Showing posts with label app. Show all posts
Showing posts with label app. Show all posts

Saturday, June 1, 2024

हॉस्पिटलसाठी ऑनलाईन अपॉइन्टमेंट सॉफ्टवेअर

भारतातील आरोग्यसेवा सर्व जगात उत्तम प्रतीची व कमी खर्चाची समजली जाते.भारतातील सर्व महत्वाच्या शहरांत अत्याधुनिक व सर्व सुविधांनी युक्त अशी अनेक हॉस्पिटल्स आहेत.तसेच त्यामध्ये विविध व्याधींवर उपचार करणारे तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध आहेत. यामुळे खेड्यापाड्यातून व दूरच्या गावातील रुग्ण अशा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी येतात. एवढेच नव्हे तर बाहेरच्या देशातील , विशेषकरून अरब राष्ट्रातील रुग्ण इंग्लंड अमेरिकेऎवजी भारतात उपचार करून घेणेच अधिक पसंत करतात.

हॉस्पिटल सेवा उत्तम प्रतीची असली तरी बाह्यरुग्ण विभागात दिसणारी रुग्णांची गर्दी पाहिली की या सेवेत फार मोठी उणीव राहिली असल्याचे जाणवते. प्रगत देशात प्रत्येक पेशंट आपली अपॉइन्टमेंट वेळ  नेटवरून आधीच  निश्चित करतो. त्यामुळे तेथे पेशंटनी गजबजलेला बाह्यरुग्ण विभाग असे  दृश्य क्वचितच दिसते. ठराविक वेळेस हॉस्पिटलमध्ये गेले की तेथील रिसेप्शनिस्ट आपला केस पेपर व एक इलेक्ट्रॉनिक डॉकेट आपल्याकडे देते. मग थोडावेळ आपणास तेथील फोटोगॅलरी, वाचनालय, कॉम्प्युटररूम वा  बागेत थाबता येते. आपला नंबर ( जास्तीत जास्त दहा पंधरा मिनिटात) आला की हातातील डॉकेटवरील लाल दिवा लागतो व आपल्याला भेटीची सूचना मिळते.या प्रक्रियेत दूरवरून येणा-या पेशंटनाही ठराविक वेळात भेटीची खात्री असते.

अनेक ग्रामीण भागातील  स्थानिक पातळीवरील डॉक्टर तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेण्यासाठी पेशंटना शहरातील मोठ्या हॉस्पिटलमध्ये पाठवितात. अशावेळी आपल्या भावी वेळापत्रकाचे नियोजन केले तर तज्ज्ञ डॉक्टरांना आपला वेळ अधिक उपयुक्तपणे वापरता येतो. डॉक्टरांची भेट घेऊ इच्छिणा-या पेशंट्सना मात्र असे नियोजन करता येत नाही. कारण अनेक रुग्ण आधीच बाह्यरुग्ण विभागात उपस्थित असल्याने त्याना आपला नंबर येईपर्यंत तेथेच वाट पहात थांबणे भाग पडते. प्रत्येक रुग्णाला किती वेळ लागेल  याची  काही खात्री नसल्याने एकूण लागणा-या वेळॆचा अंदाज त्यांना बांधता येत नाही.

ब-या च वेळेस आजारीपणामुळे रुग्णाला एका जागी जास्त वेळ बसता येत नाही. तसेच लहान मुले असतील तर त्यांना अशा बाबतीत अधिक त्रास होतो. लहान मुलांना जवळच्या इतर रुग्णांमार्फत सर्दी, खोकला यासारख्या संसर्गजन्य आजारांची लागण होऊ शकते. रुग्णाबरोबर येणा-या नातेवाईकांनाही आपला कामधंदा सोडून अशा प्रतिक्षा यादीत थांबावे लागते. काही वेळा प्रत्यक्ष आवश्यक ते तज्ज्ञ डॉक्टर बाहेरगावी वा अन्य कामासाठी गेल्याने त्यांची भेट घेता येत नाही. पेशंट परगावाहून आलेला असला तर त्याला अशी भेट घेण्यासाठी प्रवासाव्यतिरिक्त प्रसंगी राहण्याचीही सोय करावी लागते. मोठ्या शहरात यासाठी खर्चही जास्त होतो.

