Thursday, November 16, 2017

जीवाणूविषयक गुणधर्म कसोट्या

ज्या पाण्यात कॉलीफार्म जिवाणूंची संख्या एका विशिष्ट मर्यादेपेक्षा कमी असते त्या पाण्यात रोगजंतू नसतात असे अनुभवाने कळून आले आहे. आंतरराष्ट्रीय पिण्याच्या पाण्याच्या परीक्षांमध्ये ही मर्यादा दिलेली असते. पाण्याच्या नमुन्यात आढळणाऱ्या कॉलीफार्म जिवाणूंची संख्या, ही संख्याशास्त्राप्रमाणे दर १०० मिली. पाण्यात असणारी कॉलीफार्म जीवाणूच्या ‘कमाल संभाव्य संख्या’ (Max Probable Number) या परिमाणात मोजली जाते. व त्याला एम.पी.एन. निर्देशांक असे म्हणतात. प्रक्रिया केलेल्या पाण्यासाठी आंतरराष्ट्रीय परीक्षा प्रमाणे खालील गोष्टींची आवश्यकता असते.

“कोणत्याही एका वर्षात तपासलेल्या पाण्याच्या एकंदर नमुन्यांवर ९० टक्के नमुन्यात कॉलीफार्म जीवाणू किंवा त्या जिवाणूंचा MPN निर्देशांक १.० पेक्षा कमी हवा. तपासलेल्या कोणत्याही पाण्याच्या नमुन्यात कॉलीफार्म जिवाणूंचा निर्देशांक १० पेक्षा जास्त असता कामा नये.
ओळीने तपासलेल्या नमुन्यांत MPN निर्देशांक ८ ते १० पर्यत असू नये. १० मिली. पाण्याचे ५ भाग घेतलेले असतील तर ओळीने तपासलेल्या नमुन्यात त्या पाच भागापैकी तीन भाग धन असतात किंवा त्यात जीवाणू असल्याचे समजते. (पाच पैकी ३ भाग धन असतील तर MPN निर्देशांक ९.२ असतो.)

कोणत्याही वेळी जर ओळीने तपासलेल्या दोन नमुन्यांत कॉलीफार्म जिवाणूंचा MPN निर्देशांक जर ८ पेक्षा जास्त असेल तर नमुना घेतलेल्या दोन त्याच जागेतून आणखी एक वा जास्त नमुने लगेच घ्यावेत. कमीतकमी ही गोष्ट तरी केली पाहिजे. यावेळी वितरण व्यवस्थेतील निरनिराळ्या ठिकाणांहून पाण्याचे नमुने घेऊन त्यांची तपासणी करणे इष्ट असते. पाण्याचे नमुने घेऊन त्यांची तपासणी करणे ईस्ट असते. पाण्याचे उगमस्थान, जलाशय, पंप घर आणि जलशुद्धीकरण केंद्र या ठिकाणांहून नमुने घेऊन त्यांचीही तपासणी करावी. या शिवाय जलशुद्धीकरणकेंद्रातील प्रक्रियांच्या कार्यपद्धतीतील दोष ताबडतोब शोधून काढावा”


दररोज पाण्याच्या अनेक नमुन्याची नेहमीच्या पद्धतीने जीवाणू परीक्षा केली जाते. या परीक्षांवरून MPN निर्देशांक काढण्यासाठी आंतरराष्ट्रीय पिण्याच्या पाण्याच्या या पुस्तकात दिलेल्या कोष्टकाचा उपयोग करावा. उदाहरणार्थ १० मिलीचे पाच भाग तपासले तर येऊ शकणाऱ्या धन व ऋण निष्कर्षाच्या जोड्यावरून MPN निर्देशांक खालीलप्रमाणे ठरविता येईल.

प्रत्येक नमुन्यातील १० मिलीच्या पाच भागांची परीक्षा घेतल्यानंतर येणारे निष्कर्ष 
MPN निर्देशांक 

+ -
< . 
+ -
.
+ -
.
+ -
१६.
+ -
>१६.

