Thursday, April 11, 2019

No change in status of Computer Education in 7 years

When I transcribed my talks on Green FM radio recorded 7 years back, I myself felt that the time has not changed since that time.

I had expressed a fear that within two years computers will be in the hands of all students in school and colleges ( as per promise of the Govt. at that time) and we shall remain unprepared to cope up with influx of video games and foreign entertainment industry.
 Ref :

माझी रेडिओवरील मुलाखत २७ जुलै २०१२ (भाग-१)

माझी रेडिओवरील मुलाखत ३ अॉगस्ट २०१२ (भाग-२)



Thanks God ! that the promise remained only promise and there is no immediate possibility of improvement in status of computer aided education.


Hence, there is still ample time for Dnyandeep to pursue its cherished dream of starting Dnyandeep Mandal in schools.

माझी रेडिओवरील मुलाखत ३ अॉगस्ट २०१२ (भाग-२)

ग्रीन एफ एम ९०.४ या सांगलीतील कम्युनिटी रेडिओ चॅनेलवर दिनांक ३ अॉगस्ट २०१२ रोजी माझ्या मुलाखतीचा दुसरा भाग प्रसिद्ध झाला होता. . त्या मुलाखतीचा वृत्तांत आहे त्याच बोली भाषेत सादर करण्याचा प्रयत्न केला आहे.एक जुनी आठवण आणि  आमचे त्यावेळचे संकल्प यांचे दर्शन त्यात होईल अशी आशा आहे.




 मेधा सोवनी - तर मंडळी तुम्ही ग्रीन एफएम ऐकताय आणि आज शुक्रवार असल्याने आज आपला सेकंड इनिंगचा दिवस आहे, त्यामुळे मी मेधा  आपणा सर्वांचे मनापासून स्वागत करते या कार्यक्रमामध्ये. मंडळी मागच्या सुक्रवारी आपम निवृत्त प्राध्यापक डॉ. रानडे यांच्याशी बातचित केलेली होती. तुमच्या लक्षात असेलच. अतिश. उत्तम विचार असणारी ही व्यक्ती आपल्याला लाभलीय. आजही त्यांच्याशी आपण बातचित करणार आहोत. इंटरनेटचा वापर चांगल्या कारणासाठी कशापद्धतीने होऊ सकतो. उत्तम शिक्षणासाठी कशापद्धतीने होऊ शकतो हे सरांनी आपल्याला सांगितलं आणि त्याच इंटरनेटचा वापर महिलांसाठी उत्पन्नाचे साधन म्णून कसा होऊ शकतो.मुलांसाठी ज्ञानामी दालनं कशी खुली होऊ शकतात. याविषयी आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. आमि त्यासाठी सर इतं हजर आहेत. नमस्कार सर,
डॉ. रानडे - नमस्कार
सौ. मेधा सोवनी - सर आपण मागच्या वेळेला खूप छान माहिती दिलीत की आतापर्यंत तुम्ही कायकाय केलेलं आहे. आणि आता आुण वळणार आहोत ते इथून पुढे तुमचे संकल्प काय आहेत तर तुम्ही म्हणाला होतात  मागच्या वेळेस की ज्ञानदीप मंडळाची माझी एक संकल्पना आहे. आता ज्ञानदीप फौंडेशनची संस्था काम करते काय तर हे ज्ञानदीप मंडळ नेमके कशासाठी उद्देश काय आहे त्याचा
डॉ. रानडे - त्याची पूर्वपीठिका अशी की मी गेल्या पाचसात वर्षांमध्ये दोनतीन वेळा अमेरिकेला गेलो होतो. आणि तिथं मी असं बघितलं की आमचे नातू किंवा इतर मुतं ही बरीचशी कॉम्प्युटरमध्ये असणारे व्हिडिओ गेम व इतर काही खेळणी यामध्ये फार गर्क झालेली आहेत आमि त्याचा त्यांच्या शिक्षणावरती परिणाम होत आहे. त्यामुळे शिक्षणामध्ये जरा मागे पडतात.
सौ. मेधा सोवनी -  म्हणजे आपण त्या लोकांकडे बघतो ना ते काहीतरी ग्रेट म्हणून बघतो आणि तुम्ही हे जे सांगताय ते याहून वेगळे जाणवतंय.
डॉ. रानडे - याचं कारण असं आहे की त्याठिकाणी संगणकाचा जो वापर आहे तो जास्तीतजास्त मनोरंजनासाठी केला जातोय. मनोरंजन हा भाग असा आहे की लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना भुरळ घालणारा आहे.
अगदी
डॉ. रानडे - आणि त्यामुळं काय झालं की अमेरिकेच्या मोठमोठ्या ज्या कंपन्या आहेत त्या विविध क्षेत्रात आहेत तशा मनोरंजन क्षेत्रातही आहेत. म्हणजे फार मोठ्या अशा संस्था आहेत की खेळण्याची एक मोठी इंडस्ट्री त्यांनी निर्माण केलेली आहे. म्हणजे एखाद जरी खेळमं असेल, समजा स्पायडरमॅन आहे, स्टार वार्स आहे किंवा हरी पॉटर आहे आसी साधी आपण खेळणी बघतो डायनॉसॉर्स आहेत त्यांनी त्यावर प्रचंड प्रमाणात विहिडिओ गेम्स, वस्तू, खेळणी, गाणी, सिनेमे  तयार करून  मुलांनी त्याच्या मागं लागाव, त्याला अॅडिक्ट व्हाव या पद्धतीनं त्यांचे प्रयत्न चालू आहेत. आणि ब-याच मुलांचं त्यामुळं शिक्षणाकडं दुर्लक्ष होतय फक्त तिथं काय आहे फायदा असा की तिथले लोकं, सगळ्यांनाच संगणक माहिती असल्यामुळं आणि त्यांच्या जीवनाचा तो अविभाज्य भागच बनलाय सकाळपासून रात्रीपर्यंत सारखं त्यचा वापर चालू असतो त्यामुळे त्यांना माहिती आहे की मुलांनी काय बघावं त्यामुळे ते नियंत्रण करतात. त्यामुळे ते योजना आकतात की मुलांनी जास्तीतजास्त त्याचा उपयोग अभ्यासासाठी करावा. शिक्षणासाठी तेथे प्रचंड प्रमाणात तिथे संगणकाचा वापर होतो.

आणि याउलट आपल्याकडं मात्र या संगणकाच्या बाबतीत एक वेगळीच लाट निर्माण झाली की संगणकाचा वापर जास्तीतजास्त व्हिडिओ गेम, चित्रे बघणे, किंवा फेसबुक, आर्कुटवरनं गप्पा मारणं याच्यासाठी जास्त व्हायला लागला. आमि अब्यासापासून ही मुलं दूर व्हायला लागलीयत. याचं कारण याच फॅसिनेशन निर्माण झालय. त्याना असं वाटायला लागलंय की काही सहज गोष्टी केल्या की एकदम यश मिळते. आपल्याला माहिती आहे की आपण असं म्हणतो की  स्वत मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. तसंच स्वत अभ्यास केल्याशिवाय यश येत नाही. पण ह्या गोष्टीला थोडसं वेगळं व विकृत स्वरूप या असल्या खेळांमुळं किंवा अशा खेळांमुळं त्या मुलांना मिळतय आणि याच कारण असं आहे की काही कल्पनारम्य म्हणजे पूर्वी पंचतंत्र होतं,अरेबियन नाईट्स होत्या इसापनितीच्या गोष्टी होत्या पण इसापनितीता काहीतरी तात्पर्यहोतं आता तिकडं जे नवीन खेळ विकसित झाले या खेळांमध्ये हिंसा, विध्वंस आमि त्यात आनंद मिळवणं शिकार करायची कुणाला मारायचं कसं ह्याच्यामध्ये आनंद मिळवायचा आता तुम्ही घुगलवर बघितलं असेल अॅंग्री बर्ड म्हणून खेळ प्रचंड पॉप्युलर खेळ आहे. म्हणजे तिथे काय आहे की ते पक्षी जाऊन एक मोठा मनोरा फोडतात. व त्यातली लोकं खाली पडतात. कारण काहीही सांगितलं असेल परंतु पाडण्याकडं प्रवृत्ती जास्. आणि काहीतरी लकने पैसे मिळवणं आता नशीब म्हणून काही टीव्हीवर चाललय तर टीव्हीचीही तीच स्थिती आहे आपल्याकडे तर कुठल्याही माध्यमाचा उपयोग शिक्षणासाठी न होता जाहिरात व मनोरंजन यासाठी जास्तीत जास्त व्हायला लाहलाय मध्यंतरी आपल्या कपिल सिब्बल यांनी सांगितलं की आम्ही प्रत्येक विद्यार्त्याच्या हातात एक लॅपटॉप देणार आहे. अगदी कमी किमतीत देणारे की शिक्षण चांगलं करता येईल. भारत सरकारची योजना खरच चांगली आहे की शिक्षणासाठी कित्.ेक कोटी त्यांनी खर्च केलेत आणि हे सगळे लॅपटॉप आणायची त्यांनी आर्डर धिली आहे आणि एकदोन वर्षांमध्ये सगळ्यांच्या हातांमध्ये हे लॅपटॉप मिळतील आणि हे लॅपटॉप मिळाल्यावर त्याच्यावर काय बघायचे ते मटेरियलच नाही आपल्याकडे. मटेरियल तिकडले जे येईल तेच,

 सौ. मेधा सोवनी -  म्हणजे  येणार ते सगळे गेम्सच येणार.

डॉ. रानडे -  हो,

सौ. मेधा सोवनी - इंटरनेट मुलांनी ओपन केले तर त्यातून काय चांगलं घ्यावं ते आधी शिकवायला लागणार आहे

डॉ. रानडे -  हो, बरोबर आहे आणि या लॅपटॉपवरती एकदा तो खेळ बघायला लागला की तो खेळच बघत बसणार आमि सिनेमेच बघत बसणार आमि याच्यापासून वाचविणार कोण कारण शिक्षण देणारे आहेत ते शिक्षक आणि घरात अब्यास घेणारे पालक या दोघांनाही कॉम्प्युटर माहिती नाही. कॉम्प्युटरपासून ती चार हात दूर आहेत. त्यामुलं काय होतं की आपला मुलगा कॉम्प्युटर वापरतोय लॅपटॉप करतोय

सौ. मेधा सोवनी - त्याच्यावर काय चाललय हे त्यांना माहीत नाही.

डॉ. रानडे - म्हणजे लॅपटॉपवर कुठले गेम्स बघतोय कुठले व्हिडिओ बघतोय काय करतोय काहीच माहिती नाही.आणि याचा परिणाम असा होईत की अज्ञानी प्रौढ व ज्ञानी लहान मुलं असं म्हणायचं पण त्यांना माहिती नाही काय बघायचं ते अनियंत्रित वापर झाल्यामुळे त्याचे अधोगतीत रुांतर झालं आणि त्याना असं वाटायला लागलं की मी त्यातनं जास्त पैसे मिळतील किंवा काहीतरी फायदा होईल त्यामुळे अभ्यासाकडं दुर्लक्ष होईल

सौ. मेधा सोवनी -  म्हणजे  योग्य ते  ज्ञान त्याला मिळणार नाही असं वाटतयं तुम्हाला.

डॉ. रानडे - हो.

सौ. मेधा सोवनी - म्हणजे त्यासाठी तुमची ज्ञानदीप मंडळाची संकल्पना आहे.

