Showing posts with label Website Design. Show all posts
Showing posts with label Website Design. Show all posts

Wednesday, February 26, 2025

Dnyandeep Foundation to help IndiaAI Mission for Maharashtra

 Indian Government has decided to advance AI skilling and job creation efforts under the ambitious IndiaAI Mission.

The govt shall provide the IndiaAI fellowship for candidates from diverse disciplines such as BA, BSc and MBA and establishing 200 IndiaAI data labs in Tier 2 and 3 cities to offer foundational courses. 

The AI revolution is not just a technological leap; it’s a generational opportunity for India’s youth to lead on the global stage. 

Dnyandeep Foundation plans to extend AI education through collaboration with world famous AI-Club from America. 

Dnyandeep has already planned Atal Dnyandeep Training Course for building electronic circuits and robotic toys assisted by Inlearn Systems, Pune in Marathi medium for schools in Maharashtra. AI also shall be introduced at this level to create awareness about this new technology. 


 
Initially the courses will be conducted online for teachers to build a community of trainers, and they will be with revenue sharing with teachers and schools. 



I request all educational institutes at school level in Maharashtra to take advantage of this scheme initiated by Dnyandeep Foundation.

. - Dr. S. V. Ranade, Chairman, Dnyandeep Foundation, Sangli 

    Contact -  info@dnyandeep.net for more info

Tuesday, June 4, 2024

वेबमास्टर – दूरस्थ वेबडिझाईन प्रशिक्षण कोर्स

सध्याच्या इंटरनेट युगात प्रत्येक संस्थेची स्वत:ची वेबसाईट असणे ही एक  आवश्यक गोष्ट बनली आहे. वेबसाईट डिझाईन हे एक नव्याने उदयास आलेले व सतत बदलणारे तंत्रज्ञान आहे. गेली चोवीस वर्षे वेबडिझाईन क्षेत्रात कार्य करीत असलेल्या ज्ञानदीप इन्फोटेक प्रा. लि. या  सांगलीतील सॉफ्टवेअर कंपनीने  शाळा, कॉलेज व इतर अनेक संस्थांच्या वेबसाईट डिझाईन केल्या असून वेबडिझाईनचे प्रशिक्षणही या संस्थेतर्फे दिले जाते.



वेबसाईट तयार झाली तरी त्यात नियमितपणे नवी माहिती घालणे आवश्यक असते. या कामासाठी वेबडिझाईन प्रशिक्षित  व्यक्तीची गरज भासते. संस्थांकडे अशा व्यक्ती उपलब्ध नसल्याने वेबसाईटचे नूतनीकरण करण्याचे कामही ज्ञानदीप इन्फोटेक कंपनीकडून केले जाते. मात्र यासाठी वेबसाईट व्यवस्थापनासाठी जबाबदारी निश्चित न केल्याने, नवी माहिती संकलित करणे व नियमितपणे  वेबसाईटवरील माहितीचे नूतनीकरण करणे राहून जाते. परिणामी अनेक वेबसाईटवरील माहिती जुनी व कालबाह्य  राहते. साहजिकच वेबसाईटचा मुख्य उद्देश सफल होत नाही.

या परिस्थितीचा विचार करून  ज्ञानदीप एज्युकेशन अँड रिसर्च फौंडेशनने वेबडिझाईन व त्याचे नूतनीकरण यांचे दूरस्थ पद्धतीने प्रशिक्षण देण्याची एक अभिनव योजना सुरू केली आहे. सहा महिन्याच्या या कोर्सची फी १२००० रुपये असून अभ्यासाचे साहित्य प्रत्येक प्रशिक्षणार्थीस एका स्वतंत्र सबडोमेनवर टप्प्याटप्प्याने दिले जाईल. प्रत्येक धड्यावरील प्रश्नांची योग्य उत्तरे आल्यानंतरच पुढील धड्याचे साहित्य पाठविले जाईल. अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर एका वेबसाईटचे पूर्ण डिझाईन प्रशिक्षणार्थीकडून करवून घेतले जाईल.  प्रत्येक कोर्स यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यावर ज्ञानदीप एज्युकेशन अँड रिसर्च फौंडेशनतर्फे ‘वेबमास्टर’ सर्टिफिकेट देण्यात येईल.  शाळा, कॉलेज वा इतर उद्योग व संस्थांत काम करणार्‍या व्यक्तींना आपली नोकरी सांभाळून घरबसल्या आपल्या फावल्या वेळेत हा कोर्स पूर्ण करता येईल. हा कोर्स पूर्ण झाल्यावर आपल्या संस्थेची साधी (स्टॅटिक) वेबसाईट डिझाईन करणे व त्यातील माहिती अद्ययावत करणे या गोष्टी प्रशिक्षित व्यक्तीस करता येतील एवढेच नव्हे तर इतर संस्थांच्या वेबसाईट डिझाईन करून त्याला अर्थार्जन करता येईल.

कोर्सबद्दल अधिक माहितीसाठी  इमेलने info@dnyandeep.net या पत्त्यावर संपर्क साधावा.

Wednesday, April 3, 2024

Software and Web applications in Environmental Engg.

Dnyandeep Foundation, pioneer in Website design and development in Marathi and English has entered in the field of Environmental Consultancy with a dedicated  group of retired professors having consultation experience of over three decades, chemists and professionals to provide pollution control and environmental management services to local bodies and industries.

Building proficiency in Website design and Mobile App development can help in strengthening your prospects in career development. Dnyandeep Foundation has decided to develop web and mobile applications in field of Environmental Engineering.
 Dnyandeep foundation shall provide all assistance, training  and guidance to fresh graduates who are new to the subject but are ready to learn  these techniques.
The environmental engineers  who are interested in participating in this long term collaborative  project may contact info@dnyandeep.net indicating their proficiency in computer programming. 
If you have experience, expertise or interest in any environment related  field, you can contribute this group as consultant, faculty or information provider.

You are welcome to send your opinion and suggestions to improve the utility of this website. Please feel free to contact info@dnyandeep.net for any assistance you need in your studies or getting resources. 

Monday, March 18, 2024

मुंबई पर्यावरण व संतुलित विकास

 ज्ञानदीपच्या मुंबई शाखेतर्फे ७ एप्रिल २०२४ रोजी नियोजित चर्चासत्र -

मुंबई पर्यावरण व संतुलित विकास

मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी. वेबसाईट व मोबाईल अॅपसाठी मराठी भाषेचा आवर्जून उपयोग करणा-या ज्ञानदीप फौंडेशनचे मुंबईत शाखा सुरू करण्याचे स्वप्न मुंबईचे निवृत्त मुख्य अभियंता श्री. सु. ना. पाटणकर यानी पूर्ण केले आहे. त्यांच्या मुलुंड येथील निवासस्थानी ज्ञानदीप फौंडेशनची मुंबई शाखा १५ ऑगस्ट २०२३ रोजी सुरू झाली.

मुंबई चे पर्यावरण, विकास तसेच सामाजिक व सांस्कृतिक कार्याची स्थानिक जनतेला माहिती व्हावी या उद्देशाने ज्ञानदीपने माय मुंबई डॉट नेट (https://mymumbai.net)या नावाची वेबसाईट सुरू केली आहे. त्याचे औपचारिक उदघाटन ७ एप्रिल २०२४ रोजी करण्यात येणार असून मुंबईचे पर्यावरण व संतुलित विकास या विषयावर तज्ज्ञांची व्याख्याने व मराठीतून नेटद्वारे प्रशिक्षण या संबंधी चर्चासत्र आयोजित करण्यात येत आहे.

