सीमांन्त क्लोरिनीकरण:- सीमान्त क्लोरिनीकरण म्हणजे पाण्यात एवढया प्रमाणात मिसळणे की १० मिनिटांच्या संपर्क कालावधीनंतर त्यात ०.१ ते ०० भा /दलभा एवढया प्रमाणात क्लोरिन शिल्लक राहील मग तो मुक्तशेष क्लोरिन वा संयुक्त शेष क्लोरिन कोणत्याही स्वरुपात असला तरी चालेल इ.स. १९१८ मध्ये आर्थोटोलिडीन परीक्षा पद्धती विकसित झाल्यानंतरही काही वर्षे ही जुनी पद्धती वापरली जात असे. काही ठिकाणी अजूनही हीच पद्धती वापरली जाते. या पद्धतीने आवश्यक असणारे क्लोरिनचे प्रमाण १० मिनिटांच्या अल्प कालावधीत पाणी परिणामकारकपणे निर्जतुक करू शकत नाही. पाण्यात जास्त अल्कता असेल किंवा पाण्याचे तापमान कमी असेल तर ही गोष्ट प्रकर्षाने दिसून येते. म्हणून घ्या जुन्या पद्धतीचा वापर न करता त्याऐवजी मुक्त शेष क्लोरिनीकरण पद्धतीचा वापर करावयास हवा.
पूर्व क्लोरीनिकरण – हे निस्यंदन क्रियेपूर्वी करावयाचे क्लोरिनीकरण आहे. यामुळे खूप चांगल्या गोष्टी घडतात व फायदे मिळतात पण यात एकच तोटा होतो तो म्हणजे निस्यंदीत पाण्यापेक्षा नैसर्गिक पाण्याची क्लोरिन गरज बरीच जास्त असते. त्यामुळे पश्चात क्लोरिनीकरणापेक्षा पूर्व क्लोरिनीकरणात जास्त प्रमाणात क्लोरिनचा वापर करावा लागतो. त्यामुळे ही पद्धती फार खर्चाची ठरते.
पूर्वक्लोरिनीकरणाचे फायदे खलीलप्रमाणे थोडक्यात देता येतील.
जास्त दुषित झालेले पाणी प्रभावीपणे निर्जतुक करावे लागते. यासाठी मुक्त शेष क्लोरिन जास्त प्रमाणात असावा लागतो व त्याचा संपर्क कालही बराच असणे आवश्यक असते. पूर्व क्लोरिनीकरण पद्धतीत अवसादन टाकीमुळे बराच संपर्क काळ उपलब्ध होत असल्याने जास्त दुषित असलेले पाणीही निर्जतुक करणे शक्य होते. यासाठी लागणारे क्लोरिनचे प्रमाण ५.० भा/ दलभा पेक्षा जास्त असू शकते. कारण पाण्याची क्लोरिनची गरज भागवणे, मुक्त अमोनियाचे ऑक्सिकरण करणे इत्यादी बाबींसाठी क्लोरिन वापरला गेल्यानंतर अवसादित पाण्यात ०.२ ते ०.५ भा/दलभा पेक्षा या प्रमाणात मुक्त शेष क्लोरिन रहाणे आवश्यक असते.
पाणी अगदी प्रभावीपणे निर्जतुक व्हावे यासाठी पाण्यात ठेवलेला मुक्त शेष क्लोरिन हा रासायनिक दृष्ट्या क्रियाशील असल्याने त्या क्लोरिनमुळे लोह व मॅगेनीज यांचे ऑक्सीकरण होते रंजक द्रव्यांचे (बहुधा यात लोह असते) निरंजक होते व किलाटन क्रिया चांगली होते. जरी जीवाणू प्रदुषण विशेष नसेल तरी वरील दुय्यम फायद्यासाठी क्लोरिन तेवढ्याच जास्त प्रमाणात ठेवता येतो मात्र या वेळी पाण्याची क्लोरिन गरज कमी असल्यास व मुक्त अमोनियाचे प्रमाण कमी असल्यास प्रत्यक्षात आवश्यक असणारे क्लोरिनचे प्रमाण दिलेल्या क्लोरिनच्या प्रमाणापेक्षा बरेच कमी असू शकते. पाणी प्रभावीपणे निर्जतुक होण्यासाठी आणि वर उल्लेखलेल्या रासायनिक विक्रिया होण्यासाठी मुक्तशेष क्लोरिन आवश्यक असतो हे येथे ध्यानात ठेवणे जरूर आहे.
पूर्वक्लोरिनीकरणामुळे टाकीच्या भिंतीवरील शेवाळ्याची वाढ ही थोपविली जाते आणि किलाटन व अवसादन क्रियांच्या द्वारे शेवाळे पाण्यातून काढून टाकण्यास सहाय्य होते कारण मृत शेवाळाच्या पेशींचे लवकर किलाटन होते. अवसादित पाण्यात असलेल्या क्लोरिनमुळे निस्यंदन टाकीतील वाळूवरील चिकट थर तयार करणारे जीवाणू मारले जातात व त्यामुळे निस्यंदन क्रियेचा कालावधी वाढतो व निस्यंदन टाकी धुणेही सुलभ होते.
पश्चात क्लोरिनीकरण:-
हे निस्यंदन क्रियेनंतरचे क्लोरिनीकरण होय. पूर्वी निस्यंदन टाकीच्या बहिर्गम पाण्यात क्लोरिन मिसळला जाई व थोडेसेच दुषित असलेल्या पाण्याचे निस्यंदन केल असेल तर अजूनही तर क्लोरिनीकरणाची ही पद्धत वापरली तरी चालते. पूर्वक्लोरिनीकरणामुळे बऱ्याच फायदेशीर गोष्टी होत असल्यामुळे त्यासाठी जास्त प्रमाणात क्लोरिन लागला तरी त्याचा वापर करणे व पश्चात क्लोरिनीकरण फक्त सुरक्षागुणक ठेवण्यासाठी व वितरणव्यवस्थेत शेषक्लोरिन राहण्यासाठी क्लोरिन थोडया प्रमाणात वापरून पश्चात क्लोरिनकरण करणे ही पद्धत बऱ्याच ठिकाणी वापरली जाते. निस्यंदित पाशी स्वच्छ पाण्याच्या टाकीत वा निस्यंदित पाण्याच्या तलावात जाताना त्या पाण्यात क्लोरिन मिसळावा म्हणजे शक्य तितका जास्त संपर्ककाल मिळू शकतो स्वच्छ पाण्याच्या टाकीतील क्लोरिनीकरण केलेल पाणी तसेच पंपांच्या शोषक नळांकडे जवळच्या मार्गाने जाऊ नये म्हणून लाकडी अवरोधक भिंतीचा वापर करण्यात येतो.
No comments:
Post a Comment