटन समारंभाला ती.दादासाहेबांनाही आमंत्रण केले, एवढेच नव्हे तर त्या आपल्या भाषणात ती.दादासाहेबांनाच आव्हान देणारी भाषा केली. ते जाहीररीत्या म्हणाले की, 'शेंडी तुटो की पारंबी तुटो मी थांबणार नाही.तुमच्याशी कडक स्पर्धा करायलाच मी हा कारखाना सुरू केलाय." असं म्हटल्यावर या लागट कुरापतीमुळे ती.दादासाहेबांच्या मनाला ही गोष्ट फार झोंबली. आपल्याशीच आणि भर समारंभात केलेली ही आव्हानाची भाषा ऐकून त्यांची झोप उडाली. पण त्यावर शाब्दिक प्रतिटोला मारण्याच्या भरीस न पडता रचनात्मक वृत्तीने ते आव्हान दादासाहेबांनी मनोमन स्वीकारले आणि कामाला लागले. दुसऱ्याच दिवशी रात्रीच्या गाडीने दादासाहेबांनी मुंबईला प्रस्थान ठेवले. मुंबईला जाऊन मुंबईच्या मुक्कामात ६0 मागांची खरेदी त्यांनी केली व ते ६० मागांचे खाते सुरू करण्याचे काम त्यांनी हातात घेतले.
या मागाच्या खात्याकरता इमारतीची गरज होती, ती इमारत दादासाहेबांनी बांधायला काढली आणि नवीन ९० » ६0 फुटांचे नवीन खाते उभे राहिले. एवढी मोठी गुंतवणूक, स्पर्धेला निकराने तोंड देण्याच्या ठाम निश्चयाने केली आणि त्यातील यशापयशाची गोष्ट त्यांनी श्री रामरायाच्या हवाली सोडली. यश-अपयश सगळे रामरायावर हवाला ठेवून त्यांनी या नव्या खात्याचे नामकरण 'रामभरोसे मागखाते' असेच केले.
कोणतीही गोष्ट करताना ती सकारात्मक विचारानेच करायची ही दादासाहेबांची वृत्ती या प्रसंगातून दिसून येते.
जपानी माग खाते
१९३५ मध्ये दादासाहेब जपानला गेले, तेव्हा इतरत्र जगभर ब्रिटिश साम्राज्य होते. त्यामुळे परदेशी जायचे म्हटले की लोकांचा ओढा इंग्लंड, अमेरिका, युरोप इकडे जाण्याचा होता. युरोपमध्ये निर्माण होणारे नवीन कारखाने फार मोठ्या प्रमाणावर भांडवली गुंतवणुकीचे असल्यामुळे त्यासाठी जास्त पैसे गुंतवावे लागतील, त्यापेक्षा लहान कारखाना घालायचा असेल तर जपानला जाऊन अशा प्रकारच्या कारखान्याचा अभ्यास घडला तर तो योग्य होईल असे वाटून दादासाहेबांनी जपानला जायचा निर्णय घेतला. त्यांचा हा निर्णय म्हणजे एक प्रकारे एक क्रांतीच होती.परंतु जपानला जायचे म्हटल्यावर त्यांच्या मार्गात काही अडचणी होत्या आणि उद्दिषटेही होती.
१) नवीन ज्ञान घ्यायचे म्हणजे मुख्य अडचण भाषेची होती. दादासाहेबांचे तर फक्त इंग्लिश पाचवीपर्यंतचे शिक्षण असल्याने त्यांना इंग्रजीही चांगले येत नव्हते. त्यात जपानी भाषा तर पूर्णपणे परकी होती.
२) आहे तोच धंदा वाढवायचा की नवीन धंदा घालायचा हा एक प्रश्न त्यांच्यासमोर होता.
३) तिथल्या धंद्यांचे स्वरूप अजमावून आपल्या चालू असलेल्या साड्या-लुगड्यांच्या धंद्यामध्ये जपानच्या कारखानदारांची आपल्याला काही स्पर्धा होईल काय, याबाबत अभ्यास करायचा होता.
४) जपानी भाषा शिकून त्यांना एक पुस्तक काढायचे होते, पण ते कसे साध्य करायचे ही एक अडचणच होती.
