Showing posts with label Computer Programming. Show all posts
Showing posts with label Computer Programming. Show all posts

Monday, May 20, 2024

Dnyandeep's appeal to Seniors to invest in Youth

 The corona lockout has stopped the economic growth of the world. In India, the unemployment problem has sky rocketed due to closure of industries and restrictions on travel. This may lead to anarchy and violent protests unless all work relentlessly and collectively to counter this impact on our economy and progress.



There is a more responsibility on seniors and retired people to come forward and support young youth to start business and earn livelihood. Investing in shares and bank deposits is not going to help in near future, as the economy is moving on downward path and chances are that you will loose money.

Instead if the seniors invest their money and employ the young workforce and guide them to build business, it will be benificial to both. You can build a sustainable small business in your field of expertise and knowledge and can find customers easily due to you contacts in local community.

In India, foreign MNCs are entering with huge funds and wish to capture Indian customers. In education field, they have made inroads and already established supremacy in online education.

It is possible that India will face intellectual slavery if we sell our intellect and experience to  further the interests of these MNCs.

On the other hand if professionals, small businesses come together and build a sustainable growth model, we can proect ourselves and move towards Atmanirbhar Bharat.

It is not possible for government to give jobs to all or provide help to start industries to youth without any financial backup and industrial experience oe ability to take financial risk. Our interest rates are very high and new industry and business cannot sustain that load when the profits seldom exceed 15 percent.  Only seniors can take such risk, as any way, they are taking risk in putting money in banks.

Dnyandeep Foundation has decided to motivate such start-ups having combination of senior-juniors and shall provide all necessary help in digital marketing and online training.


For IT sector, Dnyandeep Foundation can give portfolio of work to start with to members who can start free lance work and work through Dnyandeep Foundation, till they come out of initial hurdles and then can start on their own.

At personal level, I have decided to invest my money in this endevor and I am sure many young students will take advantage of this scheme.

I appeal to all seniors and retired persons to spend maximum time for inspiring, training and helping youth, who will build tomorrow's strong Bharat. --- Dr. S. V. Ranade, Dnyandeep Foundation, Sangli

Saturday, January 13, 2024

बहुगुणी व शिकायला सोपी पायथॉन भाषा शिका व संगणकतज्ज्ञ बना.

ज्ञानदीपमध्ये वेबसाईट, सॉफ्टवेअर आणि एपसाठी लागणा-या सर्व भाषा शिकण्याची सोय असली तरी आता लहानांपासून थोरांपर्यंत, कोणालाही सहज शिकता येणा-या पायथॉन या आधुनिक भाषेचे अद्ययावत शिक्षण देण्याची सोय करण्यात आली आहे.


 पायथॉनची वैशिष्ठ्ये


१. पायथॉन सध्या सर्वात जास्त वापरली जाणारी आणि C प्रमाणे कॉम्प्युटर हार्डवेअरशी निगडीत असणारी प्रोग्रॅमिंग भाषा आहे.

२. पायथॉनमध्ये आपण C# वा जावाप्रमाणे  ऑब्जेक्ट-ओरिएंटेड किंवा C प्रमाणे प्रोसीजर पद्धतीने  प्रोग्रामिंग करू शकतो.

३. पायथॉन प्रोग्राम्स जावासारख्या इतर प्रोग्रामिंग भाषांपेक्षा कितीतरी लहान असतात. सहज वाचता येतात.

४.  गुगल, अमेझॉन, फेसबुक, इन्स्टाग्राम, ड्रॉपबॉक्स, उबर… इत्यादी जवळजवळ सर्व तंत्रज्ञ कंपन्या  आपल्या वेबसाईटसाठी प्रामुख्याने पायथॉन भाषा वापरतात.

५.  पायथॉनमध्ये  सर्वात मोठी सुविधा म्हणजे तयार प्रोग्रॅम्सची लायब्ररी. त्यांचा वापर करून अगदी थोड्या ओळीत अवघड क्लिष्ट गणिती प्रक्रिया, भौमितिक आकृत्या वा ग्राफ काढता येतात.

६. लहान मुलांसाठी छोटे मनोरंजक खेळ व व्हिडिओ बनविण्यासाठी लागणारी स्क्रॅच, टर्टल ग्राफिक्स व इतर अशीच सॉफ्टवेअर पायथॉन भाषाच वापरतात.

७. इलेक्ट्रॉनिक उपकरणांपासून ते यंत्रमानवापर्यंत साधनांना संचालित करण्यासाठी पायथॉनमध्येच प्रोग्रॅम लिहावे पागतात.

८. कॅमेराद्वारे चित्र वा प्रतिमा ओळखणे, फिंगर प्रिंटींग, बार कोड स्कॅनिंग, छापील पानावरून टेक्स्ट तयार करणे इत्यादी सरव गोष्टींसाठी पायथॉनचाच वापर केला जातो.



स्वतः आत्मनिर्भर होण्यासाठी आणि  डिजिटल भारताच्या उभारणीत सक्रीय सहभागी होण्यासाठी प्रत्येकाने पायथॉन शिकणे आवश्यक आहे.

ज्ञानदीपने लहान मुलांपासून ते उच्चशिक्षित विद्यार्थ्यांपर्यंत पायथॉनचे विविध स्तरावरील शिक्षण देण्यासाठी अध्यासक्रम तयार केले असून अनेक शिक्षकांमार्फत सर्वांपर्यंत ते पोहोचविण्याचे उद्धीष्ट ठेवले आहे. लवकरच

ऑनलाईन पद्धतीनेहीया भाषेचे समग्र शिक्षण ज्ञानदीपतर्फे दिले जाणार आहे,

शिक्षणसंस्थांनी यात सहभागी व्हावे असे आवाहन ज्ञानदीप सर्वांना करीत आहे.

Thursday, December 21, 2023

बलाढ्य अडोबला छोट्या फिग्माचे आव्हान

मोठा मोसा लहान माशांना गिळून मोठा होतो तसे व्यापारातही प्रतिस्पर्धी कंपनी विकत घेऊन मोठ्या कंपन्या आपले वर्चस्व कायम राखतात.फोटोशॉप, फ्लॅश, ग्राफिक डिझईन आणि इलस्ट्रेटर तंत्रज्ञानात आघाडीवर असणारी अडोब संगणक कंपनी जागतिक बाजारात सर्वात जुनी, महत्वाची व मोठी कंपनी असूनही युरोपमधील फिग्मीच्या यशामुळे त्यांच्या ग्राहक वर्गात प पर्यायाने फायद्यात घट होत होती. 


यावर उपाय म्हणून अडोबने नुकताच युरोपमधील फिग्मा ही याच क्षेत्रातील छोटी कंपनी 20 बिलियन डॉलरला विकत घेण्याचा  प्रस्ताव मांडला होता.फिग्मा कंपनीचा ताळेबंद 400 मिलियन डॉलर इतका कमी असूनही एवढी मोठी किंमत अडोबने देऊ केली होती. साहजिकच फिग्माने या विलिनीकरणास आनंदाने मान्यता दिली होती. 


Ref:https://www.wsj.com/tech/adobes-20b-purchase-of-figma-would-harm-innovation-u-k-regulator-provisionally-finds-19f28b72?mod=WTRN_pos7&cx_testId=3&cx_testVariant=cx_164&cx_artPos=6
 

मात्र   युरोपियन स्पर्धा आणि बाजार प्राधिकरणाला  असे लक्षात आले की फिग्मा हे कमी किंमतीचे सॉफ्टवेअर युरोपमधील अनेक डिजिटल डिझायनर्स व छोट्या कंपन्या  वापरत आहेत. त्याना अडोबच्या अटी व किमती स्वीकारायला लागतील शिवाय फिग्माच्या नवनिर्मितीच्या व प्रगतीच्या  प्रयत्नांना खीळ बसेल.त्यामुळे युरोपियन कायदेतज्ज्ञांनी त्यास अटकाव केला. त्यामुळे फिग्माचे निलिनीकरण थांबले. 

