Saturday, April 13, 2024

Digitisation - Major essential requisite for India's Development

It is said that Knowledge is power. But knowledge requires information and information also well connected and concievable.

When I read in newspaper that Govt. Dept, Municipal council or village panchayat cannot trace the files of resolutions and project design of Sheri Nalla project and the issue of distribution system of  treated water for irrigation has remained unresolved for a long time. I got surprised how the data and records became untracable when most people in Sangli know each and every event in Sheri Nalla pollution which has remained as the source of pollution in every summer.

Ref : https://www.esakal.com/paschim-maharashtra/dhulgaon-scheme-unreliable-farmers-303230

सांगलीतील शेरीनाल्याचे पाणी, त्यावर आधारित गाजलेल्या निवडणुकांतील राजकारण हे सर्वश्रुत आहे. त्यात ...

महापालिका योजनेच्या कराराची माहिती महापालिकेसह जीवन प्राधिकरण मंडळ अन्‌ ग्रामपंचायतीकडे उपलब्ध नाही. तत्कालीन मंत्री आर. आर. पाटील यांच्या सूचनेनुसार ठराव दिले; मात्र त्याचे इतिवृत्तही सध्या उपलब्ध नाही. याचा गैरफायदा मंडळ घेत आहे. एकूणच गोंधळाची परिस्थिती आहे.

I felt very sorry for state of affairs being myself an environmental engineer and participant in the Sheri Nalla diversion design scheme.

 I just compared this with my experience in USA and felt the need to write this blog.

For last six years I am  compiling comprehensive information about  San Fransisco bay area in California state for our newly launched website mysiliconvalley.net as the first offshore project. Based on  the experience of such work in developing mysangli.com and mykolhapur .net portal websites, I tried to collect information from library books and normal news media websites.

Soon, I realized that huge information is available for each field like history,  geo-physical and environmental information, utility infrastructural services, transport, housing, Shops, businesses, flora and fauna,education, health, law,  city and county administration. All the data was with quantitative and statistical data, images, thematic maps in great detail both at government level as well as many private agencies and organizations. I realized that compilation of such data is is just impossible for me except to jot down source links of these datasets.

Moreover all data in dynamic and is updated regularly.

The work of developing such data must have required large manpower and huge investments. All this work was done by using thousands of It personnel  from India and other countries. I know many companies in India who are doing such work for many advanced countries.

 In India, digitization has just started at few places. All the literature in different languages is non transferable  being locked in print media. All official records are locked in physical paper files in different languages and formats and distributed at many levels and places. I had to search for my birth and marriage certificates by visiting many offices in Satara and Pune and finally had to get them attested by notary.

Personal data is not so important, but legal documents, bank registers, land records, property documents,  project drawings and  society or administrative approvals and registrations lie in heaps of paper files  and become untraceable, or get lost in fire or flood thus wiping out historical records.I know many incomplete irrigation systems  also have this issue of non traceable records.It is possible the such files might have been stolen, destroyed or kept untraceable by some to their advantage.

Goernment of India has started digital India project with major initiative and publicity, however, lot has to be done  at ground level at many places. It is necessary to digitize all available  documents and records must be atleast  stored digitally  as scanned documents on priority basis.  Conversion to searchable, readable and analyzable data is next step. Government departments cannot handle this task as they lack necessary skilled manpower and the quantum of work is very huge.

Govt should give such work to small private IT firms which will generate employment opportunities  in this sector at all places. Foreign MNCs are investing heavily in smart city projects of India but their objective is mainly to capture customer base for their products and services. The requirement is not limited to smart cities or large projects but in every sector and at all levels.

Wednesday, April 3, 2024

स्वयंउद्योजक बना

भारतात शिक्षणाविषयी प्रचंड जागरुकता निर्माण झाली आहे ही चांगली गोष्ट आहे. चांगले शिक्षण मिळावे यासाठी गरीब पालकदेखील आपल्या पोटाला चिमटा काढून, भरमसाठ देणग्या देऊन महागड्या शाळांत आपल्या मुलांना घालतात.

शिक्षणाची ही ओढ व गरज लक्षात घेऊन त्यापासून केवल आर्थिक लाभ मिळविण्याच्या उद्देशाने अनेक खासगी शिक्षणसंस्थांचा उदय झाला. शासकीय वा विद्यापिठाच्या नियमानुसार लागणारा शिक्षकवर्ग कागदोपत्री दाखवून वा तात्पुरता नेमून या शिक्षणसंस्थांनी मान्यता मिळवून घेतली. चांगल्या इमारती, आधुनिक सुखसोयी व जाहिरातबाजी यांच्या जोरावर अधिकाधिक विद्यार्थी व त्यांच्याकडून देणग्या घेण्यासाठी चढाओढ सुरू झाली. शिक्षण हा व्यवसाय मानल्याने व या व्यवसायाचे गिर्‍हाईक दिखाऊ गोष्टीवर भुलते हे माहीत असल्याने योग्य पगारावर चांगले शिक्षक नेमण्याकडेया शिक्षणसंस्थांनी दुर्लक्ष केले.

विद्यार्थ्यांचे लक्षही प्रत्यक्ष शिक्षणापेक्षा नोकरीसाठी आवश्यक ती पात्रता मिळविणे याकडे असल्याने विद्यार्थी केवळ परीक्षार्थी बनले आहेत. केवळ चांगल्या पगाराची वा सरकारी नोकरी हेच ध्येय असल्याने शालेय शिक्षणानंतर महाविद्यालयीन पदवी शिक्षण, नंतर पदव्युत्तर शिक्षण व तेही अशा पायर्‍या पार करतात. मर्यादित नोकर्‍या व प्रशिक्षित विद्यार्थ्यांची प्रचंड संख्या या मुळे स्पर्धापरिक्षा, मुलाखती, अनुभवाची आवश्यकता यासारख्या पात्रता कसोट्या पार कराव्या लागतात आणि तरीही शिक्षणासाठी द्याव्या लागणार्‍या देणग्यांप्रमाणे नोकरीसाठीही भ्रष्टाचाराला निमूटपणे मान्यता द्यावी लागते. मग यदा कदाचित नोकरी मिळाली तर असे भाग्यवान खर्च झालेले पैसे वसूल करण्यासाठी पुनः भ्रष्टाचार सुरू करतात.

मध्यंतरीच्या काळात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात भारताची जी भरभराट झाली त्यामुळे या क्षेत्रात नोकरीच्या फार मोठ्या संधी निर्माण झाल्या. पदवी शिक्षण पूर्ण होण्याआधीच भरपूर पगाराचे आश्वासन देऊन विद्यार्थ्यांना आपल्या कंपनीसाठी करारबद्ध करण्यासाठी अनेक कंपन्या पुढे आल्या. त्यामुळे या क्षेत्रात प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची झुंबड उडाली. गलेलठ्ठ पगार घेऊन चैनीत राहणार्‍यांची संख्या वाढली. त्याचा फायदा घेऊन इतर व्यवसायांनी व सेवा देणार्‍या संस्थांनी व बिल्डरनी आपले दर वाढवले. महागाई वाढली व कमकुवत पायावर उभी राहिलेल्या या प्रगतीने भुलभुलैयाचे स्वरूप धारण केले. अमेरिकेमध्ये इ. स्. २००० च्या सुमारास माहिती तंत्रज्ञान क्षेत्रास अशीच भरती आली होती. मात्र ३/४ वर्षातच केवळ भागभांडवलाच्या बाजारामुळे वर आलेले हे सारे उद्योग कोलमडले व बेरोजगारीचे संकट उभे राहिले.
सध्या जागतिक मंदीच्या लाटेमुळे तशीच परिस्थिती भारतात निर्माण झाली आहे. या क्षेत्रातील विद्यार्थ्यांनाच नोकरी मिळणे दुरापास्त झाले आहे असे नव्हे तर नोकरीत असणार्‍यांनाही नोकरी गमावण्याची वा पगारकपात निमूटपणे स्वीकारण्याची वेळ आली आहे. व्यवसाय करण्याचे ज्ञान, धाडस नसल्याने व कर्जाचे डोंगर डोक्य़ावर असल्याने नोकरी गमावणार्‍यांची फारच दैना झाली आहे. समाज या विलक्षण परिस्थितीने हादरून गेला आहे. आर्थिक दृष्ट्याही याचे सर्व व्यवसायांवर प्रतिकूल परिणाम होऊ लागले आहेत.
आता सर्वत्र अनिश्चितीचे वातावरण आहे. विद्यार्थी कोणते क्षेत्र निवडावे या संभ्रमात आहेत. आता खरी कसोटी शिक्षणसंस्थांची आहे. प्रचंड पैसा खर्च करून बांधलेल्या दिखाऊ इमारती व सुखसोयी विद्यार्थ्यांना आकर्षित करू शकणार नाहीत. विद्यार्थी नसले की या इमारती म्हणजे आर्थिक बोजा ठरणार आहेत.

