क्लोरिन व अमोनिया पाण्यात मिसळण्याच्या जागा:-
क्लोरिन व अमोनिया पाण्यात मिसळण्याच्या जागा या स्थानिक परिस्थिती व प्रक्रियेचा हेतू यावर अवलंबून राहतात. क्लोरामाईनची जंतुनाशक क्रिया सावकाश चालत असल्याने शक्य तेवढा जास्तीत जास्त संपर्क काल उपलब्ध होईल अशा जागी रसायने पाण्यात मिसळावी. असंस्कारीत पाण्याच्या निस्यंदन क्रियेपुर्वी किंवा पाणी तलावात वा टाकीत जाण्यापूर्वी ही रसायने पाण्यात मिसळली असतील तर दोन तास किंवा जास्त वेळ संपर्क काल मिळणे इष्ट असते. जर क्लोरिन पाण्यात मिसळण्यापूर्वी प्रथम अमोनिया पाण्यात घालून चांगल्या प्रकारे मिसळावा अन्यथा अमोनिया आधी क्लीरीन मिसळल्यास त्याची पाण्यातील चव निर्माण करणाऱ्या पदार्थास विक्रिया होईल. पाण्यात अमोनिया घातल्यानंतर तो पाण्यात पूर्णपणे मिसळला असल्याची ज्या ठिकाणी खात्री होईल त्या ठिकाणी क्लोरिन पाण्यात मिसळावा. मात्र क्लोरिन पाण्यात मिसळण्यापूर्वी अमोनियाचे जीवरासायनिक ऑक्सकरण होऊन नायट्राईट तयार होईल इतका कालावधी जाणार नाही याची काळजी घ्यावी.
अमोनिया व क्लोरिन यांच्या प्रमाणांचे गुणोत्तर :- ह्या गुणोत्तरास कोणत्याही कायम स्वरूपाचे मूल्य नसते. स्थानिक परिस्थितीवर ते सर्वस्वी अवलंबून असते सर्वसाधारणपणे ज्यावेळी चव निर्माण करणारे पदार्थ पाण्यात कमी प्रमाणात अमोनियाचा वापर करणे योग्य असते. तथापि ज्यावेळी फेनालच्या संयुगांमुळे पाण्यास चव येत असेल त्यावेळी अमोनिया यापेक्षा जास्त प्रमाणात वापरावा लागतो व काही वेळेला तर क्लोरिनच्या प्रमाणापेक्षा एक तृतीअंश प्रमाणात अमोनियाचा वापर करणे योग्य असते. तथापि ज्यावेळी फेनालच्या संयुगांमुळे पाण्यास चव येत असेल त्यावेळी अमोनियाचा यापेक्षा जास्त प्रमाणात अमोनिया पाण्यात मिसळावा लागतो. दुसऱ्या शब्दांत सांगायचे म्हणजे पाण्यात मिसळलेल्या क्लोरिनशी ताबडतोब विक्रिया होईल इतक्या प्रमाणात अमोनिया पाण्यात ठेवावा लागतो. असे केले तर क्लोरिनची फेनालच्या संयुंगाशी विक्रिया होऊन क्लोरोफेनाल तयार होत नाहीत.
अमोनिया व क्लोरिन यांच्या प्रमाणांचे गुणोत्तर १:४ पेक्षा जास्त असल्यास अमोनिया वाजवीपेक्षा जास्त प्रमाणात आहे असा त्याचा अर्थ होतो. त्यामुळे पूर्वी सांगितल्याप्रमाणे अमोनियाचा वापर करून पाण्यास क्लोरिनची चव आणणारे पदार्थ तयार होऊ दिले नाहीत तरी जास्त असलेल्या अमोनियामुळे क्लोरिनीकरणाची कार्यक्षमता कमी होते कारण अमोनिया व क्लोरिन यांच्या विक्रीयेमुळे तयार होणारी क्लोरामाईन संयुगे स्वतंत्र क्लोरिनपेक्षा कमी क्रियाशील असतात व अमोनिया सुद्धा क्षपन सहाय्यक असल्याने प्रक्रिया केलेल्या पाण्याची ऑक्सिकरण पातळी कमी करतो.
म्हणून पाण्यास चव येणार नाही व वितरण व्यवस्थेत टिकाऊ स्वरूपाचा शेष क्लोरिन राहील यासाठी आवश्यक असेल तेवढाच अमोनिया उपलब्ध होईल अशा रितीने अमोनियाचे अमोनिया उपलब्ध होईल अशा रितीने अमोनियाचे प्रमाण कमीतकमी ठेवावे लागते. जर जास्त पी. एच. जास्त कार्बनी पदार्थ कमी तापमान वा थोडा संपर्क काल यामुळे वरील आवश्यक ते फायदे मिळवताना जंतुनाशक क्रिया फार कमी होत असेल तर प्रक्रिया पद्धतीत बदल करावा लागतो. व अमोनियाच्या आधीच क्लोरिन पाण्यात मिसळावा लागतो.
या पद्धतीने पाणी प्रभावीपणे निर्जंतुक झाले तरी पाण्याच्या चवीवर योग्य नियंत्रण ठेवता येत नाही अशावेळी क्लोरिनचे प्रमाण वाढवून चव निर्माण करणाऱ्या पदार्थाचा मुक्त शेष क्लोरिनीकारकाचे नाश करावा लागतो. किंवा चव नाहीशी करणारी दुसरी काही पद्धत वापरावी लागते. मात्र कोणत्याही परिस्थितीत अमोनियाचे प्रमाण कमीत कमी ठेवावे लागते.
No comments:
Post a Comment