माझ्या मनात आले की यावर एक कल्पनारम्य गोष्ट रचता येईल ---- अमेरिकेतील अडोब राजाने युरोपमधील रूपसुंदरी फिग्मा हिला मागणी घातली. अडोबची संपत्ती पाहून फिग्माने या मागणीला होकार दिला. पम युरोपच्या जनतेला फिग्मा आपल्यातून जाण्याची भिती वाटली. फिग्माबद्दलचे त्यांचे प्रेम उफाळून आले त्यांनी तिला राजकन्या म्हणून मान देण्याचे ठरविले, मग फिग्मानेही युरोपची राजकन्या म्हणून राहण्याचे मान्य केले व अडोबला नकार दिला.
 
भारतानेही आपल्या छोट्या स्वदेशी कंपन्यांना संरक्षण देऊन त्यांच्या प्रगतीसाठी आर्थिक मदत आणि प्रकल्प दिले तरच त्या प्रबल आंतरराष्ट्रीय संस्थांपुढे तग 
धरू शकतील.

Sunday, December 17, 2023

ज्ञानदीप इन्फोटेक - वीस वर्षांपूर्वीचा परिचय

मिलपिटास, कॅलिफोर्निया - आज शनिवार, 16 डिसेंबर 2023. कॉम्प्युटरवर जतन केलेल्या जुन्या फाईल वाचणे हा माझा रिकाम्या वेळचा छंद असतो. सध्या ज्ञानदीपच्या कार्याचे नियोजन मी दूरस्थपणे करीत असताना ज्ञानदीपच्या गेल्या कित्येक वर्षांचा इतिहासातील आशा-निराशा, यश-अपयश यांच्या घटना मनासमोर तरळून जातात. 

1973मध्ये कानपूर आयआयटीत असताना कॉंम्प्युटरच्या अद्भुत विश्वाने मला भुरळ घातली.  पर्यावरण अभियांत्रिकी माझा विषय असूनही संगणकाची कोणताही विषय आत्मसात करण्याची व गहन प्रश्न सोडविण्याच्या यांत्रिक कुशलतेमुळे मला याच विषयात आपण संशोधन करावे असे माझ्या मनाने घेतले.

1976 मध्ये पीएचडी पूर्ण करून मी जेव्हा माझ्या वालचंद कॉलेजमध्ये पुन्हा रुजू झालो त्यावेळी कॉलेजमधील इतर कॉम्प्युटरप्रेमी प्राध्यापकांशी माझे सूत जुळले. सुदैवाने इलेक्ट्रॉनिक्सचे प्रमुख प्रा. एन. आर. फडणीस  यानी मला प्रोत्साहन दिले. पुढे कॉलेजने घेतलेल्या ऑम्नी कॉम्प्युटरच्या प्रशिक्षणासाठी मला बंगलोरला जाण्याची संधी मिळाली. बेसिक आणि कोबोल प्रोग्रॅमिंगचे प्रशिक्षण वर्ग आम्ही घेतले. 

माझी पत्नी सौ. शुभांगी संस्कृत शिक्षिका होती तरी मी तिला संगणक प्रशिक्षम घेण्यास सांगितले. तिनेही हे आव्हान स्वीकारून बेसिक कोर्स केला आणि सावरकर प्रतिष्ठानच्या शाळेत मुलांसाठी महिन्याचा प्रशिक्षण कोर्स घेतला. माझा उत्साह यामुळे अधिकच द्विगुणित झाला. नंतर विश्रामबाग येथे सुयश कॉम्प्युटर्स या नावाने सुहास खांबे, वैजयंती कुलकर्णी आणि सौ शुभांगी यानी संगणक प्रशिक्षम आणि सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटचे काम सुरू केले. 

वालचंद कॉलेजतर्फे महाराष्ट्रातील अनेक शाळांत बीबीसी कॉम्प्युटर प्रोग्रॅमिंगचे  प्रशिक्षण देण्याची मला संधी मिळाली..

त्यानंतर ज्ञानदीप इन्फोटेकची स्थापना आम्ही इ. स. 2000 नोव्हेंबर मध्ये केली. आज मागे वळून पाहताना असे लक्षात येते की इतक्या वर्षांच्या प्रवासानंतरही ज्ञानदीपची स्थिती कायम बाल्यावस्थेची व नाजूक राहिली. काम खूप केले पण हाती काही राहिले नाही. याचे एक कारण म्हणजे माझा स्वभाव शिक्षकी पेशाचा असल्याने ज्ञानदीपमधून चांगले डेव्हलपर तयार करणे यावरच मी लक्ष केंद्रीत केले. फायदा तोट्याचे गणित त्यामुळे जमले नाही. शिकलेले विद्यार्थी दुस-या मोठ्या कंपन्यात गेले. 

हे असे होते ... विचार करू लागले की मन वहावत जाते व काय करायचे ते विसरले जाते. 

मी हा ब्लॉग लिहिण्याचे कारण म्हणजे 2003 मध्ये प्रसिद्ध केलेल्या ज्ञानदीपच्या परिचयाची फाईल मला हार्डडिस्कमध्ये सापडली. त्यावेळी आम्ही वापरत असलेल्या श्रीलिपीमध्ये असल्याने ती मला वाचता येईना. श्रीलिपी फॉंट इन्स्टॉल क्ल्यावर मला त्यावेळच्या  ज्ञानदीप कार्याची व भविष्यातील योजनांची माहिती कळली.  पीडीएफ करून मी त्याचे फोटो खाली देत आहे. 


 
आज 2023 डिसेंबर, वीस वर्षांपूर्वी केलेले कार्य आणि आजची ज्ञानदीपची स्थिती यांचा विचार केला तर एक लक्षात येते की ज्ञानदीपचे उद्दीष्ट बदललेले नाही. गेलेल्या प्रदीर्घ कालखंडाचा विचार करता कार्यविस्तार फारसा झालाच नाही. याला कारण बहुराष्ट्रीय कॉम्प्युटर कंपन्या आणि प्रसार माध्यमे यांनी सर्व स्थानिक ग्राहक-वर्ग गिळंकृत केला. आजही भारतातील बहुतेक समाजोपयोगी शिक्षणाचे व विकासाचे कार्य करणा-या स्थानिक स्वदेशी  संगणक संस्थांची अशीच बिकट अवस्था आहे. 
 
तरीदेखील नेटाने ज्ञानदीपचे कार्य असेच अखंड चालू रहावे यासाठी मी प्रयत्नशील आहे. पाहू कितपत यश येते आणि केव्हपर्यंत टिकते ते.


Saturday, November 11, 2023

Dnyandeep internship training program.

Dnyandeep Foundation has launched a revolutionary internship training program to provide training and experience in real life business projects with the help of academic institutes, who can use their infrastructure and teaching faculty to train their own fresh graduates.

Dnyandeep Infotech Pvt. Ltd., an IT company with track record of 22 years will be happy to share their projects and knowledge resources and issue experience certificates after successful completion of training.

Dnyandeep Foundation  has vast experience of training in IT and Env. Engg. and  Green Technology with network of academicians and professionals in these fields.

It will be a Win-Win proposal, both for Dnyandeep and participating institute.
Moreover, it will help in creating entrepreneurs and create opportunities of good job placements in private sector.

I feel that on the occasion of Teachers Day, the teachers should become main stake holders in business growth.

Interested organizations may contact info@dnyandeep.com or info@dnyandeep.net to finalise terms of collaboration.

- Dr. S. V. Ranade, Dnyandeep, Sangli
- Phone -- + 919422410520 / +01 4083387672
You can any of these numbers for  WhatsApp message

ज्ञानदीपच्या सहकार्याने इंटर्नशिप प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करा.

 ज्ञानदीप फाऊंडेशनने उद्योग व व्यवसाय प्रकल्पांमध्ये प्रशिक्षण आणि अनुभव प्रदान करण्यासाठी  शैक्षणिक संस्थांच्या सक्रीय सहभागातून इंटर्नशिप प्रशिक्षण वर्ग सुरू करण्याची  योजना आखली आहे. यात सहभागी होणा-या संस्थांना आपल्या खोल्या, प्रयोगशाळा व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या साहाय्याने आपल्याच संस्थेतून पदवी घेऊन बाहेर पडणा-या माजी विद्यार्थ्यांना   असे व्यवसायोपयोगी प्रशिक्षण देऊ शकतात.

