फ्लोरिडीकरणास असणारा विरोध:-
पाणीपुरवठ्यात फ्लोरिडीकरण करण्यास कित्येक कारणांसाठी विरोध करण्यात आलेला आहे अशा कारणांकडे दुर्लक्ष न करता त्यांची नीट छाननी करणे आवश्यक असते. काहींच्या मते, ही पद्धत म्हणजे ‘सामुदायिक औषधीकरण’ आहे व यासाठी धर्म व रुढींच्या करणासाठी ते या पद्धतीस विरोध करतात. तथापि फ्लोरिडीकरणात औषध असे काही नाही पण उलट इतर पाण्यात योग्य प्रमाणात असणारे हे पोषण मूलद्रव्य, ज्या पाण्यात कमी प्रमाणत असेल तेथे फ्लोरिडीकरणाने ती घट भरून पाण्यातील फ्लोराईडचे प्रमाण योग्य तेवढे केले जाते.
दुसऱ्या काहींच्या मते या पद्धतीत दिलेले फ्लोराईड बहुतेक प्रमाणात वाया जाते. कारण मुले जे पाणी पितात त्यात आवश्यक असणारे मूलद्रव्य योग्य प्रमाणात ठेवण्यासाठी त्या पाण्यापेक्षा आकारमानाने कितीतरी जास्त पाण्यात म्हणजे शहराच्या पाणी पुरवठ्यात योग्य तेवढ्या प्रमाणात फ्लोराईड मिसळले जाते. म्हणजे मुलांनी प्यायलेल्या पाण्याव्यतिरिक्त बाकीच्या सर्व पाण्यातील फ्लोराईड वाया जाते. या पद्धतीप्रमाणे मुलासाठी येणारा खर्च पुढे दिलेल्या खर्चापेक्षा जास्त असतो तर हा विरोध योग्य आहे असे म्हणता आले असते.
आणखी काही इतर लोकांचे म्हणजे असे असते की फ्लोराईड हे ‘धोकादायक पदार्थ’ असल्याने पिण्याच्या पाण्यात तो मिसळून नयेत तर मुलाना फ्लोराईड पुरविण्यासाठी दुसरी काहीतरी पद्धत वापरावी. विरोधाच्या या शेवटच्या दोन कारणांचे अधिक विश्लेषण करणे आवश्यक आहे कारण असे विश्लेषण झाले की जलकेंद्रावरील परिचालकाना लोकांना शंकांना समर्पक उत्तरे देता येतील.
सुमारे ०.२५ ग्रॅम सोडियम फ्लोराईड (Acute Marbidite) पोटात गेल्यास माणसाला अतिशय मॉर्बिडीही होते. एक ग्लासभर पाण्यात जर एवढे सोडियम फ्लोराईड टाकले तर त्याचे प्रमाण १००० भा/दलभा किंवा एक दशलक्ष गॅलनमध्ये ४ टन एवढे होते या उलट फ्लोरिडीकरण करताना पाण्यात १.० भा/दलभा एवढे फ्लोराईड ठेवण्यासाठी २.३ भा/दलभा (एक दल अनें. गॅलन पाण्यात १९ पौंड) एवढया प्रमाणात सोडियम फ्लोराईडचा वापर करावा लागतो. ह्या प्रमाणात रसायनांचा पुरवठा करण्यासाठी निवडलेल्या कोणत्याही रसायनापोषकामुळे ठराविक प्रमाणापेक्षा ४०० पत जास्त रसायन पाण्यात मिसळले जाण्याची चूक संभवत नाही. १.५ भा/दलभा किंवा त्यापेक्षा जास्त प्रमाणात फ्लोराईड असलेले पाणी मुलांनी सतत तीन महिने किंवा जास्त दिवस प्यायले तरच दातांचे लूकण ढिले होण्याचा रोग जडतो अन्यथा नाही. प्रत्यक्ष अनुभवावरून असे दिसून आले आहे की काही थोडया कालावधीला फ्लोराईडचे दिलेले प्रमाण १.० ते १.५ भा/दलभा पर्यत बदलले तरी सर्वसाधारणपणे नेहमी दिले जाणारे सरासरी प्रमाण आवश्यक त्या मात्रेपेक्षा कमीच असते. कोणत्याही परिस्थितीत सतत ३ महिनेपर्यत ५० टक्क्यांपेक्षा जास्त प्रमाणात चूक होईल हे खाली वर्णन केलेली नियंत्रण पद्धत वापरल्यास अशक्य असते.
पिण्याच्या पाण्यापेक्षा खाण्याच्या मिठात सोडियम फ्लोराईड मिसळावे असे काहीचे मत आहे कारण (घसादूखी) होऊ नये म्हणून खाण्याच्या मिठात आयोडीन मिसळण्याची पद्धत ठरली आहे. यासाठी लागणारे आयोडीन हे दिवसाला प्रत्येक व्यक्तीस ०.०१ मिग्रॅ. एवढे असते व आयोडीन समप्रमाणात पोटात गेले पाहिजे अशी आवश्यकता नसते. त्यामुळे प्रौढ व्यक्तीत मीठ खाण्याचे प्रमाण बदलते असले व लहान अर्भकांच्या पोटात अगदी कमी व जवळजवळ नाहीच एवढे कमी मीठ जात असेल तरी त्यामुळे मिठात आयोडीन मिसळण्यास काहीही बाधा येत नाही. परंतु त्यामुळेच लहान मुलांना समप्रमाणात फ्लोराईडचा पुरवठा करण्यासाठी मीठ खात्रीशीर ठरत नाही. तीच गोष्ट दुधाची कारण दूध पिणे नियमित प्रमाणात नसते. याशिवाय दुधाचा पुरवठा अनेक ठिकाणीहून होत असल्याने दुधात फ्लोरिडीकरण केल्यास अधिकाऱ्यांना त्यावर योग्य देखरेख करता येणार नाही. गोळ्याचा वा अचूक प्रमाण मिळावे यासाठी औषधांचे थेंब सोडणाऱ्या बाटल्यांत द्रावण भरून त्यांचा उपयोग करून प्रत्येकाला आपल्या घरातील पिण्याच्या पाण्यापुरतीच मर्यादित प्रमाणात ही प्रक्रिया करता येते. पण यापद्धतीचा पुरस्कार करायचा म्हणजे शहरातील सर्व मुलांना याचा फायदा मिळेल अशी व्यवहार्य योजना होण्यासाठी सर्व घरातील लोकांजवळ आवश्यक ती साधनसामुग्री आहे व ते खात्रीने योग्य प्रक्रिया करतील यावरच जास्त विसंबून रहावे लागेल. खरे म्हणजे सार्वजनिक पाणीपुरवठ्यात फ्लोरिडीकरण करण्याचा मुख्य फायदा हा आहे की जेथील पाणी मुळे पितात त्या घरांतील, शाळांतील व शहरांतील इतर ठिकाणची परिस्थिती काहीही असली तरी सर्व मुलांना फायदेशीर ठरणारी ही पद्धत असूनही शिवाय कमी खर्चाची व नियंत्रण करता येण्याजोगी आहे.
No comments:
Post a Comment