यावर उपाय काय? माझ्यामते शिक्षणाचे उद्दिष्ट परिक्षेपेक्षा व्यवसायाभिमुखता करण्याची वेळ आली आहे. स्वयंरोजगार निर्मिती हे शिक्षणसंस्थांनी आपले उद्दिष्ट ठरविले पाहिजे. सध्या प्रत्येक शाळाकॉलेजात विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव देण्यासाठी मंडळे कार्यरत असतात. मात्र त्यांनी उद्योजक बनावे यासाठी मार्गदर्शन देण्यासाठी फारच थोडे प्रयत्न केले जातात. हॉर्वर्ड विद्यापिठाचा आदर्श आपल्या शिक्षणसंस्थांनी घेण्याची गरज आहे. हॉर्वर्ड विद्यापिठात केवळ उद्योगास मार्गदर्शनच दिले जात नाही तर विद्यार्थी असतानाच विद्यार्थ्यांना उद्योजक बनण्यास प्रवृत्त केले जाते. आज तेथे कॉर्पोरेट दर्जाचा उद्योग विद्यार्थी समर्थपणे चालवीत आहेत.

सातार्‍यात कै. भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेच्या धनिणीच्या बागेत ‘कमवा व शिका’ योजना सुरू केली होती. कॉलेजची पहिली दोन वर्षे माझे शिक्षण सातारच्या शिवाजी कॉलेजमध्ये झाल्याने मला हे कार्य जवळून पहायला मिळाले. त्यावेळचे विद्यार्थी कोणतेही काम हलके न मानता आनंदाने व अभिमानाने अशी कामे करीत असत. अमेरिकेसारख्या प्रगत देशात विद्यार्थीच काय पण शिक्षकही कोणतेही काम करण्यात कमीपणा मानत नाहीत. श्रमाबद्दल कमीपणाची भावना आजकाल विद्यार्थ्यांमध्ये दिसते. याचे कारण दिखाऊ व्यक्तीमत्व जपण्याकडे प्रवृत्ती व टी. व्ही., सिनेमा यांचा प्रभाव असावा. श्रमाला पूर्ववत प्रतिष्ठा मिळवून देण्याचे काम सध्याच्या शिक्षणसंस्थांनी हाती घ्यावयास हवे. व्यवसायातील संधी शोधणे, त्याची पूर्ण माहिती घेणे, तशा उद्योगात प्रत्यक्ष काम करणे याला शिक्षणक्रमात महत्वाचे स्थान दिले पाहिजे. जर शिक्षणसंस्था असे उद्योजक बनवू शकल्या तरच विद्यार्थी तेथे प्रवेश घेतील अन्यथा इमारती व सुखसोयी कितीही चांगल्या असल्या तरी विद्यार्थी त्याकडे ढुंकूनही बघणार नाहीत.

सध्या नोकरीत असणार्‍यांनीही नोकरीची अशास्वतता लक्षात घेऊन स्वयंउद्योजक बनण्याचे स्वप्न बाळगले पाहिजे. चैन टाळून तसेच अनुत्पादक वा अनिश्चित लाभ पर्यायात पैसे न गुंतवता त्यांचा उपयोग स्वतःचा भावी उद्योग उभारण्याच्या दृष्टीने खर्च केला पाहिजे. नोकरी चालू असल्याने प्रत्यक्ष स्वतःला उद्योग करणे शक्य नसले तरी नोकरीच्या शोधात असणार्‍यांना वेतन देऊन त्यांचेकडून व्यवसाय करवून घेण्यासाठी पैसे खर्च केले तर फार फायदा झाला नाही तरी गरज पडली तर स्वतः त्यात सहभागी होण्यासाठी योग्य ती साधनसामुग्री, ग्राहकवर्ग व अनुभव यांची जुळणी होऊ शकेल. मग नोकरी जाण्याबद्दल भीती उरणार नाही.


सध्या परदेशात वास्तव्य करत असणार्‍यांनी तर या गोष्टीवर गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता आहे व भारतात असा उद्योग सुरू करण्याचा विचार केला पाहिजे. कारण मंदीमुळे वाढलेल्या बेरोजगारीतून वंशविद्वेषाचा वणवा वाढू शकतो याचा प्रत्यय येऊ लागला आहे. भावी काळात अशा परदेशी राहणार्‍या भारतीयांना नोकरी व सुरक्षितता याविषयी चिंता वाढू शकते.यासाठी भविष्यात अशी वेळ आलीच तर आपल्या पायावर उभे राहण्यासाठी आतापासूनच प्रयत्न सुरू करणे हितकारक ठरेल. भारतातील नोकरी गेलेल्या लोकांना मदतीचा हात देऊन सावरण्याची व त्यातून स्वतःचा उद्योग स्वदेशात उभारण्याची सुसंधी परदेशस्थ नोकरदारांना प्राप्त झाली आहे. त्यांनी जर असे केले तर सध्याच्‍या बेरोजगारीच्या कठीण पेचप्रसंगातून मार्ग निघेलच, शिवाय परदेशस्थांना स्वदेशात हक्काचा स्वयंउद्योग उभारता येईल.

Software and Web applications in Environmental Engg.

Dnyandeep Foundation, pioneer in Website design and development in Marathi and English has entered in the field of Environmental Consultancy with a dedicated  group of retired professors having consultation experience of over three decades, chemists and professionals to provide pollution control and environmental management services to local bodies and industries.

Building proficiency in Website design and Mobile App development can help in strengthening your prospects in career development. Dnyandeep Foundation has decided to develop web and mobile applications in field of Environmental Engineering.
 Dnyandeep foundation shall provide all assistance, training  and guidance to fresh graduates who are new to the subject but are ready to learn  these techniques.
The environmental engineers  who are interested in participating in this long term collaborative  project may contact info@dnyandeep.net indicating their proficiency in computer programming. 
If you have experience, expertise or interest in any environment related  field, you can contribute this group as consultant, faculty or information provider.

You are welcome to send your opinion and suggestions to improve the utility of this website. Please feel free to contact info@dnyandeep.net for any assistance you need in your studies or getting resources. 

Saturday, March 30, 2024

मराठी ज्ञानभाषा होण्यासाठी ज्ञानदीपचे आंदोलन


ज्ञानदीप इन्फोटेक प्रा. लि. या वेबडिझाईन कंपनीने इ.स. २००० पासून मराठी माध्यमास आपल्या वेबसाईट, सॉफ्टवेअर व मोबाईल सुविधांमध्ये महत्वाचे स्थान दिले आहे.
 

 
महाराष्ट्रात आज बहुतेक शहरांच्या वेबसाईट इंग्रजीत असून सर्वसामान्य जनतेला त्याचा काही फायदा होत नाही. प्रसिद्ध मराठी वृत्तपत्रांच्या वेबसाईटवर गुगलसारख्या आंतरराष्ट्रीय कंपन्या आपल्या जाहिराती देत असल्याने स्थानिक उद्योग व व्यावसायिकांना आपल्या वस्तू वा सेवा यांची जाहिरात या माध्यमातून करता येत नाही.महाराष्ट्र हे उद्योग
, तंत्रज्ञान तसेच विज्ञान संशोधनात आघाडीवर असणारे राज्य आहे. मात्र इंग्रजी भाषेच्या अडथळ्यामुळे हे ज्ञान सर्वसामान्यांच्या जीवनात क्रांती घडवून आणण्यात अपयशी ठरलेले आहे. सध्या विज्ञान व उच्च तंत्रज्ञान फक्त इंग्रजी भाषेची मक्तेदारी झाल्याने मराठीत याविषयी काही लिहिणेही कमीपणाचे वाटू लागले आहे.
 