ज्ञानदीप इन्फोटेक प्रा. लि.ही सांगलीतील कंपनी वेबडिझाईन, सॉफ्टवेअर व मोबाईल एप डेव्हलपमेंट क्षेत्रात गेली 22 वर्षे कार्यरत आहे. या संस्थेत प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेऊन अनेक विद्यार्थी भारत व परदेशात उच्च पदावर काम करीत आहेत. ज्ञानदीप फौंडेशन पर्यावरण अभियांत्रिकी, हरित तंत्रज्ञान आणि संगणक प्रशिक्षण या क्षेत्रात गेली 15 वर्षे कार्य करीत असून महाराष्ट्रात तसेच परदेशांत अनेक सेमिनार व प्रशिक्षण वर्ग संस्थेने आयोजित केले आहेत. अनेक शिक्षण संस्थांतील सध्या कार्यरत असणारे व निवृत्त अनुभवी प्राध्यापक तसेच विविध क्षेत्रातील व्यावसायिक ज्ञानदीपच्या या योजनेत सहभागी होऊ शकतील.

अमेरिकेतील हॉरवर्ड विद्यापिठाच्या धर्तीवर विद्यार्थ्यांच्या स्टार्ट अप उपक्रमात पार्टनर होऊन  त्यांच्या व्यवसायवाढीस मदत व प्रोत्साहन देण्यासाठी शिक्षण संस्थांनी पुढे आले पाहिजे. तरच माजी विद्यार्थ्यांतून  उद्योजक निर्माण होण्यास वा  खाजगी क्षेत्रात त्याना चांगल्या नोकरीच्या संधी निर्माण होण्यास मदत होईल.

मला असे वाटते की  शिक्षणसंस्थांनी  व्यवसाय वाढीचे मुख्य भागधारक बनले पाहिजे. ज्ञानदीप याबाबतीत उद्योग व शिक्षणसंस्था यातील समन्वयाचे काम करेल. तसेच ज्ञानदीप इन्फोटेक प्रा. लि. या व्यावसायिक संस्थेच्या माध्यमातून परिक्षा घेऊन  प्रत्यक्ष अनुभवाचे  शिफारसपत्र देऊ शकेल.

या योजनेत सहभागी होण्याची इच्छा असणा-या व्यक्ती व संस्थांनी   info@dnyandeep.com किंवा info@dnyandeep.net वर ज्ञानदीपशी संपर्क साधावा आणि  योजनेचे प्रारूप ठरवावे ही विनंती.

या प्रस्तावित योजनेबाबत आपली मते वा मार्गदर्शक सूचना  कळवाव्यात  ही विनंती. कारण सर्वांच्या सक्रीय सहभागाशिवाय ही योजना यशस्वी होणार नाही.
 
आभारी आहे.

- डॉ. एस. व्ही. रानडे ( निवृत्त प्राध्यापक, वालचंद इंजिनिअरिंग कॉलेज, सांगली) , ज्ञानदीप, सांगली
- फोन -- + 919422410520 / +01 4083387672
व्हॉट्सअॅप मेसेजसाठी तुम्ही यापैकी कोणताही नंबर वापरू शकता.

Tuesday, October 3, 2023

झेन ऑफ पायथॉन – अजगराचे ध्यान

 

पायथॉन म्हणजे अजगर. पायथॉन या संगणक भाषेचे नाव आणि लोगो हे अजगराच्य मुकाट्याने सर्व गिळून टाकण्याच्या क्षमतेचे प्रतिक आहे. झेन हा शब्द मध्य चिनी शब्द 禪 (chán), 禪那 (chánnà) चा संक्षेप, जो संस्कृत शब्द ध्यान (“ध्यान”) चे चीनी लिप्यंतरण आहे, या जपानी उच्चारावरून आला आहे. त्यामुळे Zen of Python (झेन ऑफ पायथॉन) म्हणजे अजगराचे ध्यान. एकाजागी स्वस्थ पडून राहिलेला अजगर काय विचार करीत असेल या कल्पनेवर आधारित पीटर्सची झेन ऑफ पायथॉन ही कविता पायथॉन भाषेचे सामर्थ्य आणि क्षमतेचे यथायोग्य वर्णन करीत असल्याने अधिकृत पायथॉन भाषेमध्ये तिचा समावेश केलाआहे.

पायथॉन >>>या चिन्हावर वर खालील प्रमाणे टाईप केल्यास ही कविता दिसू लागते.

import this

वरील इंग्रजी कवितेचे मराठी रुपांतर मी खालीलप्रमाणे केले आहे.

    कुरुपापेक्षा सुंदर चांगले 
    अस्पष्ट पेक्षा स्पष्ट चांगले 
    साधे हे क्लिष्टपेक्षा चांगले 
    गुंतागुंतीपेक्षा क्लिष्ट चांगले 

    आतल्या गाठीपेक्षा सरळ सूत  चांगले 
    दाट पेक्षा पातळ चांगले 
    सहज समजण्यासारखे चांगले

    विशेष प्रकारचे लिखाण नियम मोडण्यासाठी पुरेसे विशेष नसतात

    जरी व्यावहारिकता शुद्धतेपेक्षा उपयुक्त असते
    तरी चुका कधीही नकळत्या राहू  नयेत.
    त्यांचे स्पष्टपणे निरसन करणे आवश्यक आहे

    अस्पष्टता असेल तरी अंदाज करण्याचा मोह करू नका
    ते करण्याचा एक- आणि प्राधान्याने फक्त एकच-स्पष्ट मार्ग असतो.

    जोपर्यंत तुम्ही  प्रयत्न करीत नाही तोपर्यंत तो मार्ग प्रथम स्पष्ट नसेल.

    जरी आता करणे कधीही न करण्यापेक्षा चांगले वाटत नसले 
    तरी कधीही न करण्यापेक्षा आता करणे श्रेयस्कर असते

    कार्य करण्यात स्पष्टता नसणे वाईट
    कार्यपद्धती सोपी केल्यास  स्पष्ट करणे सोपे असेल, 
    तर ती चांगली कल्पना असू शकते.

    संकल्पनेला नाव असणे ही एक चांगली कल्पना आहे 
    – चला त्यापैकी आणखी काही करूया!

Friday, May 5, 2023

ज्ञानदीप इन्फोटेक आणि स्वयंउद्योजक

नोकरीपेक्षा स्वयंउद्योजकतेचे ध्येय विद्यार्थ्यांनी ठेवावे यासाठी ज्ञानदीप फौंडेशनच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे विविध उपक्रम आणि प्रशिक्षण शिबिरे घेतल्यानंतर आता स्वयंउद्योजकांच्या मदतीसाठी ज्ञानदीप फौंडेशनने आपले प्रत्यक्ष सहकार्य देण्याचे ठरविले आहे. इस्लामपूरचे नवउद्योजक श्री अक्षय दाभोळे यांच्या क्वांटीएड या इंडस्ट्री -4 च्या सेवा सुविधा देणा-या कंपनीशी सहकार्य करण्यात य़ेणार असून प्रोडक्ट आणि सॉफ्टवेअर विकासाच्या कार्यात ज्ञानदीपची टीम सहभागी होणार आहे.
याशिवाय ज्ञानदीप फौंडेशनतर्फे क्वांटीएड सेवासुविधांचे डिजिटल मार्केटींग करण्यात येणार आहे. ज्ञानदीप इन्फोटेक आणि ज्ञानदीप फौंडेशन या दोन्ही संस्थांनी स्वयंउद्योजकांना एकत्रितपणे मदत करण्याचे ठरविले असून त्याचा उद्योजकांनी लाभ घ्यावा.