 अशा कारणांमुळे  रुग्ण आवश्यक त्या तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेण्यासाठी दूरच्या हॉस्पिटलमध्ये जाण्याऎवजी जवळपास उपलब्ध असणा-या हॉस्पिटलमध्येच उपचार घेणे पसंत करतात. यात रुग्णास योग्य औषधोपचार व सल्ला मिळेलच याची खात्री देता येत नाही.

मोठ्या हॉस्पिटलमध्ये सध्या फोनवरून वेळ ठरविण्याची सोय उपलब्ध असते मात्र हॉस्पिटलमधील प्रत्येक डॉक्टरच्या वेळापत्रकाविषयी सर्वसाधारण माहिती असली तरी रिसेप्शनिस्टला निश्चित माहिती नसते. शिवाय पेशंटने त्यासाठी आवश्यक ती फी भरलेली नसते. तसेच तो प्रत्यक्षात वेळेवर येईल याची खात्री नसते.  त्यामुळे अशा अपॉईंटमेंटचा फारसा उपयोग होत नाही.

 या सर्व अडचणींचा विचार केल्यावर ज्ञानदीप इन्फोटेक प्रा. लि. या संस्थेने भारतातील प्रथितयश हॉस्पिटलमध्ये  उपयुक्त ठरेल असे ऑनलाईन अपॉइन्टमेंटचे सॉफ्टवेअर विकसित केले आहे. यात ऑनलाईन अपॉइंटमेंटसाठीच्या पेशंट, डॉक्टर व व्यवस्थापक यांना लागणा-या सर्व सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. यासाठी स्वतंत्र वेबसाईट बनवून डॉक्टरांच्या उपलब्ध वेळापत्रकाची माहिती तेथे संकलित केली जाते. सर्व माहिती नेटच्या माध्यमातून कोणासही उपलब्ध होऊ शकते.

या सॉफ्टवेअरद्वारे पेशंटला वा त्याच्या नातेवाईकांना घरी बसून इंटरनेटद्वारे हॉस्पिटलमधील तज्ज्ञ डॉक्टरांच्या वेळापत्रकावरून  त्यांची उपलब्धता पाहता येईल व आपल्या सोयीनुसार भेटीची वेळ ठरविता येईल. या सॉफ्टवेअरमध्ये नेट बॅंकिंग, क्रेडिट कार्ड वा डेबिट कार्ड वापरून  भेटीसाठी लागणारे शुल्क भरण्याची सोय असल्याने अशी भेट निश्चित होऊ शकेल.

ही माहिती भरण्याचे काम रुग्णाशिवाय इतर व्यक्तीसही( व्हिजिटर) करता येते व त्या व्यक्तीस एकापेक्षा अधिक व्यक्तींची(मेंबर) नोंद करण्याची सुविधा असल्याने  हे सॉफ्टवेअर अधिक सुलभ करण्यात आले आहे.
हॉस्पिटलमधील व्यवस्थापक सार्वजनिक सुट्ट्या, आठवड्यातील हॉस्पिटलचे कामाचे दिवस व तास यांची माहिती भरून कॅलेंडर तयार करू शकतील. तसेच नवीन डॉक्टरांचे नाव यादीत समाविष्ट करणे वा त्यात बदल करणे हेही त्यांना करता येईल. हॉस्पिटलमधील   डॉक्टरना आपली माहिती, फोटो, भावी काळातील त्यांच्या उपलब्धतेनुसार संभाव्य वेळापत्रक इत्यादी माहिती घालता येईल तसेच त्यात  आवश्यकतेनुसार केव्हाही बदल करता येतील.

 नेट बॅंकिंग, क्रेडिट कार्ड वा डेबिट कार्ड वापरत असताना  माहितीची गोपनीयता व सुरक्षितता सर्वात महत्वाची असते. त्यादृष्टीने या क्षेत्रातील भारतात अग्रगण्य असणार्यास सीसीअव्हेन्यू या संस्थेच्या पेमेंट गेट्वेशी हे सॉफ्टवेअर संलग्न केले असल्याने पेमेंटविषयक आवश्यक ते सुरक्षा कवच सीसीअव्हेन्यूच्या सिस्टीममध्येच अंतर्भूत असते.  अपॉइन्टमेंटविषयीची सर्व माहिती दूरस्थ सर्व्हरवरील डाटाबेसमध्ये साठविली जाते व व्हिजिटर व व्यवस्थापक यांना लॉगिन करूनच याची माहिती मिळविणे वा त्यात काही बदल करणे शक्य असते.