महाराष्ट्रातील प्रत्येक गावाची आणि शिक्षणसंस्थेची मराठी माध्यमातील वेबसाईट  तसेच मोबाईल एप 
 बनवून त्यावर स्थानिक उद्योग व व्यावसायिकांच्या जाहिराती अगदी कमी खर्चात प्रसिद्ध करण्यासाठी मोठे कृतिशील आंदोलन उभारण्याची गरज आहे.
 
ज्ञानदीप महत्वाच्या शहरांमध्ये असे कार्यगट स्थापन करून अशा वेबसाईट बनविण्यास  व त्या आर्थिक दृष्ट्या सक्षम बनविण्यास लागणारे त्यांना सर्व ते तंत्रज्ञानविषयक साहाय्य मोफत देणार आहे.
 
 एकटे ज्ञानदीप फौंडेशन हे सर्व काम करू शकणार नाही. मात्र मराठीवर प्रेम असणा-या सर्वांनी एक कर्तव्य म्हणून असे कार्य आरंभले तर हेही सहज होऊ शकेल. मग आंतरराष्ट्रीय मोठ्या आयटी कंपन्यांचे जाहिरातींवरील आणि शिक्षणावरील वर्चस्व संपुष्टात येईल. सर्वांन काम मिळेल आणि आपल्या स्वदेशी उद्योग आणि व्यवसायाला नवसंजीवनी मिळेल.
 
परभाषेतहि व्हा पारंगत ज्ञानसाधना करा, तरी
मायमराठी मरते इकडे परकीचे पद चेपू नका
भाषा मरता देशही मरतो संस्कृतिचाही दिवा विझे
गुलामभाषिक होऊनि अपुल्या प्रगतीचे शिर कापु नका
 
---
कवि कुसुमाग्रज ( स्वातंत्र्यदेवीची विनवणी ) 


मराठी विज्ञान परिषदेसारख्या संस्था गेली अनेक वर्षे मरा्ठीतून विज्ञानप्रसाराचे काम करीत आहेत. या उपक्र्मात मोठमोठे शास्त्रज्ञ व तंत्रज्ञ सहभागी झाले आहेत. त्यांनी विज्ञान तंत्रज्ञानातील शब्दांना समर्पक मराठी शब्द शोधून त्यांचा वापर करून बरेच लिखाणही केले आहे. तरीही हे काम शालेय विद्यार्थ्यांपुरतेच मर्यादित राहिले. याचे कारण मराठीतील पर्यायी शब्द व प्रचलित इंग्रजी शब्द यांची सांगड घालून अर्थ समजावून घेण्याचा खटाटॊप करण्याएवढा वेळ देण्याची लोकांची तयारी नसते. साहजिकच अशा मराठी साहित्याकडे केवळ अभ्यासण्याजोगी मराठी कलाकृती या दृष्टीकोनातून पाहिले गेले.

मराठी असे आमुची मायबोली,
तिला राज्य का? विश्वभाषा करु
जगातील विद्या तशी सर्व शास्त्रे
तिच्यामाजि आणोन आम्ही भरु
 
- प्र. ग. सहस्त्रबुध्दे

शुद्ध मराठी पर्यायी शब्दांचा आग्रह धरल्याने मराठीतील असे बरेच साहित्य सर्वसामान्यांना दुर्बोध झाले आहे. कालांतराने हे मराठी शब्द रूढ होतीलही पण प्रगत विज्ञान व मराठीतील भाषांतरित ज्ञान यातील अंतर वाढतच राहील. भाषेचा मुख्य उद्देश ज्ञान संक्रमित करणे हा असल्याने नेहमीच्या वापरातील इग्रजी शब्दही मराठीत निःसंकोचपणे वापरून हे ज्ञान लवकरात लवकर विशेष प्रयास न करता सर्व सामान्य जनतेला कसे समजू शकेल याचा विचार दुर्दैवाने झाला नाही.

नको पप्पा - मम्मी, आई - बाबा म्हणा
वात्सल्याच्या खुणा शब्दोशब्दी
धन्यवाद म्हणा नको थँक्यू थँक्यू
थोडे थोडे रांगू मराठीत
 
---कवि किशोर पाठक - प्रकाशनविश्व २००१

माझ्याही बाबतीत असेच घडले. १९६८ मध्ये पर्यावरण विषयात एम. ई. करतानाच मराठीत हे ज्ञान यावे असे मला वाटले. मराठी साहित्य संस्कृती मंडळातर्फे जलशुद्धीकरणया विषयावरील जागतिक आरोग्य संघटनेचे चार्लस कॉक्स या लेखकाच्या पुस्तकाचे मराठीत भाषांतर करण्याचे काम मी अंगावर घेतले. मराठी साहित्य संस्कृती मंडळाचे श्री. बा. रं. सुंठणकर यांनी सांगलीत माझ्या घरी येऊन या माझ्या कामास प्रोत्साहन दिले. माझ्या या कामास मार्गदर्शक म्हणून निवृत्त सचिव व मुख्य अभियंता असणारे श्री. वि. ह. केळकर हे काम पहात होते. त्यांनी धरण व जलसिंचन विषयावरील पुस्तके भाषांतरित केली होती. जलशुद्धीकरणातील सेटलिंग व फिल्ट्रेशन या प्रक्रियांसाठी त्यानी अवसादन व निस्यंदन हे मराठी शब्द सुचविले. अशा पद्धतीच्या अनेक संस्कृतोद्भव नव्या शब्दांचा उपयोग करून जिद्दीने मी ते ३०० पानांचे पुस्तक भाषांतरित केले खरे. जलशुद्धीकरण केंद्राची देखभाल करण्याविषयी अतिशय बहुमोल अशी माहिती यात असल्याने मी ते जलशुद्धीकरण केंद्रातील लोकांना वाचायला दिल्यावर पूर्ण वाचायचे कष्ट न घेता वरवर चाळून छान भाषांतर आहेएवढ्या अभिप्रायाने त्यांनी ते परत केले. या पुस्तकाचा प्रत्यक्ष व्यवहारात काहीही उपयोग होणार नाही हे कळून चुकल्याने जवळजवळ ६०० पानांचे ते हस्तलिखित प्रकाशित न करता मी तसेच ठेवून दिले.

गेल्या पन्नास वर्षात मराठीत अनेक नवे पर्यायी शब्द आता रुढ झाले आहेत मात्र त्यासाठी बराच काळ जावा लागला आज विज्ञान तंत्रज्ञानाची प्रगती ज्या वेगाने होत आहे त्याच्याशी तुलना करता भाषांतरित ज्ञान लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी एवढ्या उशीरापर्यंत थांबणे परवडणारे नाही. इंग्रजी शब्दांचा बिनदिक्कतपणे वापर करून म्रराठीचा केवळ संपर्क भाषा म्हणून वापर करण्याची गरज निर्माण झाली आहे.

शासनाने ठरविले असते तर विज्ञान तंत्रज्ञानातील नव्या मराठी शब्दांच्या वापराला निश्चितच बळ मिळाले असते. रशियाने सर्व इंग्रजी पुस्तकांचे व संशोधनपर लेखांचे रशियन भाषेत भाषांतर करण्याचे काम सक्तीने तेथील साहित्यिक व शास्त्रज्ञांकडून करवून घेतले होते. राष्ट्रीय अस्मिता जपण्याचा व वाढवण्याचा तो मार्ग त्यांनी अवलंबिला होता.

आजही शासकीय व्यवहार, कायदा, शेती, सहकार या क्षेत्रात शासनाच्या पुढाकारामुळे मराठीने चांगले पाय रोवले आहेत. मात्र विज्ञान तंत्रज्ञानाकडे शासन याबाबतीत जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. उलट यासाठी इंग्रजी शिक्षणास प्रोत्साहन देण्याचे धोरण निश्चित केले आहे. मुलांनी इंग्रजी शिकून मगच विज्ञान तंत्रज्ञानाच्या वाटेला जावे असे शासनाला वाटत असावे. त्यांचे हे मत विद्यार्थ्यांसा्ठी योग्य आहे असे मानले तरी शाळेबाहेर पडलेल्या वा शाळेतच न गेलेल्या बहुसंख्य मराठी लोकांचे काय? त्यांना हे ज्ञान मिळविण्याचा कोणता मार्ग उपलब्ध आहे.