Wednesday, November 16, 2022

Day and Night World Clock - Wolfram Demonstrations Project

Day and Night World Clock - Wolfram Demonstrations Project: See local times around the world according to Coordinated Universal Time. Understand the position of the Sun and the lengths of day and night across the year. Local time zone is automatically determined by the system clock time zone. Click get local time to retrieve current system time and compute UTC accordingly.;

Simple Programs in Turtle Geometry - Wolfram Demonstrations Project

Simple Programs in Turtle Geometry - Wolfram Demonstrations Project: This Demonstration explores simple programs in turtle geometry, where an unseen turtle moves and traces a path according to provided instructions. If only one move-turn pair is used, the size of the forward step will have no affect on the image. As an example, to draw a pentagon of side length 10, use one move-turn pair with 5 repetitions and set

Replay 10 Great Chess Games - Wolfram Demonstrations Project

Replay 10 Great Chess Games - Wolfram Demonstrations Project: Select and replay any of 10 great chess games Graphics and PGN parsing logic are all in easytoreuse Wolfram Language code The FEN string beneath the graphic can be copied and then pasted into a computer chess engine eg Stockfish for further analysis of chess positions

Saturday, July 24, 2021

मराठीतून ध्वनीचित्रफितीद्वारे संगणक शिक्षण

कोणत्याही विषयाचे मातृभाषेतून शिक्षण घेतल्यास ते लवकर आणि विनासायास समजते. सध्या माहिती तंत्रज्ञान विषयास फार महत्व आल्याने,  गुरुपौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर ध्वनीचित्रफितीद्वारे असे शिक्षण देण्याचा संकल्प ज्ञानदीप करीत आहे.

 या उपक्रमाअंतर्गत खालील व्हिढीओ आतापर्यंत युट्यूबवर प्रसिद्ध केले आहेत.

१. ज्ञानदीप इन्फोटेकची जन्मकथा


२. बायनरी किंवा द्विमान पद्धत - भाग - १

संगणकाला वीज वहाते किंवा नाही एवढेच कळण्याची बुद्धी असते. अशा निर्बुद्ध यंत्राला संख्या वा अक्षरे वाचता याव्यात यासाठी बायनरी किंवा द्विमान पद्धत शोधण्यात आली. तिचा परिचय येथे पहिल्या भागात दिला आहे


३. बायनरी किंवा द्विमान पद्धत - भाग - २

बायनरी किंवा द्विमान पद्धत वापरून संख्या वा अक्षरे कशी लिहितात याची माहिती.

 


४. रंगांची माहिती संगणकाला कशी देतात.


५. बिट, बाईट पासून ते वेबपेजपर्यंत

संगणकाला माहिती देताना शून्यएक या दोन अंकांचा वापर करून संख्या, अक्षरे, मजकूर व इंटरनेटवरील वेबपेजसाठी कसा प्रोग्रॅम करतात त्याची प्राथमिक माहिती येथे दिली आहे. 



 हा माझा पहिलाच प्रयत्न असल्याने वरील व्हिडीओत काही माहितीची द्विरुक्ती झाली आहे.

अर्थात अशी द्विरुक्ती शिकणा-यासाठी तसेच परस्पर संबंध दाखविण्यासाठी उपयुक्त ठरेल असे मला वाटते.

आता असेच व्हिडीओ क्रमाक्रमाने प्रसिद्ध करण्याचा विचार आहे.


Saturday, May 22, 2021

आयटी क्षेत्रात तृणमूल क्रांतीची गरज

राजकीय मतभेद बाजूला ठेवल्यास, डाव्या कम्युनिस्टांचे वर्चस्व असलेल्या पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींनी जी तृणमूल क्रांती करून सत्ता स्थापन केली. हे त्यांचे कार्य निश्चितच स्पृहणीय आहे. मला आठवते की १९७०-७५ च्या काळात आयआयटी कानपूरमध्ये कट्टर डाव्या कम्युनिस्ट पक्षाचे खूप व प्राबल्य होते.  संप आणि व्यसनाधीनता या माध्यमातून  विद्यार्थी वर्गाला आक्रमक बनवून प्रस्थापित व्यवस्थापनास विरोध करण्यात तो यशस्वी झाला होता. प्रा. सुब्रह्मण्यम स्वामी, प्रा. धनागरे, डॉ. जी. डी. आगरवाल यांच्या नेतृत्वाखाली  राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विधायक  कार्य  करत होता पण अशा विद्यार्थी व प्राध्यापकांची संख्या फार थोडी होती. ममता बॅनर्जींनी जशास तसे या न्यायाने कम्युनिस्टांची आक्रमक शैली उचलून त्यांना नामोहरम केले. समाजवादी व कॉंग्रेस पक्षाने  तळागाळातून संघटना बांधण्याकडे दुर्लक्ष केले आणि ते पक्ष केवळ नेत्यांचे पक्ष बनले. तळागाळात जेव्हा क्रांती होते त्यावेळीच इच्छित कार्यात यश मिळते हे आता सर्वांना कळून चुकले आहे.
 
स्वातंत्र्यपूर्व काळात किर्लोस्करांनी उद्योग क्षेत्रात, धोंडो केशव कर्वे, भाउराव पाटील आणि साने गुरुजी यांनी शिक्षण क्षेत्रात, एसएम जोशी,विनोबा भावे,अण्णाभाऊ साठे, शाहूमहाराज यांनी सामाजिक क्षेत्रात, नाना पाटील, सेनापती बापट व लोकमान्य टिळक  यांनी राजकीय क्षेत्रात अशीच तृणमूल क्रांती केली.

 गरीबी आणि बेरोजगारीमुळे ग्रामीण भागातील लोक शहराकडे धाव घेत आहेत. त्याचा शेती आणि छोटे स्थानिक उद्योग यावर फार मोठा अनिष्ट परिणाम झाला आहे. सध्या कोरोनाच्या दहशतीमुळे पुन्हा शहरातील युवक आपल्या घरी परतत आहेत. सुदैवाने मोबाईल व इंटरनेटमुळे ऑनलाईन शिक्षण वा व्यवसाय करण्याची सोय उपलब्ध झाल्याने हे चित्र पालटेल आणि ग्रामीण भागात सुबत्ता येईल अशी चिन्हे दिसत आहेत.

मात्र ग्रामीण भागातील  बहुसंख्य लोकांना इंग्रजी येत नसल्याने  आयटी क्षेत्रातील काम करणे त्यांना दुरापास्त वाटत आहे. ज्ञानदीप फौंडेशनने यासाठी स्थानिक भारतीय भाषांत वेबसाईट, मोबाईल सुविधा आणि सॉफ्टवेअर विकसित करण्याचे ठरविले आहे. भारतीय लोकांचा बुद्ध्यांक सर्वसाधारणपणे उच्च प्रतीचा असल्याने आणि जागतिक स्तरावर आयटी क्षेत्रात काम करण्याच्या अनेक संधी उपलब्ध असल्याने सर्वांना घरबसल्या प्रशिक्षण व व्यवसाय करणे शक्य होणार आहे.

अर्थात यासाठी निमशहरे आणि ग्रामीण भागात स्थानिक भारतीय भाषेत संगणक प्रशिक्षण देण्यासाठी कार्यकर्त्यांचे मोठे जाळे निर्माण करण्याची गरज आहे. ज्ञानदीप फौडेशनला हे शक्य नसले तरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारख्या राष्ट्र उभारणीच्या कार्यास वाहून घेतलेल्या संस्थांनी असा उपक्रम हाती घेतला तर अशी तृणमूल क्रांती निश्चित यशस्वी होईल याची मला खात्री आहे. असे झाले तर परदेशी बलाढ्य कंपन्यांच्या आक्रमणाला आपण यशस्वीपणे तोंड देऊ शकू आणि आपल्या छोट्या उद्योगधंद्यांचे रक्षण व संवर्धन करू शकू. - डॉ. सु. वि. रानडे, ज्ञानदीप, सांगली

 

Monday, November 23, 2020

क्लाऊड कॉम्प्युटिंग

 ज्ञानदीपचे ऑफिस सांगलीत असले तरी वेबडिझाईन,  एप डेव्हलपमेंट, व्यवस्थापन इत्यादी सर्व कामे सांगली, पुणे, नागपूर, कॅलिफोर्निया या सर्व ठिकाणांहून सुरळीतपणे चालते याचे कारण म्हणजे  आधुनिक क्लाऊड पद्धतीने इंटरनेटच्या सर्व सेवा देणा-या संस्थांचा उदय.