५) तिथले कारखाने जाऊन बघायचे कसे ?आपल्याला तेथे प्रवेश कसा मिळायचा? हाही मोठा प्रश्न होता.
१- पहिला प्रश्न त्यांनी सहजी सोडवला. ज्याचं इंग्रजी चांगलं आहे अशा आपल्या एका सहकारी मित्राला बरोबर घेऊन जायचे त्यांनी ठरवले.
२- दुसऱ्या प्रश्नाला त्यांनी उत्तर ठरवलं की, आहे तोच धंदा वाढवायचा.
३- आपल्याला तिथला कारखाना काही कॉम्पिटिशन करेल का हे पाहायला, ते इथून आपल्या कारखान्यातल्या साड्या बरोबर घेऊन गेले कन *असा माल तुम्ही पुरवू शकाल का?” याची चौकशी करून तेवढ्या व्हरायटीज ते काढू शकत नाहीत हे अजमावले.
४- जपानमध्ये त्यांनी एक दुभाषा नेमला. दिवसभरात जी जी वाक्ये अडतात, ती सहकारी मित्र श्री. विठ्ठल जोश्यांकडून इंग्रजीत लिहून घ्यायची आणि जेव्हा जपानी भाषेतील आदल्या दिवसांची वाक्ये घेऊन दुभाष्या यायचा तेव्हा ती नवीन वाक्ये त्याच्याकडे द्यायची.
५- तिथले कारखाने पाहण्यासाठी सहजच आत जायचे आणि कोणी अडवले तर 'मी परदेशी आहे, पाहायला आलो होतो” असे सांगून जेवढे बघता येईल तेवढे पाहायचे आणि बाहेर पडायचे असा क्रम त्यांनी ठरवला.
या अडचणीतून मार्ग काढणे तसे अवघड होते, पण दादासाहेबांनी ते केले.
येताना, आपल्या कारखान्यासाठी आवश्यक यंत्रे आणून ती कशी बसवायची हे योजून दादासाहेबांनी जपानला असतानाच इथे सांगलीत त्यासाठी गरजेच्या इमारतीचे काम चालू केले. त्यांची समज आणि दूरदृष्टी किती पल्लेदार होती हे यावरून लक्षात येते.
२२ डिसेंबर १९३५ ला ते भारतात आले. तिथून येताच ८0 मागांचा कारखाना स्वतःसाठी आणि विठ्ठुलराव जोशीसाठी रोप आणि टेपचा छोटा कारखाना ते घेऊन आले.
जपानी माग खात्याची उभारणी पूर्ण करून १ ऑगस्ट १९३६ ला त्यातून उत्पादन केलेला माल त्यांनी मार्केटला टाकला. 'वल्कली कापड असे नाव त्याला देऊन पहिला आर्टसिल्कचा कारखाना त्यांनी सुरूही केला या वल्कली कापडाचा कारखाना जपानमधून आणणे हाच हेतू प्रामुख्याने डोळ्यांसमोर ठेवून दादासाहेबांनी जपानचा प्रवास केला असावा असेच म्हटले पाहिजे.
जपानहून येताना दादासाहेबांनी काही सुंदर सुंदर गोष्टीही इथे आणल्या. तिथून एक बोनसाय आणले. आणलेल्या अनेक वैशिष्ट्यपूर्ण वस्तूंत बारा माहितीपटांचा (फिल्मस्) समावेश त्यात होता. रणगाडा किंवा मशीनगन टँकर व्हेलची शिकार कशी काय करतो या माहितीपटाचाही त्यात समावेश होता. येताना सोन्याच्या मुलामा असलेल्या कपबश्या त्यांनी आणल्या. मोती, विविध प्रकारचे पडदे, जाहिरातीसाठी पातळे नेसवायच्या बाहुल्याही आणल्या होत्या. जे जे उत्तम, वेचक वाटले, त्या वस्तूंचा उपयोग करून घेण्यासाठी त्यांनी त्या बरोबर आणल्या. इथे आल्यानंतर ज्ञानमंदिरात' या वस्तूंचे प्रदर्शनही त्यांनी भरवले. ते प्रदर्शन पाहायला सांगलीतीलच काय पण बाहेरगावाहूनही लोकांनी गर्दी केली. तीन-चार दिवस लोकांच्या झुंडी प्रदर्शन पाहायला लोटत होत्या.