मराठी ही फक्त साहित्यिकांची भाषा आहे अशा थाटात शासन त्याकडे पहात आहे. केवळ साहित्य संमेलनाला देणगी दिली की आपले मराठीविषयी दायित्व संपले अशी भावना शासनाची झाली आहे. मराठी शिकणे म्हणजे व्याकरण शिकणे व साहित्य वाचणे एवढाच अर्थ शिक्षण क्षेत्रातही रूढ आहे. त्यामुळे मराठी शिकविणारे प्राध्यापकही मराठी वाचतात पण लिहीत नाहीत. मराठी घेऊन बीए एमए होणार्‍यांना काही मान नाही व शिक्षण क्षेत्राशिवाय कोठे संधी नाही. भाषांतर हा मुख्य उद्देश मराठी शिकण्यासाठी ठेवला तर हा विषय व्यवसायाभिमुख होईल. मात्र त्यासाठी मराठीचा दुराग्रह न ठेवता किमान दोन भाषांचा अभ्यास करण्याची व भाषांतराची कृती सत्रे अत्यावश्यक थरविण्याची गरज आहे.

आज मराठी लिहिण्याबद्दल कमीपणाची भावना व विलक्षण उदासीनता शिक्षित वर्गात निर्माण झाली आहे. इंग्रजी वाचलेले कळत नाही व मराठीत साहित्य उपलब्ध नाही जे आहे ते प्रत्यक्ष वापरातील शब्द नसल्याने दुर्बोध आहे आजचा जिज्ञासू मराठी वाचक व विद्यार्थी अशा तिहेरी कात्रीत सापडला आहे.

प्रचलित इंग्रजी शब्दांचा वापर करून मराठीत असे साहित्य निर्माण करणेच या परिस्थितीत योग्य ठरेल. मराठीवर प्रभुत्व असणार्‍या लोकांनी नवे शब्द जरूर तयार करावेत पण त्याविना अडायचे कारण नाही. रशियासारखे महाराष्ट्रात होणार्‍या प्रत्येक संशोधनाचा गोषवारा मराठीत प्रसिद्ध करण्याचे बंधन शासन व शिक्षणसंस्था घालू शकतात. सर्वांनी या बाबतीत कर्तव्याच्या भावनेतून मराठीत लिहिण्याचे ठरविले तर मराठी ज्ञानभाषेचे स्थान पुन्हा मिळवू शकेल.

साय मी खातो । मराठीच्या दुधाची ।
मी कुणाचा उंबरा झिजवू कशाला ? ।।
 
- कवि सुरेश भट
 
मराठीला खरी ज्ञानभाषा बनविण्याविषयी साहित्यिक व राजकीय नेते काही खास उपाययोजना सुचवतील व त्या अमलात आणतील अशी आशा करूया. -  डॉ. सु. वि. रानडे, ज्ञानदीप, सांगली

Tuesday, March 19, 2024

School education must be in regional language

In India, people get attracted to English medium schools as they think their kids will get world class education, however, they become expert only in following western culture and cannot understand the subject knowledge which needs mastery over English. 

Many private schools have started in cities with speciose buildings, garden, playgrounds with facilities of  pick-up vans and buses. Parents prefer such schools even though fees are quite high comparable college education. Students also feel pride in going to schools as they have special uniforms, attractive school bag and other utilities not available in ordinary schools. They develop superiority complex as they can talk in English. If the parents are uneducated, they do not understand how far the students is progressing. Even in educated families as the medium of conversation is not English, the students find difficulty in mastering this foreign language.

Till the time they learn English, other subjects remain difficult to grasp. As a result, the students lag behind the students learning in ordinary schools where subjects as well as  English are taught in native language.

 Unfortunately, IT, IOT, Robotics and AI developments are in English, hence there is an urgent need of translation of these subjects in regional language as these tools are targeting students through many social media channels and corporate education giants. If India has to become self-reliant then education in regional languages should become compulsory at school level.

Dnyandeep Foundation has initiated training of the advanced IT related courses in Marathi medium at school level and wishes to equip teachers of all Marathi medium schools to have Dnyandeep Mandal, where such training facility for all students can be developed.

Students will be trained to learn and write blogs on various topics in Marathi medium and manage their school website.

A dedicated web portal https://school4all.org has been launched to publish information and activities of such schools. As modern IT resources are essential for all subjects, all the teachers in the school will be given training and info of net resources available in their subjects.

Dnyandeep Mandal will be knoledge and innovation centre for school. As school children are more linked to families, the information can easily percolate to society and needy people.

Thou the plan is ambitious, it needs active cooperation  many teachers, and IT experts fro colleges. Even college student organisations can undertake such extention projects and bparticipate in Dnyandeep project.

 For more information, please visit https://school4all.org and also suggest new ideas and methods for success in this plan.

Monday, March 18, 2024

मुंबई पर्यावरण व संतुलित विकास

 ज्ञानदीपच्या मुंबई शाखेतर्फे ७ एप्रिल २०२४ रोजी नियोजित चर्चासत्र -

मुंबई पर्यावरण व संतुलित विकास

मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी. वेबसाईट व मोबाईल अॅपसाठी मराठी भाषेचा आवर्जून उपयोग करणा-या ज्ञानदीप फौंडेशनचे मुंबईत शाखा सुरू करण्याचे स्वप्न मुंबईचे निवृत्त मुख्य अभियंता श्री. सु. ना. पाटणकर यानी पूर्ण केले आहे. त्यांच्या मुलुंड येथील निवासस्थानी ज्ञानदीप फौंडेशनची मुंबई शाखा १५ ऑगस्ट २०२३ रोजी सुरू झाली.

मुंबई चे पर्यावरण, विकास तसेच सामाजिक व सांस्कृतिक कार्याची स्थानिक जनतेला माहिती व्हावी या उद्देशाने ज्ञानदीपने माय मुंबई डॉट नेट (https://mymumbai.net)या नावाची वेबसाईट सुरू केली आहे. त्याचे औपचारिक उदघाटन ७ एप्रिल २०२४ रोजी करण्यात येणार असून मुंबईचे पर्यावरण व संतुलित विकास या विषयावर तज्ज्ञांची व्याख्याने व मराठीतून नेटद्वारे प्रशिक्षण या संबंधी चर्चासत्र आयोजित करण्यात येत आहे.

श्री सुरेश ना. पाटणकर यानी इंडियन वाटर वर्क्स असोसिएशनच्या स्थापनेत महत्वाची भूमिका बजावली होती संस्थेला मुंबई महापालिकेत ऑफिससाठी जागा त्यांच्याच प्रयत्नातून उपलब्ध झाली. या संस्थेची पहिली वेबसाईट 2004 साली ज्ञानदीप इन्फोटेकला मिळण्यासही त्यानी पुढाकार घेतला. 2021 साली ही वेबसाईट उत्तरप्रदेशातील कंपनीकडे हस्तांतरित करण्यात आली. भारतीय भाषांतून या संस्थेच्या कार्याची प्रसारित करण्याची ज्ञानदीपची कल्पना फलद्रूप होऊ शकली नाही. या संस्थेच्या 2021च्या अधिवेशनात श्री. पाटणकर यांनी ज्ञानदीपसाठी आपल्या निवासस्थानी मोफत ऑफिस सुरू करण्याची सूचना मांडली. त्यातूनच मुंबई शाखेची निर्मिती झाली.



श्री. पाटणकर यांनी 'करू या पर्यावरणाचा विविधांगी विचार' नावाचे पुस्तक मराठी विज्ञान परिषदेमार्फत प्रसिद्ध केले असून निवृत्तीनंतरही त्यांचे सामाजिक, सांस्कृतिक आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील कार्य सर्वानाच आदर्शवत आहे.

सकाळचे सत्र पर्यावरण तंत्रज्ञान व विकास या साठी तर दुपारचे सत्र मायमुंबई वेबसाईटच्या माध्यमातून जनजागृती व प्रशिक्षण यासाठी नियोजित केले असून  मुंबई शाखेच्या पुढील प्रगतीसाठी हे चर्चासत्र मार्गदर्शक ठरणार आहे.