आता तर कोरोनाच्या बंधनांमुळे क्लाउड सेवांचे महत्व आणखीनच वाढले आहे. पण क्लाऊड म्हणजे काय हे सर्वसामान्यांना समजत नाही म्हणून हा लेखनप्रपंच.

क्लाऊड म्हणजे काय 


क्लाऊड म्हणजे ढग. ढगातून पाऊस पडतो. त्यासाठी आपल्याला काही करावे लागत नाही. याप्रमाणे कॉम्प्युटरचे सर्व काम दूरवर कोठेतरी होऊन आपल्याकडे इंटरनेटच्या माध्यमातून पोहोचविण्याची व्यवस्था म्हणजे क्लाऊड कॉम्प्युटिंग.  यात महत्वाचे म्हणजे सर्व माहिती व प्रोग्रॅम यांच्या प्रती हे विविध ठिकाणी असणा-या अनेक कॉम्प्युटरच्या स्मृतीकोषात साठविल्या जात असल्याने कोणताही कॉम्प्युटर बंद पडला तरी या सेवांत खंड न पडता कार्य अचूकपणे व व्यवस्थित चालू शकते.  रेडिओसाठी आपल्याकडे आकाशवाणी हा शब्द वापरला जातो. पुराण काळातील कथांमध्ये आकाशवाणी म्हणजे प्रत्यक्ष आकाशातून आवाज ऎकू यायचा. त्याच पद्धतीने  ‘मेघसेवा’ वा ‘आभाळमाया’ यासारखे नाव याला रूढ होऊ शकेल. स्वर्गामध्ये देवता राहतात व आपल्या सर्व संकटांचे त्या निवारण करतात. एवढेच नव्हे तर पृथ्वीलोकातील सर्व कार्य त्यांच्या इच्छेनुसार चालू असते असे आपण मानतो. त्याच धर्तीचे पण व्यवसायक्षेत्रातील काम आता क्लाऊड कॉम्प्युटिंगद्वारे होऊआहे.

सध्याच्या युगात संगणकाचा वापर प्रत्येक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर होत आहे. बँका, व्यावसायिक संस्था व उद्योग यांना आपले सर्व व्यवहार संगणकाद्वारे करण्यासाठी आतापर्यंत अनेक संगणक त्याचे नेटवर्किंग व अ‍ॅप्लिकेशन सॉफ्टवेअर विकत घेऊन त्याचे व्यवस्थापन करणे आवश्यक होते. आता क्लाऊड कॉम्प्युटिंगद्वारे हार्डवेअर व सॉफ्टवेअर अ‍ॅप्लिकेशन या दोहोंचा वापर इंटरनेटवरून भाडेतत्वावर करण्याची सोय उपलब्ध  झाली आहे.

कॉम्प्युटर, नेटवर्कींग व सॉफ्टवेअर व त्या अनुषंगिक विद्युत उपकरणे व इन्व्हर्टर यांच्या खरेदीसाठी लागणार्‍या खर्चात बचत होणार आहे.  तसेच त्याची देखभाल व दुरुस्ती करण्याचा खर्चही वाचणार आहे. अर्थात या क्षेत्रात काम करणार्‍या व्यावसायिकांना ही धोक्याची घंटा आहे.

इंटरनेटच्या क्रांतीमुळे माहिती व त्याचे संकलन व उपयोग यासाठी वेबसाईटचा वापर सुरू झाला. सर्व माहिती व सॉफ्टवेअर दूरवरच्या सर्व्हर कॉम्प्युटरवर ठेऊन आवश्यक ते रिपोर्ट व उपयुक्त माहिती वेबसाईटवरून मिळविणे सोयीचे झाले. डेस्कटॉपवरील सॉफ्टवेअरचे ऑनलाईन सॉफ्टवेअरमध्ये रुपांतर होण्याचे प्रमाण वाढले आहे.

ऑनलाईन सॉफ्टवेअरमध्ये इंटरनेट सर्व्हीस देणार्‍या संस्थामध्ये आपले संगणक ठेवून वा त्यांचे संगणक वापरून वेबसाईटच्या माध्यमातून हे कार्य केले जाते. एखादा संगणक बंद पडला तर माहिती वा सॉफ्टवेअर यांची हानी होऊ नये म्हणून अशा संस्थांमध्ये ठराविक काळाने सर्व माहितीचा बॅक अप घेण्याची सोय केलेली असते. काही वेळेच दोन किंवा जास्त संगणकावर ह्या माहितीचा प्रती ठेवल्या जातात. मात्र संगणक व सॉफ्टवेअर यांचे व्यवस्थापन एकत्रितपणे केले जाते. ही माहिती वापरणार्‍यांच्या संख्येत अचानक वाढ झाली तर सर्व्हरवर या ताण पडून (बँण्डविड्थ मर्यादा) अशी सेवा खंडीत होऊ शकते.

आता क्लाऊड पद्धतीमध्ये संगणकाचा विभाग पूर्णपणे वेगळा करून अनेक संगणकांचा समूह अशा माहिती व सॉफ्टवेअरसाठी वापरला जातो.व त्याच्या  व्यवस्थापनाचे कार्य हार्डवेअर तज्ञ करतात. सर्व माहिती  विखुरलेल्या व अनेक प्रतींमध्ये व विखुरलेल्या स्वरुपात ठेवल्याने कोणताही संगणक बंद पडला तरी माहितीचे नुकसान होत नाही व सॉफ्टवेअर सेवा अबाधित राहते. माहितीचा एकूण साठा व सॉफ्टवेअरसाठी लागणार्‍या हार्डवेअरच्या सुविधा यांचा विचार करून आवश्यक तेवढी मेमरी व सुविधा आपोआप मिळू शकतील अशी योजना केलेली असते.

क्लाऊड मेमरी स्टोअरेज - सर्व माहिती (म्हणजे लेख चित्रे, ध्वनीफिती, चित्रपट इत्यादी) इंटरनेटद्वारे  क्लाऊडमध्ये साठविण्यासाठी (ऑनलाईन मेमरी स्टोअरेजसाठी) आता ड्रॉपबॉक्स, गुगल ड्राईव्ह, सीएक्स डॉट कॉम अशा विविध सुविधा उपलब्ध आहेत. ठराविक मर्यादेपर्यंत वापरण्यासाठी  त्या मोफत उपलब्ध होऊ शकतात.


पत्रव्यवहारासाठी आपण इमेल सेवा वापरत आहोतच. त्यातील सर्व माहिती दूरस्थ सर्व्हर कॉम्प्युटरवर असायची त्यासाठी आता क्लाऊड सेवा वापरली जाते. फोटो व चित्रांसाठी पिकासा व फ्लिकर, संवादासाठी फेसबुक, व्हाट्सएप, स्काईप, याहू मेसेंजर, गुगल टॉक इत्यादी सुविधा इंटरनेटवर मिळू शकतात.

 डॉक्युमेंटस ( लेख, पत्रे इत्यादी मजकूर), स्प्रेडशीट वा एक्सेल शीट ( तक्ते वा कोष्टके) यासारखी अनेक अ‍ॅप्लीकेशन आता गुगलवर उपलब्ध आहेतच.  रेल्वे रिझर्व्हेशन,  इन्कमटॅक्स, ऑनलाईन शॉपिंग याची आपल्याला माहिती आहेच.मोठ्या बँकांचे कार्य आता पूर्णपणे ऑनलाईन झाले आहे. तरी अजून डेस्कटॉपवरील सॉफ्टवेअरचा वापर अनेक लहान मोठ्या संस्थांमध्ये चालू आहे त्यांना लवकरच असा बदल करावा लागणार आहे.

