Thursday, November 16, 2017

टाकीत वा तलावात साठवलेल्या पाण्याचे निर्जंतुकीकरण

टाकीत वा तलावात साठवलेल्या पाण्यात जीवाणू प्रदुषण झाल्यास ते नाहीसे करण्यासाठी पाणी निर्जंतुकी करण्याची पद्धत इतरत्र दिलेली आहे. तलाव, उभ्या टाक्या व इतर टाक्या यांचे बांधकाम किंवा दुरुस्ती करीत असताना जे जीवाणू प्रदुषण होण्याची शक्यता असते. ते नाहीसे करण्यासाठी जंतुनाशक क्रियेचा कसा वापर करावा याविषयीच फक्त खाली माहिती दिलेली आहे. अशा टाक्यांच्या भीती व तळ प्रथम शक्य तेवढा स्वच्छ करावा व सर्व घाण वा सुट्टे पदार्थ काढून टाकावेत यामुळे नंतर करावयाची जंतुनाशक क्रिया फार प्रभावी होते. मोठ्या टाक्या, उभ्या टाक्या किंवा तलाव यांचे जंतुनाशन करण्यासाठी खालील तीन पद्धतीपैकी कोणत्याही एका पद्धतीची वापर करता येतो.
पहिल्या पद्धतीप्रमाणे टाकीच्या आतील पृष्ठभागात क्लोरिनचे तीन द्रावण तसेच लावले जाते. क्लोरिनचे तीव्र द्रावण तयार करण्यासाठी प्रत्येक १५० लिटर ( ३३ ब्रि.गॅलन किंवा ४० अमे. गॅलन) पाण्यात १२० ग्रॅम (४ औस) चुन्याचे क्लोराईड किंवा ४५ ग्रॅम (१.५ औंस) कॅशियम हायपोक्लोराईट मिसळले जाते. यासाठी रसायनांची भुकटी प्रथम थोडया पाण्यात घालून रबरी करून नंतर तो पाण्यात घालून ढवळावी लागते. जर द्रव विरंजक किंवा सोडियम हायपोक्लोराईट वापरले असेल तर प्रत्येक १५० लिटर (३३ ब्रि. गॅलन, ४० अमे. गॅलन) पाण्यात ५ टक्के तीव्रतेचे ६०० मिली. (२० औंस) निरंजक किंवा १५ टक्के तीव्रतेचे (हीच त्याची जास्तीत जास्त तीव्रता असते) २०० मिली. (७ औंस) निरंजक घालावे लागते. असे प्रमाण वापरल्यास तयार झालेल्या द्रावणात २०० भा / दलभा या प्रमाणात उपल्ब्ध क्लोरिन मिळतो. ते तीव्र द्रावण मोकळ्या टाकीमध्ये आतील पृष्ठभागावर, फळझाडांच्या वापरल्या जाणाऱ्या फवारणी यंत्राने फवारले जाते किंवा पांढरा रंग लावायच्या ब्रशने फासले जाते. निर्जंतुक करावयाच्या पृष्ठभाग, पाणी भरण्यापूर्वी कमीत कमी ३० मिनिटे तरी तीव्र द्रावणाच्या संपर्कात रहावा लागतो. 
दुसऱ्या पद्धतीने नव्या वा दुरुस्त केलेल्या टाकीत जे पाणी भरले जाते त्या पाण्यातच कॅशियम हायपोक्लोराईट मिसळले जाते यासाठी ५० भा / दलभा एवढे प्रमाण वापरले जाते. 
जंतुनाशक भुकटी प्रथम थोडया पाण्यात मिसळून त्याचा पातळ चिखल करून नंतर तो पाण्यात मिसळावा लागतो. उदाहरणार्थ एक घनमीटर पाण्यात २५० ग्रॅम चुन्याचे क्लोराईड किंवा ८५ ग्रॅम कॅशियम हायपोक्लोराईट घालून त्याचा रबरी तयार करता येते व नंतर टाकी भरण्यास लागेल तेवढ्या पाण्यात ती मिसळावी लागतो. याचे सममूल्य प्रमाण म्हणजे १००० ब्रि. गॅलन पाण्यात १३/४ पौंड चुन्याचे क्लोराईड किंवा १० औंस कॅशियम हायपोक्लोराईट, अथवा १००० अमे. गॅलन पाण्यात १-१/२ पौंड चुन्याचे क्लोराईड टाकी भरत असताना टप्याटप्याने ही रबरी मिश्रण पाण्यात टाकल्यास जंतुनाशक क्रिया उत्तम होते. टाकीत पिण्याचे पाणी सोडण्यापूर्वी क्लोरिनीकरण केलेले पाणी कमीत कमी ३० मिनिटे तरी व शक्यतो १२ तास टाकीतच राहू द्यावे. 

तिसरी पद्धती म्हणजे रिकाम्या टाकीत पाणी भरले जात असताना त्या वाहणाऱ्या पाण्यातच क्लोरिनीकरण करणे. यासाठी सुवाह्य क्लोरिनीकारक वापरला जातो व पाण्यात ५० भा / दलभा या प्रमाणात क्लोरिन किंवा हायपोक्लोराईटचे द्रावण मिसळले जाते. जर पाण्याचा प्रवाह वेग माहीत नसेल व क्लोरिनची मात्रा बिनचूकपणे ठरवता येत नसेल तर जास्त प्रमाणात क्लोरिन पाण्यात मिसळावा. क्लोरिन जास्त असल्यास पाण्याचा नमुना घरून त्यात आर्थोटोलिडीन विक्रियाकारक मिसळल्यास पाण्याला गडद तांबडा व तपकिरी रंग येतो हा रंग पाण्यातील शेष क्लोरिनचे प्रमाण वाढल्यामुळे येतो. पुरवणीमध्ये (पान ३२२ वर) वर्णन केलेल्या थेंब अवमिश्रण पद्धतीचा वापर करूनही पाण्यात ५० भा / दलभा या प्रमाणात शेष क्लोरिन ठेवता येतो. जास्त शेष क्लोरिनचे प्रमाण ठरविण्यासाठी काहीजण पोटॅशियम आयोडाईड या विक्रियाकारकाचा उपयोग करतात टाकीत पिण्याचे पाणी सोडविण्यापूर्वी जास्त कोरिनीकरण केलेले पाणी कमीत कमी ३० मिनिटे तरी व शक्यतो १२ तास टाकीतच राहू द्यावे. 

No comments:

Post a Comment