पाणी पुरवठा केलेल्या भागातील लोकसंख्येतरोग्यांचे प्रमाण, मलजल वा प्रदुषित पाणी यात असणाऱ्या सल्मोनेला टायफोसा व इस्करेशिया कॉली या जीवाणूंच्या गुणोत्तराच्या संदर्भात वरील प्रमाण दिले आहे.
दर १००००० लोकसंख्येतील टायफाईड रोग्यांची एका वर्षातील संख्या  
एक दशलक्ष इस्करेशिया काली बरोबर असणाऱ्या साल्नेनिला टायफोसा जीवाणूंची संख्या 
 
१०
५०
१९
१००
२६
अमेरिकन पाणीपुरवठा संघटना (१९५०) पान ४१

यावरून जीवाणू परीक्षेच्या कसोटीचा साधा व्यवहार्य अर्थ असा की रोजच्या नमुन्यातील ९० टक्के नमुन्यामध्ये १० मिलीचा एकही भाग धन नसावा म्हणजेच ९० टक्के नमुन्यांचा MPN निर्देशांक २.२ पेक्षा कमी असावा. 


या कसोट्यांचा दुसरा नियम पहिल्याच्या बदली चालू शकतो तो म्हणजे ओळीने तपासलेल्या नमुन्यांतील ९० टक्के नमुन्याच्या MPN निर्देशांक १.० पेक्षा कमी असावा प्रत्येक नमुन्याच्या १० मिलीच्या ५ भागांची परीक्षा करून हा १.० निर्देशांक ठरवता येत नाही. १.० वा त्यापेक्षा कमी असलेला निर्देशांक ठरविण्यासाठी प्रत्येक नमुन्यातील १०० मिलीच्या पाच भागांची परीक्षा करावी लागते व १०० मिली वा त्यापेक्षा जास्त पाण्याची परीक्षा करावयाची असेल तर पडद्याच्या गाळण पद्धतीची (Membrane Filter Techniques) वापर करावा लागतो प्रत्येक नमुन्यांतील १०० मिलीच्या पाच भागांची परीक्षा केल्यास त्याचे निष्कर्ष खालीलप्रमाणे मांडता येतात.
प्रयेक नमुन्यातील १०० मिलीच्या पाच भागांची कॉलीफार्न जीवाणूसाठी परीक्षा घेतल्यानंतर येणारे निष्कर्ष 
MPN निर्देशांक 
+ -
< .२२
+ -
.२२
+ -
.५१
+ -
.९२
+ -
.
+ -
>.६०

यावरून हे उघड होते की वरील पद्धतीप्रमाणे परीक्षा घेतली असता, पाणी कसोटीच्या दुसऱ्या नियमास उतरण्यासाठी १०० मिलीच्या पाच भागांपैकी जास्तीत जास्त ३ भागात कॉलीफार्न जीवाणू असल्याचा निष्कर्ष निघाला तरी चालतो. याच प्रकारे पडद्याच्या ५०० मि.ली. पाण्याची परीक्षा केल्यावर एकंदर कॉलोफार्न जिवाणूंची संख्या ५ पेक्षा कमी आली तर ते पाणी एन.पी.एन. निर्देशांक १.० पेक्षा कमी असण्याच्या कसोट्यास उतरते कारण MPN निर्देशांक १.० असणे याचा अर्थ १०० मिली पाण्यात १ जीवाणू असा होतो. कसोट्यांच्या तिसऱ्या नियमाचा अर्थ थोडा गुंतागुंतीचा आहे.

त्याचा मुख्य अर्थ असा ती जर ओळीने घेतलेल्या बहुतेक नमुन्यांचा MPN निर्देशांक १.० पेक्षा कमी असेल तर त्यातील एखाद्या नमुन्याचा निर्देशांक योगायोगाने कधीतरी २.२, ६.१ किंवा ९.२ आला पण तो जर १० पेक्षा कमी असला तर ते पाणी कसोटीस उतरले असे धरण्यास हरकत नसते. कारण नमुन्यामध्ये जीवाणूंची विभागणी समप्रमाणात झालेली नसते. तथापि जर ओळीने घेतलेले नमुन्यातील १० मि.ली. भाग धन निष्कर्ष देऊ लागले. म्हणजे निर्देशांकाचे मूल्य ९.२, १६ किंवा त्यापेक्षा जास्त दर्शवू लागले तर मात्र नमुने घेतलेल्या पाण्याचे प्रदुषण MPN निर्देशांक १ पेक्षा कमी नसून बऱ्याच वरच्या पातळीचे असते व येणारे निष्कर्ष योगायोगाने किंवा घेताना होणाऱ्या चुकांमुळे नसून प्रत्यक्ष पाण्यातील दोष असतो, हे सिद्ध झाले होते. असे निष्कर्ष आले की ताबडतोब नमुने घेतलेल्या त्याच ठिकाणी आणखी नमुने घावे लागतात व प्रक्रिया पद्धतीत आणि क्लोरिनीकरणात योग्य ती सुधारणा करावी लागते.