विंडोज, लिनक्स यासारखी वेगवेगळी अ‍ॅप्लीकेशन सॉफ्ट्वेअर आवश्यकतेप्रमाणे उपलब्ध करून  देण्याचे कार्य दुसर्‍या स्वतंत्र विभागात केले जाते.  सिस्टिम सॉफ्टवेअर तज्ज्ञ त्याची देखभाल करतात.  त्यामुळे  त्यातील  नवीन सुधारणांचा व बदलांचा  शोध घेऊन ती अद्ययावत ठेवणे व त्यानुसार प्रत्यक्ष सॉफ्टवेअर प्रोग्रॅममध्ये आवश्यक ते बदल करणे सहज शक्य होते.

थोडक्यात सांगायचे म्हणजे इन्फ्रास्टृक्चर ( संगणक व अनुषंगिक इक्विपमेंट) सेवा, क्लाऊड  मेमरी स्टोअरेज, प्लॅटफॉर्म ( लिनक्स, विंडोज, इत्यादी)सेवा,  ( डाटाबेस, एम.एस ऑफिस, फ्होटोशॉप, जावा, पीएचपी, एसपी डॉट नेट, फ्लॅश, फ्लेक्स यासारखे अ‍ॅप्लिके्शन्स व लॅग्वेजेस व त्याचा उपयोग करून प्रत्यक्ष व्यवसायासाठी बनविलेले सॉफ्टवेअर यांची सेवा अशा सर्व सेवांचा एकत्रित आविष्कार म्हणजे क्लाऊड कॉम्प्युटिंग.

सध्या क्लाऊड सर्व्हीस देणार्‍या महत्वाच्या कंपन्या पुढीलप्रमाणे आहेत. - अ‍ॅमेझॉन वेब सर्व्हीसेस, रॅकस्पेस, सेंचुरी लिंक,व्हेरीझॉन- टेरेमार्क,जॉयंट,सायट्रिक्स, ब्ल्युलॉक,मायक्रोसॉफ्ट, व्हीएमवेअर

 पब्लीक क्लाऊड सर्व्हीस वापरण्याऎवजी  आपल्या कंपनीसाठी स्वतंत्र खाजगी क्लाऊडसर्व्हिसही विकत घेता येते.
 या सर्व सेवा भाडेतत्वावर असल्याने व्यावसायिकास वा वापरकर्त्या संस्थेस गरजेप्रमाणे हार्डवेअर व सॉफ्टवेअरमध्ये बदल वा वाढ करता येते.या सेवांचे भाडेही प्रत्यक्ष वापरावर अवलंबून असल्याने सुट्टीच्या दिवसात वा रात्री ही सेवा लागत नसल्यास बंद करून  खर्चात बचत करता येते

या सर्व  सोयींमुळे व्यावसायिक व उद्योजक संस्थांना आपल्या संगणक व्यवस्थेची वा त्याच्या नूतनीकरणाची काळजी करावी लागत नाही व तो वेळ, पैसा व मनुष्यबळ त्यांना आपल्या व्यवसाय वृद्धीसाठी वापरता येतो. दुसरा महत्वाचा फायदा म्हणजे ही सेवा आपल्याला संगणक, लॅपटॉप, आयपॅड, मोबाईल अशा कोणत्याही उपकरणाद्वारे कोठूनही व केव्हाही वापरता येते.

याचा एक महत्वाचा उपयोग फ्री लान्सिंग व्यवसाय वाढण्यास होणार आहे. ज्ञानदीपने यासाठीच घरातून संगणकावर काम करण्यासाठी मोठी योजना आखली आहे. जगातील कोणतीही संगणक क्षेत्रातील कामे आता क्लाऊड कॉम्प्युटिंगच्या माध्यमातून . भारतातील ग्रामीण भागात राहणा-या महिला व सुशिक्षित युवकयुवतींना करता येतील. आपली शेती वा घरचा उद्योग सांभाळून यामे शिक्षम घेता येईल. परदेशात नोकरी करणा-यांप्रमाणे पैसैही मिळविता यातील.

गरज आहे ती ज्ञानदीपच्या या सहकारी तत्वावर सुरू केलेल्या उद्योगपर्वणीत सामील व्हायची. आपण https://dnyandeep.net या ज्ञानदीप फौंडेशनच्या वेबसाईटला भेट देऊन त्यांच्या फ्रीलान्स कार्यात सहभागी व्हावे आणि आधुनिक संगणक तंत्रज्ञान शिकावे, शिकवावे वा त्याच्या साहाय्याने आपला व्यवसाय घरबसल्या सर्वांच्या सहकार्यातून सुरू करावा असे मला वाटते. - डॉ. सु. वि. रानडे, ज्ञानदीप, कॅलिफौर्निया,(युएसए)

Friday, November 13, 2020

शिल्प चिंतामणी सोसायटीला आयटी कंपनी बनविण्याचे उद्दीष्ट.

 
ज्ञानदीपचा महत्वाकांक्षी प्रकल्प -शिल्प चिंतामणी सोसायटीला आयटी कंपनी बनविण्याचे उद्दीष्ट. 
 

 

 
या दिवाळीत सोसायटीची एक वेबसाईट तयार करून सोसायटीतील सर्वांसोठी एक व्यासपीठ आणि ऑनलाईन शिकण्याची सोय केली जाईल. नंतर ज्यांना फ्रीलान्स कामात सहभागी व्हायचे असेल त्यांच्या साहाय्याने बाहेरची कामे घेऊन त्यातील काही हिस्सा सोसायटीला दिला जाईल. 
 
सोसायटीच्या सभासदांनी  सोसायटीचा नकाशा, बंगल्यांची व सभासदांची नावे तसेच विविध कार्यक्रमांचे फोटो पाठवावेत.
 
 वेबसाईट व शिक्षण पूर्णपणे ज्ञानदीप स्वखर्चाने करणार आहे. - हीच ज्ञानदीपची सोसायटीस दिवाळीनिमित्त भेट. 
 
दिवाळीच्या सर्वांना शुभेच्छा - डॉ. सु. वि. रानडे, ज्ञानदीप, सांगली

Monday, November 9, 2020

प्रौढ संगणक साक्षरता वर्ग - ज्ञानदीपचा उपक्रम

  लिहिता वाचता न येणा-या वयोवृद्ध अनुभवी लोकांसाठी शासनाने प्रौढ साक्षरता वर्ग सुरू केले होते. त्याचा चांगला उपयोग होऊन आता सर्वांना लिहिता नाही तरी वाचता येऊ लागले आहे.

मोबाईलचे युग सुरू झाले आणि हाताने लिहिण्याचे दिवस संपले. मोबाईलवर चारपाच वाक्ये लिहिण्याचे आता सर्वांना जमू लागले आहे.  इकडून तिकडे लेख आणि चित्रे पाठविण्यात व शुभेच्छा देण्यात सर्वजण तरबेज झाले आहेत.


मात्र या वार्तालापात स्वतःचे विचार मांडणेच कमी होऊ लागले आहे. यापुढे जाऊन  वाचण्याऐवजी आता पाहणे लोक पसंत करू लागले आहेत. अगदी लिहायची वेळ आलीच तर इमोजी सारखी चित्रे मदतीला धावत आहेत. बोललेलेच आपोआप लिहिले जाईल अशा सुविधा संगणक व इंटरनेटवर उपलब्ध झाल्या आहेत.

याचा एक दृष्य परिणाम म्हणजे एकूणच सर्व लोक नवनिर्मितीच्या बाबतीत निरक्षर झाले आहेत. लिहिणे वाचणे संपले आणि बोलणे व पाहणे एवढ्याच क्रिया झाल्या तर नवी साहित्यनिर्मिती होणारच नाही.  इतिहास लिहिला जाणार नाही. आपला सर्व अनुभव विस्मृतीत नाहिसा होईल आणि हाच मोठा धोका आहे.

आज नव्या पिढीकडे तंत्र आहे पण माहितीचा अभाव आहे  प्रौढांकडे ज्ञानाचा व अनुभवाचा खजिना असला तरी त्यांना हे ज्ञान मोबाईल वा वेबसाईटद्वारा लोकांपर्यंत पोचविण्यासाठी लागणारे साधे लेख लिहिण्याचे देखील तंत्र माहीत नाही.

