Thursday, November 16, 2017

हायपोक्लोराईट टिकाऊ द्रावणतयार करणे

चुन्याच्या क्लोराईड वा जास्त तीव्रतेचे कॅलशियम हायपोक्लोराईट यांच्या द्रावणात धुण्याचा सोडा घातला तर सोडियम हायपोक्लोराईट तयार होऊन द्रावण टिकाऊ बनते व कॅलशियम कार्बोनेटचा गाळ तळाशी बसतो. अशा तऱ्हेने बनवलेले स्वच्छ नटिकाऊ द्रावण नेहमीच्या तपमानास व अंधाऱ्या जागेत चार ते पाच आठवडे ठेवले तरी उपलब्ध क्लोरिनमध्ये विशेष घट होत नाही संधारित कणांमुळे यंत्रणा बंद पडण्याची अगदी थोडी शक्यता असल्याने हे द्रावण पाण्यात मिसळण्यात काही अडथळा येत नाही. 

वजनीमापाने सुमारे १ टक्का उपलब्ध क्लोरिन असणारे ११४ लिटर (२५ ब्रि.गॅलन ३० अमे.गॅलन) सोडियम हायपोक्लोराईट तयार होऊन द्रावण तयार करायचे असल्यास १४४ लिटर (२५ ब्रि.गॅलन ३० अमे.गॅलन) पाण्यात तीव्र कॅलशियम हायपोक्लोराईट १.७ कि.ग्रॅ. (३.७५ पौंड) च्या डब्यात सर्व रसायन मिसळावे व त्यात १.३६ कि.ग्रॅ. (३ पौंड) धुण्याचा सोडा घालून ते मिश्रण चांगले ढवळले. (रिकाम्या त्याच डब्यात सैलरीतीने धुण्याचा सोडा भरला तर त्याचे वजन सुमारे ३ पौंड भरते) विक्रीयेत जे निष्क्रीय कॅलशियम कार्बोनेट तयार होईल ते तळाशी जाऊ द्यावे व वरच्या बाजूचे सोडियम हायपोक्लोराईटचे स्वच्छ द्रावण वक्रनलीकेने किंवा वरच्या बाजूने साठ्याच्या टाकीत सोडावे. या टाकीस द्रावण पोषक क्लोरिनीकारक जोडावा.

    डब्यातील या जंतुनाशकपदार्थाचे निव्वळ वजन अंदाजे ३.७५ पौंड असते पदार्थात वजनी मापाने ७० टक्के उपलब्ध क्लोरिन असल्यास एका डब्यातून २.६ पौंड क्लोरिन मिळू शकेल. डब्यातील सर्व रसायन ३० अमे. गॅलन वा २५० पौंड पाण्यात मिसळल्यास १ टक्का उपलब्ध क्लोरिनएवजी १.०३ टक्के क्लोरिन असणारे २५८ पौंड द्रावण तयार होते. तथापि तीव्रतेत अगदी थोडी वाढ झाली तरी त्यात सुधारणा करण्याची आवश्यकता नसते कारण क्लोरिनच्या प्रमाणात काही किरकोळ स्वरुपात फेरबदल झाल्यास आर्थोटोलिडीन परीक्षा करून त्यावर नियंत्रण ठेवता येते. प्रक्रिया करावयाच्या पाण्याचा पाण्याचा दर एकक परिणामास दिलेल्या क्लोरिन द्रावणापेक्षा कमी का जास्त द्रावणाची आवश्यकता आहे या परीक्षेने कळू शकते.