या चर्चासत्रात सहभागी होण्यासाठी प्रतिव्यक्ती एक हजार रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. सदरचे चर्चासत्र श्री. सु. ना. पाटणकर यांनी आपल्या हॉलमध्ये घेण्यास अनुमती दिली आहे. सर्वसाधारणपणे पन्नास प्रतिनिधी येण्याचा अंदाजअसून प्रत्यक्ष नोंदणी नंतर कार्यक्रमाचे स्थळ व रूपरेषा ठरविण्यात येईल.

मराठी विज्ञान परिषद, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, इंडियन वाटर वर्क्स असोसिएशन, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण तसेच इतर पर्यावरण आणि मराठी शिक्षणक्षेत्रात कार्य करणा-या संस्थांनी आपले प्रतिनिधी पाठविले चर्चासत्राचे प्रायोजकत्व स्वीकारले तर ज्ञानदीपच्या मुंबई शाखेचे हे पहिलेच सेमिनार यशस्वी ठरेल आणि ज्ञानदीपच्या इतर अनेक त्रानप्रसार योजनेस बळ मिळेल असा मला विश्वास वाटतो.
संपर्क - ज्ञानदीप मुंबई शाखा
द्वारका, पुष्पधन्वा सोसायटी, पं. मालवीय रोड, मुलुंड ( पश्चिम)
मुंबई - 022-2567 9245
भ्रमणध्वनी - 9322272777
 - डॉ. सु. वि. रानडे, ज्ञानदीप, सांगली
इ मेल - info@dnyandeep.net / +818422310520

Sunday, March 17, 2024

दूरदर्शन दूरच बरे

टीव्हीला इडियट बॉक्स म्हटले जाते ते खरेच आहे. आपण वेड्यासारखे टीव्हीवर जे दाखवितात ते अगतिकपणे पाहात राहतो. आपला किती वेळ गेला व नुकसान झाले याचा आपल्याला अंदाज येत नाही. तीच तीच बातमी वा तेच तेच दृश्य पुनःपुन्हा दाखविले तरी ते आपल्याला पहावे लागते. मालिकेतील पुढील भाग पाहण्यासाठी जाहिरातींवर जाहिरातीचे हल्ले आपल्याला निमूटपणे सहन करावे लागतात. थोड्क्यात दूरदर्शन आपला अमूल्य वेळ हक्काने आपल्या ताब्यात घेतो.

सध्या तर दूरदर्शन वा टीव्ही या प्रसार माध्यमाने बहुतेक सर्व घरांचा ताबा घेतला आहे. कोरोनामुळे घरात बसावे लागते. मग वेळ घालवायचा सगळ्यात सोपा आणि आनंददायी पर्याय म्हणून आपण टीव्ही पहात बसतो.

चित्तवेधक जाहिराती, गाणी,   जगभरात चाललेल्या दंगली, हिंसाचार, अपघात, भडक बातम्या दाखवून लोकांना आपल्या चॅनेलकडे खेचून आणण्याची स्पर्धा पराकोटीला गेली आहे. करमणुकीसाठी नाचगाणी, नटनट्या व खेळाडूंच्या रसभरीत कथा व ओढून ताणून बनविलेल्या कौटुंबिक संघर्ष मालिका यांनी दूरदर्शन व्यापून गेले आहे. त्यातच चैनीच्या वस्तूंच्या व सौंदर्यप्रसाधनांच्या जाहिराती भर घालत आहेत. आता लॉटरीच्या धर्तीवर स्पर्धा मालिका लोकप्रिय होत आहेत. मुलांसाठी कार्टून मालिका तर युवकांसाठी सिनेसंगीत व मुव्हीज यांचाही जाहिरातींसाठी वापर होत आहे. फुकट करमणूक करण्याच्या व जगातील घडामोडींचे ज्ञान देण्याच्या बहाण्याने व्यावसायिक दूरदर्शन चॅनेलधारकानी या एरवी उपयुक्त व प्रभावी प्रसार माध्यमावर आपला बाजार मांडला आहे. दुर्दैवाने याविरुद्ध कोणीच तक्रार करीत नाही ही खेदाची गोष्ट आहे.

दूरदर्शनचा उपयोग शिक्षणासाठी व समाज प्रबोधनासाठी करण्याचे सरकारचे उद्दीष्ट असले तरी त्याची अंमलबजावणी करण्यात सरकार अपयशी ठरले आहे. व्यावसायिक चॅनेलना टक्कर देऊन समाजोपयोगी सरस व आकर्षक कार्यक्रम व विधायक संतुलित बातम्या देणे हे शासनाचे कर्तव्य आहे. मात्र त्यासाठी भरीव आर्थिक तरतूद न केल्याने या कार्यक्रमांकडे प्रेक्षक वळत नाहीत. परिणामी  दूरदर्शन हे प्रसारमाध्यम समाज उन्नतीऎवजी समाजाच्या अधोगतीस कारणीभूत होत आहे.

दूरदर्शन पाहण्यात लोक आपला किती वेळ घालवतात हे पाहिले तर धक्कादायक निष्कर्ष निघतील. दूरदर्शन पाहण्याचा नाद लागल्याने मुले वाचन व अभ्यासास कंटाळा करतात. मोठ्या माणसांना घरात बसून टी व्ही बघण्याची सवय लागल्याने महत्वाची बाहेरची कामे, समाजसेवा, सभा, व्याख्याने यांना उपस्थिती, भेटीगाठी यात चालढकल होते.  टीव्ही मालिकेतील ताणतणाव यानी विनाकारण मनात काहूर माजते. पुढे काय होणार हे पाहण्याची उत्सुकता व नंतर चटक लागते. दूरदर्शन मालिकावाले या अशा लोकांना हवे तसे ताटकळत ठेवतात व जाहिरातींचा मारा त्यांच्यावर करतात.

माझे एक मित्र टीव्हीच्या या दुरुपयोगाबद्दल फार जागरूक असल्याने त्यांनी आपल्या घरात टीव्ही घेतला नव्हता. त्यावेळी मीही त्यांच्या या वागण्यावर टीका करायचो. आता मला त्यांचे म्हणणे पटू लागले आहे. मात्र त्या मित्राच्या घरात बायको व मुलांच्या आग्रहाखातर टीव्हीने आपले बस्तान बसविले आहे.

आपण टीव्ही पाहतो तेव्हा आपला किती वेळ फुकट जातो याचा विचार करावयास हवा. तोच वेळ शिक्षण, व्यवसाय वा अन्य कामात घालविला तर किती फायदा होऊ शकेल हे लक्षात घेतले तर याची नीट  कल्पना येईल.

म्हणून दूरदर्शनचा वापर मर्यादित व जपून करा. कोणता कार्यक्रम पहायचा हे विचारपूर्वक ठरवा. आवश्यक माहिती मिळाली वा कार्यक्रम संपला की लगेच दृढ निश्चयाने तो बंद करा. मुलांपासून तर दूरदर्शन शक्यतो दूरच ठेवा. कारण तुम्ही स्वतःवर नियंत्रण ठेवू शकाल मात्र तुमच्या मुलांना याची चटक लागली की ती तुमचे काही ऎकणार नाहीत. मग त्यांच्या अभ्या्स व खेळात होणार्‍या हानीस टीव्हीऎवजी वा मुलांऎवजी तुम्ही स्वतःच जबाबदार ठराल.

Saturday, March 16, 2024

सामान्य माणूस


सामान्य माणूस कसा असतो याचे चित्रण आर. के. लक्ष्मण यांच्या व्यंगचित्रांतून, चार्ली चॅप्लीन व लॉरेल हार्डी सारख्या सिनेमांतून प्रभावीपणे व्यक्त झाले आहे. मर्यादित स्वार्थ, पापभिरुपणा, उसने अवसान, बावळटपणा, घाबरटपणा व भाबडा स्वभाव ही सामान्य माणसाची वैशिष्ठ्ये सांगता येतील. टॉलस्टॉय, मार्क ट्वेन, चेकॉव्ह यांच्या गोष्टी, पु.ल. देशपांडे, चिं.वि. जोशी यांच्या लेखांतूनही त्याचे दर्शन घडते. दादा कोंडके, लक्ष्या व आता मकरंद अनासपुरे याचे चित्रपट सामान्य माणसाचीच कहाणी सांगतात.