पडद्याच्या गाळण पद्धतीने परीक्षा केली असता या कसोट्यांचा नियम खालीलप्रमाणे असतो. लोकांना पुरविल्या जाणाऱ्या पाण्यातून नमुने घेऊन ते तपासल्यास त्यापैकी ९० टक्के नमुन्यातील दर १०० मिली पाण्यात १ पेक्षा कमी कॉलीफार्म जीवाणू असावेत वा ओळीने घेतलेल्या कोणत्याही नमुन्यातील दर १०० मिली पाण्यात १० पेक्षा जास्त कॉलीफार्म जीवाणू नसावेत.
अमेरिकन सार्वजनिक आरोग्य खाते यांच्या पिण्याच्या पाण्याच्या कसोट्या (१९६२) या पुस्तकांत पडद्याच्या गाळण पद्धतीचा वापर करून काढलेले निष्कर्ष, उत्क्षोभण परीक्षानळीच्या येणाऱ्या निष्कर्षाप्रमाणे, खालीलप्रमाणे मांडले आहेत.
प्रयेक महिन्यात, पडद्याच्या गाळण पद्धतीने तपासलेल्या सर्व प्रमाणित नमुन्याची सांख्यिक सरासरी धन्यता काढल्यास ती दर १०० मिलीला १ पेक्षा जास्त असता कामा नये. ( १०/१०० मिली) प्रयेक प्रमाणित कॉलीफार्म जिवाणूंचे एकूण गट, ३/५० मिली, ४/१०० मिली, ७/२०० मिली, किंवा १३/५०० मिली पेक्षा जास्त खालील परिस्थितीत असू नयेत. 
ओळीने घेतलेले दोन नमुने
एका महिन्यात २० पेक्षा कमी नमुने तपासले असतील तर एकापेक्षा जास्त प्रमाणित नमुने
एका महिन्यात २० किंवा २० पेक्षा जास्त नमुने तपासले असतील तर ५ टक्क्यांपेक्षा जास्त प्रमाणित नमुने

सूचना:- प्रमाणित पुरवठा करताना खालील गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. (अ) रोजच्या पाण्याच्या नमुन्यातील कोणत्याही एका नमुन्यात कॉलीफॉर्म जीवाणू आढळणार नाहीत असे उद्दिष्ट ठेवून पाणी पुरवठ्यावर देखरेख ठेवावी लागते. (आ) पूर्वी सांगितल्याप्रमाणे १०० मिलीपेक्षा जास्त पाण्याचे भाग तपासले नसतील तर MNP निर्देशांक दर १०० मिली ला १ पेक्षा कमी असणारे मूल्य, योग्य तऱ्हेने दर्शवू शकत नसल्याने, अशा वेळी महिन्याला सरासरी एन.पी.एन. निर्देशांक १०० मिली ला १ एवढा येणे शक्य नसते. 


असंस्कारीत पाण्याचा गुणधर्म कसोट्या पिण्याच्या पाण्याच्या वर दिलेल्या कसोट्यामुळे लोकांना पुरविल्या जाणाऱ्या या असंस्कारीत पाण्यातील प्रदुषणाच्या अनुज्ञेय प्रमाणावर मर्यादा पडते. खाली दिलेल्या कसोट्या (पिण्याच्या पाण्याच्या आंतरराष्ट्रीय कसोट्या १९६२) या सार्वजनिक पाणीपुरवठ्यासाठी वापरावयाच्या पाण्यासंबंधी आहेत. या पाण्यात होणाऱ्या प्रदुषणाचा दर्जा त्यामुळे कळू शकतो व पाण्यावर प्रक्रिया करणे व प्रक्रिया करण्यासाठी पाणी योग्य आहे का नाही हे या कसोट्यामुळे दर्शविले जाते. 

No comments:

Post a Comment