संगणकाच्या या सर्व सुविधा इंग्रजीत असल्याने आपल्या भारतीय भाषांचे फार नुकसान होत आहे. त्यांचे महत्व फक्त बोली भाषा एवढेच राहील. परदेशातील वस्तू आणि सेवा यांच्यासाठी भारतातील आपला प्रचंड ग्राहक वर्ग खुला होईल पण आपल्या स्वदेशी उद्योगांना त्यांच्याबरोबर स्पर्धा करता येणार नाही.  यामुळे आपण आपला व्यवसाय, उद्योग गमावून त्यांचे ताब्यात जाऊ.

यासाठी भारतीय भाषांतून संगणक वापरण्यास शिका. ज्ञानदीप गेली वीस वर्षे यासाठी प्रयत्नशील आहे. मात्र परदेशी जाण्याच्या वा त्यांच्या कंपन्यांत नोक-या मिळविण्याच्या  धडपडीत सर्वजण असल्याने ज्ञानदीपची स्थिती प्राथमिक शाळेसारखी स्टेपिंग स्टोन सारखीच राहिलेली आहे.

तरीही ज्ञानदीपने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून इंटरनेटवर मराठी आणि संस्कृतमध्ये वेबसाईट, मोबाईल एप बनवले आहेत.

भारतातील सर्व शैक्षणिक संस्थांनी त्यांचा इतिहास आपल्या भारतीय भाषेत वेबसाईट व मोबाईलच्या माध्यमातून जगापुढे आणावा. त्याद्वारे आपल्या माजी विद्यार्थ्यांशी संपर्क साधावा या हेतूने विशेष योजना सुरू करीत आहे.

महाराष्ट्रात गावोगावी रयत शिक्षण संस्था, डेक्कन एज्युकेशन संस्था, वुईमेन्, एज्युकेशन संस्था, लठ्ठे एज्युकेशन संस्था  यासारख्या जुन्या ध्येयवादी शिक्षणसंस्था तसेच अस्सल , मराठी नावाची अनेक विद्यापिठे आहेत पण त्यांचा इतिहास मराठीत इंटरनेटवर उपलब्ध नाही. प्रत्येक गावात आणि शहरात अशा कितीतरी शिक्षणसंस्था शिक्षकांच्या स्वार्थत्त्यागातून उभ्या राहिलेल्या आहेत. त्यांची स्थिती आज इंग्रजीने विलायती करून टाकली आहे.

ज्ञानदीप फौंडेशन अशा सर्व संस्थांच्या संचालकांना आवाहन करीत आहे की त्यांनी आपल्या संस्थेचा उज्वल इतिहास मराठी माध्यमातून इंटरनेटवर प्रसिद्ध करावा. ज्ञानदीपतर्फे या संस्थांतील शिक्षक, प्राध्यापकांना मराठीतून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून वेबसाईट तयार करण्याचे सर्व प्रशिक्षण देईल.

चला... मोबाईल हातात असू द्या पण लॅपटॉप वा संगणक वापरायला लागा. व्हॉट्सएप आणि फेसबुकही आपल्या लॅपटॉपवर इन्स्टॉल करा आणि ज्ञानदीपशी संपर्क साधा ( +919422410520 ),  इमेल (info@dnyandeep.net) पाठवा. आम्ही आपल्याला संगणक साक्षर करण्याची हमी देतो.

आपण एकदा मराठीत वेबसाईट करण्यात पारंगत झालात की इतर स्थानिक उद्योग आणि व्यावसायिक यांच्या जाहिराती व वेबसाईट मराठीतून आपण करू शकता. एवढेच नव्हे तर त्यांच्या उद्योगाला लागणारे सॉफ्टवेअरही मराठीत आपणास करता येईल. मग ख-या अर्थाने आपली संस्था स्थानिक प्रगतीला हातभार लावू शकेल, 

ज्ञानदीप फौंडेशनचे सदस्य (https://dnyandeep.net) झाल्यास आपल्याला वर्डप्रेसमधील एक वेबसाईट देऊन त्याद्वारे स्वतःचा व्यवसाय, शिक्षण वा सल्ला देण्याचे कार्य आपणास करता येईल. आपले ज्ञान, आपल्या जीवनप्रवासातील अनुभव आणि पुढील पिढीसाठी ज्ञानाचा वारसा आपणास   इंटरनेटवरून जगभर प्रसारित करता येईल.


Saturday, November 7, 2020

ज्ञानदीपच्या वर्क फ्रॉम होम संकल्पनेला केंद्र सरकारकडून प्रोत्साहन

 भारताच्या दूरसंचार विभागाने आयटी उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. बीपीओ आणि वर्क फ्रॉम होम बाबत कोरोनाकाळात देण्यात आलेली सूट आता कायमस्वरुपी लागू करण्यात आली आहे. केंद्र सरकारने गुरुवारी बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग तसंच आयटी सेवा देणाऱ्या कंपन्यांसाठी काही नियमांमधून सूट दिली आहे. यामुळे उद्योगाला प्रोत्साहन मिळेल आणि वर्क फ्रॉम होमसाठी मदत होईल असं म्हटलं आहे.नव्या नियमांनुसार सेवा देणाऱ्यांना वर्क फ्रॉम होम किंवा वर्क फ्रॉम एनीव्हेअर करता येईल. या कंपन्यांना वेळेवर रिपोर्ट करणं आणि इतर बंधनांतून मुक्त करण्यात आलं आहे.

ज्या कंपन्या दूरसंचार साधनांचा वापर करून अॅप्लिकेशन सेवा, आयटीशी संबंधित सेवा किंवा इतर प्रकारच्या आउटसोर्सिंग सेवा पुरवते. अशा कंपन्यांना बीपीओ, नॉलेज प्रोसेसिंग आउटसोर्सिंग, आयटीइएस आणि कॉल सेंटर म्हटलं जातं. दूरसंचार विभागाने जारी केलेल्या आदेशानुसार वर्क फ्रॉम होम संकल्पनेला यामुळे प्रोत्साहन मिळणार आहे आणि याचा विस्तार वर्क फ्रॉम एनीव्हेअर असा करण्याच्या दृष्टीने पावले उचलली जात आहेत.यात घरातून काम करत असलेल्या एजंटला ओएसपी केंद्राचा रिमोट एजंट मानलं जाईल आणि इंटरकनेक्शनची परवानगी असेल. रिमोट एजंटला देशातील कोणत्याही ठिकाणाहून काम करण्याची मुभा असेल.नव्या नियमांचा उद्देश उद्योगाला प्रोत्साहन देणे हा आहे. 


भारताला आयटी क्षेत्रात सहकारी तत्वावर अनेक छोट्या संस्था वा व्यक्तीगत सल्लागार यांना एकत्र आणून मोठा उद्योग उभा करण्याच्या ज्ञानदीप फौंडेशनच्या प्रकल्पाला या निर्णयाने मोठे पाठबळ मिळणार आहे. नव्या नियमांमुळे ज्ञानदीप इन्फोटेक कंपनीला वर्क फ्रॉम होमशी संबंधित व्यवस्था उभारण्यास आणि  अर्धवेळ कर्मचा-यांच्या नेमणुकीस वाव मिळाला असून  ज्येष्ठ अनुभवी व्यक्तींना ज्ञानदीप फौडेशनच्या माध्यमातून नवा सेवा व सल्लागार व्यवसाय सुरू करणे शक्य झाले असून ज्ञानदीप इन्फोटेकशी व्यावसायिक संबंध प्रस्थापित करणे शक्य होणार आहे.

सध्या व्यक्तीगत पातळीवर मानद सल्लागार म्हणून कार्य करत असणा-या भारतातील अशा तज्ज्ञ  व्यक्तींना नवयुवकांना आर्थिक साहाय्य देऊन ग्रामीण भागातही स्वतःच्या मालकीचा  उद्योग करता येईल. ज्ञानदीप फौंडेशनच्या कार्यात सक्रीय सभासद बनून (https://dnyandeep.net)आपला परिचय व  स्वतःचे सल्लादालन सुरू करा. 