सांगलीच्या राणीसाहेबांना द्यायला सुंदर पार्टिशन्स आणली होती. इतरही अनेक मान्यवरांना त्यांनी सुंदर सुंदर वस्तू भेट म्हणून मोठ्या हौसेने दिल्या. जपानमधून निऑन साईन आणून श्री गजानन मिल्स या नावाचा ५0 फूट लांब आणि ५ फूट उंचीचा बोर्ड उभा केला.
एका जपानच्या प्रवासात अनेक गोष्टी त्यांनी साध्य केल्या. केवळ अशक्य वाटतील अशा गोष्टी करून दाखवल्या. आमच्या कुटुंबासाठी तर हा चमत्कारच होता. 'जपानच्या प्रवासाची शिदोरी” हे माहितीपूर्ण पुस्तकही त्यांनी लिहिले आणि ते चांगले वाचकप्रिय झाले.
केवळ सातवी पास माणसाची कर्तृत्वाची झेप भव्यदिव्य दृष्टिकोन लक्षात घेतला तर शाळेबाहेर अनुभवाचीही एक शाळा असते आणि तिथले शिक्षण माणसाला उंचीवर नेते हे पटल्याखेरीज रहात नाही.
Tuesday, November 3, 2020
ज्ञानदीप फौंडेशनचे प्रमुख आधारस्तंभ श्री अरविंद यादव यांचे अचानक दुःखद निधन
ज्ञानदीप फौंडेशनचे प्रमुख आधारस्तंभ आणि ज्ञानदीप इन्फोटेकचे डायरेक्टर श्री अरविंद यादव यांचे अचानक दुःखद निधन झाल्याचे कळल्यावर फार वाईट वाटले.
दोन दिवसांपूर्वीच माझे त्यांच्याशी फोनवर बोलणे झाले होते. त्यांची पुण्यातील बहीण गेली म्हणून त्ते पुण्याला गेले होते. मी त्यांना स्कूल फॉर ऑल या वेबसाईटसाठी विषयवार शिक्षकांची माहिती गोळा करण्यास सांगितले होते. सांगली आकाशवाणीचे सुनील कुलकर्णी यांचे नावही त्यांनी मला त्यावेळी सुचविले होते.
पहाटे ज्ञानदीपचे प्रवीण कोकाटे यांचा फोन आल्यावर मला धक्काच बसला. कदाचित बातमी चुकीची असेल या कल्पनेने मी इतरांना फोन केला. दुर्दैवाने बातमी खरी ठरली. माझे एक ज्येष्ठ सहकारी आपल्यातून निघून घेल्याचे मनाला फार दुःख झाले.
जिल्हा परिषदेतून निवृत्त झाल्यावर त्यांनी मराठी विज्ञान प्नबोधिनी आणि ज्ञानदीपच्या कार्याला वाहून घेतले होते.
त्यांचा थोडक्यात परिचय
जन्म - ८-५-१९३९
सांगली जिल्हा परिषदेत ३५ वर्षे सेवेनंतर १९९७ मध्ये निवृत्त.
सेवाकाळात माजी जिल्हाधिकारी सौ. लीना मेहेंदळे यांचे विश्वासू अधिकारी म्हणून कार्य
ते जगन् मित्र होते. सांगलीतील तसेच शालेय स्तरावरील शिक्षण क्षेत्रातील बहुतेक सर्वांशी त्यांचा घनिष्ट मैत्रीपूर्ण संबंध होता.
- खेळ, फोटोग्राफी, १७० शास्त्रीय संगीत रागांचे संकलन ( १००० कॅसेटस् व १००० फोनोग्राम रेकॉर्डस् चा संग्रह.
- कै. मधुकर घारगे यांच्या वस्तुसंग्रहासाठी सहकार्य.
- निसर्ग प्रतिष्ठान, मराठी विज्ञान प्रबोधिनीचे कार्यवाह.