डॉ. रानडे - हो. म्हणजे  माझे मत असे होते की सरकारने असा सर्वांना लॅपटॉप देण्याचा  निर्णय घेण्याऐवजी मोठमोठ्या शाळा सांगली हायस्कूल लठ्ठे एज्युकेशन संस्था यांनी डिजिटलस्कूलसाठी प्रचंड पैसा खर्च केलाय. प्रत्येक वर्गामध्ये कॉम्प्यु़टर ठवायची योजना आहे पण या कॉम्प्युटरवर दाखविणार काय. ते सध्या इंटरनेटवर मिळते ते दाखवितात. पण यात देखील बरेचसे प्रोग्रॅम हे अशा कंपन्यांनी केलेले आहेत. येथे त्यांचा इथे  उद्देश वेगळा असतो.  तिकडलं जे ज्ञान आहे ते तिकडल्या परिस्थितीशी जुळमारी असतात. तिकडली नावं आपल्याकडं रुळायला लागतात. इथल्या परिस्थितीची जी जाण आहे व इथे ज्याची गरज आहे ती माहिती आपल्याला यातून मिळत नाही. बरं, दुसरी गोष्ट म्हणजे हे सगळं असतं ते इंग्रजीमधलं, त्यामुळे मराठी माध्यमातील मुलांना केवळ करमणूक सिनेमा बघतोय एवढच त्याच समाधान होईल. शिक्षकांनाही काय टिव्ही लावलाय त्यावर आम्ही शिकवतो स्वत शिकवण्याचे कष्टही घ्यायला नकोत रेडिमेड आहे ते दाखवायचं मुलांनी त्यावर उत्तरे लिहायची. त्याचा जेवढा अभ्यास व्हायला पाहिजे ते कशापद्धतीने चालवायचे याची काहीच तयारी नाही तर नुसते लॅपटॉप दिले तर त्यामा परिणाम चांगला व्हायट्याएवजी वाईट होईल असे मला वाटते. तर यासाठी आधी सर्व शिक्षकांना कॉम्प्युटर शिकवणं त्याचा वापर कसा करायचा हे शिकवण्याची फार मोठ्ठी गरज आहे आणि फक्त  आपल्याकड कसं आहे की शाळेमध्ये एक संगणकाचा शिक्षक असतो तो त्याचे काम असतं संगणक ठीक ठेवायचं. असं नाही संगणक हे साधन आहे. प्रत्येक विषयाच्या शिक्षकाला संगणकाचा वापर करून शिकवायचंय.

सौ. मेधा सोवनी - म्हणजे शिक्षकांनी संगणकाचा उपयोग करायचा आणि आपला विषय विद्यार्थ्यांना समजाऊन सांगायचा.

डॉ. रानडे -  ह्याची खरी गरज आहे. आपल्याकडं काय होतं आमच्याकडं चार कॉम्प्युटर आहेत. संगणकाचे सिक्षक आहेत झालं काम असं नाही. प्रत्येक शिक्षकाची ती आता जबाबदारी आहे आमि येत्या दोन वर्षांत त्यांना संगणक साक्षर व्हावच लागेल. आणि ते जर झाले नाहीत तर मुलांचे भवितव्य फार भयावह होणार आहे. कोणीच हा विचार करत नाहीत. राज्यकर्ते विचार करत नाहीत मोठ्या संस्था आहेत त्या आपल्या बिल्डींगच्या जाहिरात करतात. अरे शिक्षकांची जाहिरात करा बिल्डींगची करू नका. बिल्डींग किती मोठी आमि किती कॉम्प्युटर याएवजी कोण शिक्षक आहेत ते काय शिकवतात याला महत्व आहे. म्मजे मी नेहमी म्हणतो इन्फ्रास्ट्रक्चर नको आपल्याला इन्फोस्ट्रक्चरची गरज आहे. माहितीचे आमि  ज्ञनाचे भांडार पाहिजे आणि त्याच्याकडे दुर्लक्ष झालय आपलं. असं मला वाटतं.
सौ. मेधा सोवनी - त्याकरताच आपल्याला काही करायला पाहिजे असं तुम्हाला वाटलं आणि त्यासाठी तुम्ही संकल्प सोडलाय तुम्ही इतके उत्तम चांगले संकल्प मोडलेत त्याबद्दल आपम एक मस्त गाणं ऐकूया. गाणं ऐकवते आणि मग आपण या संकल्पाकडे वळूया.
--- गाणं---
मंडळी,   ९०.४ ग्रीनएफएमवर आपण प्राध्यापक रानडे यांच्याशी बातचित करतोय. आता त्यांनी सांगितलं की ज्ञानदीप मंडळ स्थापन करावं असं मला का वाटलं त्याची पार्श्वभूमी काय काय होती  हे सगळ बघितलं आपण तर अॅक्चुअल   हे मंडळ स्थपन करायचय म्म्हणजे काय करायचं सर, याविषयी सांगाल जरासं

डॉ. रानडे - आमचा असा उद्देश आहे की ग्रामीण भागातल्या वा म्युन्सिपालिटीच्या ज्या शाळा मराठी माध्यमाच्या आहेत की ज्यांच्याकडे या सगळ्या सुविधा नाहीत डिजिटल स्कूल इत्यदी अशाठिकामी कॉम्प्युटर चालू करायचे तेथल्या   एखाद्या शिक्षकाला आपले चांगले शैक्षमिक साहित्य ज्ञानदीपकडे आहे ते मोफत त्यांना देणार आणि ते  विद्यार्थ्यांना दाखवायची सोय करायची आमि मुलांना मराठीत टाईप करायचं शिकवायचं. म्हणजे तिथलं मराठीतलं ज्ञान आपल्याला संगणकात घेता येईल आमि ते सा-या जगापर्यंत पोचविता येईल. म्हणजे निसते ज्ञान देणे ही प्रवृत्ती नाहीय़े त्यामध्ये तर ज्ञान जनरेट करणे ग्रामीण भागातून ज्ञान जनरेट व्हायला पाहिजे. त्या सिक्षकाची जबाबदारी असेल की सगळ्या शिक्षकांना एकत्र करून त्यांना या संगणकाचे महत्व सांगायचे.  आमि प्रत्येक विषयामध्ये खूप माहिती आहे हे त्यांना पटवून द्यायचे आणि जबाबदारी आहे त्यांची हे दोन वर्षात शिकाययी हे पण त्यांना सांगायचे. ह्याच्यासाठी आम्ही एक ज्योत लावल्यासारखी आहे.  आम्ही काही जास्त करू शकणार नाही. माझ्याकडे चार मुले आहेत. पण तेथे एकएक सेक्शन जर जागृत झाला तर तो अशा शिक्षकांना प्रवृत्त करेल तिथे जे ज्ञान जनरेट होईल ते माझ्या भांडारात पडेल मग अशा  शाळा   आपण एकत्र जोडू शकतो.

सौ. मेधा सोवनी - पण सर आता तुम्ही म्हणालात की मी काय करू शकणार आहे . चार मुलं आमि मी एवडंच आम्ही काम करू सकतो पण  ही तुमची जी इच्छा आहे ही कल्पना जर असा अनेक शाळांच्या मनात जर रुजली तर आपण म्हणतो न जसे ज्योत से ज्योत हे गाणं ऐकलं तशापद्धतीने एका ज्योतीने अनेक ज्योती लावल्या आणि त्या पणत्या वा दिवे तेवले तर त्याचा प्रकाश जगाला उजळून टाकेल अशा पद्धतीचा असणार आहे.

  डॉ. रानडे -  त्याच्यासाठी मी स्कूल फॉर अॉल या नावाची वेबसाईट सुरु केलीय. त्यावर या सर्व शाळांची माहिती त्यांचे फोटो व उपक्रमांची माहिती देणार त्याबरोबरच  तेतली मुलं काय शिकतायत त्याची माहिती जगभर पोचविणार. अगदी साधी गोष्ट बघा. परवा आमचं दोघांच रेकॉर्डिंग झालं  ते मी आमच्या मायचांगली वेबसाईटवर टाकलं. टाकल्याबरोबर अमेरिकेतल्या माझ्या मुलाने ऐकलं आणि त्याने फोन केला ग्रीन एफएमने खूपखूप चांगलं काम केलय. दोन तासात हा फोन आला म्हणजे याचा अर्थ अमेरिकेतील तोकांनी ती ऐकली म्हणजे या ज्ञानाचा प्रसार अतिशय वेगाने होऊ शकतो.

सौ. मेधा सोवनी -  बरोबर. म्हणजे आता खर तर आमचा हा कम्युनिटी रेडिओ आहे.आणि आपलं हे प्रसारण हे फार कमी लोकांपर्यंत पोचू शकते  आमि वेळेचे बंधन म्हणजे मी त्या वेळेत रेडिओ लावू नाही शकले तर मला ते ऐकू येणार नाही. पण असा पद्दतीने केल्यामुळे म्हणजे इंटरनेटचा वापर करून  ही चांगली गोष्ट आपण दूर अमेरिकेत बसलेल्या मुलालासु्द्धा ऐकवू शकलो. तर हा ज्ञानाचा उपयोग वा ज्ञानाचा प्रकाश  आहे आपल्या सांगलीकरांच्यापर्यंत पोचवायचा आहे . खूप चांगला उपक्रम आहे तुमचा आणि डिजिटल स्कूल म्हणालात तुम्ही तर त्याबद्दल काय तूमची प्रतिक्रिया ते सांगाल का.

  डॉ. रानडे -  ते काय आहे. डिजिटल स्कूलमध्ये प्रत्येक विषयामध्ये व त्यातील छोट्या भागावरही प्रचंड ज्ञान उपलब्ध आहे. तेही विविध स्वरुपात आहे म्हणजे लिखित स्वरुपात आहे, चित्रांच्या स्वरुपात आहे. पॉवर पॉईंट्स आहेत चांगले व्हिडिओज आहेत. आणि जवळजवळ सर्व फ्री मटेरिएल आहे. फक्त त्याकड लोकांचे लक्ष नाही. ते आपण गोळा करू शकलो पाहिजे आणि ते मी एकटा करू शकणार नाही.   प्रत्येक शिक्षकाला जबाबदारी दिली तर गोळा करू शकतील त्याचे नीट वर्गीकरण करू सकतील त्याचे मराठीत रुपांतरण करू शकतील. आणि हे रूपांतर केल्यानंतर त्याचा एक ज्ञानकोश तयार होईल आणि एकमेकांच्या शाळांमध्ये हे गेलं की हॉरिझांटल इंटिग्रेशन होईल आणि कॉलेजमध्ये केलं म्मजे कॉलेजमधले जमा केलेले ज्ञान जर आपण शाळांमध्ये पोहोचवू शकलो तर व्हर्टिकल इंटिग्रेशन होईल.  व्हर्टिकल आणि हॉरिझांटल इंटिग्रेशन  झाल्याशिवाय शिक्षणाचा व इंटरनेटचा वापर चांहलो होणार नाही. आता तुम्ही म्हणाल की तुम्ही नुसतेच वाईट सांगताय की हे सगळं इतकं भयावह आहे आणि कसं शिकऱार काय होणार तर  असं नाही कारण  याच वेळी आपल्याला फार मोठी संधी उपलब्ध झाली आहे. सगळ्या शिक्षकांना, महिलांना संधी ही आहे की हे जे काम आहे ते कोण करणार अमेरिकातले लोक करणार नाहीत आपमच करायचं आहे त्यामुळं ही मोठ्ठी  व्यवसायाची संधी आपल्याला मिळाली आहे. ज्यांना कॉम्प्युटर प्रोग्रॅम करता येतात त्यांना यातून प्रचंड उत्पन्न होऊ शकते.

 सौ. मेधा सोवनी -  बरोबर. म्हणजे  ज्ञानार्जनाबरोबर अर्थार्जनही यातून होणार आहे.   मंडळी हे पम तुम्ही लक्षात घ्या म्हणजे इंटरनेटचा वापर करून ज्ञानार्जन तर होणार आहेच आहे पण ज्या महिला आपले घरातले काम आवरून जो वेळ त्यांच्याशी सिल्लक आहे अशा महिलांनी जर हे वेब डिझाइनिंग शिकले किंवा इंटरनेटचा वापर चांगल्या पद्धतीने कशाप्रकारे होऊ शकतो हे जर शिकलं तर ते नक्कीच आपल्या मुलांच्याबाबतीतसुद्धा त्यांना चांगला आदर्श घालून देऊ शकणार आहेत

  डॉ. रानडे - बरोबर आहे.  तिकडे असे आहे की पालकांसाठी वेबसाईट असते शिक्षक व त्यांया चालकांसाठी असते मुलांना इंटरनेटवर बघून रोज  उत्तरे लिहावी लागतात. शिक्षक रोज ब्लॉग लिहितात. आपल्या सिक्षकांनी ब्लॉग लिहिले पाहिजेत त्यांचे ज्ञान  लोकांच्यापर्यंत पोचले पाहिजे. आणि ते आपल्या भाषेत लिहिले पाहिजेत जसं ज्ञानेश्वरांनी त्यावेळी संस्कृतमधलं सगळं ज्ञान मराठीत आणलं त्यामुळं आपण आज बघतोय तसं इंग्रजीतलं जे ज्ञान आहे ते इंटरनेटम्टा माध्यमातून आपल्या डोक्यावर पडतेय. पण आपल्याला ते समजत नाही. तर त्यातलं चांगलं कुठलं आहे ते काढून आपण ते विद्यार्थ्याला द्यायला पाहिजे कारण विद्यार्थ्याला माहीत नाही काय चांगले आणि काय वाईट घ्यायचे ते. विद्यार्थी सगळेच घेतात.  आमि ते घेतल्यानंतर त्यातले वाईट चटकन घेतात कारण त्यात जास्त भुरळ पाडण्यासारख्या गोष्टी असतात. तर जे चांगले आहे त्यात कष्ट वाटतात. ते   घ्यावे लागेल त्याचा तुम्हाला अभ्यास करावा लागेल आणि त्यातून तुम्हाला     त्याचा उपयोग करऊन सांदिपनीसारखे तुम्ही ज्ञान मिळवा व ते ज्ञान लोकांच्यासाठी वापरा. असं करता येईल.