    ज्यावेळी ३० गॅलनपेक्षा कमी द्रावण तयार करावयाचे असेल त्यावेळी डब्यातील थोडयाच रसायनाचा उपयोग करावा लागतो. व हा उपयोग करताना योग्य तेवढेच रसायन घेण्यासाठी त्याचे नीट वजन करणे आवश्यक असते उदाहरणार्थ १ टक्का तीव्रतेच्या द्रावणासाठी १४ ग्रॅमप्रत्येक लिटरला भुकटीचा वापर करावा लागतो. (१.६५ औस / ब्रि.गॅलन, १.३८ औस अमे. गॅलन) कॅलशियम क्लोराईड घालून अगदी कमी खर्चात हायपोक्लोराईट द्रावणाचा गोठण बिंदू खाली करता येतो. कॅलशियम क्लोराईड मिसळले तरी द्रावणाचा जंतुनाशक क्षमतेवर तयार काहीही परिणाम होत नाही. उदारणार्थ १६ टक्के कॅलशियम क्लोराईडच्या तीव्रतेचे द्रावण तयार होईल इतके ते रसायन हायपोक्लोराईटच्या द्रावणात टाकले तर गोठण बिंदू- १२ अंश सें. (१० अंश फॅ) इतक्या तापमानापर्यत खाली उतरतो. परीशिष्ठात दिल्याप्रमाणे १६ टक्के तीव्रतेचे द्रावण करण्यासाठी वजनी मापाने १६ भाग टक्के तीव्रतेच्या प्रत्येक लिटर द्रावणासाठी १९० पौं. / ब्रि.गॅलन, १.५८ पौं. अमे. गॅलन ) वापरावे लागते. 

    कॅलशियम वा सोडियम हायपोक्लोराईट द्रावण तयार करण्यासाठी व त्याचे अवमिश्रण करण्यासाठी व मृदू पाणी उपलब्ध असल्यास त्याचा वापर करावा म्हणजे कमी गाळ तळाशी बसेल व त्यामुळे क्लोरिनीकारकाचे कार्यही खात्रीशीर होईल. याबाबतीत पावसाचे पाणी हे उत्तम मृदू पाणी असल्याने ज्यावेळी फक्त कठीण पाणीच उपलब्ध असेल त्यावेळी पाणी गोळा करून त्याचा वापर करावा.


    जास्त तीव्रतेच्या हायपोक्लोराईटची द्रावणे तयार करीत असताना तळाशी गाळ साचू नये म्हणून एक विशिष्ट रसायन द्रावणात मिसळले जाते या रसायनामुळे कॅलशियम संयुगाचे अविद्राव्य कण तयार होण्यास प्रतिबंध होतो. ट्रेटा सोडियम पायरोफास्पेट घ्या रसायनाचा या कमी उपयोग करता येतो. रसायन वापरण्यासाठी पद्धत खालीलप्रमाणे असते. १०० लिटर द्रावण तयार करण्यसाठी लागणाऱ्या पाण्यातील प्रत्येक भा/ दलभा कठीणपणासाठी ०.६६ ग्रॅम हे रसायन वापरावे (०.११ औस/ १०० ब्रि.गॅ./भा.दलभा ०.०९ औस/ १०० ब्रि.गॅ/भा.दलभा) उदाहरणार्थ असे समजता येईल कि अवमिश्रणासाठी वापरलेल्या पाण्यात १५० भा. दलभा एवढा कठीणपणा आहे व एकूण १२० लिटर द्रावण तयार करावयाचे आहे. तर ०.६६x १५०x १२०x /१०० = १९९ ग्रॅम सममूल्य आकडे :- ३० बि.गॅ. द्रावण तयार करण्यासाठी ०.११x१५०x३०x /१००= ५ औस /३० अमे.गॅ. द्रावण तयार करण्यासाठी ०.०९x१५०x ३०/१००= ४ औस एवढे वरील रसायनही वापरावे लागेल म्हणून हायपोक्लोराईटचे १२० लिटर टिकाऊ द्रावण तयार करण्यासाठी अवमिश्रणाच्या पाण्यात आवश्यक तेवढ्या क्लोरिन संयुगाशिवाय ११९ ग्रॅम एवढे वरील रसायनही घालावे लागेल

No comments:

Post a Comment