हॉस्पिटलच्या व्यवस्थापनासाठी लागणारे अपॉइन्टमेंटविषयीचे विविध प्रकारचे रिपोर्ट या सॉफ्ट्वेअरमधून मिळू शकतात. तसेच या रिपोर्टचे रुपांतर एक्सेलच्या तक्त्यात करता येऊ शकते.

सांगलीतील प्रसिद्ध नेत्रविशारद डॉ. मिलिंद किल्लेदार यांच्या अनुराधा आय हॉस्पिटलमध्ये हे सॉफ्टवेअर तीन  वर्षे  यशस्वीपणे चालू होते. मात्र त्यात वापरले  जाणारे फ्लॅश तंत्रज्ञान कालबाह्य झाल्याने आता क्लाऊड बेस्ड मोबाईल फ्रेंडली सॉफ्टवेअर बनविण्यासाठी ज्ञानदीप इन्फोटेक कंपनीने त्यांच्या कडे पूर्वी काम करीत असलेल्या व पुण्यात मोठ्या कंपनीत नोकरी करणा-या माजी डेव्हलपरला सांगलीत पुन्हा बोलावून हे काम युद्धपाताळीवर करावयाचे ठरविले आहे. सुदैवाने ज्ञानदीपच्या व्यवस्थापनात आता सांगलीतील गणपती कॅंन्सर हऑस्पिटलमध्ये अनेक वर्षे अॅडमिनिस्ट्रेटर म्हणू काम केले.्या प्रा. डॉ. यशवंत तोरो यांचे मार्गदर्शन लाभणार असल्याने थोड्याच अवधीत हे सऑफ्टवेअर सर्व डॉक्टर व पेशंट याच्या सेवेस उपलब्ध होईल.

ज्या हॉस्पिटल्स  वा डॉक्टर्सना या  संधीचा फायदा घ्यावयाचा असेल त्यांनी आपली माहिती व अपेक्षा कळवून सऑफ्टवेअरसाठी आपली मागणी नोंदवायची असेल त्यांनी डॉ. यशवंत तोरो यांचेशी संपर्क साधावा.
 

. डॉ. सु. वि. रानडे, ज्ञानदीप इन्फोटेक प्रा. लि., सांगली.

Monday, November 20, 2017

काव्यदीप - आयफोन व आयपॅडसाठी ज्ञानदीपचे नवे अॅप


ज्ञानदीपचे नवे अॅप सौ. सुमेधा गोगटे यांनी तयार केले असून त्यात स्व सौ. शुभांगी रानडे यांच्या 'काव्यदीप', सांगावा' आणि 'सय' या तीनही कवितासंग्रहातील सर्व कविता  दिल्या आहेत. सर्व कविता स्व सौ. शुभांगी रानडे यांच्या आवाजात ऐकावयास मिळतात.

या अॅपमध्ये आवडलेली कविता मेलने पाठविण्याची सोशल मिडियावर शेअर करण्याची तसेच नोंद करून ठेवण्याची सोय केली आहे.

सर्वांना हे अॅप मोफत आपल्या आयफोनवर डाऊननलोड (https://itunes.apple.com/app/id1274655599) करता येईल. 
आपण या संधीचा लाभ घ्यावा तसेच आपल्या प्रतिक्रिया कळवाव्यात ही विनंती.

सुभाषितानि - आयफोन व आयपॅडसाठी ज्ञानदीपचे नवे अॅप

 सुभाषितानि - आयफोन व आयपॅडसाठी ज्ञानदीपचे नवे अॅप


ज्ञानदीपचे नवे अॅप सौ. सुमेधा गोगटे यांनी तयार केले असून त्यात सुमारे २०० सुभाषिते, त्यांचे मराठी व इंग्लिश  भाषांतर व  इंग्लिश ट्रॅन्स्लिटरेशन दिले आहे. सर्व सुभाषिते स्व सौ. शुभांगी रानडे यांच्या आवाजात ऐकावयास मिळतात.