श्री सुरेश ना. पाटणकर यानी इंडियन वाटर वर्क्स असोसिएशनच्या स्थापनेत महत्वाची भूमिका बजावली होती संस्थेला मुंबई महापालिकेत ऑफिससाठी जागा त्यांच्याच प्रयत्नातून उपलब्ध झाली. या संस्थेची पहिली वेबसाईट 2004 साली ज्ञानदीप इन्फोटेकला मिळण्यासही त्यानी पुढाकार घेतला. 2021 साली ही वेबसाईट उत्तरप्रदेशातील कंपनीकडे हस्तांतरित करण्यात आली. भारतीय भाषांतून या संस्थेच्या कार्याची प्रसारित करण्याची ज्ञानदीपची कल्पना फलद्रूप होऊ शकली नाही. या संस्थेच्या 2021च्या अधिवेशनात श्री. पाटणकर यांनी ज्ञानदीपसाठी आपल्या निवासस्थानी मोफत ऑफिस सुरू करण्याची सूचना मांडली. त्यातूनच मुंबई शाखेची निर्मिती झाली.



श्री. पाटणकर यांनी 'करू या पर्यावरणाचा विविधांगी विचार' नावाचे पुस्तक मराठी विज्ञान परिषदेमार्फत प्रसिद्ध केले असून निवृत्तीनंतरही त्यांचे सामाजिक, सांस्कृतिक आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील कार्य सर्वानाच आदर्शवत आहे.

सकाळचे सत्र पर्यावरण तंत्रज्ञान व विकास या साठी तर दुपारचे सत्र मायमुंबई वेबसाईटच्या माध्यमातून जनजागृती व प्रशिक्षण यासाठी नियोजित केले असून  मुंबई शाखेच्या पुढील प्रगतीसाठी हे चर्चासत्र मार्गदर्शक ठरणार आहे.

या चर्चासत्रात सहभागी होण्यासाठी प्रतिव्यक्ती एक हजार रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. सदरचे चर्चासत्र श्री. सु. ना. पाटणकर यांनी आपल्या हॉलमध्ये घेण्यास अनुमती दिली आहे. सर्वसाधारणपणे पन्नास प्रतिनिधी येण्याचा अंदाजअसून प्रत्यक्ष नोंदणी नंतर कार्यक्रमाचे स्थळ व रूपरेषा ठरविण्यात येईल.

मराठी विज्ञान परिषद, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, इंडियन वाटर वर्क्स असोसिएशन, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण तसेच इतर पर्यावरण आणि मराठी शिक्षणक्षेत्रात कार्य करणा-या संस्थांनी आपले प्रतिनिधी पाठविले चर्चासत्राचे प्रायोजकत्व स्वीकारले तर ज्ञानदीपच्या मुंबई शाखेचे हे पहिलेच सेमिनार यशस्वी ठरेल आणि ज्ञानदीपच्या इतर अनेक त्रानप्रसार योजनेस बळ मिळेल असा मला विश्वास वाटतो.
संपर्क - ज्ञानदीप मुंबई शाखा
द्वारका, पुष्पधन्वा सोसायटी, पं. मालवीय रोड, मुलुंड ( पश्चिम)
मुंबई - 022-2567 9245
भ्रमणध्वनी - 9322272777
 - डॉ. सु. वि. रानडे, ज्ञानदीप, सांगली
इ मेल - info@dnyandeep.net / +818422310520

Saturday, March 2, 2024

Online Web-Master Course




In today’s world of mobile and internet based communication and e-commerce, it has become imperative for every organization to have it’s own website. Dnyandeep Infotech Pvt. Ltd., a software company in Sangli, is providing web-design and web hosting services for last 22 years and has a client- base of more than 150 organisations. 

Many organizations have a separate web-master to handle website issues and it is supported by data entry operators. However, small organizations cannot afford to provide such dedicated post. As a result, it is observed, that the organizations find it difficult to keep the websites up-to-date , due to lack of trained personnel and system of data collection and upadation. As a result, most of the websites do not reflect the current status of organization, defeating the sole purpose of having an active website.

Considering the need of training in house personnel for website updation, Dnyandeep Education & Research Foundation, a sister concern of Dnyandeep Infotech, has developed an online web-master course to provide basic hands-on training of designing basic informative website and its updation. The course is of six months duration (Course can be completed earlier, but maximum support duration shall be 6 months) with fees of Rs. 12000/- per participant. The novelty of the course is that the person can complete the course by working in spare time from home. The course contents will be designed based upon individual requirements and the contents shall be provided in well-defined steps with condition of successful completion of previous assignments.  A separate sub-domain shall be assigned to each candidate for submitting his responses and difficulties.

Web-design is an ever changing technology and requires adoption of new techniques and methods to suit latest browser requirements. Hence, Dnyandeep Foundation shall be utilizing services of professional software engineers from Dnyandeep Infotech Pvt. Ltd. who work on live web development projects, for providing online training for would-be webmasters.

Tuesday, February 27, 2024

Sunday, February 18, 2024

डॉकरच्या पेटा-यात प्रोग्रॅम करा

 भारतात बहुतेक लोक मायक्रोसॉफ्ट विंडोज कार्यप्रणाली (ऑपरेटिंग सिस्टीम) असणारा कॉम्प्युटर वापरत असले तरी अमेरिका व इतर प्रगत देशात ॲपलचा एक्सकोड कार्यप्रणाली असणारा मॅक कॉम्पुटर वापरतात. या दोन्ही खाजगी कार्यप्रणालींऐवजी लिनक्स व युनिक्स ही मुक्त कार्यप्रणाली वापरण्याचे प्रमाण वाढले असून अनेक विशेष सॉफ्टवेअरसाठी विशिष्ठ  कार्यप्रणाली असणारा कॉम्युटर आवश्यक असतो. 

यामुळे आपल्या कॉम्पयुटरवर असणा-या कार्यप्रणालीपेक्षा वेगळी कार्यप्रणाली लागणा-या सॉफ्टवेअरचा वापर करता येत नाही.

यावर उपाय म्हणजे आभासी कार्यप्रणाली ( व्हीएमवेअर) स्थापित करून त्याच्या साहाय्याने  प्रोग्रॅमिंग करणे. मात्र या पद्धतीत वेगळी कार्यप्रणाली, त्यावर चालणारी प्रोग्रॅमिंग भाषा तसेच डाटाबेस ( माहितीकक्ष असे घटक जोडावे लागतात. 

याला एक उत्तम पर्याय डॉकरने उपलब्ध करून दिला आहे.  

आपल्या कॉम्प्युटरवर डॉकर हे सॉफ्टवेअर इन्स्टॉल केल्यावर  आपल्याला कोणत्याही प्रकारचा प्रोग्रॅम वा सॉफ्टवेअर प्रोजेक्ट कार्यान्वित करता येते. त्यासाठी आवश्यक असणारी कार्यप्रणाली, प्रोग्रॅमिंग भाषा, डाटाबेस इत्यादी सर्व घटक एकत्र करून त्याची एक इमेज (रेडीमिक्ससारखी मिसळ) केली जाते व ती कार्यान्वित करून उत्तर काढता येते. 



