Thursday, November 16, 2017

जलहीन अमोनिया

जलहीन अमोनिया हा रंगहीन वायू असून त्याचा वास अत्यंत उग्र असतो. हा वायु थंड व संपीडीत केला तर त्याचे रंगहीन द्रावात सांद्रीभवन होते. दाब कमी होताच या द्रवाचे पुन्हा बाष्पीभवन होते. कायद्याच्या नियमाप्रमाणे भरले असेल तर ६३ अंश सें.(१४५ फॅ) तापमानास ते पूर्णपणे भरलेले राहते व त्यापेक्षा जास्त तापमान झाल्यास स्टीलचे नळकांडे फुटून स्फोट होण्याची शक्यता असते. 
नळकांड्यातील दाब- २९ अंश सें. तापमानास ० असतो तो वाढत वाढत ६३ अंश सें. (१४५ फॅ) तापमानास २६.५ वातावरण दाब (३९०/ पौंड/चौ.इंच) एवढा होतो. यासाठी जलहीन अमोनियाची नळकांडी थंड जागेत ठेवावी लागतात व ४३ अंश सें. (११० फॅ) पेक्षा जास्त तापमान असणाऱ्या पदार्थाच्या संपर्कात येणार नाहीत अशी काळजी घ्यावी लागते. 
अमेरिकेत तीन निरनिराळ्या आकारांची नळकांडी वापरली जातात व त्यात अनुक्रमे ५०, १००,व १५० पौंड अमोनिया असतो. या नळकांड्यावरील झडपा बसविताना त्यांचे पेच नेहमीच्या पेक्षा उलट दिशेने असतात नळकांडी अमोनियाकारकास जोडण्यासाठी तांबे वा पितळ यांचा वापर करताना फक्त जास्त जाडीच्या स्टीलच्या पत्राचे नळ व विशिष्ट अमोनिया झडप यांचा उपयोग करावा लागतो. नियंत्रक व्यवस्थेकडे वायू पुरवणारी नळी, अमोनियमाच्या नळकांड्यास जोडण्यापुर्वी ते नळकांडे आडवे असताना तोंडे मात्र वरच्या दिशेला असावी लागतात. 
यंत्रणेतून अगदी थोडा अमोनिया गळती वाटे बाहेर पडला तर त्याचे अस्तित्व लगेच ओळखता येते. यासाठी जेथे गळती झाली असण्याची शक्यता असेल तेथे हायड्रोक्लोरिक आम्लाची बाटली बूच उघडून नेली की अमोनिया तेथे असल्यास बाटलीच्या तोंडाशी पांढरा ढग दिसू लागतो. हवेतील अमोनिया हवेत मिसळण्यापूर्वीच यंत्रणेतील सर्व गळती काढावी व त्यांची दुरुस्ती करावी.


आणीबाणीच्या वेळी घ्यावयाची काळजी:
श्वसन करताना नाकावाटे हवा आत येण्यापूर्वी हवेतील अमोनिया शोषून घेतील असे खास वायूसंरक्षक मुखवटे आणीबाणीच्या वेळी वापरण्यासाठी उपलब्ध असावे लागतात. गळतीवाटे बाहेर पडणारा अमोनिया हवेतून वर जातो म्हणून सुटकेसाठी येणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने जमिनीलगत पडून यावे व मुखवटा नसेल तर नकातोंडावर ओले फडके वा ओला स्पंज ठेवावा यामुळे पाण्यात अमोनिया शोषला जाऊन नाकात कमी प्रमाणात जाईल अमोनियाचा त्रास झाल्यास लगेच डॉक्टरांना बोलवावे व रोग्यास दवाखान्यात हलवावे. 

No comments:

Post a Comment