Thursday, November 16, 2017

पाण्याचे जिवाणूविषयक गुणधर्म

पुष्कळ ठिकाणचे भूजल निर्धोक व आरोग्यकारक असते. त्यात खनिज पदार्थही फार जास्त नसतात. असे पाणी प्रक्रिया न करता वापरले तरी चालते मात्र विहिरी वा झरे योग्य जागी असले पाहिजेत तसेच त्यांची सुधारणा करणे व प्रदूषणापासून त्यांचे संरक्षण करणे या गोष्टी केल्या तरच पाणी तसेच वापरले तरी चालते. तथापि जमिनीवर असणाऱ्या पाण्यात सरळ प्रदुषण होऊ शकते त्यामुळे बहुधा असे पाणी, पिण्याच्या कसोट्यांना उतरत नाही. सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीकोनातून पाण्याच्या प्रदुषणाचा दर्जा व पाण्याचे गुणधर्म यावर प्रक्रीयेचा दर्जा व प्रकार अवलंबून असतो. 

लोकांना पुरविले जाणारे पिण्याचे पाणी सर्व दृष्टीने योग्य असणे हे जलशुद्धीकरणाचे उद्दिष्ट असते. पिण्याचे पाणी निर्धोक व आरोग्यकारक असावे लागते. त्यात विषारी पदार्थ विशेष प्रमाणात असता कामा नयेत. त्याचा वास वा चव घेतल्यास ते आकर्षक वाटले पाहिजे. ते शक्य तेवढे मृदू असावे पण संक्षारक नसावे. धुलाई केंद्रात वा नळव्यवस्थेसाठी डाग न पडणारे पाणी मिळण्याकरिता पाण्यातील लोह व मँगेनीज यांचे प्रमाण अगदी कमी हवे. या नदीत यासाठी पण्यात पुरेशा प्रमाणात फ्लोराईड असणेही जरूर आहे. 

जिवाणू प्रदुषण नाहीसे व्हावे म्हणून बऱ्याच प्रक्रियांचा एकत्रितपणे प्रभाव पडणे आवश्यक असते कारण जीवाणू प्रदुषण मध्ये सार्वजनिक आरोग्याची तत्वे गुंतलेली असतात त्यांचा पिण्याच्या पाण्याच्या दर्जावर व त्या दर्जाच्या विश्वसनीयतेवर ही परिणाम होतो. इतर प्रक्रियांचे कार्य व्यवस्थित झाले नाही तरी सार्वजनिक आरोग्यास विशेष धोका पोहोचत नाही पण लोकांच्या आरोग्यास जपावयाचे असेल तर रोगजंतूंचा नाश होण्यात मात्र कधीही कमतरता पडणे योग्य नसते. 

जलाशुद्धीकरण प्रभावी असेल तर द्रव जिवाणू प्रदुषण नाहीसे होते म्हणजे निस्यंदन क्लोरिनीकरण योग्य रितीने केल्यास चांगले पाणी तयार होते. अशी एक गैरसमजूत साधारणपणे आढळून येते पण खरी गोष्ट अशी आहे की विशिष्ट असंस्कारित पाण्यातील जीवाणूंच्या प्रमाणाशी प्रक्रिया केलेल्या पाण्यातील जिवाणूंचे प्रमाण हे सरळ गुणोत्तरात असते. याचा अर्थ असा की कोणत्याही विशिष्ट केंद्रात तेथील विशिष्ट पाण्यातील जिवाणूंचा नाश करण्यासाठी योग्य पद्धती वापरल्यास शुद्धीकरण यंत्रणा व्यवस्थित चालू असेपर्यंत जीवाणू निर्मूलनाचा दर्जा शक्यतो कायम रहातो. जिवाणू निर्मूलनाचा दर्जा हा असंस्कारित पाण्यातील विशिष्ट जीवाणूंचे प्रक्रियेमुळे कितपत निर्मुलन झाले त्याची टक्केवारी दर्शवितो. जर असंस्कारित पाण्यातील जीवाणू प्रदुषणाचा दर्जा वाढल्यास प्रक्रिया केलेल्या पाण्यातील जिवाणूंचे शेकडा प्रमाणही त्यानुसार वाढते. म्हणून प्रक्रिया केलेल्या पाण्यात असणाऱ्या विशिष्ट जीवाणू अनुज्ञेय संस्थेवरकमाल मर्यादा घातली की प्रक्रियापूर्व पाण्यातील प्रदूषणाच्या दर्जावर आपोआप मर्यादा पडते. 