मोठी अवजड यंत्रसामुग्री वा अनेक परस्पर संबंधित वस्तू एकत्रपणे जहाजावरून पाठविताना भलेमोठे सीलबंद पेटारे वापरले जातात. त्यांना कंटेनर म्हणतात त्यांची वाहतूक करणा-या जहाजावरून डॉकर हे नाव या आगळ्यावेगळ्या वैशिष्ट्यपूर्ण सॉफ्टवेअरला दिले आहे. 


डॉकरची ही कल्पना मला फार आवडली. डॉकरमध्ये सर्व क्रिया अगदी छोट्या प्रोग्रॅमने स्वयंचलितपणे आपोआप होत असल्याने मला डॉकर ही जादुची कुपीच वाटते.


आता कुपी  आणि पेटारा हे दोन शब्द लहान आणि मोठा कंटेनर दर्शवितात.  आपली मराठी भाषा शब्दसंपदेत समृद्ध आहे. अत्तराची कुपी ते शिवाजी महाराजांनी वापरलेला पेटारा या शब्दांचा विचार करताना डॉकरसाठी मला इतर अनेक शब्द सुचले.

कागदाची पुडी वा पुडा

पत्र्याची डबी व डबा

पेटी आणि पेटारा

कप्पा आणि कपाट

तिजोरी

पेटारा हा शब्द मला जास्त योग्य वाटला. पण अगदी कितीही मोठा प्रोग्रॅम असला तरी तो ठेवण्यासाठी अगदी लहाम चिप पुरेशी होते. मग डॉकरऐवजी कुपी म्हटले तरी चालण्यासारखे आहे. अर्थात याला जादूचा दिवा वा उडणारी चटई असेही नाव देता आले अलते. 

हे विषयांतर झाले. पण सांगायचा मुद्दा हा की डॉकर सॉफ्टवेअर आपल्याला कोणतेही सॉफ्टवेअर वापरण्याची  सुविधा प्रदान करते.

मी या डॉकरचा वापर करून वर्डप्रेस इन्स्टॉल करून पाहिले. आणि माझी याच्या उपयुक्ततेबद्दल खात्री पटली.

Friday, January 26, 2024

माहिती तंत्रज्ञान क्षेत्राला सहकारी चळवळीची आवश्यकता

महाराष्ट्रात प्रसिद्ध अर्थतज्ञ डॉ. धनंजयराव गाडगीळ आणि पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांनी प्रवरानगर येथे १९४८ साली पहिला साखरकारखाना काढला व सहकारी चळवळीची मुहूर्तमेढ रोवली.

त्यानंतर मा. यशवंतराव चव्हाण व अनेक ग्रामीण भागातील शेतकरी कुचुंबात ही सहकारी चळवळ पुढे नेणारे नवे नेते उदयास आले. आपली वाडवडिलार्जित विकून त्यांनी या नव्या सहकारी तत्वावर साखर कारखान्याबरोबर बॅंकींग व इतर क्षेत्रातही प्रगती केली आणि महाराष्ट्राच्या ग्रामीण जीवनाची सर्वांगीण प्रगती झाली. पाणीपुरवठा, शिक्षण, रस्ते, दवाखाने या सोयी झाल्या त्याचबरोबर छोटे कृषी उद्योग सुरू होऊन रोजगार उपलब्ध झाला.

तरीदेखील महाराष्ट्रात उच्च तंत्रज्ञान शिक्षण देणा-या सरकारी महाविद्यालयांची क्षमता फार कमी असल्याने फारच कमी विद्यार्थ्यांना य़ा आधुनिक तंत्रशिक्षणाचा लाभ घेता येत लव्हता. यावर उपाय म्हणून सांगलीचे सुपुत्र माजी मुख्यमंत्री . पद्मश्री श्री वसंतराव दादा पाटील यांनी विनाअनुदान तत्वावर तंत्रशिक्षण महाविद्यालये सुरू करण्याचा क्रांतीकारक निर्णय घेतला व महाराष्ट्राच्या कानाकोप-यात अशी महाविद्यालये सुरू झाली. याचा फायदा उच्च वर्गातील श्रीमंत मुलांबरोबर मागास व आर्थिक दृष्ट्या कमकुवत कुटुंबातील मुलांनाही झाला. एका दृष्ठीने हे सहकाराचेच नवे रूप होते.

तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे महाराष्ट्राची आर्थिक प्रगती झाली. नव्या संगणक व इंटरनेटच्या युगात मोठ्या बहुराष्ट्रीय कंपन्या पुण्या-मुंहईसारख्या मोठ्या शहरात आल्या. इन्फोसिस, लिप्रो, कॉग्निजंट, परसिस्टन्स सारख्या भारतीय बहुराष्ट्रीय कंपन्याही आपल्या आकर्षक पे पॅकेजच्या जोरावर बुद्धिमान तरूण वर्गाला आपल्या ताफ्यात सामील करून घेतले. यामुळे अशा शहरांतील राहणीमान वाढले. जास्त पगाराच्या अपेक्षेने खेड्याकडून शहराकडे वा परदेशात नोकरी करण्याकडे युवकांचा लोंढा वाहू लागला.

इंटरनेटच्या साहाय्याने जागतिक संस्थांनी भारतातील बाजारपेठ काबीज केली. नोक-या कमी आणि जास्त पगाराच्या नोकरीच्या शोधात असणारे असंख्य विद्यार्थी अशी विचित्र परिस्थिती निर्माण झाली. संगणक क्षेत्रात एवढी प्रगती झाली तरी स्थानिक पातळीवरील छोट्या कामासाठी प्रसिद्ध असणा-या चांगल्या संस्थांची वाढ खुंटली कारण त्यात काम करणारे कर्मचारी मोठ्या कंपन्यात नोकरी मिळविण्यासाठीच धडपडत राहिले. सांगलीत इ. स. २००० मध्ये स्थापन झालेल्या ज्ञानदीप इन्फोटेक कंपनीची आणि इ. स.. २००५ मध्ये स्थापन झालेल्या ज्ञानदीप फौंडेशनची वाटचाल यानुळेच कायम बिकट राहिली. चांगले कर्मचारी येथे शिकून व अनुभव घेऊन मोठ्या कंपन्यात जात राहिले व ज्ञानदीपला एखाद्या शिक्षणसंस्थेचे रूप आले.

बहुराष्ट्रीय कंपन्यांनी आपल्या संपत्तीच्या जोरावर छोटी शहरे व ग्रामीण भागातील कामेही गिळंकृत करण्यास सुरुवात केली व एका नव्या एकाधिकारशाहीचा विस्तार झाला व त्यातील लोकशाहीचा अस्त झाला. अशा संस्थांमध्ये कामाचा ताण व नोकरी जाण्याची भीती यांनी कर्मचा-यांचे मनस्वास्थ्य बिघडण्याच्या वा अचानक नोकरकपातीच्या घटना वार्ता येऊ लागल्या आहेत. या बहुराष्ट्रीय कंपन्यांचे कार्य जागतिक उलाढालींवर व आर्थिक पाठबळ शेअरमार्केटवर अवलंबून असल्याने या नोक-यात एक अनिश्चितता आली आहे.