सामान्य माणसाच्या भावभावनांशी आपण लगेच एकरूप होतो. मात्र आपण सामान्य माणूस आहोत हे मान्य करायला मात्र बहुतेकांना लाज वाटते. अर्थात आपण असामान्य नाही हेही त्यांना पुरेपूर ठाऊक असते.

माझ्याबाबतीत मात्र मला आपण सामान्य माणूस आहोत याची मनोमन खात्री पटली आहे.मोठेपणी आता समाजकारण व राजकारण याबाबतीत माझी काही मते निश्चित झाली असली तरी लहानपणी ती सतत बदलत असायची.

मला आठवते त्याप्रमाणे १९५० ते १९६० पर्यंतचा शालेय जीवनाचा काळ विविध रंगी संस्कारांनी अगदी भारून गेला होता. सातारला राजवाडा चौकात यशवंतराव चव्हाण, एस. एम. जोशी, श्री. अ. डांगे, गॊळवलकर गुरुजी यासारख्या बर्‍याच नेत्यांची भाषणे मोठ्या भक्तीभावाने मी ऎकायचो. एकाचे भाषण ऎकले की मी त्यांच्या विचाराचा होऊन जाई. ते म्हणतात तेच खरे. बाकी सर्व चूक अशी माझी स्थिती होई. दुसरे वेगळ्या विचाराचे भाषण ऎकलॆ की माझ्या विचारांत पूर्ण बदल होई.

खेळाची फारशी आवड नसल्याने वा प्रकृतीही नाजुक असल्याने मी मैदानी खेळांच्या भानगडीत कधी पडलो नाही. त्यापेक्षा नगरवाचनालयातील पुस्तके वाचणे मला आवडे. त्यात आवड निवड नव्हती. कोणतेही पुस्तक मला चाले. सोव्हिएट देश मासिकातून मराठीत सुंदर लेख व गोष्टी येत. मी त्या वाचत असे. पुस्तक वाचनातून वैज्ञानिक व समाजवादी विचारसरणीचा माझ्यावर प्रभाव पडू लागला. एकदा मी शाळेतील मित्राला मार्क्स तत्वज्ञान काय आहे याची माहिती सांगितली. तो संघस्वयंसेवक असल्याने त्याला ते रुचले नाही. तो म्हणाला असले काही वाचत जाऊ नकोस. तुझा बुद्धीभेद होईल. तुला वाचायचेच असेल तर म्हाळगींचे मार्क्सवादावरील पुस्तक वाच.त्याला माझ्याबद्दल वाटणारी काळजी मला कळली पण मी त्याचा सल्ला मानला नाही. कारण मला कोणतेही बंधन नको वाटायचे. कधी मित्रांबरोबर शाखेत गेलो तर तेथील बौद्धीके ऎकून मला हिंदु धर्माचे भरते य़ेई. पण इतर धर्मांविषयी पुस्तके वाचली की त्यांची श्रद्धाही मला योग्य वाटू लागे.

अंधश्रद्धा, धर्म व विज्ञान या विषयांवर आमच्यात नेहमी वादविवाद होत असत. त्याबाबतीतही माझे मन सांगणार्‍याप्रमाणे हेलकावे खाई. देव आहे की नाही असे विचारले तर मला दोन्ही बाजूंनी वाद घालता येई. घरात देवाबद्दल अशी शंका घेण्याने घरातल्यांची मने दुखावतात हे पाहून मी तेथे धार्मिक रहात असे तर मित्रांत निरीश्वरवादी. रामायण महाभारतातील युद्धे, शिवाजी, राणाप्रताप यांचे पराक्रम, राणी लक्ष्मीबाई किवा सुभाषचंद्र बोस यांचा सशस्त्र संघर्ष या माहितीबरोबर महात्मा गांधींची अहिंसा व असहकाराचे स्वातंत्र्यासाठी योगदान पाहिले की मनात हिंसा-अहिंसा या मार्गांविषयी संभ्रम निर्माण होई.

आजही माझ्या स्वभावात फारसा काही फरक पडलेला नाही हे मला जाणवते. लांबची लढाई मला आवडते. पण प्रत्यक्ष लढाईला मी घाबरतो. विरुद्ध पक्षाचाही सहानुभूतीने व त्याच्या दृष्टीकोनातून विचार करण्याची सवय जडल्याने माझी अर्जुनासारखी स्थिती होते. गरिबांचे दुःख मला अस्वस्थ करते मात्र आपल्या सुखासीन जीवनाचा त्याग करून त्यांच्या उद्धारासाठी जीव झोकून काम करण्याचे धाडस होत नाही. राजकारणात तर ‘कोणता मी झेंडा घेऊ हाती’ असा रास्त संभ्रम पडतो.

पर्यावरण रक्षण का विकास, व्यक्तीस्वातंत्र्य की स्वयंशिस्त, मराठी की इंग्रजी, समाजवाद की लोकशाही असे अनेक प्रश्न माझ्या मनात अनुत्तरित राहिलेले आहेत. त्यामुळे कोणत्याही बाबतीत ठाम भूमिका घेणे मला जमत नाही.

थोडक्यात सांगायचे म्हणजे वार्‍याप्रमाणे गवताची पाने जशी त्या त्या दिशेने वाकतात तशीच सामान्य माणसाची स्थिती असते. पाने वाकली तरी मुळे भोवतालच्या समाजातील संस्कारात घट्ट रोवलेली व गुंतलेली असतात.वार्‍याला विरोध करणारी झाडे पडली तरी गवत तसेच राहते. कदाचित पाने खुडली गेली तरी मुळे शाबूत राहतात. समाज जीवनास हानी पोहोचत नाही. सत्यासाठी संघर्ष करणे आवश्यक असले तरी आपल्याला वाटणारे सत्य हॆ आपल्या आकलन शक्तीवर व पूर्वग्रहावर आधारित असते हे समजून घ्यावयास हवे. त्रयस्थपणाने खरे काय व खोटे काय याची शहानिशा करायला गेले की दोन्ही बाजूत काही तथ्य तर काही दोष आढळतात.त्यातील सत्य शोधून काढायला सामान्य माणसाला वेळ नसतो, धाडस नसते व त्याची ती कुवतही नसते.

सुदैवाने कबूल नाही केले तरी बहुतेक माणसे सामान्यच असतात. त्यांची निष्ठा, आशाआकांक्षा वैयक्तिकपणे बदलत्या असल्या तरी त्यांचा एकूण प्रभाव सत्य, अहिंसा, सर्वांभूती समभाव या चिरंतन गोष्टींचाच पाठपुरावा करतो. हेच लोकशाहीचे मुख्य यश आहे.

काळजी एवढीच वाटते की सत्ता, पैसा व अधिकारांचा वापर करून सामान्य जनसागरास आवश्यक त्या दिशेने वळविण्याचे व त्याच्य़ा प्रचंड ताकतीच्या लाटांनी हवे ते घडविण्याचे तंत्र मानवसमूहांनी विकसित केले आहे.हे मानवसमूह एखाद्या राजकीय पक्षाच्या स्वरुपात, सामाजिक चळवळीच्या स्वरुपा्त, बलाढ्य कार्पोरेट कंपनी वा सत्तापिपासू राष्ट्राच्या स्वरुपात कार्य करीत असतात. या सत्तासंघर्षात किती सामान्य माणसांचे जीवन व संसार उध्वस्त होतात याकडे कोणाचेच लक्ष जात नाही. इतर घटक सोडा पण त्यांच्यासारखी बाकी सर्व सामान्य माणसे अशा विध्वंसाकडॆ एक अपरिहार्य घटना म्हणून पाहतात व त्याची आपल्याला काही झळ बसत नाही ना याची काळजी घेतात.
प्रौढत्वी निज शैशवास जपणे बाणा कवीचा असे

