Thursday, November 16, 2017

पिण्याच्या पाण्याच्या कसोट्या

पाण्यामुळे रोगप्रसार होऊ नये यासाठी जलशुद्धीकरण प्रक्रियांची उदिष्टे अशी असावीत त्यामुळे पाण्यातील रोगजंतूंचा नाश होईल। मात्र   पाण्यातील वास्तवीय प्रमाणांवरही पाणी पिण्यास योग्य आहे की नाही हे अवलंबून असते.
पदार्थ वा गुणधर्म  जास्तीत जास्त चालू शकणारे प्रमाण  जास्तीत जास्त अनुज्ञेय प्रमाण
एकंदर पदार्थ  ५०० मि. ग्रॅ. / लि. १५००० मि. ग्रॅ. /लि.
रंग एकक () ५० एकक
गढूळपणा  एकक () २५ एकक
चव  त्रासदायक नसणे      -
वास              -
लोह (Fe) . मि.ग्रॅ./लि. मि.ग्रॅ./लि. 
मँगेनीज(Mn) . मि.ग्रॅ./लि. . मि.ग्रॅ./लि.
तांबे (Cu) . मि.ग्रॅ./लि. . मि.ग्रॅ./लि.
जस्त (Zn) . मि.ग्रॅ./लि. १५ मि.ग्रॅ./लि.
कॅलशियम (Ca) ७५ मि.ग्रॅ./लि. २०० मि.ग्रॅ./लि.
मॅग्नेशियम (Mg) ५० मि.ग्रॅ./लि. १५० मि.ग्रॅ./लि.
सल्फेट (So4) २०० मि.ग्रॅ./लि. ४०० मि.ग्रॅ./लि.
क्लोराईट (Cl) २०० मि.ग्रॅ./लि. ६०० मि.ग्रॅ./लि.
पी.एच. . ते . . मि.ग्रॅ./लि. पेक्षा जास्त कमी किंवा . पेक्षा जास्त 
मॅग्नेशियम+सोडियम सल्फेट  ५०० मि.ग्रॅ./लि. १००० मि.ग्रॅ./लि.
फेनालची संयुगे (फेनालच्या स्वरुपात ) .००१ मि.ग्रॅ./लि. .००२ मि.ग्रॅ./लि.
कार्बन क्लोरोफॉर्म चा अर्क (CCC, कार्बन प्रदूषक) . मि.ग्रॅ./लि. . मि.ग्रॅ./लि.
अल्काईल बेंझोल सल्फोनेटस (ABS, सरफेक्टंटस) . मि.ग्रॅ./लि. . मि.ग्रॅ./लि.

  
अ – प्लॅटीनन कोबाल्ट प्रमाण 
आ – गढूळपणा एकक 
इ – ०.२ मि.ग्रॅ./लि. पेक्षा जास्त प्रमाण असल्यास त्यांचे कारण शोधण्यासाठी अधिक विश्लेषण करणे आवश्यक असते.
जागतिक आरोग्य संघटनेच्या (१९६३) ‘पिण्याच्या पाण्याच्या आंतरराष्ट्रीय परीक्षा’ या पुस्तकातील पान २३ वरून                                                                                                                                     
याबाबतीत, संदर्भासाठी जागतिक आरोग्य संघटना ‘पिण्याच्या पाण्याच्या आंतरराष्ट्रीय परीक्षा’ हे पुस्तक पहावे. या पुस्तकात, पाण्याच्या दर्जावर कोणत्या घटकांवर परिणाम होतो व प्रयोगशाळेत पाण्याचा दर्जा ठरवण्यासाठी कोणत्याही पद्धतीचा वापर करावा लागतो याची सविस्तर माहिती दिलेली आहे.

