Thursday, November 16, 2017

रासायनिक जंतूविनाशक -आयोडीन, पोटॅशियम परमँगनेट

आयोडीन:-
  आयोडीन हा एक सर्वोत्तम जंतुनाशक आहे. आयोडिनच्या द्रावणाचाही जंतुनाशनासाठी (Tincture) उपयोग करता येतो. सर्वसाधारणपणे १ लिटर पाण्यासाठी २ टक्के तीव्रतेच्या आयोडीन द्रावणाचे दोन थेंब पुरेसे असतात. जे पाणी गढूळ व मातकट असेल वा पाणी स्वच्छ असूनही ज्याला कळण्याइतपत आयोडीन योग्य नसते. गढूळ पाणी गाळून नंतर स्वच्छ झालेल्या पाण्यावर आयोडिनचे जास्त प्रमाण वापरले तरी कोणताही धोका नसतो. फक्त त्यामुळे पाण्याला औषधी वास येतो.

ट्रेटाग्लिसाईन पोटॅशियम ट्रायआयोडाईड यासारख्या आयोडीनचा संयुगांपासून गोळ्याही तयार करण्यात येतात व अमिबा सिस्ट, करकेरीया, लेप्टोस्पिरा व काही विषाणूंचाही या गोळ्यांमुळे नाश होऊ शकतो. बाजारात मिळणाऱ्या अशा गोळ्यांची नांवे ग्लोबलिन, पिण्यायोग्य द्रावण व व्यक्तिगत जलशुद्धीकरणाच्या गोळ्या अशी असतात. आतापर्यंत तयार झालेल्या जंतुनाशकांमध्ये या गोळ्या सर्वात जास्त प्रभावी आहेत.

पोटॅशियम परमँगनेट:- 
पाण्याचे जंतुनाशन करण्यासाठी बऱ्याच वेळेला पोटॅशियम परमँगनेटचा उपयोग करण्यात येतो. तो अत्यंत प्रभावी ऑक्सिकरण सहाय्यक आहे. त्यामुळे कार्बनी पदार्थ असणाऱ्या पाण्यात त्याचा जलद नाश होतो. याचे नेहमी वापरले जाणारे प्रमाण दर २००० भागास एक किंवा ०.५ ग्रॅ. लिटर हे असते. कॉलरा विषाणूंचा नाश करण्यासाठी पोटॅशियम परमँगनेट थोडा फार उपयोग होतो पण इतर रोगजंतूंचा नाश करण्याचा बाबतीत ते फारसे उपयुक्त ठरत नाही. 

पाण्यात पोटॅशियम परमँगनेट मिसळल्यावर थोड्यावेळाने गडद तपकिरी गाळ तयार होतो. कांच व चिनीमातीच्या भांड्यावर तो सांचल्यास ओळखू येतो व घासून काढल्याखेरीज तो निघत नाही. पोटॅशियम परमँगनेट जंतुनाशक म्हणून फारसे उपयोगी पडत नाही. म्हणून पाणी निर्जतुक करण्यासाठी त्याचा वापर करू नये.

No comments:

Post a Comment