सुभाषिताचा शोध घेण्याची तसेच  आवडलेले सुभाषित मेलने पाठविण्याची  सोय आहे. 



सर्वांना हे अॅप मोफत आपल्या आयफोनवर डाऊननलोड करता येईल. 
(https://itunes.apple.com/us/app/subhashitani/id1263239697?mt=8
आपण या संधीचा लाभ घ्यावा तसेच आपल्या प्रतिक्रिया कळवाव्यात ही विनंती.

Sunday, October 22, 2017

Times Table Memorizer


Dnyandeep is happy to announce the release of Times Tables Memorizer, an android app as an English version of its earlier Marathi Padhe Pathantar which has a record downloads of 1,30,000 in one year.



Times Tables Memorizer contains all multiplication tables from 2x10 to 30x10. This is very useful memorizing method for mastering elementary level mathematics.

Each table has text in number and words as well as Audio Playback to help memorize the tables. There are each table specific test in simple true-false format.

This app also has a random number multiplication test with increasing complexity. User can earn 'stars' and go to higher level. This test helps cross check the 2 to 30 tables memorizing.

See some of the screen shots of the app.


We hope that this new FREE app  will be useful to kids for mastering maths at elementary level and their parents also would like to give this tool to their children.

Saturday, July 29, 2017

Padhe app published on iOS

New Padhe app is developed by my daughter, Mrs. Sumedha Gogate on behalf of Dnyandeep Foundation.

The app is based on Android app of Dnyandeep Foundation titled 'Marathi Padhe Pathantar '
 which has been downloaded by more than 1,14,000 users within a span of one and half years.

The app can be downloaded from itunes app store on link
https://itunes.apple.com/us/app/padhe/id1244236011?mt=8



Subhashitani App published on iOS


New Subhashitani app is developed by my daughter, Mrs. Sumedha Gogate on behalf of Dnyandeep Foundation.

 The app contains about 200 Subhashitani with Marathi meaning which can be read or listened by search through a sorted list. The audio clips are by Late Mrs. Shubhangi Ranade.  The app is based on the Dnyandeep Foundation's website www.sanskritdeepika.org.

There is a facility for sharing any Subhashit by sending mail.

 The app is free to download on itunes app store with link
https://itunes.apple.com/in/app/subhashitani/id1263239697?mt=8 .

Next version of this app will contain English transliteration and English meaning as additional option.


Tuesday, January 10, 2017

मराठी पाढे पाठांतर एक वर्षात ७०,००० वर डाउनलोड

गेल्या वर्षी ७ जानेवारी २०१६ मध्ये  तयार केलेले  "मराठी पाढे  पाठांतर"  हे  ऍप एका वर्षात लोकप्रियतेच्या शिखरावर पोचले असून आतापर्यंत ७०,००० वर लोकांनी ते डाउनलोड केले आहे. कोणतीही जाहिरात  न करता ज्ञानदीपला मिळालेले हे यश  स्पृहणीय  आहे.
या ऍपमध्ये २ पासून  ३० पर्यंतचे  पाढे उच्चारासहित दिले असून त्याला ध्वनी फितींची  जोड  दिली  आहे.
लवकरच ज्ञानदीपतर्फे  "मराठी पाढे  पाठांतर" ची  सुधारित  नवी  आवृत्ति तसेच इंग्रजी  माध्यमासाठी Multiplication Tables हे  नवे ऍप  ज्ञानदीप गुगल  प्ले स्टोअरवर उपलब्ध  केले  जाईल

सध्याचे  ऍप आपणास  गुगल  प्ले स्टोअरवरून खालील लिंक वरून डाउनलोड करता  येईल.
https://play.google.com/store/apps/details?id=com.dnyandeep.padhe