- ज्ञानदीप इन्फोटेक प्रा. लि. या संस्थेत २००३ मार्केटींग विभाग प्रमुख
- ज्ञानदीप इन्फोटेक प्रा. लि. या संस्थेत २०१३ पासून डायरेक्टर
- ज्ञानदीप फौडेशनचे सुरुवातीपासून म्हणजे २००५ पासून विश्वस्त
- चित्रकला, बॅडमिंटन, कॅरम, क्रिकेट व इतर सर्व खेळांत पारंगत.
- ड्रायव्हिंग उत्तम येत असल्याने ज्ञानदीपच्या तसेच आमच्या घरातील कोणत्याही कामास ते आमची कार चालवत असत.
- सांगलीतील मराठी साहित्य संमेलनाच्या वेळी आणि इनोव्हेशन सेमिनारचे वेळी तसेच पुणे, कोल्हापूर, इस्लामपूर अशा ठिकाणी अनेकवेळा माझेबरोबर कारने ड्राईव्ह करत येऊन तसेच निष्णात फोटोग्राफर असल्याने फोटो काढत त्यांनी ज्ञानदीपच्या कार्याचा विस्तार केला.
त्यांच्या सर्व कार्याचा परिचय यथावकाश ज्ञानदीप फौंडेशनच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येईल.
माझ्या पत्नीच्या आजारपणात त्यांची मला फार मदत झाली. आमच्या घरातील सर्वजण त्यांना आपल्या घरातीलच एक व्यक्ती समजत होते.
मी २०१६ साली अमेरिकेत आल्यानंतर तर त्यांनी या दोन्ही संस्थांची जबाबदारी पूर्णपणे सांभाळली होती. त्यांचे कार्य असेच जोमाने करत रहाणे ही जबाबदारी आता आपणा सर्वांची आहे.
त्यांना ज्ञानदीपतर्फे व व्यक्तिशः माझ्या व आमच्या कुटुंबियांतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली. - सु. वि. रानडे, ज्ञानदीप, सांगली.
.
Friday, October 30, 2020
छोट्या डबीत मावणारे सूक्ष्म गीतरामायण
सांगलीतील कै. रा. ग आपटे यांनी छोट्या डबीत मावेल एवढ्या सूक्ष्म आकारात स्वहस्ते गीतरामायणाचे पुस्तक लिहून आपले नाव कलाक्षेत्रात अजरामर केले आहे.
श्री. रा. ग. आपटे माझ्या आत्तेबहिणीचे पती. घरीबामुळे कोकणातून सांगलीत येऊन गाडगीळ सराफ यांचे घरी आश्रित म्हणून रहावयास आले. शिक्षण पूर्ण करून गाडगीळ यांच्या सराफी दुकानात विक्री आणि जमाखर्च करीत आपले आयुष्याची उमेदीची वर्षे त्यांनी व्यतीत केली. सचोटी, सालस आणि सात्विक स्वभावामुळे त्यांनी दुकानात मालक आणि ग्राहक दोहोंचा विश्वास संपादन केला होता.
त्यांचे अक्षर सुवाच्च होते. घरी कलाकुसरीच्या वस्तू आणि चित्रे काढण्याचा त्याना छंद होता. गीतरामायणाची लोकप्रियता पाहून त्याना याची सूक्ष्म अक्षरांत हस्तलिखित प्रत करण्याची कल्पना सुचली. तग प्रत्यक्षात आणल्यावर ज्ञानदीपने आपल्या मायमराठी वेबसाईटवर त्याची बातमी प्रसिद्ध केली आणि आपटे प्रसिद्धीच्या झोतात आले.
पुढे ते पुण्यातील सराफी दुकानात कामास लागले. गाडगीळ सराफांनी त्यांच्या पंचाहत्तरीनिमित्त चांदीची गीतरामायणासाठी डबी देऊन त्यांचा सत्कार केला. दोन वर्षांपूर्वी त्यांचे दुःखद निधन झाले. आता त्यांच्यामागे त्यांचा मुलगा राजेंद्र पुण्यात संगणक क्षेत्रात काम करीत आहे. त्याचेकडे हे गीतरामायण आपणास पहावयास मिळेल.













