Thursday, November 16, 2017

वितरण व्यवस्थेत दूषित पाणी


वितरण व्यवस्थेत दूषित पाणी 
 वितरण व्यवस्थेवरील झडपा बंद असतील त्यावेळी पाण्याच्या नळांत ऋण किंवा शून्य दाब असतो व या कालावधीत मलजल किंवा इतर दूषित पाणी, तोटीतून आत शिरून सर्व वितरणव्यवस्थेत प्रवेश करण्याची शक्य असते ज्यावेळी खंडीत पाणीपुरवठा पद्धती असेल किंवा लोक पाणी पुरवठ्यापेक्षा जास्त पाणी नळांतून पंपाने खेचून नळात कमी वा ऋण दाब निर्माण करत असतील तर दूषित पाणी नळात ओढले जाण्याची फार शक्यता असते. हे एक प्रदूषणाचे महत्त्वाचे उगमस्थान असते. 
कॉलिफार्म जीवाणूंची जी निरनिराळी उगमस्थाने वर दिली आहेत त्याठिकाणी कॉलिफार्मची उत्पत्ती होऊ नये म्हणून खलील उपाय करता येतात 
(अ) पाणी साठवण्याच्या तलावांवर छप्पर घालणे 
(आ) पाण्याच्या मुख्य नळांचे निर्जंतुकीकरण करणे 
(इ) नळजोडणी आधुनिक पद्धती करण्याची कायद्याने सक्ती करणे 
जरी हे सर्व उपाय केले तरी जर पश्चात क्लोरिनीकरण केले नसेल व सर्व वितरणव्यवस्थेत मुक्त शेष क्लोरिन पाण्यात राखला नसेल तर लोकांनी पुरविलेल्या पाण्याचा दर्जा निस्यंदित पाण्याच्या दर्जापेक्षा कमी असतो असे. अनुभवाने दिसून आले आहे. येथे एक गोष्ट लक्षात ठेवणे जरूर आहे. ती म्हणजे वितरण व्यवस्थेतील थोड्याशा भागात उलट दिशेने वाहणाऱ्या वक्रनलिका प्रवाहासारख्या कारणाने नळात दषित पाणी शिरले तर त्या प्रदूषित पाण्यास आवश्यक असेल तेवढा जास्त क्लोरीन सर्व वितरण व्यवस्थेतील पाण्यात राखणे शक्य नसते. तथापि जर नियमितपणे काही निवडक ठिकाणी पाण्याचे नमुने घेऊन त्यात मुक्तशेष क्लोरिन नसेल त्याच्या जवळपास प्रदुषण उगमस्थान आहे व क्लोरिनची त्यातील प्दार्थाशी विक्रिया होत आहे. 
असा अंदाज करता येतो मग या उगमस्थानाचा शोध घेऊन योग्य ती उपाययोजना करावी लागते. एकंदरीत पाहता पाणी दूषित होऊ न देणे, निस्यंदन क्रिया कार्यक्षम ठेवणे व स्वच्छ पाण्याचे तलाव आणि वितरण व्यवस्था यांची देखभाल करणे या गोष्टींचे महत्व यावरून कळून येते तसेच फक्त क्लोरिनीकरण जास्त अवलंबून रहाणे असे चुकीचे आहे हेही तेथे पुन्हा एकदा लक्षात येते. 
बहुधा सर्व वितरण व्यवस्था ०.२ ते ०.४ भा / दलभा प्रमाणात मुक्त शेष क्लोरिन राखला जातो ही स्थिती निर्माण होण्यासाठी प्रथम थोडा कालावधी जावा लागतो कारण नळांतील जिवाणूंचे चिकट थर किंवा साचलेले पदार्थ यांच्याशी निस्यंदित पाण्यातील क्लोरिनची विक्रिया होऊन त्या सर्व पदार्थाचे ऑक्सीकरण होईपर्यत स्थिर स्थिती निर्माण होत नाही. संक्रमणाचे तीन कालावधी असतात. पहिल्या कालावधीत नळातील कार्बन पदार्थांची क्लोरिन गरज बरीच जास्त असल्याने त्यामुळे पाण्यातील शेष क्लोरिन नाहीसा होतो. (जलशुद्धीकरण, केंद्रापासून, सुरवात करून बाहेरच्या नळापर्यंतची वितरणव्यवस्था व्यवस्थित धुवून काढली तर हा कालावधी कमी करता येतो.) कार्बनी पदार्थांची प्राथमिक गरज संपल्यावर दुसरा कालावधी सुरु होतो. त्यावेळी मुक्त अमोनियाशी क्लोरिनची विक्रिया होऊन तयार झालेला संयुक्त शेष क्लोरिन पाण्यात राहिलेला असतो. 
कार्बनी पदार्थ व अमोनिया यांने पूर्णतः ऑक्सीकरण झाल्यानंतर तिसरा कालावधी सुरु होतो व आवश्यक तो मुक्त शेष क्लोरिन पाण्यात रहातो. या तीन कालावधीसाठी एकूण एक ते सहा महिन्यापर्यत वेळ लागतो व तोपर्यत पाण्यास क्लोरिनची चव येते हे टाळण्यासाठी आधी नळ धुवून काढून नंतर मुक्त शेष क्लोरिनीकरणाचे प्रमाण थोडेथोडे वाढविले जाते उदाहरणार्थ पूर्वी पाण्यात राखलेला संयुक्त शेष क्लोरिन नाहीसा होण्यासाठी दर आठवड्याला ०.१ भा / दलभा या प्रमाणात मुक्त शेषक्लोरिनची मात्रा वाढवावी लागते. व नंतर जलशुद्धीकरण केंद्रातील संयुक्त शेष क्लोरिन नाहीसा होऊन तेथे आवश्यक त्याप्रमाणात मुक्त शेष क्लोरिन राहीपर्यत पुन्हा दर आठवड्याला ०.१ भा /दलभा या प्रमाणात मुक्तशेष क्लोरिन मात्रा वाढवावी लागते. 

No comments:

Post a Comment