Friday, September 23, 2016

सय काव्यसंग्रह


मनोगत  
सौ. शुभांगी सु. रानडे 


 प्रिय वाचकहो,

 एक नवा कवितासंग्रह घेऊन पुनः एकदा मी आपल्या भेटीला येत आहे.
काव्यदीप व सांगावा हे माझे दोन काव्यसंग्रह प्रसिद्ध झाल्यानंतर आपल्याहातून सय हा तिसरा काव्यसंग्रह लिहून होईल असे वाटले सुद्धा न्व्हते. पण आज तो योग आला आहे खरे.
यासाठी मला मनापासून आभार मानायचे आहेत ते त्या देवरायाचे. त्याने आपल्याला किती म्हणून द्यायचे ? आपल्या दोन्ही हातांच्या ओंजळीत मावणार नाही एवढे भरभरून सुख सुख दिले आ्हे त्याने. त्यामुळॆ त्याचे गुणगान करणारे शब्द हे आपोआप कवितारूप घेऊन आले. तसे लग्नाच्या अगोदर पुण्याच्या पेंडसे चाळीतील एका लहानशा खोलीत राहणार्‍या मला स्वतःच्या मोठ्या घरात-बंगल्यात राहिल्यावर माणसांची सोबत तशी थोडी कमीच; पण निसर्गाची, झाडाझुडपांची, कुत्र्यामांजरांसारख्या प्राण्यांची व विविध प्रकारच्या पक्ष्यांची सोबत मात्र भरपूर मिळाली. त्यामुळेच ही सर्व मंडळी कवितारूप कधी झाली ते समजलेच नाही.

यअ कवितांची मला मोठी मौज वाटते.प्रत्येक कविता अगदी थाटामाटात येते. तिचा पेहराव, दागदागिने, वेगवेगळ्या प्रकारचे असतात. प्रत्येकीचा नखरा काही औरच अवतो. कधी रुमझुम रुमझुम पैजणांचा नाजुकसा नाद करत, हातातल्या बांगड्यांची किणकिण करत, कधी लहान बाळासारख्ही दुडुदुडु धावत, कधी  ठुमकत ठुमकत, कधी  मधुर चिवचिव करत, कधी भ्रमरासारखा गुंजारव करत, तर कधी कोकिळेसारखा मंजुळ कुहूरव करतगाण्याची चाल लडिवाळपणे माझ्यापाशी कधी लगट करते तेकळतच नाही. आणि मग शब्दांचे थवेच्या थवे कोठूनसे येतात व त्या गेय कवितेच्या गाडीत जागा पटकविण्यासाठी त्यांची एकच झुंबड उडते. त्यातून निवड करून योग्य त्या शब्दांना जागा मिळवून देण्याचे काम माझ्याकडून केले जाते. बाकी सर्व आपोआप जुळून येत असावे असे मला वाटते. देवाजीची किमया दुसरे काय !

देवाचे आभार मानायचे दुसरे कारण म्हणजे त्याने संसारात सोबतीला देलेला जोडीदार डॉ. सु. वि. रानडे हे होय. पुष्पासंगे मातीस वास लागे, थोडीफार अशीच अवस्था झाली आहे माझी. म्हणजे असे की अत्यंत हुषारी पण तितकीच नम्रता, सुस्वभावी, समाधानी वृत्ती असणारा सहचर लाबल्यावर त्याच्या अंगच्या सद्‌गुणांचे काही कन माझ्यात उतरायला थोडा वेळ लागला खरा.

पण आनंद यातच की त्यामुळे आमच्यात कधीच साधा वादविवाद सुद्धा होत नाही. मग राग-लोभ तर दूरच ! जीवनातील प्रत्येक क्षेत्रात मला अनमोल मदत व योग्य ते मार्गदर्शन करणार्‍या माझ्या जीवनसाथीदारास माझे शतशः धन्यवाद ! केवळ धन्यवाद मानून ऋणातून उतराई न होता सदैव त्यांच्या ऋणात राहण्यातच मला अधिक आनंद आहे.

सोन्यासाराखी सुंदर मुले व नातवंडे माझ्या पदरात टाकणार्‍या देवाचे आभार मानण्यासाठी तर माझ्याकडे शब्दच नाहीत. संसारातील सर्व कर्तव्ये यथासांग पार पाडल्यानंतर आता मन अत्यंत तृप्त,सशांत, समाधानी झाले आहे. तसेच जीवनाचा पेला आनंदाने, समाधानाने काठोकाठ भरलेला आहे.