या उक्तीप्रमाणे मला असे वाटते की माणसाने सामान्यच रहावे, सामान्यांविषयी आस्था ठेवावी. लोकशाही व कायदा दोहोंचे कसोशीने पालन करावे. असे झाले तर असामान्यांची समाजाला गरज उरणार नाही व पसायदानाचे उद्दीष्ट साध्य होईल.
सर्वे सुखिनः संतु ।
सर्वे संतु निरामयाः ॥
सर्वे भद्राणि पश्यंतु ।
मा कश्चित दुःखम्‌ आप्नुयात ॥
हे सर्व ठीक असले तरी काही वेळा अशा सामान्य माणसांतूनच परिस्थितीचे चटके बसल्याने, अन्याय असह्य झाल्याने वा सात्विक संताप आल्याने अथवा केवळ स्वार्थापोटी काही माणसे असामान्य कृती करतात. त्यातील काही नेते तर काही गुन्हेगार बनतात. एरवी संथ असणारा जनसागर मग यांच्यामुळे जागृत होतो. त्यात प्रचंड लाटा उसळतात. त्याचे बरे वाईट परिणाम मग सर्वांना भोगावे लागतात.
याचवेळी काही राजकीय व सामाजिक संघटित गट अशा व्यक्तीला पाठिंबा देऊन आपला स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करतात. एवढेच नव्हे तर प्रसिद्धीच्या प्रलोभनातून त्याला अतिरेकी पावले उचलायला प्रवृत्त करतात. यात त्याचा जीव गेला तरी त्याचे भांडवल करायला मिळते. तो यशस्वी झाला तर त्याला मांडलिक बनवून आपला कार्यभाग साधण्याकडे या शक्तींचा प्रयत्न असतो. नव्या सत्तासंघर्षात अशावेळी सामान्य वा अपक्ष राहणे धोकादायक ठरू शकते. मग पापभिरू माणसे सुरक्षेसाठी वा आपल्या फायद्यासाठी बलवान पक्षाच्या गटात सामील होतात.

Monday, March 11, 2024

एकच प्याला - व्यक्ती आणि समाज यांना अधोगतीला नेणारे मोहिनी अस्त्र

 प्रसिद्ध व विलक्षण प्रतिभावंत लेखक, कवी आणि नाटककार कै. राम गणेश गडकरी  यांचे एकच प्याला हे नाटक प्रत्यक्ष पाहिले नसले तरी मला पूर्वीपासून माहिती होते. पहिल्या मोहाला बळी पडल्याने सुधाकर  दारूच्या  व्यसनात कसा अडकत गेला आणि  सुधाकर व सिंधू यांच्या संसाराचाच कसा  सर्वनाश झाला याचा जीवनपटच नाटकाने प्रेक्षकांपुढे उभा केला आहे. जवळजवळ तशाच  पद्धतीने दुर्दशा माझ्या जवळच्या नातेवाईकांची आणि सहका-यांची झालेली मी प्रत्यक्ष अनुभवलेली असल्याने आणि सध्याच्या सामाजिक परिस्थितीमुळे  मी त्याबाबतीत अतिसंवेदनशील बनलो आहे. गरीबांना अन्न मिळण्याची भ्रांती असताना धान्यापासून दारू करण्याचे उद्योग सुरू होत आहेत याविरोधात   मी एक लेखही पूर्वी लिहिला होता.  

 राज्यसरकारच्या वाईन विक्रीसंबंधित धोरणावर समाजात व प्रसारमाध्यमात उलटसुलट चर्चा चालू असल्याने मला हे नाटक समाजापुढे पुन्हा परत आणण्याची गरज भासू लागली.  सुदैवाने मराठी विकीपीडीयाच्या विकीस्रोतमध्ये मला त्याची डिजिटल आवृत्ती मिळाली.

राम गणेश गडकरी यांनी  सुरुवातीच्या काळात पुण्यातील `ज्ञानप्रकाश` मध्ये उपसंपादक, `न्यू इंग्लिश स्कूल` मध्ये शिक्षक अशा नोकर्‍या केल्या. नंतर त्यांना किर्लोस्कर नाटक कंपनीत नाटयपदं लिहिण्याची संधी मिळाली व इथून त्यांची कारकीर्द सुरु झाली. नाटकांबरोबरच राम गणेश गडकरी काव्य आणि विनोदी लेखनांतही तितकेच लोकप्रिय ठरले. त्यांनी आपल्या कविता `गोविंदाग्रज` या टोपणनावाने लिहिल्या. त्या वाग्वैजयंती (1921) या संग्रहातून प्रसिध्द झाल्या.  आपलं विनोदी लेखन त्यांनी `बाळकराम` या नावाने केले. त्यांच्या साहित्यातून त्यांची अलौकिक प्रतिभा, सामाजिक व राजकीय परिस्थितीची जाण आणि प्रखर बुद्धीमत्ता यांचे दर्शन होते. त्यांचे मराठी साहित्यातील योगदान महत्वाचे आहे. व्यसन लागल्यानंतर त्यातून बाहेर पडणे कठीण असल्याने सुरवातीसच त्याचा मोह कटाक्षाने टाळावा असा महत्वाचा संदेश त्यानी एकच प्याला या आपल्या नाटकातून दिला आहे. आजच्या युवा पिढीला याची अत्यंत गरज आहे.  

नाटकातील मजकुराचे वाचन करताना जसजसे मी सर्व नाटक वाचत गेलो तसतशी  कट्यार काळजात घुसली या उक्तीप्रमाणे दारूच्या भीषण परिणामांचे दाहक सत्य मला जाणवू लागले.  व्यसनाधीनाची अगतिकता  सुधाकराच्या तोंडी घालून इतक्या उत्कटतेने मांडलेली पाहून मन बेचैन झाले व गडकरींच्या अलौकिक प्रतिभेची साक्ष पटली. 

नाटकाची कथा स्वातंत्र्यपूर्व काळातील सुधारक आणि जहाल समाजगट, स्त्रियांची दयनीय अवस्था, देशी विदेशी औषधांतील परस्परविरोध, दारू पिणा-यांचे तत्वज्ञान आणि स्त्री-पुरुष संबंधातील भावनिक ताणतणाव यांचे सुंदर दर्शन घडविते. व्यसनाधीनता हा व्यक्ती आणि समाजाला अधोगतीला नेणारा कायमचा धोका आहे. हे नाटकाने  प्रभावीपणे समाजापुढे मांडले आहे. व्यसनाधीनता इी जागतिक समस्या असल्याने या नाटकाचे इतर भाषांत भाषांतर वा रुपांतर झाले पाहिजे असे मला वाटले.

हे काम प्रथम आपणच हाती घेतले तरच या नाटकातील पश्चातापदग्ध सुधाकराची आर्त विनवणी सर्वांपर्यंत पोहोचेल या कल्पनेने मी या नाटकाचे हिंदी व इंग्रजीत भाषांतर करावयास घेतले आणि पाहता पाहता दोन महिन्यात मी दोन्ही भाषांतरे पूर्ण केली. माझे हिंदी व इंग्रजीचे ज्ञान मर्यादित असल्याने त्यात सुधारणा व योग्य वाक्यरचना करण्यासाठी तज्ज्ञ व्यक्तींची गरज भासणार आहे. मी हे सर्व भाग मायमराठी वेबसाईटवर प्रसिद्ध केले असून त्याच्या संपादनासाठी वाचकांनी मदत करावी ही विनंती.




Sunday, March 10, 2024

Live with Purpose


Life is precious. Living is an opportunity. Keep struggling to fulfill your cherished dreams. If you don’t have any, help others to achieve their goals. Sow the seeds of aspirations in young minds and instill courage and resolve to  pursue those whole hearted.


Retirement should mean only restrictions due to heath problems and not abandoning the work style. Retired people have vast store of knowledge and experience. Though it may not have direct use to solve current problems, still it can supplement the new knowledge and skill requirements and can help in fall back situations.


Invest not in money but human resources. It has many advantages. Reduction of unemployment,  availability of human support  when needed, respect for our experience and utilization of our  knowledge, opportunity to learn new things and participate in aspirations of starters in business.

It also creates new purpose for life to transmit whatever we have achieved to young generations. We also feel ourselves young and keeps us remain healthy and cheerful. We regain our lost childhood and become curious abot new technology. Try to learn from young generation by becoming studet. You will reveal that you learn fast than other fresh students as you have cultivated habit of birds eye view and can relate new concepts with your vast resource of life experience.

