हेतू:- पिण्याच्या पाण्यात असणाऱ्या फ्लोराईडचे नैसर्गीक प्रमाणात भर घालून ते योग्य त्या मर्यादेपर्यंत वाढविण्यासाठी पाणी पुरवठ्यात फ्लोरिडीकरण केले जाते. क्लोराईड हे मुलांच्या वाढीस मुलजन्य द्रव्य असते व त्यामुळे दातांची चांगली वाढ होऊन ते घट्ट होतात व किडण्याच्या क्रियेस जास्त प्रतिकार करणारी शक्ती दातांत येते. म्हणून फ्लोराडीकरण हा दातांच्या आरोग्यासाठी एक प्रभावी उपाय आहे व या पद्धतीचा पुरस्कार व त्यावरील नियंत्रण आरोग्य संस्थांकडून केले जावे. जलकेंद्रावरील अधिकाऱ्यांनी यास सक्रीय मदत व सहकार्य करावे लागते कारण क्लोराईड पाण्यात मिसळणारी यंत्रणा निवडणे ती योग्य जागी बसविणे व तिचे परिचालन करणे ही जबाबदारी त्यांची असते.
जलशुद्धीकरण केंद्रावरीलपरिचालकांना फ्लोरिडीकरणाचे तत्व व उदिष्ट याबद्दल थोडीफार माहिती असावी
ज्याठिकाणी निर्धोक व आरोग्यप्रद दर्जाच्या पाण्याचा भरपूर प्रमाणात करण्यासारखे मुख्य कार्यही पैसा मर्यादित असल्याने व्यवस्थित होऊ शकत नाही त्याठिकाणी फ्लोरिडीकरण करणे हितकारक असले तरी आवश्यक नसते हे लक्षात ठेवले पाहिजे.
पाठिंबा :-
दातांच्या आरोग्यासाठी असणाऱ्या या उपाययोजनेत जागतिक आरोग्य संघटना व इतर आरोग्य, वैज्ञानिक व तांत्रिक संघटना यांची रीतसर पाठिंबा मिळाला आहे. या पाठिंब्याचे विस्तृत स्वरूप, अमेरिकेतील पाणी पुरवठा संघटना, सार्वजनिक आरोग्य राखण्यासाठी सार्वजनिक पाणी पुरवठ्यात फ्लोरिडाकरण करण्याच्या या धोरणास पुढील देशातील वैद्यकीय व दंत वैद्य संघटनांचा पाठिंबा आहे. ते देश असे ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, झेकोस्लोव्हाया, इजिप्त, फिनलंड, जर्मन लोकशाही, ब्रिटन, ग्रीस, इटली, न्यूझीलंड, नॉर्वे, स्वीडन, दक्षिण आफ्रिका आणि युगोस्लाव्हिया इतका सर्वदूर पाठिंबा, दुसऱ्या कोणत्याही आरोग्य वा जलशुद्धीकरण योजनेस मिळाला असेल याची शंकाच आहे.
आरोग्यधिकाऱ्यांनी सार्वजनिक पाणीपुरवठ्यावर ही प्रक्रिया करण्याची योजना आखली तर सार्वजनिक आरोग्य शास्त्रातील या सर्वात महत्वाच्या प्रगतीस स्थानिक पाणीपुरवठा अधिकाऱ्यांच्या सहकार्य मिळाले पाहिजे.
नेहमीच्या जलशुद्धीकरण प्रक्रिया पद्धतीचा वापर करताना प्रयोगशाळेतील नेहमीच्या परीक्षांच्या सहाय्याने प्रक्रियांवर नियंत्रण ठेवले जाते. पण्यात फ्लोरिडीकरण करण्याचे संशोधक १९४५ मध्ये सुरु झाले व अमेरिकेतील ती ठिकाणीच्या पाणीपुरवठ्यावर हे प्रयोग पुढे १० वर्षापर्यत चालू होते. तेव्हापासुन अधिकाधिक पाणीपुरवठ्यासाठी फ्लोरिडीकरण करण्यात येऊन खूप प्रत्यक्ष अनुभव जमा झाला. इ. स. १५५९ च्या शेवटपर्यत अमेरिकेतील एकंदर ३६,०००,००० लोकसंख्येच्या १८७८ ठिकाणी व कॅनडातील एकंदर १२,००,००० लोकसंख्येच्या ६३ ठिकाणी अशा सर्व ठिकाणी मिळून एकंदर १०४९ पाणीपुरवठा केंद्रातील या प्रक्रियेचा वापर होत आहे. असा अंदाज आहे. फ्लोरिडीकरणाचे निष्कर्षही चांगले आहेत. हे प्रक्रिया केलेले पाणी पिणाऱ्या मुलांत ६० ते ७० तक्क्यांने मुलांचे दात किडण्याची उदाहरणे कमी झाल्याचे सिद्ध झाले आहे.
