ज्या ठिकाणी अणुभट्ट्या आहेत किंवा औषधे, उद्योगधंदे व इतर नागरी कार्यामध्ये किरणोत्सर्गी समस्यांनीय द्रव्याचा वापर करण्यात येतो किंवा ज्या ठिकाणी अनुबॉबच्या चाचण्यामुळे वातावरणात पसरलेली किरणोत्सर्गी धूळ खाली बसते अशा ठिकाणी जमिनीवरील पाण्याचे या किरणोत्सर्गी द्रव्यामुळे फार मोठया प्रमाणावर प्रदुषण होते व सध्या ती एक गंभीर समस्या बनू पहात आहे जास्त संहत किरणोत्सर्गी द्रव्य उत्सर्जित पाण्यावाटे पृष्ठजलात मिसळू नयेत म्हणून शक्य ते सर्व प्रयत्न करावेत मात्र अणुभट्टीत शीतन करावयाच्या पाण्यात फार थोडया प्रमाणत किरणोत्सर्गी द्रव्ये असतात. ज्या सनस्थानीय किरणोत्सर्गीद्रव्यांचा संस्था सर्वांना पुरवठा करण्यात येतो त्यांनाच त्या द्रव्यांच्या वापरावर नियंत्रण व देखरेख ठेवावी लागते. ज्याठिकाणी अशा प्रदुषणाची समस्या असेल तेथे खालीलप्रमाणे जास्त उपाययोजना करणे इष्ट असते.
जमिनीवरील पाण्याचे प्रदुषण होऊ नये म्हणून प्रयत्न करणे.
निवडक अशा असंस्कारित पाण्यांच्या नमुन्यांची नियमितपणे किरणोत्सर्गाच्या दृष्टीने परीक्षा घेणे.
पिण्याच्या पाण्याच्या साठ्यातून किरणोत्सर्गी द्रव्यांचे निष्कासन करण्याची पद्धत शोधण्यासाठी संशोधन करणे.
या अभ्यासावरून लगेच निष्कर्ष काढणे योग्य नसते कारण कोणत्याही पाण्यात असणाऱ्या विशिष्ट समस्थानीय किरणोत्सर्गी द्रव्यांचे गुणधर्म यासारख्या व इतर अनेक गोष्टीवर हे निष्कर्ष अवलंबून असतात. तथापि हे मात्र निश्चितपणे सांगता येईल की असंस्कारितपाण्यातील एकंदर किरणोत्सर्गी आतापर्यतच्या परीक्षांमध्ये कधीही धोकादायक मर्यादेपर्यत वाढलेला आढळला नाही. एकंदर किरणोत्सर्गी ठरविताना नैसर्गिक किरणोत्सर्गी धूळ खाली बसणे व अणुभट्ट्या आणि सनस्थानीय किरणोत्सर्गी द्रव्ये वापर केलेली नागरी कार्ये यांचे उत्सर्जित पाणी या सर्वाचा एकत्रितपणे विचार करावा लागतो.
पिण्याच्या पाण्याच्या आंतरराष्ट्रीय कसोट्या या पुस्तकात पिण्याच्या किरणोत्सर्गाविषयी अंदाजे ठरविलेल्या मर्यादा दिल्या आहेत. मोठया लोकसंख्येस पाणी पुरवठा केला जात असेल तर व लोक आयुष्यभर तेच पाणी पीत आहेत असे गृहीत धरल्यास पिण्याच्या पाण्यातील किरणोत्सर्गी कमाल अनुज्ञेय प्रमाण खालील मार्गदर्शक मूल्यांनुसार असावे असे या पुस्तकात नमूद केले आहे.
कमाल प्रमाण मायक्रोमायक्रोक्युरि / लिटर
स्ट्रॉटीयन ९० ३०
रेडियम २२६ १०
सर्व बीटा संहती १०००
( स्ट्रॉटीयन ९० व अल्फा किरण सोडणारी द्रव्ये पाण्यात नसताना )
जमिनीवरील पाण्यात ७० ते ९० किरणोत्सर्गी द्रव्ये नेहमीच्या जलशुद्धीकरण प्रक्रियांना वेगळी करता येतात. किरणोत्सर्गी धूळ जमिनीवर पडली असेल व पावसाच्या पाण्याबरोबर जमिनीखाली झिरपत असताना पाण्यातील ९९ टक्क्यांपेक्षा जास्त किरणोत्सर्गी द्रव्ये पाण्यातून वेगळी होतात म्हणजे सुदैवाने भूमिजल साठ्यातील पाण्यात निदान खोल विहिरीतल्या पाण्यात फार प्रकारचे प्रदुषण निश्चितपणे झालेले नसते. नागरी संरक्षक पद्धतीमध्ये जमिनीखालील पाण्याच्या साठ्याचा योजनाबद्ध वापर कसा करावा या विषयी माहिती दिलेली असते.
म्हणून याबाबतीत तज्ञ मार्गदर्शन व तांत्रिक मदत देऊ शकणाऱ्या कोणत्या संस्था देशांत आहेत याविषयी जलकेंद्राच्या अधिकाऱ्यानी माहिती करून घेतली पाहिजे.
No comments:
Post a Comment