या परिस्थितीत सहकारी तत्वावर सर्व छोट्या संगणक संस्था एकत्र आल्या आणि फ्री लान्स पद्धतीने सुशिक्षित बेरोजगारांना काम देऊन योग्य नियोजल आणि व्यवस्थापन केले तर बेभरवंशाच्या बहुराष्ट्रीय कंपन्यांना एक सशक्त व स्थायी पर्याय देता येईल.

ज्ञानदीप फौंडेशनने याबाबतीत पुढाकार घेण्याचे ठरविले असून त्या दृष्टीने फौंडेशन विविध शिक्षण संस्थांशी परस्पर सहकार्याचा करार करून तेथील शिक्षक व विद्यार्थी यांना आपल्या कार्यात सहभागी करून घेणार आहे.

ज्ञानदीप इन्फोटेक प्रा. लि, या कंपनीने ज्ञानदीप फौंडेशन प्रायोजित केले असल्याने देशातील वा परदेशातील कामे वा प्रकल्प मिळविण्याचे व ते काम ज्ञानदीप फौंडेशनच्या माध्यमातून सर्वांच्या सक्रीय सहभागातून करण्याचे योजिले आहे. जर असे संस्थात्मक सहकारी नेटवर्क करता आले तर शिक्षणसंस्था, विद्यार्थी व घरबसल्या काम करू इच्छिणारे इतर नागरीक यांना आर्थिक उत्पन्नाचे साधन निर्माण होऊ शकेल. या योजनेत सध्या ग्रामीण भागात कार्यरत असणा-या संगणक संस्थांनाही सहभागी करता येईल. विना सहकार नही उद्धार असे म्हणतात.

महाराष्ट्राच्या सहकारभूमीत या माझ्या कल्पनेला चोगला प्रतिसाद मिळेल अशी मला आशा आहे.. – सु. वि. रानडे, ज्ञानदीप इन्फोटेक व ज्ञानदीप फौंडेशन, सांगली.

Thursday, January 25, 2024

शहर स्वच्छता अभियान - वेबसाईटवर वस्तुस्थितीची प्रसिद्धी आवश्यक

शहरातील मोकळ्या प्लॉट्मध्ये वाढणारी झाडे झुडपे व साठणारे कचर्याचे ढीग हे शहर स्वच्छता अभियानात  एक मोठी समस्या होऊन बसली आहे. प्लॉटच्या मालकावर स्वच्छतेचे कोणतेही कायदेशीर बंधन नसल्याने त्याच्याकडून प्लॉट स्वच्छतेबाबत टाळाटाळ केली जाते. बर्याच ठिकाणी अशा जमिनीचा मालक कोण हे कोणालाही माहीत नसते. यातील काही प्लॉट शहरविकासासाठी आरक्षित असतात त्यामुळे त्याची मालकी नगरपालिकेकडेच असते. त्यामुळे असे बेवारस प्लॉट कचरा, सांडपाणी व झाडेझुडपे यांनी व्यापलेले दिसतात.

विकसित देशात सार्वजनिक स्वच्छतेला फार महत्व दिले जाते. जुनी मोटार जरी रस्त्यावर बेवारस सापडली तरी त्याच्या मालकाला शोधून त्याला दंड केला जातो. एवढेच नव्हे तर पाळलेल्या कुत्र्याची विष्ठा देखील सार्वजनिक जागेत ( रस्ता, बाग वा क्रीडांगण) पडली तर त्याच्या मालकाला दंड होतो.

आपल्या येथे सार्वजनिक स्वच्छतेबाबत फारच उदासीनता दिसून येते. आपले घर वा प्लॉट स्वच्छ ठेवण्यात आपण कसूर करीत नाही. मात्र गोळा केलेला कचरा आपण जवळच्या सार्वजनिक जागेत वा मोकळ्या प्लॉटमध्ये बिनधास्तपणे टाकून देतो. घंटागाडी चालविणारे कर्मचारीदेखील अशा प्लॉटमधील कचरा उचलण्याची तसदी घेत नाहीत. अशा कचर्याचा उपद्रव सुरू झाला की आपण नगरपालिकेला दोष देतो.

 प्रत्येक रिकाम्या प्लॉट वा जागेची मालकी असणार्‍याचे नाव, फोन नंबर व पॅन नंबर लिहिलेली पाटी नगरपालिकेने  लावली ( वा मालकावर अशी सक्ती केली ) तर यावर काही ठोस उपाययोजना करणे शक्य होईल. अशा प्लॉटवरील झाडेझुडपे काढण्याचा खर्च प्लॉटमालकाकडून व  कचरा उचलण्याचा खर्च, असा कचरा टाकणार्‍या सभोवतालच्या प्लॉटधारकांकडून वसूल करण्यासाठी करण्यासाठी योजना आखली तर नगरपालिकेस असे प्लॉट स्वच्छ राखणे सहज शक्य होईल.  गृहनिर्माण सहकारी संस्था वा स्थानिक नगरसेवकांना याचे व्यवस्थापन व योग्य ती कारवाई करण्याचे अधिकार दिले तर या कचरा समस्येवर कायमस्वरुपी तोडगा निघू शकेल. मोकळ्या प्लॉट वा सार्वजनिक जागांची स्वच्छता राखण्याची जबाबदारी भोवताली राहणारे लोक  आपोआपच घेतील व यामुळे आर्थिक बोजा न पडता शहर स्वच्छता  अभियान यशस्वी करणे नगपालिकेस शक्य होईल. 
स्थानिक माहिती मराठीत देणा-या वेबसाईटवर गुगलमॅपच्या माध्यमातून अशा रिकाम्या प्लॉटची नोंद शहर व महापालिकेने केली तर स्वच्छ शहर अभियानाला एक वस्तुस्थितीनिदर्शक सार्वजनिक आढावा प्रसिद्ध करता येईल. सध्या प्लॉट व फ्लॅट खरेदीविक्रीसाठी वेबसाईटवर जाहिराती केल्या जातात. मात्र शासनाने रिकामे प्लॉट, कच-याचे ढीग, रस्ते,गटारे, नदीची स्थिती, पाण्याची गळती व प्रदूषण यांची माहिती प्रसिद्ध करणे बंधनकारक केले तर शहर स्वच्छता  अभियान यशस्वी होऊ शकेल आणि स्वच्छ शहर बक्षिसासाठीची अनाठायी रंगरंगोटी बंद होईल. जनतालाही शहराची खरी स्थिती कळेल.
याच उद्देशाने ज्ञानदीप फौंडेशनने 
  • मायसांगली (https://mysangli.com), 
  • मायकोल्हापूर(https://mykolhapur.net), 
  • मायपुणे(https://mypune.net), 
  • मायसोलापूर(https://mysolapur.net), 
  • मायनाशिक(https://mynashik.net) व 
  • मायमुंबई (https://mymumbai.net)
या मराठी माध्यमातील वेबसाईट तयार केल्या आहेत.सध्या त्यात फक्त इतिहास, पर्यटनस्थळे, प्रसिद्ध व्यक्ती व संस्था यांची माहिती दिली आहे. शहर आणि जिल्ह्यातील तालुक्यांचे माहितीपूर्ण नकाशेही यात दिले जाणार आहेत. परंतु केवळ शैक्षणिक आणि पर्यटनाच्या दृष्टीने माहिती देण्यापेक्षा पर्यावरणविषयक वस्तुस्थती अहवाल देण्याचा आमचा मनोदय आहे.