 सौ. मेधा सोवनी -बरोबर. सर,  ऑनलाईन  वेबडिझाइनिंगबद्दल सुद्द्धा आपण मागच्यावेळेला बोललो होतो. तर हे  वेबडिझाइनिंग आहे ते    ऑनलाईन  तुम्ही कशापद्धतीने   काय केले पाहिजे म्हणजे एखाद्याला वाटले की अॉनलाईन शिकायचे तर त्यासाठी काय केले पाहिजे.

    डॉ. रानडे -  सर्वप्रथम म्हणजे त्या व्यक्तीकडे एकतरी कॉम्प्युटर व इंटरनेट असावं पहिली गोष्ट. त्यानंतर त्याला प्राथमिक थोडी माहिती पाहिजे गुगल याहू सारख्या इमेल सर्व्हीस आहेत त्यांची माहितई पाहिजे आणि शिक्षण अकरावी बारावी झालेले असले तर त्याचे लॉजिक तेव्हढे तयार असते. तर त्या तेवढ्या पूर्वपीठिकेवर आपण त्यांना कोठलाही कॉम्प्युटरचा विषय शिकवू शकतो. अगदी सुरवातीपासून. फक्त काम करण्याची व कष्ट करण्याची तयारी हवी. असं होणार नाही की मी इथे कोर्स केला चाळीस तासांचा की मी उद्या पऐसे मिळवायला लागिन असं नाही. चाळीस तासांचा कोर्स झासा तर तुम्ही चारशे तासांचे त्याच्यावर काम  करायला पाहिजे. म्हणजे एखादे काम स्वत केल्याशिवाय ते अंगात मुरत नाही.

कारण कॉम्प्युटर जितका सोपा ाहे तितकाच तो स्वत ढुझाईन करण्यासाठी अवघड आहे. आणि त्यासाठी काय लागतं   नुसतं प्रॅक्टिस बाकी काही नाही.    प्रॅक्टिस, प्रॅक्टिस ,प्रॅक्टिस  दुसरे काही नाही.   आता आमच्याकडे डिप्लोमा झालेला मुलगा होता. तो इथं एमएसइबीची बिलं रात्री टाईप करायचा तो आमय्च्याकडे शिकला तीनचार वर्ष शिकल्यानंतर तो आता न्यू जर्सीमध्ये आहे.  अशी अनेक माझी मुले गेलेली आहेत म्हणजे शिक्षणाचा काही संबंध नाही ज्या विषयात तुमचे डेडिकेशन किती आहे त्यावर तुम्ही मिळवू शकता आता ब-याच महिला म्हणतात आम्हाला शिकायचय  पण दुपारी दोन ते तीन च्या वेळात शिकेन  तर असं नाही होणार तर त्याच्यवर दिवसभर काम केले पाहिजे प्रश्नांची उत्तरे द्यायला    पाहिजेत. आम्ही सर्वबाबतीत तुम्हांला मदत करू.  तर या पद्धतीने आपल्याला शिकवायचेय तर कसे आहे तुम्ही एखादे व्रत घेता तसे.  सणाचे व्रत घेतलं जशी माळ घालायची गळ्यात तसंट व्हायला पाहिजे. मी आता वेबडिझाईनचे व्रत घेतले मी ते करणार आणि करणारच असं जोपर्.ंत तुम्ही म्हणत नाही तोपर्यंत तुमच्या हातनं होणार नाही. नाही तर करमणुकीचे म्णून त्यात गंमत वाटती नंतर वाटते जाऊदे आता जास्त काही करायला नको असं होऊ नये
सौ. मेधा सोवनी -एखादी गोष्ट हातात घेतली की त्याच्या मुळाशी जाऊन नेमकं काय आहे ते शोधायची तयारी हवी.
    डॉ. रानडे - अगदी बरोबर आपण नवी पुस्तक घेतली, नवी असतात म्हणून हवी वाटतात आत वाचायची वेळ आली की नको वाटते.    अहदी साध बघा आपली लिहायची सवय गेली. मोबाईलवर बोललं की काम होत. पत्रच लिहीत नाही आपण. म्पणून आम्ही लिहिले होते कग हस्ताक्षरातील पत्राच आम्ही छापू आमच्या साईटवर. अक्षर विसरायला लागलं हस्ताक्षरामुळं  त्याट्या व्यक्तिमत्वाचा ठसा उमटतो हे त्याच्या लक्षात येत नाही. तुमचे अक्षर कसेही असो तुम्ही लिहिलेलं आहे ते जाणवतं अक्षरांचा संबंध नाही तुम्ही ते लिहिता स्वत ते सिग्नेचरला महत्व आहे. अमेरिकेमध्ये आता हॅंडरायटिंग डे आहे. २३ जानेवारीला  हॅंडरायटिंग डे पाळतात आणि तिथे हा प्रश्न फार महत्वाचा आहे.
  सौ. मेधा सोवनी - तसा दिवस आपल्याकडे पाळायची गरज लागू नये.
    डॉ. रानडे -  मुलं ही हस्ताक्षर काढू शकतात. जर मुलांना हे कळलं की आपण लिहिलेली माहिती तिथले ज्ञान उदा. भोवतालच्या झाडांची माहिती नेटवर घातली तर जगभर जातीय तर मुलं उत्साहाने लिहितील.
  सौ. मेधा सोवनी -  तर आतापर्यंत तुम्ही ज्ञानदीप मंडळ सुरू केले आहे तर काय काय परिस्थिती आहे त्याची.
   डॉ. रानडे - आता दोन ठिकाणी सुरू केलेली आहेत मला जळगाव येथून फोन आला.  आम्हाला सुरू करायचंय. मी म्हटले शाळाप्रमुखाच्या सहीचे एक पत्र पाठवा आॅफिशियल की आम्हाला ज्ञानदीप मंडळ सुरू करायचय कारण नंतर प्रॉब्लेम व्हायला नको कारण शिक्षकांच्या मनात असते त्यांना याचे महत्व कळते मात्र संस्थाचालक यांना त्याचे महत्व जाणवेल असे नाही आणि त्यामुळे जरा थोडसं अडतं अगदी आमच्या एन्व्हायर्नमेंटच्या बाबतीतील उदाहरण देतो. आम्ही टेक्निशियन्सना पोल्युशन कसे टाळावे प्लॅंट कसे चालवावे याचे खूप  शिक्षण देतो.पण ते होत नाही कारण त्यांचे जे मालक असतात इंडस्ट्रीचे त्यांना आम्ही शिकवित नाही. खालच्यांच्या काहीच हातात नसतं.
  सौ. मेधा सोवनी - इम्प्लिमेंटेशन करणारे त्यांना हे कळले पाहिजे,
   डॉ. रानडे -  डिसिजनमेकर महत्वाचा. म्हणून आम्ही संस्थाचालकाना महत्व देतो. परवा कोरेगाववरून दोन शिक्षक आले होते. त्यांनी खूप माहिती आणली होती. तिथे एक सरस्वती शिक्षण शाळा आहे ते म्हणाले आम्ही करतो. एक शिक्षक मिळाला दुसरा शिक्षक मिळाला ब-याच शिक्षकांपर्यंत पोचवलय
  सौ. मेधा सोवनी -   म्हणजे बाहेरून तुम्हाला रिस्पॉन्स आले सांगली भागामध्ये तुम्हाला काय रिस्पॉन्स मिळाला.
   डॉ. रानडे -  सांगली भागामध्ये सर्व शिक्षकांपर्यंत आम्ही पोचलोय. पण शिक्षकांच्याकडून संस्थाचालकांच्चाकडे गेलो नाही. संस्थाचालकांची दृळ्टी ही फक्त फी मिळवणे किंवा जाहिरातीसाठी काही मटेरियल मिळते का याकडे असते. त्यांना याचे महत्व अजून कळलेले नाही म्हणून तुमच्या या माध्यमामुळे कदाचित त्यांना उपयोग होईल आणि दोन वर्षांनंतर कॉम्प्युटर आल्यानंतर शिक्षणाला याचे महत्व कळेल. कारण काय दाखविणार  मुलांना आज डिजिटल स्कूल म्हणून जाहिरात करताय पण त्यावेळी प्रत्येकाकडेच लॅपटॉप असणार आहे.त्यावेळी तुम्ही देणार काय. त्यावेळी आमच्याकडे चांगले प्रोग्रॅम आहेत आम्ही चांगले शिकवू शकतो
  सौ. मेधा सोवनी -  म्हणजे येणा-या कालावधीसाठी तयारी आतापासून करायला हवी.
    डॉ. रानडे - ती कोण करणार कुणाचेच तिकडे लक्ष नाही.
  सौ. मेधा सोवनी -  तर मह, सर आता आपली मुलाखत तर लोक ऐकतीलच व त्यातून कोणाला वाटलं काही करावं तर तुम्ही काय करणार,
 डॉ. रानडे - आता सांगलीमधल्या शाळांमध्ये आम्ही आलरेडी अॅप्रोच झालोय. या शाळातील कॉम्प्युटर काढून साफ करून चालू करणार आमचे संस्कृतदीपिकाचे सऑफ्टवेअर आहे ते घालून देणार. मराठी टायपिंगचे सऑफ्टवेअर घालून देणार.  माझ्या विज्ञान, स्कूल फॉर अॉल मध्ये प्रचंड माहिती गोळा केलेली आहे. ती सगळी देणार. तिथ व्याख्यान देऊन ती मुलांना दाखविणार शिक्षकांना दाखविणार. तिथल्या शिक्षकांना प्रशिक्षित करणे हा आमचा मुख्य उद्देश आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना आणि शिक्षक आमि विद्यार्थी यांनी समाजाला भोवतालच्या करावं. अशी कल्पना आहे ाणि याचप्रमाणे शाळांशी कॉन्टक्ट करतोय. एमओयू करतोय आमच्या  एन्व्हायर्नमेंट शिक्षणासाठी कॉलेजेसशी सहकार्य करार केला होता. आता एन्व्हायर्नमेंट मधून मी अंग काढुन घेतलंय आता वेबडिझाईनसाठी सगळ्या कॉलेजशी सहकार्. करार करणार आहे. त्यांच्याकडे ज्ञानदीपचा क्लब सुरू करायचा प्रयत्न करणार आता ते म्हणतील ज्ञानदीप कशाला आमचा आहेच क्लब. असेल पण विषय असा आहे की सगळ्या विषयांचे शिक्षम त्यात यावे.अशाप्रकारचा कुठलाही क्लब निवडा.  आम्ही त्याला ज्ञानदीप क्ब म्हणणार आमि त्याचे ज्ञान खालच्या स्तरावर म्हणजे भोवतालच्या शाळा नेणे. शाळांतून हे ज्ञान मुलांच्या पालकांपर्यंत जाईल. म्हणजे ज्ञानाचा प्रसार आहे तो आसे कॅटेगराईज होऊनतो व्हर्टिकल व्हायला पाहिजे.    भारताच्या म्हणजे देशाच्या पातळीवर कोणीतरी याचा गंभीरपणे विचार करायला पाहिजे. इथल्या शिक्षणतजज्ञांनी हा विचार केला नाही तर दोन वर्षांनी अमेरिकेतील व परदेशातील  व्हिडिओगेम्सच पक्त येतील आणि मुलं आपली वाया जातील.
  सौ. मेधा सोवनी -  सर , खूप मोठी धोक्याची घंटा तुम्ही वाजवून दाखविलेली आहे. सो बी सिरीयस कारण सर जे काही बोलत आहेत ते खूप माहिती घेऊन बोलत आहेत. त्यामुळे या गोष्टी ापण नक्कीच लक्षात ठेवल्टा पाहिजेत. तर येणारा काळ हा थोडासा कठीम आहे आपल्यासाठी त्यातून तरून जाण्यासाठी आपल्टाला काय करणे गरजेचे आहे त्या सरांनी सगळ्या गोष्टी सांगितलेल्याच आहेत. तर सर तुमही इथ येऊन खूप मोलाचे मार्गदर्शन केले आहे. आपल्या सहळ्या पालकांसाठी, शि७कांसाठीसुद्धा. त्याबद्दल करच मी आपले मनापासून आभार मानते.
  डॉ. रानडे - नमस्कार.