पुस्तक प्रकाशनाच्या बाबतीत ज्ञानदीपच्या सर्व सहकार्‍यांची लक्षणीय मदत झाली. तसेच छपाईचे कामही फारच थोड्या कालावधीत पूर्ण करून दिल्याबद्दल श्री सेल्स‌चेश्री. यशवंत पाटील यांचे आभार.
                                          सौ. शुभांगी सु. रानडे 
------------------------------------------------------
प्रस्तावना
सौ. सुमेधा गोगटे
कॅलिफोर्निया, अमेरिका
सौ. शुभांगी रानडे – माझी आई – यांचे काव्यदीप व सांगावा हे दोन काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले आहेतच. आज सय हा तिसरा काव्यसंग्रह प्रसिद्ध होत आहे.
‘सय’ म्हणजे आठवण. आठवण आई-बाबांची, भावाबहिणींची, मित्रमैत्रिणींची अगदी घरादाराचीही. माणूस अशा ह्या आठवणींमध्येच रममाण होत असतो. 
आई म्हणते त्याप्रमाणे ह्या कविता सुमधुर चालीतूनच जन्माला आल्या आहेत. त्यामुळे ह्या कवितांची खरी गोडी कळते ती प्रत्यक्ष तिच्या तोंडून ऎकल्यावरच. मात्र ह्या चाली  निवडण्याचे व त्यात समर्पक शब्द गुंफण्याचे कसब आईच करू जाणे. या पुस्तकात केवळ कविता असल्या तरी ह्या कविता वेबसाईट व सीडीवर ध्वनीफितींसह प्रसिद्ध केल्या असल्याने त्यांचा रसिकजनांना आस्वाद घेता येईल. 
मी आईला नेहमी म्हणते, ‘तुला ह्या कविता सुचतात तरी कशा?’ तर तिचे आपले साधे आणि एकच उत्तर – ‘अशाच सहज’. जरा विचार केल्यावर मला जाणवते आहे की ती ह्या कविता स्वतः जगतेच आहे सकाळी उठल्यापासून सडा, रांगोळी, फुले, पक्ष्यांचे आवाज, रेडिओवरचे भक्तिसंगीत या व अशा अनेक गोष्टीत ती गुंग झालेली असते. दारातल्या तुळशीचे मनही तिला कळते. पारिजातकाच्या झाडाशी ती गुजगोष्टी करते. आणि मागील दारी येणार्‍या मांजर-कुत्र्यांशीही तिचे संभाषण चालू असते.
या संग्रहातल्या तुळशीबाई, पारिजाताचा सडा, आंबामोहोर, सारमेयास - या कविता वाचताना मला आमच्या घरची सकाळ आठवते. नवे घर, मायेचा गाव, दिवाळीचा किल्ला, भूपाळी, गारा आल्या या कवितांमधून प्रत्येकाला आपल्या घराची, गारांच्या पावसाची, भूपाळीपासून संध्याकाळच्या परवच्यापर्यंत ऎकू येणार्‍या धुनींची आठवण आल्याशिवाय राहणार नाही.या कवितांमधून कवयित्रीचे संवेदनशील मन आपल्याला दिसते व भावतेही.
आमची आई सगळ्या देवांची पूजा मनोभावे करते तिने केलेले विठ्ठलाचे, शंकराचे, मारुतीचे, दत्ताचे, रामाचे स्तुतीगान तितक्याच भक्तिभावाने केले आहे. केवळ कर्मकांडापेक्षा मनापासून केलेली देवाची पूजा याला ती अधिक महत्व देते. जीवन, मनपाखरू, काळाची पायवाट, अखेरचे पर्व यासारख्या कविता आपल्याला जीवनाचे सार सांगून जातात. अंतर्मुख करून टाकतात. जगण्याचं सार्थक हे आनंदी व समाधानी राहण्यात आहे, हे शिकवितात.
सध्याचे जग माणसांना पैशामागे पळायला भाग पाडते. त्यामुळे माणसे जगण्याचा खरा अर्थच विसरून जातात. अशा आजच्या धावत्या जगात, निर्विकार, निरंतर आनंद देणार्‍या , वेळेच्या बंधनात न अडकणार्‍या कवितांची गरज आहे. या कवितासंग्रहातल्या कविता आठवणींवर आधारित आहेत. पण आठवण येऊन उदास करणार्‍या नाहीत. हुरहुर लावणार्‍या नाहीत. मुलं मोठी होऊन घराबाहेर गेल्यावर पालकांना वाटणारी ओढ,  काळजी यात आहे. घरापासून दूर गेलेल्या आम्हा मुलांना आईवडिलांची आठवण आली की या कविता मनाला शांतता, दिलासा देतात. आईवडील सदैव आपल्याबरोबर आहेत याचा अनुभव देतात.
विषय छोटा असो वा मोठा. आमची आई हाडाची शिक्षिका असल्याने कितीही अवघड विषय असला तरी तो सोपा करून कसा सांगावा हे तिला चोख जमते. म्हणूनच अगदी साध्या शब्दांमधूनही उदाहरणे देऊन मोठे गहन विचार मांडण्याची हातोटी या कवितांमधून दिसते.
सौ. सुमेधा गोगटे
कॅलिफोर्निया, अमेरिका
----------------------------
Say Poem App and enjoy reading the poems and listen them in Shubhangi's her own voice