मात्र पर्यावरणविषयक माहिती नगरपरिषद वा माहापालिकेच्या अनुमतीशिवाय तेथे प्रसिद्ध करता यात नाही. त्यामुळे अशी माहिती जिल्ह्यांच्या अधिकृत संकेतस्थळांवर प्रसिद्ध करणे आवश्यक आहे. तसेच जनतेला त्यात माहिती समाविष्ट करण्यास अधिकार द्यावयास हवेत.



Wednesday, January 17, 2024

मराठीतून वेबडिझाईन शिका (Webdesign Lessons)

वेबसाईट जनजागृती अभियान वेबसाईटचे आधुनिकीकरण - वेबसाईट जनजागृती अभियान -छंदातून अर्थप्राप्ती करून देणारी वेबसाईट -सेवाभावी संस्थांना वरदान ठरणार्‍या वेबसाईट -सामाजिक संस्थांसाठी प्रभावी संपर्क माध्यम वेबसाईट -शालेय शिक्षणासाठी वेबसाईट-उद्योगवृद्धी व मार्केटींगसाठी वेबसाईट -बांधकाम व्यवसायात वेबसाईटचे महत्व -हॉस्पिटलसाठी वेबसाईट -ग्रामविकासासाठी वेबसाईट वेबसाईट डिझाईन - इंटरनेट - इंटरनेट,ब्राउजर व सर्व्हर - छोटे उद्योगधंदे आणि इंटरनेट-इंटरनेटचा दुरुपयोग टाळा - इंटरनेटद्वारे फसवणूक -फुकट श्रीमंत करणार्‍या स्पॅममेलची शोधकथा -खोट्या इ-मेल व स्पॅम जाहिरातींपासून सावधान - र्वांसाठी मोफत शिक्षण - - माय मराठी-संस्कृतदीपिका डॉट ओआरजी - विज्ञान डॉट नेट -वर्ल्ड पेंटर्स डॉट नेट - इंटरनेटवर कुलवृत्तांत - माय कोल्हापूर डॉट नेट- मधुरंग डॉट कॉम-इ गुजर डॉट कॉम- वर्ल्ड लायब्ररियन्स डॉट कॉम -अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन - संकेतस्थळ-


मराठीतून वेबडिझाईन शिका- साध्या वेबसाईटचे डिझाईन भाग - १ भाग - २ भाग - ३-मेटा टॅग-डोमेन नेम--रंगांची दुनिया -बुलेटेड लिस्ट -टेबल - टेबल टॅग्स -टॅग गुणविशेष-टॅग उदाहरणे -FTP साठी FileZilla ( फाईलझिला)चा वापर -डायनॅमिक वेबपेजसाठी स्क्रिप्टींग लॅंग्वेजेसचा वापर..-वेबपेजचा टेबल लेआउट- फ्रेम्स -वेबसाईट स्टाईलशीट - वेबसाईट- क्लास स्टाईल-टेबललेस लेआउट-वेबसाईटच्या इंडेक्स पेजचे डिझाईन - स्टॅटिक व डायनॅमिक वेबसाईट -फीडबॅक फॉर्म -वेबसाईटवरील सदस्यनोंदणी-जावास्क्रिप्ट - पॉप अप बॉक्सेस - फंक्शन- फॉर्म व्हॅलिडेशन - नेव्हीगेटर ऑब्जेक्ट - String Object- Date Object -जावास्क्रिप्टच्या साहाय्याने पाढे तयार करणे -Server Information -पीएचपी वापरून वेबसाईट डिझाईन - पीएचपी (PHP) प्रोगॅमिंग भाग-१ भाग-२ भाग-३भाग-४ Strings भाग-५पीएचपी भाग-६ Form Process -ड्रीमव्हीवरच्या साहाय्याने वेबपेज डिझाईन. भाग - १ भाग - २ भाग - ३ -शोधयंत्रास सुयोग्य वेबसाईट भाग - १ भाग - २ भाग - ४ भाग - ५ -आकर्षक वेबसाईटसाठी फ्लॅश(Flash) तंत्रज्ञान -फ्लॅश प्रोग्रॅमिंगसाठी अ‍ॅक्शनस्क्रिप्ट-जुमला - - भाग-२ वर्डप्रेस (Wordpress) भाग - १ -ऊप (OOP) ऑब्जेक्ट ओरिंएन्टेड प्रोग्रॅमिंग - कोड इग्नायटर (Codeigniter) भाग -१ भाग -२ -कोहाना फ्रेमवर्क -


पर्यावरण - १. चिरंतन विकास व पर्यावरण २. हवा प्रदूषण ३. ओझोनच्या थरातील घट ४. खार्‍या पाण्यापासून गोडे पाणी ५.कृष्णा नदी प्रदूषणः कारणे ६.प्रदूषण निदर्शक जलपर्णी ७.ग्रीन बिल्डिंग ८.जलाशयातील पाण्याचे नैसर्गिक शुद्धीकरण ९. जलाशयावर प्रयोगशाळांचे नियंत्रण १०. पाणी पुरवठा स्थानांचे संरक्षण ११. घन कचर्‍याचे व्यवस्थापन -News blogs and photos on Save Ganga Movement -Agonizing dilemma -Happy and successful achievement in Save Ganga Mov... - निसर्गसौंदर्याची विक्री


ऊर्जा - १. ऊर्जेचे प्रकार २. अणुउर्जा ३. जलशक्ति व पवन ऊर्जा ४. भू- औष्णिक ऊर्जा ५. जैविक ऊर्जा ६. हायड्रोजन ऊर्जा ७.घरबांधणीमध्ये सौरऊर्जेचा उपयोग


Social Topics-Far from the madding crowd -गरिबांची जनगणना -सामान्य माणूस -With malice toward none -Don't aggrevate the conflict, solve it amicably. - Beware of History -Root out Corruption, not the Tree -Third Eye of Information Technology -Octopus Culture of Corporate Sector - माहिती तंत्रज्ञानाचा तिसरा डोळा - कार्पोरेट जगताची ऑक्टोपस संस्कृती -महात्मा गांधी - उद्याच्या शांतताप्रेमी जगासाठी महा... -दारू - समाज अधोगतीचे कारण - धान्यापासून दारु -
सुनितीवर अनीतीचा हल्ला - Naked king and daring child
- Why history repeats itself?- Organisation or Herd of Animals - New Brave World - अमेरिकेतील भारतीय
-Mahatma Gandhi - The great legendary guide for tom... -Smoking banned. Good beginning. -Suggestions to fight terrorism - Reduce casualties... -Nationalise all explosives -Strong Info structure needed to fight Terrorism - बॉम्बस्फोट व सुरक्षाव्यवस्था - Nuclear Energy - A must for Sustainable Developmen... - - माझा भारत - आपला भारत -Postpone the parliament elections -
भविष्यातील वाहतूक समस्या -आयटी उद्योगाचे विकेंद्रीकरण आवश्यक - स्वयंउद्योजक बना