Wednesday, April 10, 2019

माझी रेडिओवरील मुलाखत २७ जुलै २०१२ (भाग-१)

ग्रीन एफ एम ९०.४ या सांगलीतील कम्युनिटी रेडिओ चॅनेलवर दिनांक २७ जुलै २०१२ रोजी माझी एक मुलाखत ( भाग-१) प्रसिद्ध झाली होती. त्या मुलाखतीचा वृत्तांत आहे त्याच बोली भाषेत सादर करण्याचा प्रयत्न केला आहे.एक जुनी आठवण आणि  आमच्या ज्ञानदीपची प्रगती यांचे दर्शन त्यात होईल अशी आशा आहे. 



मुलाखतकार सौ. मेधा सोवनी- नमस्कार मंडळी,  आज शुक्रवार आहे. आमि आज आपला सेकंड इनिंगचा दिवस, त्यामुळे मी मेधा आज तुम्हाला भेटायला पुन्हा एकदा आलेली आहे. मंडळी, मागच्या शुक्रवारी आपण सौ. शुभांगीताई रानडे यांची मुलाखत ऐकलेली होती. आणि त्यांच्या कविता ज्या आहेत त्या गेय असतात.  त्या इंटरनेटवर टाकण्यासाठी त्यांना सरांची खूप मदत होते आसं त्यानी सांगितलं होतं आणि आपण म्हटलं होतं की आपण पुढच्या आठवड्यात सरांना नक्की भेटू. त्याप्रमाणं आज आम्ही सरांना इथं बोलावलेलं आहे. आपण सरांविषयी थोडंसं बघूया. त्यांचं नाव डॉ. श्री. सुरेश विष्णु रानडे. १९६६ साली बीई झालं ते आणि १९७६ मध्ये आय.आय.टी. कानपूर येथून पर्यावरण शास्त्रामध्ये त्यांनी पीएचडी केली आहे तर असं हे विद्वान व्यक्तिमत्व त्यांचं आपण स्वागत करूया. नमस्कार सर,

डॉ. रानडे - नमस्कार

सौ. मेधा सोवनी - या कार्यक्रमात अगदी मनापासून स्वागत. आणि मागच्या कार्यक्रमात मॅडमनी सांगितलं होतं की सरांची त्यांना किती मदत होत असते आणि सहचारी म्हणून देखील त्यंना तुमच्याबद्दल वाटणारा अभिमान त्यांच्या शब्दांमधून मला जाणवत होता. म्हणजे आज तुमची भेट घ्यायची आमि तुमच्याकडूनच तुमच्या कामाबद्दल सगळी माहिती घ्यायची. तर तुम्ही पहिल्यांदा सांगलीमध्ये ज्ञानदीप इन्फोटेक अशी संस्था चालू केलेली होती. तर मला काय म्हणायचंय आपल्या सांगलीकरांना ब-याचजणांना ही गोष्ट माहिती आहे पण आपल्या ग्रीनएफएमचे लिसनर्स आहेत त्यापैकी ब-याच जणांना या कामाबद्दल तुमच्या खूप इंटरेस्ट असेल तर त्यांना हे सगळं कळावं यादृष्टीन आतापर्यंत तुम्ही कायकाय केलंत आमि यापुढे काय करायच. या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत तर पहिल्यांदा मला असं सांगा की तुम्ही ज्ञानगीप इन्फोटेकबद्दल सुरवात कशी केलीत व काय झालं त्याचं आणि सध्या तुमचे काय काम चालू आहे.

डॉ. रानडे -  सर्वप्रथम मी तुम्हाला धन्यवाद देऊ इच्छितो कारण मला आणि माझ्या पत्नीला ग्रीन FM वर बोलायची संधी दिली. यामध्ये विशेष म्हणजे ग्रीन हे नाव तुम्ही जे निवडलेलं आहे हे काळाला अतिशय योग्य असं नाव आहे. कारण पुढचं भविष्य हे सगळं ग्रीन आहे. मी बऱ्याच वेळेला ग्रीन बिल्डींगवरती महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी लेक्चर्स दिलेली होती. माझा पर्यावरण विषय असल्यामुळे मला पर्यावरण शास्त्रामध्ये अतिशय आवड आहे आणि माझा जो दुसरा आवडीचा छंद म्हणजे इंटरनेट आणि कॉम्प्युटर आहे. या विषयी आज मी बोलणार आहे.

मी १९६६ साली B.E झालो आणि लगेच वालचंद कॉलेजमध्ये प्रोफेसर म्हणून लागलो. याच कॉलेजमधून १९७० साली पर्यावरण शास्त्रामध्ये M.E.  केले आणि १९७३ ते १९७६ मला क्वालिटी इंम्प्रुव्हमेंट प्रोग्रॅम खाली आयआयटी कानपूरमध्ये पीएचडी करण्याची संधी मिळाली. आता जे पर्यावरण विज्ञान मुख्य तज्ञ आहेत डॉ. जी.डी.अग्रवाल त्यांच्या हाताखाली मी पीएचडी केली आणि जलशुध्दीकरणामध्ये मी काम केलं. त्यानंतर इथ आल्यावर आमचे डॉ.व्ही.सुबाराव म्हणून पर्यावरण शास्त्रामध्ये आहेत त्यांच्याबरोबर आम्ही ३०-४० वर्षे साखर उद्योग, टेक्स्टाईल उद्योग, शहर, सांडपाणी, पाणीपुरवठा यावरती असंख्य कन्सल्टेशनची कामं केली आणि हे काम ३०-४० वर्षे चालू होतं, अजूनही चालूचं आहे

पण त्याच बरोबर काय झालं की १९८० च्या सुमाराला जसं कॉम्प्युटरच युग आलं त्याबरोबर आमच्या कॉलेजमध्ये सुध्दा हालचाल सुरु झाली की आपण मोठा कॉम्प्युटर घ्यायला पाहिजे. मग त्यांनी असं ठरवल की बंगलोर मधील ऑम्नी म्हणुन कॉम्प्युटर घ्यायचा आणि त्यावेळी शिकणार कोण? कारण कॉम्प्युटर कुणालाच माहित नव्हता. यासाठी त्यांनी प्रत्येक डिपार्टमेंटचा एक प्रोपेसर असे पाच प्रोपेसर निवडले आणि आम्ही बंगलोरला सव्वा महिना ट्रेनिंकसाठी गेलो. आणि तो जो कॉम्प्युटर होता तो कपाट किंवा फ्रीजच्या डबल आकाराचा कॉम्प्युटर आम्ही आणला. त्यामध्ये बेसीक आणि कोबोल्ट या दोन लंगवेज होत्या. आणि त्यानंतर मला जे कॉम्प्युटरच वेड लागल त्यावेळेपासून मी कॉम्प्युटर बद्दलच वाचायला लागलो आणि मला पर्यावरण नको वाटल. कारण कस आहे की कॉम्प्युटरमध्ये दोन अधिक दोन चारच असतं. पर्यावरणात तस होत नाही त्यामध्ये अनेक राजकिय, सामाजिक हितसंबंध गुंतलेले असतात काम होत नाहीत. सल्ला दिला तरी ते झालेलं नसतं मग आपल्या मनाला उगीच त्रास होतो. मग याच्यापेक्षा हे कॉम्प्युटर क्षेत्र चांगल आहे असं मला वाटलं.

त्याच काळामध्ये कॉम्प्युटरच युग सुरु झालं सगळं जग त्यामुळे भारावून गेलं आणि वायटूके प्रॉब्लेम तुम्हाला माहिती असेल. त्यावेळी आपल्यातील हजारो मुले अमेरीकेला शिकायला गेलेली कारण तिथल्या ज्या कंपनी होत्या त्यांच्यापुढे मोठा प्रॉब्लेम आला होता वायटूके कारण पूर्वी जी कमी मेमरी लागायची त्यासाठी Year च फक्त Y Y एवढच वापरायच आणि त्यामुळे काय झालं २००० साली एकदम ० ० अस आल म्हणजे सगळं ती फेल होण्याची शक्यता आहे त्यांना कळलं मग त्यांनी भारतातील तज्ञ बोलावून घेतले होते. आणि तिथ एकदम कॉम्प्युटरच्या अनेक कंपन्या उभ्या राहिल्या म्हणजे २००० नंतर कॉम्प्युटरचा आपण बिग बबल झाला म्हणतो हजारो कंपन्या निर्माण झाल्या आणि नंतर त्या सगळ्या कोसळल्या ५-१० वर्षामध्ये. आणि त्याचवेळी मी माझी ज्ञानदीप इन्फोटेक ही कंपनी सुरु केली. अगोदर मी माझ्या मिसेसलाही कॉम्प्युटर शिकवलं. कारण ती संस्कृत या विषयामध्ये असल्यामुळे बेसीक कॉम्प्युटर सर्व शिकवल. आम्ही कॉलेजमध्ये ही कॉम्प्युटर शिकवत होतो. डिप्लोमा कोर्सेसना आणि मी सिव्हीलचा जरी असलो तरी तिथ जावून शिकवायचो. याठिकाणचे बरेच प्रोफेसर, डॉक्टर वगैरे माझ्याकडे शिकले.

विश्रामबागला सुयश कॉम्प्युटर म्हणून आम्ही सुरु केलं. हे सेंटर मिसेस चालवायची ते आम्ही १०-१२ वर्षे चालवली पण नंतर असा विचार केला की आपल्याला जागतीक मार्केटमध्ये जायच असेल तर काहीतरी मजबूत अशी कंपनी व्हायला पाहिजे म्ह्णून ज्ञानदीप इन्फोटेक प्रा.लि कंपनी मी २००० साली स्थापन केली. यामध्ये पहिला उद्देश असा होता की लोकांना इंटरनेट कळावं यासाठी नेट कॅफे सुरु केला आणि नेट कॅफे सुरु केल्यानंतर असं लक्षात आलं की आपण हॉटेलच्या मॅनेंजरसारख बसायच नुसत तास झाला की पैसे घ्यायचे. ती मुले काय बघतायत आपल्याला माहिती नाही. मग म्हंटल की आपण ते मुलांना शिकवूया. त्यानंतर मी अमेरीकेला मुलीकडे २-३ वेळेला गेलो आणि मग माझ्या लक्षात आलं की तिकडचे लोक कॉम्प्युटरचा जास्तीत जास्त उपयोग करमणूक व जाहिरात यासाठी करतात. त्यामुळे त्याठिकाणच्या मुलांवरती गेम्सचा खूप वाईट परिणाम होतो आहे. म्हणून त्या ठिकाणच्या सबंध लोकांच शिक्षण मागं पडलेल आहे. तर मनोरंजन हा इंडस्ट्री धरुन कॉम्प्युटरचा पहिला विकास झाला. आज सुध्दा व्हिडीओ गेम्सना प्रचंड डिमांड आहे. यासाठी २००७ साली मी पहिला ब्लॉग लिहिला टॉय मॅनिया म्हणुन की ज्यांनी ग्रासलेल आहे अमेरीकेला आणि उद्या ते जगाला ग्रासणार आहे.

