Thursday, November 16, 2017

अमोनियाच्या साहाय्याने मुक्त शेष क्लोरिनीकरण

अमोनियाच्या साहाय्याने मुक्त शेष क्लोरिनीकरण
 ही पद्धत वापरली तर मुक्तशेष क्लोरिनचे क्लोरामाईनमध्ये रुपांतर होते व अमोनिया पाण्यात घालताना पाण्यातील शेषक्लोरिनच्या प्रमाणापेक्षा अमोनियाचे प्रमाण १/२ वा एक चतुर्थांश ठेवावे लागते.

मुक्त शेष क्लोरिन व क्लोरिन डाय ऑक्साईड ही दोनच क्लोरिनची संयुगे अशी आहेत की १० मिनिटांच्या कालावधीतती संयुगे पाणी प्रभावीपणे निर्जंतुक करू शकतात. मात्र जर पाण्याचा पी.एच.८ पेक्षा जास्त असेल तर जास्त शेषक्लोरिन पाण्यात ठेवणे आवश्यक असते. मुक्त शेष क्लोरिन त्यामानाने टिकाऊ असल्याने अवसादन टाकीतही तो टिकून रहातो व त्यामुळे पूर्वक्लोरिनीकरणाचे सर्व फायदे मिळू शकतात. जर निस्यंदीत पाण्यात थोडा मुक्तशेष क्लोरिन राहील असेल किंवा बहिर्गत पाण्यात पश्चात क्लोरिनीकरण केलेले असेल तर निस्यंदित पाण्याच्या तलावात ही त्याच प्रभाव टिकून रहातो.

वितरण व्यवस्थेत शिल्लक क्लोरिन किती रहातो न पाहता फक्त जलशुद्धीकरण केंद्रातील बहिर्गमपाण्यातील ०.२ भा / दलभा प्रमाणात संयुक्त शेषक्लोरिन राखायचा अशी पूर्वीची पद्धत होती. आता नवी पद्धत वापरल्यास खालीलप्रमाणे बदल घडून येतील व प्रत्यक्षात सहा आठवड्यापेक्षाही जास्त काय यासाठी लागेल.

कालावधी
जलशुद्धीकरण केंद्रावरील पाण्यातील शेष क्लोरिन भा / दलभा 
वितरण व्यवस्थेच्या मध्यभागी असणाऱ्या नळातील पाण्यात असणारा शेष क्लोरिन भा / दलभा 
सुरुवाती पूर्वी 
. संयुक्त 
अजिबात नाही 
सुरवात
. मुक्त शेष+. संयुक्त शेष 
अजिबात नाही 
पहिल्या आठवड्याच्या  शेवटी 
. मुक्त शेष 
अगदी अल्पप्रमाणात संयुक्त शेष
दुसऱ्या आठवड्याच्या शेवटी
. मुक्त शेष
. संयुक्त शेष
तिसऱ्या आठवड्याच्या शेवटी 
. मुक्त शेष 
. संयुक्त शेष 
चौथ्या आठवड्याच्या शेवटी 
. मुक्त शेष 
. संयुक्त शेष + . मुक्त शेष 
पाचव्या आठवड्याच्या शेवटी 
. मुक्त शेष 
. संयुक्त शेष + . मुक्त शेष 
सहाव्या आठवड्याच्या शेवटी 
. मुक्त शेष 
. मुक्त शेष 

सर्व वितरण व्यवस्थेत मुक्त शेष क्लोरिन राखल्याने जंतुनाशक क्रिया सुधारते पण्यात ऑक्सीजन नसेल तर सल्फेटचे जीवरासायनिक क्षपणामुळे सल्फाईडमध्ये रुपांतर जंतुनाशक क्रिया प्रभावी झाल्याने सल्फाईड तयार होण्याची क्रिया मंदावते.

मुक्त शेष क्लोरिनीकरणासाठी वापरावयाचे क्लोरिनीकारक निवडताना त्यांची जास्तीत जास्त क्षमता क्लोरिन संभाव्य कमाल मात्रेपेक्षा सुमारे २ भा / दलभा ने अधिक असावी (दुषित पाण्याच्या अवमिश्रणासाठी पाणी कमीत कमी असताना व पाण्याचे तापमान जास्तीत जास्त असताना जितके जास्त प्रदुषण होण्याची शक्यता असेल असे धरल्यासत्यावेळी तितके प्रदुषण झाले आहे पाण्याची जी क्लोरिनची गरज असेल त्यावर क्लोरिनची संभाव्य) कमाल मात्रा अवलंबून असते.

No comments:

Post a Comment