सोडियम हायपोक्लोराईट :- कित्येक देशामध्ये सोडियम हायपोक्लोराईटचे द्रावण विकत मिळू शकते हे द्रावण बाजारात निरनिराळ्या नावांनी विकले जाते व द्रावणाचे स्वरूप या नावांवरून येईलच असे नसते ही द्रावणात बहुधा वजनी मापाने ३ ते १५ टक्के उपलब्ध क्लोरिन असतो व अल्कत बरीच जास्त असल्याने ही द्रावणे त्यामानाने चांगली टिकाऊ असतात या द्रावणात संधारित कर्णे नसतात त्यामुळे ही द्रावणे पाण्यात मिसळतात नळी तुंबण्याची शक्यता नसल्याने क्लोरिनीकरणाचेकार्य सुलभ होते.
बरेच दिवसापासून प्रसिद्ध असलेले जोव्हेल पाणी किंवा या दि जोव्हेल हे सोडियम हायपोक्लोराईटचेच नांव आहे. ज्या देशांत पूर्वी फ्रेचांचा प्रभाव होता त्या ठिकाणी घ्या द्रावणाचा क्लोरोमेट्रीक अशांत मोजला जातो एक अंश तीव्रता म्हणजे एक कि.ग्रॅ. द्रावणाची ऑक्सीकरण क्षमता ३.१७ ग्रॅम क्लोरिनच्या क्षमते इतकी असणे.
विशेषाधिकार असलेल्या लेबल पद्धतीप्रमाणे सोडियम हायड्रोक्साईडच्या द्रावणात वायुरूप क्लोरिन मिसळून सोडियम हायपोक्लोराईट द्रावण तयार करता येते. खाली दिलेल्या पद्धतीप्रमाणे धुण्याच्या सोड्यात चुन्याचे क्लोराईड घालून देखील हे द्रावण तयार करता येते. सोडियम हायपोक्लोराईटचे द्रावणात थंड जागेत व काळ्या रंगाच्या बुधल्यात ठेवावे व वापरण्याच्या वेळीच फक्त बाहेर काढावे. नंतर या द्रावणाचे आवश्यकतेप्रमाणे अवमिश्रण करता येते. द्रावण पोषक यंत्रणेचा वापर करणे सुलभ व्हावे यासाठी ०.५ टक्के किंवा १.० टक्के तीव्रतेचे अवमीश्रीत द्रावण वापरण्यात येते.
चुन्याचे क्लोराईड:-
विरंजक चूर्ण किंवा चुन्याचे क्लोराईड १२ औस व १० पौंडाच्या डब्यातून वा १०० आणि ३०० पौंडाच्या पिंपातून विकत घेता येते. पण निरनिराळ्या देशात यांचे आकार वेगवेगळे असू शकतात हे जंतुनाशक चूर्ण नाशवंत असल्याने त्यामानाने थोडया थोडया प्रमाणात पण जास्त वेळेला ते विकत घेणे इष्ट असते. चूर्ण प्रत्यक्ष वापरण्याची वेळ येई तोपर्यत त्याचे डबे वा पिंपे उघडू नयेत व डबे व पिपे थंड व कोरडया जागेत साठवून ठेवावीत. बाजारात मिळणाऱ्या चुन्याच्या क्लोराईडमध्ये सुमारे २५ ते ३७ टक्के वजनापर्यंत उपलब्ध क्लोरिन असतो नुकत्याच फोडलेल्या डब्यांतील चुन्याच्या क्लोराईडमध्ये ३३ टक्के उपलब्ध क्लोरिन आहे असे निर्धोकपणे गृहीत धरणे बहुधा योग्य असते माल किती दिवस साठवून ठेवला होता हे निश्चित तर मात्र गृहीत तीव्रतेत किती घट झाली हे ठरविता येते
चुन्याच्या क्लोराईडमध्ये बऱ्याच जास्त प्रमाणात चुना असून तो अविद्राव्य असतो त्यामुळे या टाकी असणे इष्ट असते. या टाकीत चुन्याचे क्लोराईड पाण्यात घालून ते भरपूर ढवळावे व नंतर अविद्राव्य पदार्थ तळाशी द्यावेत वरच्या बाजूस असणारे स्वच्छ द्रावण वक्रनलीकेने साठवण्याच्या टाकीत घ्यावे व तेथे आवश्यक तेवढी तीव्रता होईपर्यत त्याचे अवमिश्रण करावे. सर्वसाधारणपणे १ टक्का उपलब्ध क्लोरिन असणारे द्रावण वापरण्यात योग्य असते अशा तऱ्हेने तयार केलेले द्रावण १४ दिवस उजेडात राहिले व भोवताल तापमान सुमारे २१ अंश सें (७० फॅ) असले तर या द्रावणातील सुमारे ७१ टक्के उपलब्ध क्लोरिन निघून जातो असे काळजीपूर्वक अभ्यासानंतर कळून आले आहे. जर हे द्रावण उजेडापासून दूर ठेवले तर ही घट फक्त ३ टक्क्यांनी असते यामुळे कमीतकमी दोन आठवडे पुरेल इतक्या द्रावणासाठी असणाऱ्या मोठया टाक्या असल्या तरी उपलब्ध क्लोरिन विशेष कमी होत नाही हे कळून येईल.
जास्त तीव्रतेची कॅलशियम हायपोक्लोराईट रसायने चुन्याच्या क्लोराईडपेक्षा बऱ्याच वरच्या दर्जा कॅलशियम हायपोक्लोराईटचे अनेक प्रकार बाजारात मिळतात चुन्याच्या क्लोराईडपेक्षा हा बारीक रवाळ पदार्थ बराच जास्त टिकाऊ असतो त्यामुळे चुन्याच्या क्लोराईड मानाने या पदार्थांतील क्लोरिनचे प्रमाण वजनी मापाने ६५ ते ७० टक्के एवढे असते.
कॅलशियम हायपोक्लोराईटचे जास्त तीव्रतेचे प्रकार मिळू शकतात हे पदार्थ गोळ्यांच्या स्वरुपात असतात व प्रत्येक गोळीचे वजन १/१०० पौंड असते. कमी प्रमाणात या पदार्थाचा उपयोग करावयाचा असेल तर गोळ्या फार सोईस्कर पडतात. कारण पदार्थाचे प्रत्येक वेळी वजन करावे लागत नाही. ही संयुगे त्यांच्या मूळच्या डब्यांतच ठेवावी म्हणजे आद्रतेपासून त्यांचा बचाव करता येईल साठवण्याची जागा शक्य तेवढी थंड असावी व सूर्यप्रकाश किंवा इतर उष्णता निर्माण करणाऱ्या वस्तूपासून दूर असावी. असे नसेल तर उष्णतेने पदार्थातील क्लोरिन वायू वेगळा होऊन साठवण्याचा डब्याचा स्फोट होण्याइतका जास्त प्रमाणात तो तयार होईल तेल किंवा इतर कार्बनी पदार्थ या पदार्थाच्या संपर्कात येणार नाही याची काळजी घ्यावी अन्यथा स्फोट होण्याची शक्यता असते. जास्त तीव्रतेच्या कॅलशियम हायपोक्लोराईट पासून तयार केलेले द्रावण अंधाऱ्या जागेत कमीत कमी दोन आठवडे ठेवले तरी त्यातील क्लोरिनमध्ये विशेष घट होत नाही.
No comments:
Post a Comment