 यावेळी मला अस वाटल की या मनोरंजनाच्या क्षेत्रापासून आपण कॉम्प्युटर दूर ठेवून शिक्षण क्षेत्राकडे घेवून जावे. कारण शिक्षणामध्ये याला प्रचंड महत्त्व आहे. आता आपली जी मोठी लोकसंख्या आहे ही जर आपल्या Asset बनवायची असेल तर या लोकसंख्येची बुध्दीमान लोकसंख्या आहे आणि त्यांना जर का हे कॉम्प्युटरच तंत्रज्ञान मिळालं तर ती सगळ्या जगावर राज्य करु शकतील. खरचं आपण नेतृत्व करु शकू कारण त्या ठिकाणची लोक तशी भाबडी आहेत. त्यांना शिक्षणाचं एवढ वेड नाही. आज त्या ठिकाणी जी प्रगती होत आहे ते आपले भारतीय लोक तिथ जाऊन करत आहेत. त्यांच्या मोठ्या कंपन्या आज आपण चालवतोय. आज तुम्हाला सांगताना वाईट वाटत की इन्फोसिस कंपन्या वगैरे आपण कौतुकाने बोलतो पण या कंपन्या फक्त माणसं पुरवण्यासाठी असतात. म्हणजेच B.E झालेली माणसं इथून घेतात आणि ती अमेरीकेला पाठवतात. त्या ज्या आंतराष्ट्रीय कंपन्या आहेत त्या इथून सगळा फायदा घेऊन जातात. पुर्वी जे ब्रिटीश अधिकारी होते ते इथून कापूस घेऊन जायचे आणि तिथून कापड तयार करुन आणावयाचे. तोच प्रकार आता इथे चालू आहे की, ते या ठिकाण ब्रेन वापरतात त्यांना पुष्कळ वेळेला कोड मंकीज म्हणतात. परंतु ते जे काय करताहेत यांनी जगावर राज्य करण्याच तंत्रज्ञान त्यांनी विकसित केलेल आहे आणि अमेरिका सारख्या प्रगत राष्ट्रांच्या ताब्यात दिलेल आहे.

 मग याच्यातून जर सुटका व्हायची असेल तर आपल्या मुलांना लहानपणापासून कॉम्प्युटरची ओळख व्हायला पाहिजे. म्हणजे कॉम्प्युटरची वेड न लागता त्याचा शिक्षणासाठी आपल्याला कसा उपयोग करता येईल हे बघायला पाहिजे. दुर्दैवानं कसं केलं आमची एवढी शक्ती नव्हती त्यामुळे या कंपन्या आल्या त्यांनी व्हीडीओ गेम्स केले आणि आत्ता मुलं फेसबुक आणि आरकुट वर बसलेली दिसतात. आणि २० वर्षाच्या मुलाला १०,००,००० पगार दिला की लोकांना वाटत की याच्यात पाहिजे तेवढा पैसा मिळतो. हे सर्व जाहिरातीचे टेक्निकच आहे. इथही तसच झालेल आहे त्यामुळे ज्ञानदीप इन्फोटेक आम्ही सुरु केली त्यामध्ये पहिल्यांदा मराठीतून वेबसाईट्स करायला सुरुवात केली.

मातृभाषेतून शिक्षण हे महत्वाच आहे. मी मराठी विज्ञान परिषदेचाही कार्यकर्ता आहे आणि हे जे शिक्षण आहे किंवा कोणतही शिक्षण हे मातृभाषेतूनच चांगल होतं. त्यामुळे कॉम्प्युटरवर मराठी आणण्याचा उद्योग आम्ही सुरु केला. त्यावेळी बेसीक होतं त्यावेळी  डॉट डॉट कारुन आम्ही अक्षरं काढली. संस्कृतकरीता आम्ही श्रीलिपीचा फॉंट वापरला. एक होतं की सॉर्टिंग करता येत नव्हत अल्फा बेटीकल प्रमाण कारण त्याला आम्ही कोड केल की, ‘अ’ म्हणजे काय ‘क’ म्हणजे काय कारण ते आपल्या पद्धतीन पाहिजे ना. काय त्यांच A,B,C,D आपल्याला नको आहे आपल्याला क ख ग घ पाहिजे. अस आम्ही ३-४ वर्षे संस्कृतमध्ये काम केल तीनही भरपूर साथ दिली आणि आम्ही ती साईट पूर्ण केली. त्याचबरोबर मराठीतून आम्ही माय मराठी. कॉम म्हणुन मराठीतून साईट केली अन् सबंध जगातल्या महाराष्ट्र मंडळाची माहिती त्यामध्ये दिली. संस्कृती, साहित्य अशी सर्व माहिती तुम्हाला माय मराठीवरती बघायला मिळेल. कोट्यावधी लोक ही साईट अजून बघताहेत. खाण्याच्या पदार्थापासून सर्व गोष्टी यामध्ये आहेत. तसच शहरासाठी म्हणून माय सांगली. कॉम ही साईट काढली. नंतर माय कोल्हापूर काढली.

आणि मग मला अस वाटल की भरभर सगळीकडे सेंटर सुरु होतील पण माझ्या असं लक्षात आलं की ज्या ज्या ठिकाणी मी सेंटर्स सुरु केली म्हणजे मुंबई, बेंगलोर त्याठिकाणच्या ज्या लोकच कॉम्प्युटर नौकी होती. ते म्हणजे उद्योजक होती मोठी होती पण त्यांना कॉम्प्युटरच ज्ञान नव्हतं त्यामुळे त्या संस्था पुढे चालल्या नाहीत. मग मी ठरवलं की इथ आपण स्थिर होऊ आणि इथून रिमोटली सर्व फिरवू. मग २००५ साली मी ज्ञानदीप एज्युकेशन आणि रिसर्च फौंडेशनची स्थापना केली. खर म्हणजे इन्फोटेकबद्दलची माझी हीच संल्पना होती की, सामाजिक शिक्षण किंवा पर्यावरणाबद्दलची जागृती करायची फक्त काय आहे प्रायवेट लिमीटेड कंपनी म्हंटल्यावर लोकांचा त्याच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन फायदे मिळवणारी संस्था असा होतो. त्यामुळे २००५ ला मी फौंडेशनची स्थापना केली. फौंडेशनचा मुळ उद्देश हाच आहे की सर्व लोकांना व जनसामान्यांना वेबसाईट आणि इंटरनेटबद्दलची माहिती देणे आणि ही माहिती मराठीतून देणे. यामधून शिक्षण देऊन त्यांना कॉम्प्युटरच्या धोके आणि फायद्याची जाणीव करुन देणे. इंटरनेटवर फसवणुक वगैरे असे बरेच प्रकार घडतात, गुन्हे होऊ शकतात पण त्याचबरोबर चांगलेही फायदे होऊ शकतात. त्यामुळ कॉम्प्युटर उगीचच्या उगीच बदनाम झाला. इंटरनेट किंवा फेसबुक म्हंटल की बदनाम झाला. याच्या ऐवजी कॉम्प्युटरचा उपयोग शिक्षणासाठी केला तर प्रचंड त्याला पोटेंशीयल आहे. आणखी माझ्या मनामध्ये अशी एक कल्पना आली की, भारतामधील महिला या ५०% पोटेंशीयल अन्- टॅपड् आहे. महिला हुशार असतात पण मुल व इतर संसार बघून त्यांना नोकरीसाठी बाहेर पडता येत नाही. नोकरी करणाऱ्या बऱ्याच महिला आहेत पण काही महिलांचा वेळ कादंबऱ्या, मासिक, वृत्तपत्र वाचण्यात जातो. याच्या ऐवजी त्यांना जर आपण वेब डिझायनिंगच ट्रेनिंग दिलं, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटच ट्रेनिंग दिलं तर त्याच्यातून एक मोठी Asset निर्माण होईल.

ती अलिबाबाची गुहा आहे जवळजवळ हे आपल्या लक्षात आलं नाही ही आपल्या हातात आहे फक्त ती आपल्याला उघडून बघायची आहे. त्या दृष्टीन मी ती कल्पना मांडली. आणि शाळेमध्ये ज्ञानदीप मंडळ सुरु करायच असं ठरवलं. शाळेमध्ये शिक्षक जे शिकवतात ते फक्त पुस्तकावरुन शिकवतात. पुस्तकातील ज्ञान हे जुन असतं, मासिकातील त्यातल्या त्यात नवीन असत आणि इंटरनेटवर त्याच्याहीपेक्षा रोज नविन ज्ञान असतं. आज जर दोन मिनीटांपुर्वी काय झाल हे आपल्याला पहायच असेल तर आपण इंटरनेटवरती पाहू शकतो. हे ज्ञान जर तुम्ही लोकांना दिल नाही तर तुमची मुल पुर्वीच्या पठडीतल काहीतरी टेक्निक वापरत बसतील. आणि डिग्री झालेली मुल ही नुसती शिक्का मारलेली मुल होणार. आज आपल्याला मार्केटींगच्या दृष्टीन म्हणा किंवा इतर कोणत्याही दृष्टीन याहु व गुगल यांनी प्रचंड प्रमाणात ज्ञान मुफ्त दिलेलं आहे. तुम्ही सॅटेलाईटद्वारे न्यूज बघू शकता. अमेरिकेच्या रस्त्यावरती काय चाललेल आहे ते तुम्हाला समजू शकतं. ही सर्व माहिती तुम्हाला फ्री मध्ये मिळते. सांगलीचा नकाशा गुगलवरुन पाहिल्यानंतर मला पुर्ण कळतो. आणि त्या नकाशावर मी माझी माहिती भरु शकतो. आणि हे फ्री आहे पण मुलांना हे माहित नाही. मी अनेक ठिकाणी लेक्चरस् दिली, अनेक चांगल्या चांगल्या अमेरिकेच्या, सायन्सच्या व्हिडीओ यु टुब वरती दाखवल्या. मग मी हे व्हिडीओ काढून दाखवल्यानंतर शिक्षक चकित झाले. पण ते म्हणाले, आमच्याकडे नेट नाही मग मी सांगीतल नेटवरुन डाऊनलोड करुन घेतो आणि तुमच्या कॉम्प्युटरवर घालून देतो.

कस आहे हल्ली शिक्षण हे व्यवसायाच साधन झाला आहे. त्यामुळ प्रचंड फी घेवून मोठ्या बिल्डींगा बांधून पैसे उकळायचे असा उद्योग चालू झाला आहे. त्यामुळ या इंग्लीश मिडियम स्कूलसारख्या मोठ्या डिजीटल शाळांकड माझा दृष्टीकोन नाही. तर जिल्हा परिषदेच्या ज्या शाळा आहेत या शाळांमध्ये कॉम्प्युटर आहेत पण वापरता येत नाही. अशा ठिकाणच्या शिक्षकांना आपण शिकवू शकतो आणि त्यांना ट्रेन कस करता येईल? यासाठी मी सुरु केलं. आता माझ्याकडे फौंडेशनला जी मुल काम करतात ती सर्वजन डेग्री न झालेली आहेत. कोणी बारावी झालेल आहे, कोणी मधूनच शाळा सोडुन आलेल आहे. पण ती अतिशय उत्तम प्रोग्रॅमींग व वेब डिझाइन केलेल्या आहेत व करताहेत. काही दिवसापुर्वी लुल्ला चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेची प्रचंड मोठी अशी साईट आमच्यातील दोनच मुलांनी केली. आणि ती मुल ग्रॅज्युटपण नाहीत. पण मी त्यांना शिकवू शकतो त्यांच्यामध्ये आता एक प्रकारची ताकत आलेली आहे. ती अशी तयार आहेत की कुटेही गेली तर वेब डिझाईन करु शकतील व १०००० रु मिळवू शकतील. मी त्यांना नेहमी सांगतो की तु बाहेर जा स्वत:चा बिझनेस सुरु कर.

मी नंतर काय केल की २००७ पासून मी ब्लॉग लिहायला लागलो आता माझे जवळजवळ ३०० ब्लॉग लिहून झालेले आहेत. सगळ्या विषयावर लिहतो मी दारुच्या व्यसनापासून ते राजकारणापर्य्ंत. यामध्ये मला अस वाटल की लोकांना वेबडिझाईन विषय किंवा कॉम्प्युटर विषय अवघड वाटतो. मराठीतून जवळजवळ ६० ते ७० ब्लॉग लिहले. त्यामध्ये वेबसाईट कशी करायची, डिझाईन कशी करायची हे सर्व लिहले. तरीही लोक वाचत नाहीत, फुकट असूनसुध्दा वाचत नाहीत. म्हणुन मी अस ठरवल की पैसे घेऊन ऑनलाईन कोर्स सुरु करायचा. नंतर मी काय केल की संस्कृत, माय मराठी या साईटबरोबर विज्ञान. नेट ही साईट सुरु केली. कारण विज्ञानच ६०० पानांच इंग्रजी पुस्तक मी मराठीतून भाषांतर केलं. आणि आता मग अस झाल की संस्कृत, माय मराठी, विज्ञान बरोबर स्कूल4ऑल.ओआरजी ही साईट सुरु केली. यामध्ये शालेय स्तरावरचे मराठी, गणित, इंग्रजी, चित्रकला, संस्कृत, संगीत, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र असे सर्व विषय घेतले एवढच नव्हे तर कन्नड सुद्धा घेतलेलं आहे. कारण मिरजच्या जवळ कर्नाटक भाग येतो. आपण भांडत बसतो कन्नड आणि मराठी पण त्या मुलांना कन्नड शिकायला मिळेल. मला कन्नड भाषा येत नाही तरीही कन्नडच पुस्तक मी आणून त्याच्यातील पेजस स्कॅन करुन साईटवरती घातली. मी म्हंटल की ज्याला कन्नड शिकायच असेल तो ही पुस्तके वाचून शिकेल. आणि म्हणूनच माझा विचार असा आहे की याच्या पुढच्या काळामध्ये हे सर्व रिमोटली घरी बसून शिक्षण देणार आहे.