In fact, you can be a successful entrepreneur as you have capital, knowledge and manpower to execute your commands and plans.

In my view, this is adhyatma. The great seers of ancient times were always surrounded by their disciples eager to get guidance till the last breath.
 
Dnyandeep is trying to build this culture of bringing old and young together for growth and prosparity. I would like to get your views, suggestions and active participation. – Dr. S. V. Ranade, Dnyandeep, Sangli
Contact- info@dnyanddep.net / +919422410520

Friday, March 8, 2024

Pragyata - Guidelines for Digital Education at School Level


PRAGYATA Guidelines on Digital Education

Guidelines place a cap on duration and number of online sessions in a day
for students from Class I to XII - New Delhi 14 th July, 2020

भारत सरकारने शालेय स्तरावर ऑनलाईन शिक्षणासाठी मार्गदर्शक नियम तयार केले आहेत.
त्यात मुलांच्या सर्व आवश्यकतांचा विचार केलेला असून
त्याबद्दल अधिक मार्गदर्शन व आदर्श वस्तुपाठ ज्ञानदीप फौंडेशन देऊ शकेल.

Union Human Resource Development Minister Shri Ramesh Pokhriyal 'Nishank' released
PRAGYATA Guidelines on Digital Education through online medium.

COVID-19 pandemic has led to closure of schools and has impacted over 240 million children of the country who are enrolled in schools. Extended school closures may cause loss of learning.

To mitigate the impact of the pandemic, schools will not only have to remodel and reimagine the way teaching and learning have happened so far, but will also need to introduce a suitable method of delivering quality education through a healthy mix of schooling at home and schooling at school.
 
The Minister informed that PRAGYATA guidelines have been developed from the perspective of learners, with a focus on online/blended/digital educationfor students
who are presently at home due to lockdown.

He added that these guidelines on Digital/ Online Education provide a roadmap or pointers for carrying forward online education to enhance the quality of education. The Minister highlighted that the guidelines will be relevant and useful for a diverse set of stakeholders including school heads, teachers, parents, teacher educators and students.

The guidelines stress upon the use of alternative academic calendar of NCERT, for both, learners having access to digital devices and learners having limited or no access.
Guidelines place a cap on duration and number of online sessions in a day for students from Class I to XII

The guidelines outlines suggestions for administrators, school heads, teachers, parents
and students on the following areas:

● Need assessment
● Concerns while planning online and digital education like duration, screen time,
inclusiveness, balanced online and offline activities etc level wise
● Modalities of intervention including resource curation, level wise delivery etc.
● Physical, mental health and wellbeing during digital education
● Cyber safety and ethical practices including precautions and measures for
maintaining cyber safety
● Collaboration and convergence with various initiatives


Thursday, March 7, 2024

कळप

स्वसंरक्षणासाठी कळप करणे ही एक नॆसर्गिक प्रक्रिया आहे. अनेक प्राणी पक्षी, जलचर कळपात रहाणे पसंत करतात.

माणूस हाही कळप करून राहणारा प्राणी आहे. मात्र बुद्धिमत्तेचे वरदान लाभल्यामुळे माणसाने नॆसर्गिक कळपापेक्षा इतर अनेक प्रकारचे कळप निर्माण केले. व तो त्यातच गुरफटून गेला.जात, धर्म, पंथ, राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, संस्था, वसाहत, गाव, राज्य, देश म्हणजे जन्म, आचार, विचार, साहचर्य, स्थान, नोकरी, ध्येय, उद्योग यापरत्वे निर्माण झालेले माणसांचे कळपच आहेत.

म्हणजे प्रत्येक माणूस जे काही वागतो त्यात केवळ व्यक्तिगत स्वार्थ असतो असे नव्हे तर तो ज्या कळपात रहातो त्यामुळे त्याच्यावर ते बंधन   वा दायित्व  आलेले असते.

यामुळेच कविवर्य ग. दि माडगूळकर यांनी म्हटले आहे की

पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा

 कळपाविरुद्ध वागणार्‍याला आपण कळपद्रोही किंवा क्रांतिकारक म्हणतो.  कळपाशी एकनिष्ठ असणारे लोक त्याला कळपद्रोही व इतर कळपातील लोक त्याला क्रांतीकारक म्हणतात.

कळपाचे काही नियम असतात. काही फायदे असतात. एका कळपातील लोक स्वत:ला श्रेष्ठत्वाचा मान घेतात व इतर कळपांबाबत कनिष्ठता बाळगतात. हा एक आत्मप्रौढीचा सार्वत्रिक आविष्कार आहे.कळपाच्या चालीरीती त्याचे नियम बनतात. कळपाच्या बाहेर गेल्यास कळपातील लोक त्याचा तिरस्कार करतात. कळपातील पक्षी बाहेर पडल्यावर त्याला कळपातील पक्षीच चोचींनी घायाळ करतात तीच तऱ्हा माणसांच्या अशा कळपात होते.

समाजातून बहिष्कृत होणे व त्यांचा रोष ओढवून घेणे इत्यादी धोक्यांना अशा माणसाला सामोरे जावे लागते. त्यामुळे सर्वसाधारणत: माणसे कळपात राहणे पसंत करतात. कळपात राहिल्यास माणसास सुरक्षितता लाभते. एकटेपणाचे भय रहात नाही. स्वत:चे स्वतंत्र अस्तित्व विसरून माणूस कळपालाच स्वत:चे प्रतीक समजू लगतो.

कळपातील माणसे कळपाचे नियम पाळतात एवढेच नव्हे तर कळपाच्या रक्षणासाठी व वाढीसाठी तन, मन, धनही अर्पण करतात. म्हणजेच ती माणसे कळपाचा एक अविभाज्य अंग बनतात आणि तो कळपच एक स्वतंत्र प्राणी बनतो.कळप किती घट्ट विणीचा, किती चिवट आणि जाज्वल्य यावर त्याचे अस्तित्व वा वाढ अवलंबून असते. मात्र असा कळप शिरजोर झाला तर इतर कळपांवर आक्रमण करून स्वत: मोठा होण्याचा प्रयत्न करतो.यातून नवे प्रश्न निर्माण होतात.

सामाजिक, राजकीय वा धार्मिक संघर्ष 

सर्व कळप एकाच प्रकारे विभागले नसल्याने एकच माणूस एकाच वेळी अनेक कळपांचा सदस्य असतो. या सर्व कळपांचे नियम पाळणे त्यात समरस होणे त्याला शक्य नसते. त्यामुळे त्याची ओढाताण होते. माणूस व कळप किंवा दोन कळप यात संघर्ष होतो.असा संघर्ष टाळण्यासाठी प्रत्येक प्रकारच्या कळपांसाठी आदर्श नियमावली केली जाते. पण तरीही कळपांवे एकमेकांशी संघर्ष चालू असतात. या संघर्षात यशस्वी होण्यासाठी प्रत्येक कळप आपली ताकत वाढविण्याचा प्रयत्न करतो वा अनेक छोटे कळप एकत्र येऊन मोठ्या कळपाचे रूप घेतात.

एकंदरीत मानवी समाजव्यवस्था कळप करून राहणाऱ्या इतर प्राण्यांप्रमाणेच असते. त्यांच्या वर्तनात विलक्षण साम्य आढळते. समाजातील अनेक घटनांचा आणि मानसिक ताणतणावांचा कार्यकारणभाव शोधण्यासाठी मानवसमूहाची प्राण्याशी व अशा प्राण्यांच्या कळपातील संघर्षाशी तुलना करणे अधिक उपयुक्त ठरेल असे वाटते.

 केवळ सजीवांसाठी असलेल्या कळप या  संकल्पनेचा अधिक विस्तार केल्यास निसर्गातील इतर निर्जीव पदार्थ हे देखील एकप्रकारचे कळपच असतात असे म्हणता येईल.त्यांना विशिष्ठ गुणधर्म असतात. त्यांची स्थिती बदलते. काहींना गती असते.ऊर्जा म्हणजे त्यांच्यातील संघर्षाचे दृष्य स्वरूप असते असे म्हणता येईल.     लोखंडातील अणु एकदिश झाले की त्याचा चुंबक बनतो. या कळपांचा संघर्ष  होताना पदार्थांना नाश वा वृद्धी होते.