Sangava

Kavyadeep

Tuesday, September 20, 2016

मराठी पाढे पाठांतर ऍप लोकप्रियतेच्या शिखरावर



यावर्षी जानेवारीत तयार केलेले "मराठी पाढे  पाठांतर"  हे  ऍप लोकप्रियतेच्या शिखरावर पोचले असून आतापर्यंत ३७००० वर लोकांनी ते डाउनलोड केले आहे. "जुनी  कालबाह्य पद्धत"  असा एखादा नकारात्मक अभिप्राय वगळता इतर सर्वांनी   याचे स्वागत केले आहे.  यास संगीताची जोड द्यावी तसेच इंग्रजी माध्यमातही ऍप करावे अशा  बऱ्याच सूचना आल्या  आहेत
या प्रतिसादामुळे आम्हाला हुरूप आला असून असे अनेक एप विकसित करण्याचे आम्ही ठरविले आहे.
https://play.google.com/store/apps/details?id=com.dnyandeep.padhe

Sunday, October 18, 2015

मराठी पाढे पाठांतर

मराठी माध्यमातील प्राथमिक शाळेत शिकणार्‍या मुलांसाठी ज्ञानदीपने मराठी पाढे पाठांतर ही सुविधा तयार केली आहे. या सुविधेत २ ते ३० पर्यंतचे पाढे ध्वनीफितींसह दिले असून पाढे म्हणताना करावयाचे उच्चारही शब्दात दिले आहेत. त्यांचा उपयोग करून मुले स्वत: सर्व पाढे पाठ करू शकतात.
गणितात प्राविण्य मिळविण्यासाठी पाढे पाठ असणे ही एक अत्यावश्यक गोष्ट आहे. मराठी बालसंस्कृतीचा तो एक अमूल्य वारसा आहे व त्याचे जतन व संवर्धन करण्यासाठी या सुविधेचा निश्चित उपयोग होईल असे वाटते. पाढे पाठ का करावेत याविषयी माझा आधीचा पाढे पाठांतर  हा लेख पहावा.
खाली यातील काहील पाने दाखविली आहेत.
सर्व मराठी शाळा तसेच पालकांनी ही सुविधा गुगल प्ले स्टोअरवरून डाऊनलोड करून घ्यावी ही विनंती.

Wednesday, September 23, 2015

पाढे पाठांतर

 कोणी काही म्हणो. बालवयात बुद्धी आणि उच्चार यात जलद प्रगती हवी असेल तर पाठांतरास पर्याय नाही. अंकगणित शिकताना पाढे पाठ असतील तर अंकगणित शिकणे फार सोपे जाते.

 अगदी एक ते शंभर अंक लिहिताना देखील एक एके एक, दोन एके दोन, एकावर एक अकरा असे मोठ्याने तालात म्हटल्यास लिहिण्याकडे लक्ष राहते व अंक लवकर पाठ होतात.

एक ते शंभर अंकांची ओळख झाली व ते लिहिणे व वाचणे जमू लागले की पहिला टप्पा म्हणजे बेचे पाढे पाठ करणे. बे म्हणजे दोन. गेयता असल्यास  पाठांतर लवकर होते. यासाठी दोन ऎवजी बे या सोयीस्कर शब्दाचा वापर केला जातो.