कारण माझ वय आत्ता ७० व मिसेसचे ६५ आहे तर पुढच्या काळात आम्हाला बाहेर फिरता येणार नाही. आणि शक्यतो मराठी मधून देणार आहे. कारण गुगल टॉक सारख्या सुविधा असल्यामुळे मी कोणाशीही घरी बसून बोलू शकतो. आज पुण्यातली लोक अमेरीकेतल्या लोकांच्या शिकवण्या घेताहेत. तिकड इंग्रजी शिकवायला पुण्यातील लोक प्रचंड पैसा मिळवत आहेत. आणि आमच्या इन्फोटेक मध्ये फ्लॅश, फ्लेक्स मध्ये भरपूर काम सुरु आहेत व डेव्हलपमेंटही सुरु आहे. आता डॉ. किल्लेदारांच्यासाठी नविन अपॉंटमेंटच सॉफ्टवेअर तयार केलेल आहे कारण कस होत की लोक खूप लांबून येतात आणि त्यांना अपॉंटमेंट तर प्रॉब्लेम येतो. या सॉफ्टवेअर मध्ये १०० रु भरुन तुम्ही डॉक्टरांच टाईम बुक करु शकता. आणि या सॉफ्टवेअर आपल्याला डॉक्टर कधी भेटणार आहेत ते लगेच समजते व त्यांना पुढच्या महिन्यापर्यंतच्या अपॉंटमेंटच ठेवता येतात. आणि हे अपॉंटमेंट सिस्टीम आता आम्ही सर्व हॉस्पीटल्स मध्ये देणार आहे. आज कॉमप्युटरच्या किंमतीही कमी झालेल्या आहेत व ब्रॉडबॅंडच्याही किंमती कमी झालेल्या आहेत महिलांना शिकून त्या तासाला १० डॉलर मिळवू शकतात. आमच्याकडे मुल मिळवत आहेत. आज ४०,६० हजार पगार मी स्वत: मुलांना देतोय. ६० हजार पगारावर समाधान न मानता ते मुंबईमध्ये किंवा पुण्यामध्ये जाऊन १,५०,००० रु पगार घेत आहेत.

एकदा प्रा. माधूरी बापट अमेरिकेतून आलेल्या होत्या त्यांना कोणी विचारलं की तुमची भारतीय मुलं इतकी हुशार कशी आहेत तेव्हा त्या म्हणाल्या, मुले  संस्कृत भाषा शिकतात. तेथल्या स्त्रिया रांगोळी काढतात. त्यामध्ये पेशंस असतो आणि पेशंस व लॉजिक असल्यावर ही मुल नक्की बाहेर जातात. परदेशामध्ये गेली तरी ही मुलं मजा करत नाहीत तर रविवारी सुध्दा अभ्यास करतात. आणि तिकडली मुलं रविवारची हिंडायला जातात.
--- to be continued

Tuesday, April 2, 2019

कै. सौ. शुभांगी रानडे - रेडिओ मुलाखत २० जुलै २०१२

संस्कृतदीपिका या वेबसाईटच्या निर्मात्या आणि तीन काव्यसंग्रह प्रसिद्ध करणा-या सांगलीतील ज्ञानदीप इन्फोटेकच्या  माजी संचालिका सौ. शुभांगी रानडे यांचे वयाच्या ६९ व्या वर्षी दिनांक २२ ऑगस्ट २०१६ रोजी दुखद निधन झाले.

ग्रीन एफ एम ९०.४ या सांगलीतील कम्युनिटी रेडिओ चॅनेलवर दिनांक २० जुलै २०१२ रोजी सौ. शुभांगी रानडे यांची एक मुलाखत प्रसिद्ध झाली होती. त्यांच्या कार्याची ओळख   व्हावी या हेतूने या मुलाखतीचा वृत्तांत आहे त्याच बोली भाषेत सादर करण्याचा प्रयत्न केला आहे. ( आपल्या सूचना व अभिप्रायांचे स्वागत आहे.)




मुलाखतकार सौ. मेधा सोवनी -
आज आपल्याकडे शुभांगी रानडे या आलेल्या आहेत. निवृत्त शिक्षिका आहेत त्या आणि
त्यांच्याकडून आपल्याला ब-याच नवीन नवीन  गोष्टी ऐकायला मिळणार आहेत. त्या संस्कृतच्या टीचर होत्या एम. ए. बी. एड झालेल्या आहेत त्या आणि आजही सतत त्या कामात व्यस्त असतात. निरनिराळं लिखाण त्यांच सतत चाललेलं असतं आणि ते सगळं कशा पद्धतीनं चाललेलं असतं ते मी नाही तुम्हाला सांगत तर त्यासाठी आपण त्यांनाच विचारुया. कारण त्यांच्या कामाचा जो ढंग आहे तो खूप वेगळा आहे. म्हणजे सर्वसामान्य माणसं विचार पण करू शकणार नाहीत, असं काहीतरी गंमतशीर, त्यांचं चाललेलं असतं. हे त्यांना आपल्याला सांगायचंय. त्यासाठी आपण त्यांना इथं बोलावलंय, तर

‘नमस्कार शुभांगीताई, संस्कृत भाषा घेऊन तुम्ही एमए झालात. बीएड आहात तुम्ही. शिक्षिका म्हणून तुम्ही काम केलेलं आहे आणि एक उत्तम कवयित्रीपण आहात तुम्ही. तर आज तो उहापोह आपण या कार्यक्रमात करुया.

तर सुरवातीला थोडंसं तुमचं पूर्वाश्रमीचं जे आयुष्य होतं, ते आम्हाला आता सांगा आणि नंतर तुमच्या कविता व इतर सारे उद्योग आहेत, त्याविषयी बोलूया.

सौ. शुभांगी रानडे - माझं माहेर पुण्याचं ते म्हणजे प्युअर सदासिव पेठी समजा तर. त्याच्यामुळे सहज बोलण्या चालण्यात सुध्दा लोकं म्हणायची, तुम्ही पुण्याच्या काहो कसं काय ओळखलं मी काही लिहिलं नाही कपाळावर, नाही तुमच्या बोलण्यावरून दिसतं म्हणजे यातनं मला फार गंमत वाटली की हे लोकांना कसं कळतं.

सौ. मेधा सोवनी - ही एक भाषेची  छाप आहे. ते आपोआपच कळते.

सौ. शुभांगी रानडे - तर मी जाणून-बिणून काही असे शब्द बोलत नाही. पण ती एक सवयच पडून गेली असायची. संस्कृतची आवड होती पहिल्यापासूनची. शिकता शिकता असं वाटलं की आपण इतर विषय घेण्याऐवजी संस्कृत विषय घेतला तर आवडेल आपल्याला. बी.ए. होस्तवर धरातली परिस्थितीही थोडी अवघड होती. आई नोकरी करत होती. ताराचंद हॉस्पिटलमध्ये नर्स होती आई. त्यामुळं घर सांभाळून, मी सगळ्यात धाकटी, बाकीच्यांची लग्नं झालेली. मोठा भाऊ शिकत होता, मेडिकलला होता. दोन भावांची मुलं आमच्याकडं होती. त्यांना, सगळ्या भाच्यांना सांभाळून मग जमेल तेवढं शिक्षण. त्यामुळे आई म्हणाली, `बाई सकाळचं कॉलेज करणार असशील तर ठीक. तुला काही सायन्सला घालणं मला काही जमणार नाही.` असं करत करत, संस्कृत बीए झाल्यावर असं वाटलं, मला एमए करणं झेपेल का पण पुन्हा वाटलं कशाला काळजी करतीस म्हणतात ना `गाजराची पुंगी. वाजली तर वाजली नाही तर मोडून टाकू` ट्राय तर करू. नशिबानं मिळाला प्रवेश. मग दोन वर्ष कशी गेली कळली नाहीत. एमए झाले. लगेच बीएड पुढच्या वर्षी. म्हणजे शिक्षणाचा ओघ हा सतत झाला.

बीएड होता होता लग्नाची वेळ आली आणि पुणे सोडून सांगलीला यायची वेळ आली आणि येईस्तो लगेच नोकरी तयार होती सिटी हायस्कूलला सर्व्हीसची. ते म्हणाले  करणार का माधवनगरला जाणार का मी म्हटलं सासरी विचारलं पाहिजे, मी पहिल्यांदा सांगलीला आलीय.  मला. काहीच माहिती नाही माधवनगरची. पण झालं एकंदरीत नशिबानं व्यवस्थित आणि मिळालं हवंतसं. मुलगी झाली मला. मग मिस्टरांसाठी पीएचडीला गेलो कानपूरला.  ते पीएचडीला. त्यावेळी मी माझी नोकरी सोडली. मी विचार केला की आपण  नोकरी करीत बसायचं आणि त्यांच्यासाठी काय करणार. नोकरी काय परत मिळेल. हे दिवस नाही परत येणार. मग तीन वर्षांसाठी नोकरी सोडून गेले होते मी तिकडे, परत आल्यावर लहान मुलगा झाला नंतर, आता मुलं निवांत आहेत. दोघेही अमेरिकेत आहेत. लग्नकार्ये करून. मग आम्ही रिकामेच दोघेजण. आता काय करणार

आणि मग माझ्या लक्षात आलं की  आई  शिकली नाही तरी ती जाताना तिचा वरदहस्त ठेऊन गेली बहुतेक. आणि ती गेल्यावर इतक्या मला पटापटा कविता सुचायला लागल्या की दिवसाला एक कविता पडायला लागली. मी कधीच केल्या नव्हत्या आधी. पण हे मला कसं सुचायला लागलं हे लक्षात नाही आलं. पण मधला काळ सगळा संसाराचा गेला. मुलंबाळं, त्यांची लग्नं कार्य. नंतर मात्र कविता इतक्या वेगात झाल्या की `काव्यदीप` नावाचं पुस्तक मी काढलं. त्यात १०० कविता होत्या. दुसरं पुस्तक काढलं `सांगावा` म्हणून त्यात साधारणपणे ६०-६५ झाल्या. आता तिस-या पुस्तकाची योजना आहे `सय` म्हणून. त्यात माझ्या ३५-४० कविता झाल्या आहेत. पुन्हा वाटतं करून टाकावं रिकामं.

सौ. मेधा सोवनी - शुभांगीताई, आत्ता तुम्ही दोन तीन पुस्तकांची नावं सांगितलीत. मी आता त्याच्याकडेच येणार होते की ही जी पुस्तकं आहेत. तुम्ही साधारण २००० नंतर ही पुस्तके काढलीत. तेव्हा मला असं वाटलं की तुम्ही खूप पूर्वीपासून कविता लिहिताय का आमि मी विचारणार होते की तुमचे पहिलं काव्य कधी जन्माला आलं वगैरे. तर तुम्ही काही वेगळंच सांगितलत की आई गेल्यानंतरचं.

सौ. शुभांगी रानडे - आई एकोणनव्वदला गेली आई गेल्यावरच मी पहिली कविता तिच्यासाठीची म्हणून केली.

सौ. मेधा सोवनी - कुठली कविता संगाल का.

सौ. शुभांगी रानडे - हो हो आहे की काहीच प्रश्न नाही.  तिच्यावरची कविता म्हणजे मला असं काही वाटलं नाही की आपल्याला कविता करता येतात का की आजपर्यंत आपम केस्या पम मला राहवेच ना की आपल्या हातनं हे जालंच पाहिजे आमि ते सुद्दा कधी तर वर्ष झाल्यावर. वर्षश्राद्धाच्या वेळी मी करून नेली आणि मग मला इतकं भरुन आलं की वा आपल्याला येताय मग रोजच यायला लागल्या. एखादं काव्य म्हणून दाखविते
   
     वर्ष कसे हे सरून गेले
    कळले मजला नाही
    परि माऊली माया अमुचि
    तिळभर आटली नाही ---- १

    कितीक झाले त्यागी विरागी
    गणती त्यांची नाही
    परि मला वाटते त्यागाला तव
    जगती उपमा नाही ---- २


वर्षश्राद्धाच्या वेळी अशाच पद्धतीची ५-७ कडवी लिहिली आहेत. त्यातले शेवटचे छोटंसं कडवे मला फील होणारे, म्हणून वाचून दाखविते.