ज्ञानपीपतर्फे केंद्र सरकारच्या या उपक्रमाबद्दल अभिनंदन. सहकारी संस्थेसाठीही भांडवली व पायाभूत विकासासाठी राज्य सरकारकडून आर्थिक मदतीची योजना सुरू व्हावी असे वाटते. 


Tuesday, October 27, 2020

सिलिकॉन व्हॅलीतील झोहो कंपनी आता चेन्नईजवळच्या खेडेगावात

 झोहो आज क्लाऊड-आधारित ग्राहक संबंध व्यवस्थापन (सीआरएम), ऑनलाइन अकाउंटिंग, ह्यूमन रिसोर्स व्यवस्थापनासाठी 40 हून अधिक अॅप्स तयार करते.


झोहोचे प्रमुख श्रीधर वेंभू यांनी न्यू जर्सीच्या प्रिन्स्टन विद्यापीठात व नंतर  कॅलिफोर्नियामधील क्वालकॉम येथे शिक्षण घेतले. 1996 मध्ये सॉफ्टवेअर  तयार करण्यासाठी त्यांनी सॅन फ्रान्सिस्को बे एरियाच्या सिलिकॉन व्हॅलीमध्ये अ‍ॅडव्हेंटनेट कंपनीची  स्थापना केली. २००० मध्ये त्यांनी  कंपनीचे नाव झोहो कॉर्प ठेवले.

कोरोनाचा उद्रेक होण्यापूर्वीच ऑक्टोबर २०१९मध्ये त्यानी आपली कंपनी चेन्नईपासून ५० कि. मी. वर असणा-या टेनकासी या खेडेगावात नेली.  नऊ वर्षांपूर्वीच त्यानी यासाठी मथालंपराय या एका गावात  ४ एकर जमीन घेतली होती.

झोहोने पहिले सॉफ्टवेअर उत्पादन युनिकॉर्न असण्याचा मान मिळविला आहे आणि 2019 मध्ये फोर्ब्सने वेम्बूच्या ८८ टक्के भागभांडवलाचे मूल्य १.८३ अब्ज डॉलर होते. २०१९ मध्ये झोहोने ३४१० कोटींच्या एकूण उलाढालीत  516 कोटी कोटी रुपये  नफा नोंदविला. आपल्या अ‍ॅप्ससाठी जागतिक स्तरावर ५० दशलक्ष वापरकर्ते असल्याचा कंपनीचा दावा आहे,

 खेड्यांमधून शहरात लोक गेल्यामुळे खेड्यांचे व तेथाल शेती व समाजजीवनाचे  नुकसान होते शहरांवरही अधिक लोकसंख्येचा ताण पडतो. 


2004 मध्ये, संस्थापकांनी झोहो विद्यापीठ सुरू केले, जे आता झोहो स्कूल म्हणून ओळखले जाते. झोहो स्कूलचे  सरन बाबू परमशिवम यांना २००५ मध्ये कॉम्प्युटर कसा वापरायचा हे माहीत नव्हते परंतु आता झोहो येथे ते वरिष्ठ उत्पादन व्यवस्थापक म्हणून काम पहातात


 विद्यार्थ्यांना कौशल्य व क्षमता असलेले जहाज चालविण्यासाठी आणि प्रशिक्षित करण्यासाठी. विद्यार्थ्यांना फी आकारली जात नाही परंतु दोन वर्षाच्या कोर्सच्या कालावधीत त्यांना 10,000 डॉलरचे वेतन दिले जाते.

 ज्ञानदीप फौंडेशनसाठी हे एक अलौकिक दूरचे लक्ष ठरू शकेल. कदाचित भविष्यात ते साध्य होईलही. पण त्यासाठी महाराष्ट्रातील बुद्धीवंतांची आणि सिलिकॉन व्हॅलीतील मराठी संगणक तज्ज्ञांची मानसिकता बदलण्याचे मोठे अवघड काम करावे लागणार आहे.

मी असा प्रयत्न सुरू केला आहे पण अजूनतरी रात्रीचा अंधःकारच समोर दिसत आहे.  - डॉ. सु. वि. रानडे, ज्ञानदीप, सांगली

Monday, October 5, 2020

Y2K Exodus gave birth to Dnyandeep

 My association  with computers is from 1970 when programming was at infant stage.
Since my stay in IIT, Kanpur during 1973-76 , I was attracted to computers and was following the progress of the world in this new technology.


Arrival of BBC computers at school level in 1983 gave us a chance to educate school children in computing as our Walchand College became nodal centre for this work.

My brother did M. Tech. in IIT Mumbai and developed programs in Fortran for grid slab. We in our college also were doing some programs in C, Basic and Fortran for student projects. In our Applied Mechanic Department, almost all post graduate work was done in computer programming as Dr. Shiyekar was leader in using this technology.

Our college had started Basic programming course for outside professionals and teacher through initiative by Prof. N. R. Phadnis, Head of Electronics division. I took lectures and guided students projects in programming.

My wife did Basic course and conducted one month training course for highschool students of Savarkar Pradnya Prashala in 1985.

I got opportunity to learn Unix and Cobol at PSI Systems in Bangalore in one month course, as college wanted to purchase Omni Computer.
   
Later my wife started Suyash Computers class in Vishrambag in partnership with Suhas Khambe and Vijaya Kulkarni.

In 1987, we had gone to Bangkok trip with Sugar factory technicians. I brought Commodore computer from there and it became our first home computer with colored TV as screen, where my son and daughter developed many games.

I asked my daughter Sumedha to take computer branch for engineering and she graduated in 1994 from Walchand College. 

 In 1995, she was married to Suhas Gogate from Gogate family in Sangli. He had done ME in computers and was working in CDAC, Pune. Later they joined TATA-IBM in Bangalore.

Since 1995, there was  growing concern about the fate of Industries and Businesses and Transport companies about the likely disruption of computer programs in the year 2000 as all these programs were using two digits for year in date format which will become zero on
1st Jan. 2000 and would disrupt timetables and banks.

It was necessary to change these programs by replacing two digit year to four digit year.
 The work was huge, required computer knowledge and very few people were ther in advanced countries to tackle this issue.Many new startups and companies were established in Europe and America sensing the opportunities.

Then the demand of educated smart young graduates suddenly sky rocketed and most of the bright students and computer professionals  went to foreign countries with lucrative job offers.  

My son-in-law also went to USA with family and joined IBM. We were happy and sad at the same time. Such an exodus of cream of society was a great loss to India. 


Myself and my wife thought that we also should start a company in India and establish  a link to  Indians  in foreign countries for easy transfer of knowledge . As our Bunglow name was Dnyandeep which was appropriate for the objective we provided three names with Dnyandeep as first word and got approval to Dnyandeep Infotech Pvt. Ltd.

By taking my nephew Manish and his classmate Amogh Kulkarni and my friend Prof. Ramesh Charate along with my wife we registered the company by  taking a risk of investing Rs.35000/- and copleting all formalities through Panpalia & Co. in Sangli. He registered the company first in Mumbai office name of his friend to hasten the process and then transferred the address to our house in Sangli.


Inauguration of Dnyandeep Infotech by Prof. D. P. Sakhdev in his bunglow taken on rent

Finally on 27th November our Dnyandeep Infotech Pvt. Ltd. was born. Our idea at that time was to link our people who have gone to foreign countries and bring the knowledge from their through softhelpindia.com website and train people in India to do the work for India requirements.

My nephew could go to USA for MS and he also remained in IT field. My son also has got job in Silicon valley and myself after my wife's sad demise, could get Green Card.

Thus our  family got shifted to bay area in California also called as Silicon Valley. After coming here, I immediately launched mysiliconvalley.net website to link it to our mysangli.com website.


After 20 years, I feel that we have achieved that goal in establishing such a network. I am seeing morning light in the sky indicating the rise of sun with only saddened heart feeling absence of my wife who could not see this achievement.