या पद्धतीस येणाऱ्या खर्चाबद्दल खाली माहिती दिलेली आहे. पण येथे हे मुद्दाम लक्षात ठेवले पाहिजे की आर्थिक स्थिती, रुढी वा सवयी, आड न येता सर्व घरातील मुलांच्यापर्यत ही आरोग्यकारक उपाययोजना दुसऱ्या कोणत्याही योजनेपेक्षा कमी खर्चाची असते.
इतिहास:- काही शहरांमध्ये दातांचे लूकण सैल होण्याच्या रोगाचा विशेष प्रादुर्भाव दिसून येतो तर त्यांच्या शेजारच्या शहरांतच हा रोग अजिबात आढळून येत नाही याचे कारण, म्हणजे निरनिराळ्या ठिकाणच्या पाणीपुरवठ्यात असणारा पाण्यातील विशिष्ट अज्ञात घटक हे इ.स. १९०६ मध्येच लक्षात आले होते. पुढे इ.स. १९३१ मध्ये असे आढळून आले की हा घटक फ्लोरिन असून पाण्यात तो फ्लोराईडच्या स्वरुपात असतो. त्यामुळे दाताचे लूकण ढिले होण्याच्या रोगात त्यावर रंग चढतो पण असे दात त्यामानाने विशेष किडत नाहीत. शेवटी असे आढळून आले की पाणीपुरवठ्यात सुमारे १.०० भा/दलभा प्रमाणात फ्लोराईड असेल तर दात फारसे किडत नाहीत व फ्लोराईडचे प्रमाण १.५ भा/दलभा पेक्षा जास्त झाले तरच दाताचे लूकण ढिले होण्याचा रोग जडतो. पूर्वी केलेल्या या सर्व संशोधनाचे असे निष्कर्ष निघतात की, दातांची चांगली बऱ्याच ठिकाणच्या पिण्याच्या पाण्यात आढळत नाही. या पाण्यात फ्लोराईड १ भा/दलभा या प्रमाणात असणे सर्व दृष्टीने हितकारक असते व दातांचे लुकणढिले होण्याचा रोग होऊ नये यासाठी ते १.५ भा/दलभा पेक्षा कमी प्रमाणात असावे लागते.
इ.स. १९४५ पासून न्यू बर्ग व न्यूयॉर्क, ग्रँड रॅपिडस व निशिगन, ब्रॅडफोर्ड व ओंटारिया या शहरात, याविषयी प्रयोगिक संशोधन सुरु झाले व ते पुढे १० वर्षे चालले. या तिन्ही ठिकाणच्या सर्व शाळकरी मुलांचे आरोग्य व त्यांच्या दातांची स्थिती यांची प्रथम तपासणी करण्यात आली. नंतर तिन्ही शहरातील पाणीपुरवठ्यात फ्लोरिडीकरण केले नाही. या दोन्ही ठिकाणांच्या तुलनात्मक अभ्यास केल्यावर असे दिसून आले की फ्लोरिडीकरण केलेल्या शहरांत शेजारील दात किडण्याचे प्रमाण ६० ते ७० टक्क्यांनी कमी झाले. त्याच शहरातील दात किडण्याच्या पूर्वीच्या प्रमाणापेक्षाही हे प्रमाण ६० ते ७० टक्क्यांनी कमी होते. या अभ्यासामुळे ही प्रक्रिया पद्धत निर्धोक, प्रभावी, व्यवहार्य व कमी खर्चाची आहे असे आढळून आले व त्यावर योग्य नियंत्रण व देखरेख करता येते हे सिद्ध झाले.
No comments:
Post a Comment