प्रक्रिया केलेल्या पाण्याची गुणवत्ता:-

विषारी पदार्थ :- आंतरराष्ट्रीय परीक्षाप्रमाणे विषारी पदार्थाचे जास्तीत जास्त किती प्रमाण अनुज्ञेय असते ते कोष्टकामध्ये दिले आहे. 
विषारी पदार्थाचे जास्तीत जास्त अनुज्ञेय प्रमाण
जागतिक आरोग्य संघटनेच्या (१९६३) ‘पिण्याच्या पाण्याच्या आंतरराष्ट्रीय परीक्षा’ या पुस्तकातील २७ पानावरून. 
विषारी पदार्थ जास्तीत जास्त अनुज्ञेय प्रमाण मि.ग्रॅ./लि.
शिसे (PI च्या स्वरुपात)
सेलेनियम (Se)
.०५
.०१
आर्सेनिक (As) .०५
क्रोमियम (सहा विद्युत भाराच्या Cl)  .०५
सायनाईड (Cn) .
कॅडमियम  .०१
बेरीयम .
संक्षारक पाण्यासाठी शिशाच्या नळीचा उपयोग केला असेल तर पाण्यातील शिशाचे प्रमाण महत्वाचे ठरते. नेहमीच्या जलपरीक्षणात पाण्यातील सेलेनियमचे प्रमाण काढले जात नाही पण ज्या जमिनीत हे खनिज असेल त्या जमिनीत उगवणाऱ्या अन्न धान्यांमध्ये खनिजांचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे अशा भागात ज्वालामुखीचा उद्रेख झालेला आहे अशा भागातील पाण्यात वा जेथे आर्सेनिकचे प्रमाण जास्त आढळण्याची शक्यता असते. सार्वजनिक पाणीपुरवठ्यामुळे आर्सेनिकची विषबाधा झाल्याचे आजपर्यत काहीही उदाहरण दृष्टीत्पतीस आलेले नाही. धातूवर मुलामा चढवणाऱ्या कारखान्यातील उत्सर्जित पाण्यामुळे जर पिण्याचे पाणी प्रदुषित झाले असेल तरच फक्त पाण्यात कलोनियन व सायनाईड (व कॅडमियमसुद्धा ) हे विषारी पदार्थ असू शकतात.


आरोग्यास अपायकारक पदार्थ:- 
कोष्टकामध्ये दिलेल्या पदार्थाव्यतिरिक्त असे काही पदार्थ आहेत की जे पाण्यात जास्त प्रमाणात असतील तर काही परिस्थितीत त्याच्यामुळे आरोग्यास अपाय होऊ शकतो त्यापैकी काही पदार्थ हे पिण्याच्या पाण्याचे आवश्यक घटक समजले जातात व अगदी अल्प प्रमाणात असल्यास ते आरोग्यास हितकारकच ठरतात.

फ्लोराईड संयुगे पिण्याच्या पाण्यात ०.८ ते भा / दलभा या प्रमाणापर्यत असल्यास जरी फायदेशीर ठरत असली तरी त्यांचे प्रमाण १.० ते १.५ भा/ दलभा पेक्षा वाढल्यास त्यामुळे दातांचे लुकण खराब होतो. 

पिण्याच्या पाण्यात निसर्गतःच नायट्रेट संयुगे असू शकतात. मलजलाच्या खड्ड्यातील पाणी झिरपून किंवा खताचा वापर केलेल्या भागातील पाणी पिण्याच्या पाण्यात मिसळले गेल्यासही पाण्यात नायट्रेटची संयुगे आढळतात. नायट्रेट पाण्यात असल्यास काही अर्भकांना त्यापासून अपाय होतो पण मोठ्या मुलांना वा प्रौढांना त्यापासून काहीही त्रास होत नाही. नायट्रेट असलेले पाणी, प्यायल्यामुळे वा तयार केलेल्या अन्नावाटे अर्भकाच्या पोटात गेल्यास आतड्यात या नायट्रेटचे क्षपन होऊन नायट्राईट तयार होण्याची शक्यता असते व या नायट्राईटमुळे अर्भकांना ‘मिथेनोग्लोबिनेनिया’ हा रोग होऊ शकतो. जरी पाण्यात नायट्रेटचे प्रमाण १० भा/दलभा पेक्षा जास्त असल्यास ते धोकादायक मानले जात असले तरी पाण्यात ४५ भा/दलभा पेक्षा जास्त प्रमाणात नायट्रेट असेल तरच हा रोग होऊ शकतो. ज्याठिकाणी जवळपासचे दुषित पाणी झिरपून भूजलात मिसळले जाते अशा काही भूजलातच नायट्रेटचे एवढे प्रमाण असू शकते. अर्भकांना पाजण्यासाठी दुसऱ्या ठिकाणी पाणी वापरावे हाच यावर उपाय आहे. 








No comments:

Post a Comment