Education -
India's Vision - Education to All -Extravagant Infrastructure for Educational Institu... -Dark side of Autonomy - सर्वांसाठी मोफत शिक्षण -Free Education? Why not? - Global Knowledge Integration based on Family Commu...
Management -Work the system by Sam Carpenter -REWORK -The Art of Start -Winners Take All -Leading Change - Kotter -A Good Reference Book on Business Management Teleconference by successful manager - टेलिकॉन्फरन्सद्वारे यशस्वी नियोजन - Customers
- Habit

 Book Reviews -
'1984' by George Orwel (एकोणिसशे चौर्‍याऎंशी) - जॉर्ज ऑर्वेलची रूपक कथा ‘अ‍ॅनिमल फार्म’ - POET OF DEMOCRACY by Walt Whiteman - - The world is not flat -सिलिकॉन व्हॅली ग्रेटस्‌ - पुस्तक परिचय -The Google Story
Poem Translations-1.Walk Alone-2.Do not pluck the buds-3.A moment-4.Lamp of Poetry-5.Meeting-6.I don't know-7.Accounts-8.An act of forgiving-9.The other path-10.Old Age-11.Binding-12.माझ्या मना बन दगड

Personal - Friendship with child -
-बालदिन -Journey of Mind -My Birthday - Friendship with child - एका निखळ मैत्रीपर्वाची अखेर -This and that

Yes, you also can be a good writer.

Tuesday, January 16, 2024

ज्ञानदीपच्या सहकार्याने आपल्या गावाची वेबसाईट बनवून आयटी व्यावसायिक बना.

 ज्ञानदीप इन्फोटेक प्रा. लि. या वेबडिझाईन कंपनीने इ.स. २००० पासून मराठीमाध्यमास आपल्या वेबसाईट, सॉफ्टवेअर व मोबाईल सुविधांमध्ये महत्वाचे स्थान दिले आहे तसेच मायमराठी व संस्कृतदीपिका या वेबसाईट स्वखर्चाने तयार केल्या आहेत. 


महाराष्ट्रात आज बहुतेक शहरांच्या वेबसाईट इंग्रजीत असून सर्वसामान्य जनतेला त्याचा काही फायदा होत नाही. प्रसिद्ध मराठी वृत्तपत्रांच्या वेबसाईटवर गुगलसारख्या आंतरराष्ट्रीय कंपन्या आपल्या जाहिराती देत असल्याने स्थानिक उद्योग व व्यावसायिकांना आपल्या वस्तू वा सेवा यांची जाहिरात या माध्यमातून करता येत नाही.


ज्ञानदीपने  मायसांगली, मायकोल्हापूर या शहरांच्या वेबसाईट तयार करून त्यात शहरांचा इतिहास, भूगोल, नकाशे तसेच जिल्ह्यातील प्रेक्षणीय स्थळे व इतर माहिती दिली असून त्यावर स्थानिक जाहिरातींसाठी सुविधा उपलब्ध करून दिली आहे.



याच धर्तीवर  जुळेवाडी ह्या छोट्या खेडेगावाची वेबसाईट ज्ञानदीपने नमुन्यादाखल तयार केली असून सर्व गावांच्या मराठीतून वेबसाईट तयार करण्याचे भव्य महत्वाकांक्षी उद्दिष्ट आपल्यासमोर ठेवले आहे.

अशा वेबसाईटवर जाहिराती मिळवून व्यवसाय करण्याची मोठी संधी डिजिटल मार्केटिंगच्या क्षेत्रातील विद्यार्थ्यांना उपलब्ध झाली असून त्याचा संबंधितांनी फायदा घ्यावा. 


आयटी क्षेत्रात आणि महाराष्ट्रात सध्या मराठीची होत असलेली उपेक्षा लक्षात घेऊन सर्वांनी ज्ञानदीपच्या या कार्यात सहभागी व्हावे आणि ज्ञानदीपच्या मार्गदर्शनाखाली वेबडिझाईन शिकून या नव्या क्षेत्रात आपल्या शहराचे वा गावाचे नेतृत्व करण्याची संधी घ्यावी.

अधिक माहितीसाठी ज्ञानदीपशी संपर्क साधावा.  info@dnyandeep.com / +919422410520

Wednesday, January 10, 2024

ज्ञानदीप मंडळ - प्रत्येक शाळेसाठी नवे इंटरनेट दालन

भारत सरकारने ‘सर्व शिक्षा अभियान ’ या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना कमी किंमतीत लॅपटॉप देण्याची एक भव्य योजना 2012 साली आखली होती. एकदोन वर्षात असे लॅपटॉप प्रत्येक विद्यार्थ्याच्या हातात येतील अशी आशा सर्वांना वाटत होती पण ती योजना केवळ बातमीच राहिली. त्यावेळी ज्ञानदीपने मोठ्या उत्साहाने संगणक प्रशिक्षणाची योजना आखली होती त्यासाठी एक वेबसाईटही केली होती.  पुढे काही शाळांत शासकीय अनुदानातून अटल लॅब उभारण्यात आल्या. मात्र याचा उपयोग शिक्षणासाठी न होता केवळ एक प्रतिष्ठेेचे व प्रदर्शनीय साधन म्हणूनच शाळांनी त्याकडे पाहिले. प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत हे ज्ञान पोहोचलेच नाही. आता पुन्हा एकदा ज्ञानदीप ज्ञानदीप मंडळाच्या माध्यमातून ही योजना कार्यान्वित करणार आहे.

मोबाईल क्रांतीमुळे संदेशवहन सोपे झाले असले तरी युवावर्गाकडून त्याचा उपयोग फालतु गप्पा व गाणी यासाठीच होत आहे. कानात हेडफोन लावून मोबाईलवरून गाणी ऎकत प्रवास हे तर नित्याचेच झाले आहे. संगणकाचा व इंटरनेटचा उपयोगही मुख्यत्वे ट्विटर, आर्कुट व फेसबुकसारख्या सोशल साईटस, सिनेमा, गाणी, व व्हिडिओ गेम यासाठीच केला जात आहे. दूरदर्शन आज जाहिराती, मनोरंजन व भडक बातम्या यांनी ग्रासला आहे तीच परिस्थिती विद्यार्थ्यांच्या हातातील संगणकाची होईल व शिक्षणासाठी सर्व मोह टाळून कठोर परिश्रम करावे लागतात हेच विद्यार्थी विसरून जातील. हा धोका ओळखून वेळीच त्यावर उपाय योजना करणे आवश्यक आहे.

आज मनोरंजन क्षेत्रातील अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्या भारतातील या फार मोठ्या ग्राहकवर्गाला आपल्या प्रभाव क्षेत्रात आणण्यासाठी टपून बसल्या आहेत.अमेरिकेत तीन चार वेळा गेलो असताना तेथील मुलांवर मनोरंजनाचा, टॉय इंडस्ट्रीचा जबरस्दस्त पगडा बसल्याचे मला जाणवले. डायनोसॉर, स्पायडरमॅन, स्टार वार्स, हॅरी पॉटर अशा अनेक विषयांवर अशा कंपन्या खेळणी, पुस्तके, कपडे, वस्तू , गाणी व चित्रपट या माध्यमातून एक अनोखे, आवडणारे पण भ्रामक विश्व निर्माण करण्यात यशस्वी झाली आहेत. त्यांत त्यांचा हेतू शिक्षण नसून केवळ पैसा वा अधिक फायदा मिळविणे हा आहे. याचे भयावह परिणाम आता तेथील मुलांवर दिसू लागले आहेत. हिंसक व विध्वंसक वृत्तीतील दॊष व परिणाम यांचा ठसा उमटण्याऎवजी त्यात अन्याय व दु:ख नसून शौर्य व आनंद आहे अशी भाबडी कल्पना मुलांच्या मनांत रुजते आहे. या मनोरंजन व्यवसायाची संगणकामुळे प्रचंड वाढ झाली आहे व डायनॉसोरसारखी त्याची भूक वाढली आहे.भारतात आपण आपल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या आक्रमणापासून वाचवावयास हवे.