 पाढे पाठ करताना दोन दोन ओळीत पाठ करावे. म्हणजे बे एके बेए, बे दुणे चार. यांनंतर थोडे थांबून पुढच्या दोन ओळी म्हणाव्या. सर्व ओळी पाठ झाल्या की मग सलगपणे संपूर्ण पाढा म्हणावा. २ ते १० पर्यंतचे पाढे पाठ झाले की सलगपणे सर्व पाढे म्हणण्याचा सराव करावा.

याचप्रमाणे अकराचे व एकवीसचे पाढे पाठ करावेत. शाळेत शिक्षकांनी व घरात पालकांनी असे पाढे नियमितपणे म्हणवून घ्यावेत.

 मला आठवते. लहानपणी प्राथमिक शाळेत असताना दर शनिवारी प्रार्थना झाल्यावर बेच्या पाढ्यापासून सुरुवात करून तीसच्या पाढ्यापर्यंत सर्व पाढे विद्यार्थी मोठ्या आवाजात एका कोरसमध्ये म्हणत असत. कोणत्या वर्गाचा आवाज मोठा अशी त्यावेळी चढाओढही लागे. यात ज्या मुलाचे पाढे पाठ नाहीत त्याचेही  पाढे आपोआप पाठ होण्यास मदत होत असे. देवाच्या आरत्या जशा एकत्र म्हटल्याने आपोआप पाठ होतात तसेच पाढ्यांच्या बाबतीतही होते.

इंग्रजी माध्यमातील मुलेही टू टूज आर फोर ( Two twos are Four),   टू थ्रीज आर सिक्स (Two threes are Six) या पद्धतीने पाढे पाठ करू शकतात.

काही पालक विद्यार्थ्याला क्रमवार बेरीज करून पाढे तयार करायला शिकवितात. पाढ्यातील कार्य-कारण भाव (लॉजिक)  त्यामुळे मुलाला कळेल व पाठांतराची गरज भासणार नाही असे त्यांना वाटते. मात्र या पद्धतीने शिकविल्यास लॉजिक कळले तरी प्रत्येक संख्या काढताना गणिती क्रिया करावी लागते व त्यात वेळ जातो. मात्र पाढे पाठ असणारा मुलगा चटकन उत्तर देऊ शकतो.

पाढ्यातील कार्य-कारण भाव समजणे आवश्यक असले तरी पाढे पाठ केल्यानंतर ते शिकवणे अधिक श्रेयस्कर ठरेल.

भाषा शिकताना देखील आपण वाचलेली किंवा ऎकलेली वाक्ये वापरतो व नंतर त्यातील व्याकरणाचा अभ्यास करून नवी वाक्ये तयार करायला शिकतो. अंकगणित शिकताना हीच पद्धत वापरणे सोयीचे ठरते.

पाढे पाठ करणे सोपे जावे यासाठी ज्ञानदीपने पाढे या नावाचे एक अँड्रॉईड एप विकसित केले आहे. त्यात बे पासून तीसपर्य़ंत पाढे यांचा उच्चार व ध्वनीफितींसह समावेश केला आहे. गुगल प्लेस्टोअरवर हे ऎप लवकरच उपलब्ध करण्यात येईल.


Wednesday, March 4, 2015

New Android App - Anusha and Ojas in Wonderland

Dnyandeep has launched  a new android app based on stories published on this blogsite.
Visit Link - https://play.google.com/store/apps/details?id=com.ssbakshi.anushaandojasinwonderland&hl=en



Anusha, a small girl in first standard gets fascinated by the story book "Alice in Wonderland". She finds herself as Principal of magic maths school where the students are geometry objects i.e. points, lines, triangles, polygons & circles.She learns many properties of these objects while interacting with then as a teacher. She understands the significance of these objects in maths as well as their presence in nature.

Ojas, elder brother of Anusha is fan of science. He meets Anusha in her dream and both search for magic science school. Ojas discovers elementary & secondary schools where atoms & molecules are trained to learn their properties before going to real world.The story contains many imaginary and interesting episodes. The story will go ahead to reveal all other sciences in future.


Dnyandeep Infotech Pvt. Ltd. Sangli, plans to develop such interesting educational applications for kids so that they can learn the subjects with fun