पाण्यामार्फत रोगप्रसार करणारे रोगजंतू नेहमीच्या प्रयोगपद्धतीच्या सहाय्याने पाण्यातून स्वतंत्रपणे वेगळे काढता येत नाहीत. म्हणून निर्धोक वा धोकादायक पाण्यात निश्चित स्वरूपांचा विभागणी करू शकणारी किंवा रोगजंतू नसलेले व रोगजंतू असलेले पाणी यातील फरक दाखवू शकणारी कसोटी उपलब्ध नाही म्हणून सर्वसाधारणपणे वापरली जाणारी पद्धत म्हणजे आतड्यातील रोगजंतूमुळे प्रदुषण झाले आहे की नाही ते ठरविण्यासाठी आतड्यात नेहमी असणाऱ्या विशिष्ट जिवाणूंचा निर्देशक म्हणून उपयोग करणे निर्देशक जीवाणूंची पाण्यातील संख्या वाढली की प्रदुषणाची पातळी वाढते व रोगजंतू पाण्यात असण्याची अधिक शक्यता उद्भवते याचा प्रत्यक्ष परिणाम म्हणजे ते पाणी ज्या भागात पुरविले जाते तेथे पाण्यामुळे रोगांची साथी फैलावते. निदर्शक जीवाणू म्हणून कॉलीफार्म गटाच्या जिवाणूंचा उपयोग केला जातो. कॉलीफार्म म्हणजे कॉलान किंवा मोठया आतड्यात असणारे जीवाणू. हे जीवाणू पाणी व माणसे यांच्या आतड्यात असतात. ‘फेकल स्ट्रेप्टोकोकाई’ या जिवाणूंचाही यासाठी निर्देशक म्हणून उपयोग करण्यात येतो विशेषतः युरोपमध्ये ही पद्धत जास्त वापरतात पण या जिवाणूंच्या बाबतीत सख्यांत्मकनियम अजून प्रमाणित केलेले नाहीत. 


पाण्यावाटे रोगप्रसार करणाऱ्या रोगजंतूमध्ये सर्वात महत्त्वाचे रोगजंतू सल्नोनेला टायफोसा. या रोगजंतू टायफाईडचा ताप येतो. संशोधनानंतर असे दिसून आले आहे की (अ) रोगजंतू असणाऱ्या मलजलावर प्रक्रिया केली. (आ) नदीमध्ये स्वयंशुद्धी झाली किंवा (इ) प्रदुषित पाण्यावर प्रक्रिया तरी पाण्यातील कॉलीफार्न जीवाणू व सल्नोनेला टायफोस यांचे गुणोत्तर कायम रहाते. मलजल गोळा केलेल्या भागातील लोकसंख्यापैकी टायफाईड ताप झालेले लोक किती आहेत त्या प्रमाणावरच स्वाभाविकपणे गुणोत्तराचे मूल्य अवलंबून रहाते. असे दिसून येते की जेथे पाण्यामुळे पसरणारे रोग जास्त प्रमाणात असतात तेथे पाण्यावर योग्य प्रक्रिया व्हावी यासाठी फार काळजी घ्यावी लागते. ज्याठिकाणी जलशुद्धीकरणव्यवस्था अपुरी असते व मलजल निसारण व नदीतील प्रदुषण प्रतिबंध करण्यासाठी पुरेसा पैसा उपलब्ध नसतो अशा ठिकाणीच पाण्यामुळे रोगप्रसार होण्याची ही स्थिती उद्भवते. 

No comments:

Post a Comment