अमेरिकेत एक गोष्ट चांगली आहे की तेथे प्रौढ व्यक्ती संगणकाचा त्यांच्या नित्य कामासाठी भरपूर उपयोग करीत आहेत. नव्हे त्यांचे जीवनच संगणकाशी निगडीत झाले आहे. मुलांनी काय पहावे काय पाहू नये त्याचा कसा उपयोग करावा हे त्यांना कळते. त्यामुळे त्यांच्याकडे परिस्थिती आटोक्यात आहे. 

पण आपल्याकडे याबाबतीत शिक्षक वा पालक यांच्या संगणक अनभिज्ञतेमुळे याचे दुष्परिणाम होण्याचीच अधिक शक्यता आहे. काडेपेटीतील काडीने दिवा लावता येतॊ हे आपल्याला माहीत असते. पण म्हणून आपण काडेपेटी मुलांच्या हातात देत नाही. कारण काडेपेटीने भाजते हेही आपल्याला ठाउक असते. संगणक व इंटरनेटचे साधन शिक्षणासाठी मुलांच्या हातात देताना आपल्याला त्याच्या धोक्यांची माहिती असावयास हवी. अन्यथा सरकारचा एवढा खटाटॊप व प्रचंड खर्च शिक्षण दर्जा सुधारण्याऎवजी शिक्षणाची अधोगती होण्यास कारणीभूत व्हायचा. 

आपल्या देशात बहुतेक सर्व प्रौढ व्यक्ती संगणकापासून चार हात दूर आहेत. यात पालक व बहुतेक शिक्षकांचाही समावेश होतो. विद्यार्थ्याच्या हातात संगणक आला की त्याचा तो कशासाठी उपयोग करतो हे कळण्याचीही क्षमता बहुतेकांकडे नाही. अशावेळी संगणक क्रांतीचा उपयोग न होता दुरुपयोग होण्याची अधिक शक्यता आहे.

यावर उपाय काय? आपण संगणकक्रांती तर थोपवू शकत नाही. मग शिक्षक व पालकांनी संगणक शिक्षण घेणे आवश्यक आहे. तरच संगणकाचा शिक्षणासाठी उपयोग होऊ शकेल अन्यथा मनोरंजनाच्या मोहजालात आपला विद्यार्थीवर्ग गुरफटला जाईल.

आता संगणक शिक्षण घेणे म्हणजे काय? सुदैवाने संगणकाचा वापर टीव्हीइतकाच सोपा झाला आहे. थोडा प्रयत्न केला तर कोणालाही सहज संगणक व इंटरनेट वापराचे ज्ञान मिळविता येईल. प्रश्न आहे तो याची निकड समजण्याचा. संगणकाचा शिक्षणक्षेत्रास खरोखर फायदा हवा असेल तर त्याचा वापरही योग्य पद्धतीने व्हावयास हवा. 

संगणक हे साधन आहे साध्य नाही हे लक्षात ठेवले पाहिजे. हल्ली शाळेत संगणक शिक्षण हा एक विषय असतो. त्याऎवजी सर्व विषयांच्या शिक्षणासाठी संगणक हे साधन म्हणून प्रत्येकाने वापरले पाहिजे. ती काळाची गरज आहे.

आजकाल आधुनिक डिजिटल स्कूल पद्धतीने प्रभावी शिक्षण देण्याची जाहिरात बहुतेक मोठ्या खाजगी शाळा करीत असतात. यात दिले जाणारे ज्ञान बहुधा परदेशातील कंपन्यांनी विकसित केलेले व इंग्रजीत असते. स्थानिक परिस्थिती व गरज यांचा त्यात अभाव असतो. त्यामुळे अशा शिक्षणाचा प्रत्यक्ष अभ्यासात फारसा उपयोग होत नाही. येथील शिक्षकांनी असे ज्ञान मराठीत विकसित केले तरच त्याचा प्रभावी उपयोग होऊ शकेल.

अर्थात हे सर्व अल्पावधीत करणे अशक्य आहे. यासाठी पहिला टप्पा म्हणजे इंटरनेटवर उपलब्ध असणारे शिक्षणविषयक लेख, चित्रे वा धनीचित्रफिती यांचे आवश्यक तेथे मराठीत रुपांतर करून विषयवार वर्गीकरण करून त्याचा साठा विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणे. यात सर्व शिक्षकांचा सहभाग असणे आवश्यक आहे. शिवाय प्रत्येक शाळेत निर्माण होणारे हे ज्ञान एकत्र करून ते वेबसाईटच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोचविण्याचे काम करावे लागेल. याला समपातळीवरील ज्ञानप्रसार म्हणता येईल. महाविद्यालयातील प्राध्यापकांनी असेच कार्य करून महाविद्यालय पातळीवर मुक्त ज्ञानभांडार निर्माण केले तर त्याचा शाळांना फार फायदा होईल. महाविद्यालय व शाळा यांनी निर्माण केलेले ज्ञान सर्व समाजाला शिक्षित करण्यास व त्यांचे दैनंदिन प्रश्न व अडचणी सोडविण्यास अतिशय उपयुक्त ठरेल. ज्ञानदीप फौंडेशनने यासाठीच ‘ज्ञानदीप मंडळ’ हा महत्वाकांक्षी प्रकल्प सर्व शाळांत सुरू करण्याचे ठरविले. कोल्हापूर येथे पत्रकार परिषद घेऊन या योजनेचे उद्घाटन करण्यात आले होते.

 या योजनेत शाळेतील संगणकाचा शिक्षणासाठी प्रभावी वापर कसा करता येईल याचे प्रशिक्षण शिक्षकांना देण्यात येईल. संगणकावर मराठी टाईप करणे, माहितीचा शोध घेणे, इ मेल व ब्लॉग सुरू करणे इत्यादी माहिती ज्ञानदीपतर्फे देण्यात येईल. विविध विषयांवर असणार्‍या शैक्षणिक ध्वनी चित्रफितींची माहिती देण्यात येईल.

शिक्षण प्रसारासाठी माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग करणे आवश्यक आहे. कारण इंटरनेटवर विविध विषयावरील ज्ञानाचा अपार साठा आहे. अनेक संकेतस्थळांवरून आपणास हे ज्ञान सहज व मोफत मिळू शकते. यात प्रश्नमंजूषा, चित्रे, आकृत्या, ध्वनीफिती व चित्रफिती यांचा वापर करून अतिशय योजनाबद्ध स्वरुपात माहिती मांडलेली असते. मात्र याविषयी फारच थोड्या पालकांना, शिक्षकांना वा विद्यार्थ्यांना माहिती असते.