    कृष्णतुलेसम उणीव तुझी ही
    सदैव भासत राही
    तुला वाहतो स्मृतिसुमने ही
    विनम्रभावे आम्ही ---- ७

आणि आता लक्षात येतं की आईच्यावर कितीही बोललं किंवा लिहिलं तरी कमीच पडते ते.

सौ. मेधा सोवनी -  अगदी

सौ. शुभांगी रानडे - हा विषयच तसा आहे.

सौ. मेधा सोवनी - खूप गहन आहे तो.

सौ. शुभांगी रानडे -असं होऊ शकत नाही की आईची ऊब तुझ्याबाबतीत वेगळी आणि माझ्याबाबतीत वेगळी. शेवटी आई ती आई, जरी परदेशी असो वगैरे, गोरगरीब असो श्रीमंत असो आई ती आईच. कष्ट घेण्याची

सौ. मेधा सोवनी - बरोबर आहे. म्हणजे, मला एक प्रश्न तुम्हाला विचारावासा वाटतो की इतकी तीव्र भावना आतून निर्माण झाल्यावर तुम्हाला हे शब्द सुचले पहिल्यांदा व नंतर तुम्ही हे काव्य लिहिलंत आणि ते आईला अर्पण केलंत तर असं कधी होतं का की काव्य आधी सुचले आणि मग त्याला चाल लावलीत तुम्ही की आधी चाल सुचते व मग शब्द येतात.

सौ. शुभांगी रानडे - तीच गंमत आहे की मला आधी चाल सुचते मग त्यात काव्य बसते. मग त्यात शब्द बसतात. आधी सुचतच नाही मला काई. मनात असतं कविता करायचीय. आणि एकदा का चाल सुचली की टेबलावर पाटीपेन्सिल ठेवलेली असते. मग त्यात दोन शब्द, दोन शब्द, दोन शब्द लिहीत जाऊन मग ते कम्प्लीट होतं. फायनली मग शेवटचा पीस लिहिला जातो पण ते आधी चाल बसल्याशिवाय येतच नाही मला ते तिहायला. 
मग या पद्धतीच्या माझ्या देवाच्या कविता झाल्यात, आप्तेष्टांच्यावरच्या कविता झाल्यात, निसर्गाबद्दलच्या कविता झाल्यात, कवितेबद्दलच्या कविता आहेत. परवा सहज सांगायची गंमत म्हणजे एकदा अचानक फोन आला. किती आठ दहा दिवसांपूर्वी. मला तुमच्या कविता फार आवडल्या हो.  मी म्हटलं थॅंक्यू. नाही तुम्ही चाली फार सुंदर म्हणल्यात. तुम्हाला कसं कळलं गुगलवर सर्च केलं तेव्हा तुमच्या कविता मिळाल्या. गंमत अशी की माझ्या पुस्तकातल्या सगळ्या कविता गेय आहेच आणि गुगलवर टाकलेल्या आहेत. आवाजासह.

सौ. मेधा सोवनी - छानच आहे. म्हणजे मगाशी मी म्हटलं ना की यांचे वेगवेगळे उद्योग कशाप्रकारे चालू आहेत.हे नॉर्मल माणसाच्या डोक्यात पण येत नाही. आता एखाद्या कवयित्रिला वा कवीला काय वाटेल की आपण कविता लिहावी. त्याचं. पुस्तक प्रकाशित करावं. पण असं किती जणांनी केलंय की आपल्याच कविता या गायच्या आणि ते गायलेलं सगळं गुगलवर टाकायचं. सांगा बरं असं किती जणांनी केलंय. मग ह्यात त्यांनी जे केलंय ऐकूया त्यांच्याकडे मग.

सौ. शुभांगी रानडे -
म्हणजे जगभरात ते कुणालाही ऐकायला मिळते ते.  रेकार्डिंग माझं मी केलं हं घरी. आमच्याकडे सौंडप्रुफ वगैरे काही नाही. बोलल्यासरखे. मी स्वत माईक घेऊन बसते. रेकॉर्डिंग करते. मध्येच एखादवेळी बेल वाजते. एखाद काही होतं. मधे कट होतं पण मी अशा पद्धतीनं सगळं रेकॉर्डिंग केलेले आहे. सगळ्या कविता रेकॉर्ड केल्या आहेत. अर्थात या सर्वात मदत मला माझ्या मिस्टरांची  झाली यात वादच नाही. म्हणजे खारीसारखं काम माझं, कविता लिहिण्याचं आणि म्हणण्याचं, बाकी मेन्ली काम त्यांचं.

    ⁃    पलिकडचा आवाज आला `मला तुमची मुरली कविता इतकी आवडली की आमच्याकडं आता लक्षार्चन आहे त्यावेळी मी तुमची कविता चालीवर म्हणणार आहे. मी म्हटलं `थॅंक्यू थॅंक्यू , पण आता आपण कोण बोलताय ते सांगाल का प्लीज. ती म्हणली मी `मीनल गद्रे बोलतीय.`
    ⁃    ` हो का पण मी नाही हो ओळखलं तुम्हाला.`
    ⁃    ` अहो कसं ओळखाल मी अमेरिकेतून बोलतीय आणि  मी अक्षरशहा हवेतच उडाले की आत्ता अमेरिकेतून फोन करणारी ही बाई कोण एवढी. जिचा `स्टार माझा` वरती ब्लॉग्जमध्ये पहिला क्रमांक आलेला आहे अशा मुलीनं मला फोन करावा. हे म्हणजे फार कौतुकच वाटलं. तुम्ही छानच काव्य करता. मी म्हटलं `सांगू का, हे माझ नाहीये ही देवाची कृपा आणि आईचे आशीर्वाद आहेत.`
    ⁃   
    ⁃    कविता आहे मुरली म्हणून कृष्णाची. म्हणजे घरात कॅलेंडर होतं. कृष्ण मुरली वाजवतोय पण इतकी मोहक त्याची छबी होती की मला त्याच्याकडं बघूनच मला ती कविता सुचली.
    ⁃   
सौ. मेधा सोवनी - शुभांगीताई, ती कविता होऊन जाउदे की.

सौ. शुभांगी रानडे -
    कृष्णा वाजव रे मुरली
    मुरलीने भूक नुरली
    कृष्णा वाजव रे मुरली ---- ।।ध्रु।।

    गोपी निघाल्या लवकरी
    जाण्या मथुरेच्या बाजारी
    करण्या गोरस विक्री
    कृष्णा वाजव रे मुरली ---- १

    पेंद्याचंद्या रे बल्लारी
    गाई घेऊनि जा नदीतीरी
    परतुनि या लवकरी
    कृष्णा वाजव रे मुरली ---- २

    गोपी अणिती तक्रारी
    काय कमी रे तुज घरी
    न करी गोरस चोरी
    कृष्णा वाजव रे मुरली ---- ३

    उघडी वदना मुरारी
    दूर सारी रे बासरी
    नवनीत ना अंतरी
    कृष्णा वाजव रे मुरली ---- ४

    विश्वरूपाच्या दर्शनी
    झाली यशोदा बावरी
    हृदयी त्या कवटाळी
    नक्को वाजवु रे मुरली ---- ५


सौ. मेधा सोवनी - वा शुभांगीताई, तुमच्या अशा अनेक कविता असतील तर ह्या ज्या कविता तुम्ही केल्या तर असं कधी झालंय का की खरच आज धन्य झाले मी कविता करतेय म्हणून हे काम माझ्या हातनं हे झालं. असं कधी झालय तुमच्याबाबतीत.

सौ. शुभांगी रानडे -  हो. मला वाटतंय असं की कविता करायची म्हणून करते असं माझ्या हातनं होत नाही. तर इतकं दूध उतु गेल्यासारखं मन भरून येतं की ते उतरवलच पाहिजे कुणाच्या पाटीवर. ते दोन शब्द झालेच पाहिजेत. मग इतरांना काहीही वाटू दे माझे तिकडं लक्ष नसतं. मला तसं केल्याशिवाय चैनच पडत नाही आणि याचा मला एक फायदा झालेला आहे की एक कविता मी केली नव्हती, पण प्रसंग असा आला होता की आमच्या नात्यात एकाच्या ठिकाणी घटस्फोटाची वेळ आली होती.

मी म्हटलं, की मी उद्याच येते, दोन शब्द बोलू आपण. मी एक कविता लिहिलीय. मी वाचून दाखविते, मग तुला पटेल तसं कर. ठीक आहे. मग मी गेले त्याठिकाणी. ` तुला नाही ना रहायचं, काही हरकत नाही, तू वेगळी रहा, नवरा वेगळा राहूदे, मुलगी आहे पाच वर्षांची, ती जाऊदे की वा-यावर, काही का त्यांच होईना, तू वेगळी रहा. पण एक पाच मिनिट मला दे माझी कविता ऐक. कारण, इतकं माझ मन भरून आलं होत की माणसाच्या संसारात काही ना काही कमी जास्ती गोष्टी असणारच. आपल्या हाताची पाची बोटं सारखी असतात का गृहीत धरा माझी काय अवस्था आणि नंतर लिहिली ती कविता तिला वाचून दाखवली नि म्हटलं `सांगू का तुला मला काय म्हणायच ते मी शब्दरूप केलंय.`

सुवर्णपट


संसाराचा सुवर्णपट हा कधी न द्यावा उधळोनी
दान कसेही पडले तरीही घ्यावे सकला समजोनी ---- १

पेला अर्धा रिकामा ही खंत करावी कधी न मनी
पेला अर्धा भरलेला हे सूखचि राही भरुनी मनी ---- २

झाले गेले विसरुनी जावे पुढील पाना उलटोनी
नशीबवान हो खरेच आपण नरजन्मा आलो म्हणुनी ---- ३

टाकीचे ते घाव सोशिता देवत्वचि ये दगडाला
सजीव आपण त्यातुन माणुस उणे कुठे मग पुण्ण्याला ---- ४

अर्धनारी त्या नटेश्वरापरि संसारचि तो असे खरा
थोडे इतरा समजुनि घेता रोजचि येई तो दसरा ---- ५

रोजचि दसरा घरात असता आनंदा नाही तोटा
दुसर्‍यासाठी झिजता झिजता चंदनगंधही ये मोठा ---- ६

सदा करावा विचार अपुल्या पुढील पिढीचा तोच भला
हेवेदावे पार पुसोनी मदत करू त्या तरायला ---- ७

आकाशीच्या देवाघरची फुलेच असती अपुली मुले
सुंदर सोज्वळ संस्कारांनी सजवू तयांचे मधुर झुले ---- ८

सुजाण आपण आहात सारे ठाऊक आहे जरि मजला
दोन शब्द हे सांगितल्याविण राहवते ना परि मजला ---- ९


आणि गंमत अशी की ही कविता ऐकताक्षणी ती म्हटली मी येते हं आज संध्याकाळपासून. घरीच रहायला येते

सौ. मेधा सोवनी - 
संसार मोडता मोडता वाचला. तीन आयुष्य डायरेक्टली वाचवलीत. तर तुमच्यासाठी एक मस्त गाणं ( प्लेसहोल्डर ध्वनीफीत नाही)

सौ. शुभांगी रानडे - थॅंक्यू  व्हेरी मच.

सौ. मेधा सोवनी - तर मंडळी, आपण सौ.शुभांगी रानडे यांच्या काही कविता आत्ताच ऐकल्यात. तर किती शब्दामध्ये ताकद असू शकते. दोन जिवांचा मोडणारा संसार आज त्यांच्या त्या कवितेतील शब्दांमुळे तो वाचला. तर ९०.४ एफएमवर आज तुम्ही हा कार्यक्रम ऐकताय. तर शुभांगीताई, कवितासंग्रह दोन तुम्ही प्रकाशित केलेत तर पुढचा मानस काय आहे तुमचा.