आज माहितीचा हा साठा मुख्यत्वे इंग्रजी भाषेत उपलब्ध आहे त्याचे मराठीत भाषांतर वा रुपांतर करून ते इंटरनेटवर प्रसिद्ध करण्यासाठी विद्यार्थी व शिक्षक यांच्या सामुहिक प्रयत्नांची गरज आहे. सर्व विषयाच्या शिक्षकांना व विद्यार्थ्यांना ज्ञानदीप मंडळात सहभागी होता यॆईल. मात्र विज्ञान शिक्षकांना नव्या तंत्रज्ञानाची ओळख व अधिक माहिती असल्याने त्यांनी या उपक्रमात पुढाकार घेतल्यास ज्ञानदीप मंडळाचे कार्य यशस्वी होऊ शकेल. ज्ञानदीप फौंडेशन आपणास याबाबतीत सर्वतोपरी सहकार्य करेल.

भोवतालच्या समाजातील विविध समस्यांचा शोध घेणॆ व त्यावर प्रभावी उपाय शोधण्याचे कार्य शिक्षक व विद्यार्थी इंटरनेट्च्या माध्यमातून सहज करू शकतील. ही माहिती देऊन शाळा आपल्या भोवतालच्या विकासात भरीव योगदान देऊ शकेल. उपलब्ध संगणकाचा वापर करून विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासक्रमास पूरक माहिती मराठीत टाईप केली तर मराठीत अशा ज्ञानसाठ्यात वाढ होईल व हा साठा संकेतस्थळाच्या माध्यमातून इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविता येईल. इंटरनेटची सुविधा नसलेल्य़ा शाळातील संगणकावर ही माहिती स्थापित करण्याचे कार्य ज्ञानदीप फौंडेशनतर्फे करण्यात येईल.

शाळांना या योजनेचा उपयोग अर्थसाहाय्य मिळविण्यासही करता येईल. अनेक उद्योजक व व्यावसायिक यांना इंटरनेटवर त्यांच्या दृष्टीने आवश्यक अशा उपलब्ध ज्ञानाविषयी कल्पना नसते वा त्यांना अशा माहितीचा शोध घेण्यास वेळ नसतो. ज्ञानदीपच्या मंडळातील विद्यार्थ्यांनी नियमितपणे अशा माहितीचा शोध घेऊन ती स्कॅन वा झेरॉक्स करून संबंधितांपर्यंत पोहोचविली तर त्यातून शाळेस आर्थिक लाभ होऊ शकेल. शिवाय विद्यार्थ्यांना नव्या माहितीची ओळख होईल. मराठी टायपिंग, मराठीत भाषांतर, तसेच संगण्क शिक्षणाचे सशुल्क वर्गही शाळेस ज्ञानदीप मंडळामार्फत चालविता येतील.

ज्ञानदीप मंडळांचे कार्य प्रसिद्ध करण्यासाठी तसेच शाळा, शिक्षक, विषय तज्ञ यांच्यात परस्पर सुसंवाद व सामुहिक कार्यास मदत करण्यासाठी www.school4all.org ह्या संकेतस्थळाचा उपयोग करण्यात येणार आहे. सध्या या संकेतस्थळावर असणार्‍या सुविधां अधिक विकसित करण्यात येत असून त्यावर सहभागी शाळा, शिक्षक, व विषय तज्ञ यांची माहिती विनामूल्य देण्यात येणार आहे.

यापूर्वी मराठी, संस्कृत व विज्ञान या विषयांसाठी ज्ञानदीप फौंडेशनने स्वतंत्र संकेतस्थळांची निर्मिती केली आहेच. आता इतिहास, भूगोल, गणित, चित्रकला इत्यादी विषयांची माहिती संकलित करण्यात येईल. school4all.org या संकेत स्थळासाठी सध्या प्रामुख्याने मराठी माध्यम वापरले आहे मात्र आवश्यकता भासल्यास व पुरेसा प्रतिसाद मिळाल्यास तेथे इंग्रजी व अन्य भाषांचाही समावेश करण्यात येईल . .

या प्रकल्पाचा आवाका मोठा असल्याने आपण सर्वांनी या उपक्रमास सक्रीय सहकार्य करावे ही नम्र विनंती. आपल्या पाहण्यात आलेल्या शिक्षणविषयक मोफत माहिती देणार्‍या संकेत स्थळांचे पत्ते कळविणे, स्वतः लेख, चित्रे वा माहिती पाठविणे, उपयुक्त सूचना करणे, चुका दर्शविणे असे सहकार्य मिळाल्यास या संकेतस्थळाची व्याप्ती लवकर वाढू शकेल. स्पर्धा, प्रश्नोत्तरे व शिक्षणविषयक घटना व कार्यक्रम यांनाही या संकेतस्थळांवरून प्रसिद्धी देण्यात येईल.

Friday, January 5, 2024

Web portal for Environmental Engineers


Dnyandeep Education & Research Foundation has launched a portal website http://www.envis.org for empowering Environmental Engineers and Architects to accept the challenge of rapid development of India without any adverse environmental impact.
Objective
  •      To empower environmental engineers and architects to accept the challenge of rapid development of India without any adverse environmental impact.
  •      To create job prospects by convincing the need of full time, environmental engineer/architect for planning and executing all environment related projects.
Relevance
  •        Environmental Education, Research, Field experience and Project Management through     coordinated efforts of all stake holders is needed for this purpose.
  •      There is a need of finding techno-economical solutions for pollution control, effective operation and maintenance and use of strict monitoring and control systems to safeguard environmental quality.
  •     Environmental engineer/architect has to play a dual crucial role of convincing society about effective environmental protection and ensuring proper pollution control measures by builders, industries and project proponents.
Job Prospects
At present, the environmental engineers / architects are not given any administrative powers in project management, though they have acquired special training in environmental technology and impact assessment. Their role remains only limited to technical aspects and they cannot enforce authorities for proper allocation of funds to safeguard environmental quality. Moreover   they remain isolated from society and get  blamed of project delay or failure  Most of the technical experts in green and environmental technology accept academic career and lack actual experience of field work. There is a need to integrate research and field experience for getting practical technical and ally acceptable solutions to environmental issues. 
 
By building strong group of Environmental Engineers and Green Architects both from academic and field sectors, we can convince the administrative authorities that  all the local bodies, industries and infra-structural projects must employ full time, well qualified/experienced environmental engineer/architect for proper planning and  implementation of  all environment related projects.
This change can be achieved if environmental engineers/architects come together and build a strong proactive social group backed with sound technical knowledge.

   Salient Features of envis.org

  • Study material of all necessary science and technology subjects related to Environmental  Engineering, Green Building, Eco village and Smart city.
  • EIA, Environmental Laws and Environmental Project Management
  • Online books, videos, power point presentations
  • Question banks, research projects  and web links to environment resources, news and events.       
ERG Membership
  • Environment Resource Group aims to build a network of  Environmental Engineers / Architects.
  • It provides a virtual platform for information exchange, education and career growth
  • Members can display resume, publish environment related blogs and contribute to knowledge database
  • They can undertake collaborative research and consultancy projects
  • Develop a  strong environmental association with sustainable environment as objective.
Join ERG  and participate in Dnyandeep Foundation Activity
  • I request all  Environmental Engineers and Architects to visit the website, see the features provided, give suggestions for improvement and help  Dnyandeep Foundation in this venture.
  • Let us use this virtual platform of portal website to strengthen Education, Research and Consultation in Environmental Engineering for effective Sustainable Development