सौ. शुभांगी रानडे - पुढचा मानस म्हणजे एक तिसरा संग्रह प्रसिद्ध करण्याचा बेत आहे. म्हणजे मला अस जाणवतं की कदाचित कवितांची संख्या कमी असेल, पहिल्या पुस्तकात १०० होत्या. दुस-यात ६०-६५. त्यात कविता कमी आहेत पण मला अस जाणवतं की  कवितांची उंची वाढलेली आहे हे माझं मला कळून आलं.

सौ. मेधा सोवनी - म्हणजे जसं आपण लिहीत जातो तसतसं नीटसपणा येत जातो.

सौ. शुभांगी रानडे - आणखी प्रतिभा  येत जाते. म्हणजे माझी तरी अशी समजूत आहे.

सौ. मेधा सोवनी -आणखी एक विचारावसं वाटतं की तुम्ही शाळेमधे असताना तुम्ही कॉंप्युटर शिकवत होतात तर त्या दृष्टीनं काही वेगळा प्रयोग केलेला होतात तो जरा सांगा की.

सौ. शुभांगी रानडे -  म्हणजे गंमत अशी माझी झाली की मुलगी दहावीत असताना पहिल्यांदा कॉंप्युटर आलेले होते. मी या डिसिप्लीनमध्ये नव्हते पण आमच्या  घरातनं मला असं काही सांगितलं की नाही बाई, तुला संस्कृत  येतय पण कॉंप्युटर शिकला पाहिजे. मग मी शिकले आणि पहिला प्रयोग करण्यासाठी म्हणून सावरकर प्रतिष्ठान आमि ज्ञानदीपतर्फे आम्ही एक सुट्टीचा वर्ग म्हणून जाहीर केला मे महिन्यात. ज्यावेळी माझी  परिक्षा होती. मुलगी दहावीला होती व तिच्याबरोबरचे किंवा डिप्लोमाला असणारी मुलं अशी साधारणत ३५-४० मुलांचा एक वर्ग घेतला. फी म्हणाल तर किती, महिन्याला फक्त २५ रुपये. आणि मला अगदी आश्चर्य वाटतंय की त्यावेळेला मुलं तशी बरीच मोठी होती. स्वाभाविक आहे. नामजोशी सरांनी सांगितलं बाई, प्रेझेंटी सुद्धा घ्यायची बरं का मग मी उपस्थिती घेतली `उपस्थित, हजर, येस मॅडम,  नो मॅडम` मी एकदम उभी राहिले `फक्त उपस्थित शब्द पाहिजे ज्यांना बाकीचे बोलायचंय त्यांनी वर्गाबाहेर जायला हरकत नाही.` चुपचाप सगळी मुलं. सर म्हटले `बाई काय तुम्ही` पण मुलांना इतका भाग आवडला की मराठीतनं संगणक शिकवणे मला एवढं कळतं की कदाचित शिक्षकी पेशा असल्यामुळे जे आपल्याला येतं ते दुस-याच्या गळी उतरविण्याची कला असेल जे सांगितलं गेलं की मुलांसाठी हा क्लास चांगला घेतला गेला व मग सगळ्यांनी सांगितलं की आम्हाला फार आवडला. त्यानंतर   मी घरगुतीच क्लास घेत होते. म्हणजे की ज्यात सगळी मोठी माणसं यायची. लहान नाहीत.

सौ. मेधा सोवनी -
पण तुम्ही मराठीतूनच संगणक शिकलाय का हे कसं डोक्यात आलं.

सौ. शुभांगी रानडे -  कारण त्यावेळी संगणक इंग्लिशमधून शिकणं तसं क्लिष्ट होतं.

सौ. मेधा सोवनी -
साधारण केव्हाची गोष्ट ही.

सौ. शुभांगी रानडे -
  ही ८५ ची गोष्ट आहे. म्हणजे मी ८५ला पहिला क्लास घेतला. त्या वेळेला असं कळलं की जे आपल्याला कळतं ते आपल्या मातृभाषेत जास्त चटकन लक्षात येतं.यात इंग्लिश मिडियम काही वाईट नाही, हे सगळं मला मान्य आहे. पण जी गोष्ट मातृभाषेतून कळते, त्यात काहीही माणसाला, कितीही हुशार असो, काहीही असो, खरचटलेलं असलं की आईच म्हणतो ना  तो एकदम, तसं होतं त्यामुळे अजूनसुद्धा आम्ही मराठीत टायपिंग करतो त्यात एक्सपर्ट झालो असं म्हणायला काही हरकत नाही. किंवा मराठीत वेबसाईट केल्या जातात. त्या आमच्याइतक्या कोणी केल्या नसतील. आता आमच्याकडे आम्ही त्याच संदर्भात संस्कृतही शिकवायचं मला मुलांना तर आजपर्यंत  मराठी इनटू संस्कृत  अशी डिक्शनरी कोठे अव्हेलेबल नाही. कुठेच नाही. संस्कृत - मराठी आहे संस्कृत - इंग्लिश आहे संस्कृत - गुजराथी आहे हिंदी आहे तरी मराठी इनटू संस्कृत  अशी नाही. की आत्ता दहावीच्या मुलांना ट्रान्स्लेशनसाठी  परिक्षेत १० मार्काचा प्रश्न असतो यासाठी शाळेतील मुलांना उपयोगी पडतील असे १०,००० शब्द काढले आणि  मी आणि माझे मिस्टर असे दोघंही जसं जमेल तसं कॉंप्युटरवर बसायचे आणि ते फीड करायचे. मराठी, इंग्लिश आणि संस्कृत तिन्ही पद्धतीनं केलं. बरं त्यावेळेला जसं आपल्याला ते अल्फबेटिकली करता येत नाही मराठी इनटू संस्कृत. तसं इंग्लिशमधून सोपं असतं. मग त्याच्यासाठी आम्ही स्वतंत्र कोडवर्ड्स घातले होते आणि त्यातनं ते केलं, फार उलट्या पालट्या कोलांट्या उड्या मारल्या, पण ते केलं खरं.

तर आधी करायची होती फक्त डिक्शनरी. पण परत सामासिक शब्द घातले संधी घातले मग सुभाषितं घातली ती सुभाषितं नुसतीच नाही तर मी स्वतः त्यांचा अर्थ लिहून ती म्हटलीयत. म्हणजे अशी सीडी केली की ज्यात सुभाषित मी म्हटलेली आहेत २००. त्याच्यानंतर जे नाटेकरांच्या पुस्तकातसुद्धा शब्द नाहीत ते शब्द लिहून, ते म्हणून दाखविलेत. पण मुलं शाळेतली वाघ मागे लागल्यासारखी म्हणतात म्हणजे संस्कृत शब्द चालविणे जे आहे ते सावकाश म्हणावं लागतं. किंवा धातु सावकाश म्हणावे लागतात पाठ व्हायला. तरी मी कितीही वेळा सांगायची तुम्ही आंधोळीला गेलात ना त्यावेळी म्हणा वेळ वाया घालवू नका. पण ते लक्षातच रहात नसेल कोण जाणे. सर्वनामं म्हटली रोज एक तास स्तोत्ंर म्हटली की जी कायम तुम्हाला उपयोगी पडतील म्हणजे रामरक्षा अथर्वशीर्ष नवग्रह स्तोत्र जी संस्कृतमध्येच आहेत पण मुलांना उच्चाराला आवश्यक आहेत.मग त्याची स्वतंत्र सीडी करून  ते सगळं रेकॉर्डिंग मी माझं माझं केलं. कुणीही दुसरं नव्हतं. म्हणजे टाकून देऊन तुमचे तुम्ही करा पण दुपारी जेव्हा मला सवड असेल तेव्हा माझी मी करायची ते चेक केलं लहानाचे मोठे शब्द करायचे ते घालायचे  दुरुस्त्या म्हणजे कंटेंट आणि  हे सर्व काम माझं मी केलं, नंतर सरांनी ते घालणं ते प्रोग्रॅममध्ये घालून ते वेबवर टाकून सगळ्या जगभर दाखविणे हे काम सरांचे.

सौ. मेधा सोवनी - मराठी इनटू संस्कृत ही जी तुमची डिक्शनरी आहे ती ओपन टू ऑल आहे का

सौ. शुभांगी रानडे -
हो ओपन टू ऑल आहे होहो शिवाय त्याची वेबसाईट आहे पुस्तकाच्या नावाची म्हणजे संस्कृतदीपिका डॉट ओआर जी या नावाची आहे त्याच्यात पुस्तक उलगडून ही वाचता येईल अशीही सोय  केलेली आहे. सगळे शब्द ऐकता येतील सीडीही त्यात बघता येतील. शिवाय पर्सनल हवे तर तेही आम्ही देऊ शकतो. शिवाय शाळांनाही फ्री द्यायची आमची योजना आहे. शेवटी काय आपलं जे ज्ञान आहे जाऊदे ना चार लोकांपर्यंत.

सौ. मेधा सोवनी - तुमचा दृष्टीकोन खूप वेगळा आहे. म्हणजे सुरवातीस मी म्हटलं की नाही की खूप वेगळ्या पद्धतीनं विचार करणारी जी माणसं आहेत. यापैकी शुभांगीताई  या आहेत. आपल्याजवळ असणारं ज्ञान इंटरनेटच्या युगामध्ये हे ज्ञान सगळ्यांपर्यंत पोचणे शक्य आहे. तर त्याच्यासाठी त्यांनी काय काय करायला पाहिजे त्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. सरांचे त्यासाठी त्यांना अतिशय मोलाचे मार्गदर्शन त्याना लाभलेले आहे. आता मंडळी आपण असं करुया का सरांनी या वेबसाईट कशा पद्धतीने तयार केल्या आणि शुभांगीताईना कशा कशा पद्धतीने साहाय्य केले यासाठी काय काय योजना त्यांनी राबविल्या आणि काय काय योजना त्यांना राबवायच्या आहेत. या सगळ्या गोष्टी आहेत तर त्यासाठी आपण सरांची भेट घेऊया आणि या सगळ्या गोष्टी सरांनाच विचारुया. पण आज आता मात्र आपण थांबूया `शुभांगीताई, खरच आपला वेळ कमी असतानासुद्धा तुम्ही इतक्या या सगळ्या गोष्टी आम्हाला सांगितल्यात. तुमच्या कविताही आम्हाला वाचून दाखविल्यात खूप छान पद्दतीने प्रेझेंट केल्यात त्या आणि या सगळ्यांबद्दल ग्रीनएफएमतर्फे मी तुमचे अगदी मनापासून आभार मानते. नमस्कार धन्यवाद.

तर मंडळी आपण शुभांगीताई रानडे या निवृत्त शिक्षिका आहेत एमए संस्कृत झालेल्या तर त्यांची आज मुलाखत घेतली ती ही मुलाखत कशी वाटली ते आम्हाला जरूर कळवा आणि पुढच्या शुक्रवारी आपण पुन्हा भेटतोय त्यावेळी बहुतेक आपण सरांशी बातचित करू आणि पुढच्या शुक्रवारी जरूर भेटूया निरोप द्या नमस्कार.

नित्यपाठ स्तोत्रे

नित्यपाठ स्तोत्रे हे ज्ञानदीपचे नवे आयफोन अॅप सौ. सुमेधा गोगटे, कॅलिफोर्निया यांनी विकसित केते असून त्यात संस्कृत व मराठी स्तोत्रे ध्वनीफितींसह दिली आहेत. हे अॅप डाऊनलोडसाठी मोफत उपलब्ध असून मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांना उपयुक्त ठरेल. यात नवी स्तोत्रे ( विविध भारतीय भाषांतील) घालून ते सर्वसमावेशक करण्याचा मनोदय आहे. संदर्भ लिंक - https://itunes.apple.com/us/app/nityapath-stotre/id1457882787?ls=1&mt=8

आपल्या संस्कृतीमध्ये स्तोत्रपठण महत्वाचे आहे. लहान मुलांना संस्कार म्हणून आणि थोरांना भक्ती आणि मनःशांतीसाठी स्तोत्रे उपयुक्त ठरतात. प्रत्येकाला आपल्या आराध्य देवतेचे स्तोत्र नित्यपाठ म्हणून वापरताना शुद्ध उच्चार करता यावेत यादृष्चीने वाचन आणि श्रवण यांची सोय यात केली आहे.


Reciting stotras has an important place in Hindu religion.It helps children to earn fast and for elders, it provides a way to worship their cherished God. The present app includes popular Sanskrit and Marathi stotras with audio clips.