Thursday, November 16, 2017

पाण्यात फ्लोरिडीकरण करण्याची पद्धत

सार्वजनिक पाणीपुरवठ्यात फ्लोराईड मिसळण्याच्या पद्धती किलाटन पद्धतीसारख्याच असतात. सर्वात मोठा फरक म्हणजे फ्लोरिडीकरणात रसायनांच्या मात्रेवर जास्त अचूक नियंत्रण ठेवावे लागते. पण प्रकिया करावयाच्या पाण्याचे तापमान वा इतर गुणधर्म यात काहीही बदल झाला तरी फ्लोराईडचे प्रमाण एकसारखेच लागत असल्याने असे नियंत्रण ठेवणे फार सोपे जाते. कोणत्याही गुंतागुंतीच्या पद्धतीचा येथे वापर करावा लागत नाही व प्रयोगशालेय नियंत्रणासाठी देखील एकच परीक्षा घ्यावी लागते. 

फ्लोराईड रसायने:-  
               
फ्लोरिडीकरणासाठी अमेरिकन बाजारी सोडियम फ्लोराईड, सोडियम सिलीकोफ्लोराईड, फ्लूओसिलीसिक आम्ल व अमोनियन सिलीकोफ्लोराईड या रसायनांचा आतापर्यत वापर केला गेला आहे. हायड्रोफ्लोरिक आम्ल हे तीव्र क्रियाशील व संक्षारक असल्याने, फक्त एका ठिकाणी वापरल्यानंतर त्याचा कोठेही वापर केला गेला नाही. फ्लूओसिलीसिक आम्ल हा अतिशय तीव्र द्रव असल्याने फक्त काचेच्या बरण्यात वा रबराचे अस्तर असणाऱ्या पिंपात भरूनच त्याची वहातूक करावी लागते. अमेरिकेत अमोनियम सिलिका फ्लोराईड फक्त मर्यादित प्रमाणातच मिळू शकते. ही सर्व रसायने विषारी असतात. म्हणून त्यांची वहातूक करताना व हाताळताना काय काळजी घावी लागते. त्याविषयी खाली माहिती दिली आहे. 

सोडियम फ्लोराईडपेक्षा सोडियम सिलीकोफ्लोराईड स्वस्त असते व त्यातील फ्लोराईडही जास्त प्रमाणात असते परंतु ते बारीक भुकटीच्या स्वरुपातअसल्याने त्यामुळे धूळ तयार होते व या रसायनांची पाण्यातील विद्राव्यताही फार कमी असते. कोष्टक क्र. १३ मध्ये या दोन्ही रसायनांचे गुणधर्म एकत्रितपणे दिलेले आहेत. फॉस्फेट रॉक, फ्रीऑन वायू इत्यादी पदार्थचे मोठया प्रमाणावर उत्पादन करीत असता उत्पादनाची दुय्यम वस्तू आणून फ्लूओसिलीसिक आम्ल तयार होते वा आम्लाचे उदासिनीकरण केले कि सोडियम सिलीकोफ्लोराईड तयार होते.

गुणधर्म  सोडियम फ्लोराईड  सिलीको फ्लोराईड 
सूत्र
रेणूभार  
स्वरूप
शुद्धता:
फ्लोराईड संयुगांचे शेकडा प्रमाण 
फ्लोराईड आयनाचे शेकडा प्रमाण 
एकूण घनता { किग्रॅ./ घनमीटर
पौंड/ चौ. फूट
प्रत्येक भा/दलभा फ्लोराईड
आयनासाठी असणारे संयुगाचे वजन 
किग्रॅ./१००० घनमीटर
पौंड/दल ब्रि. गॅलन
पौंड/दल अने. गॅलन
विद्राव्यता सें (३२कॅ) तापमानास पौंड/ १०० पौंड मध्ये
१५(६० कॅ) तापमानास १०० पौंडमध्ये १५(६० कॅ) तापमानास एक एकक आकारमानाच्या संतृप्तद्रावासाठी बाजारी संयुगाचे लागणारे वजन
ग्रॅम/ लिटर 
पौं./ब्रि. गॅलन
पौं./अने.गॅलन



भा/दलभा फ्लोराईड आयनसाठी लागणाऱ्या संतृप्त द्रावाचे आकारमान 
लिटर/१००० घनमीटर } गॅ./दल आनें. गॅलन

टक्का तीव्रतेचा दर एकक आकारमानाच्या द्रावणासाठी लागणारे संयुगाचे वजन 
गॅ./ लिटर
पौं./ब्रि. गॅलन
पौं./अने.



भा/दलभा फ्लोराईड आयनासाठी लागणाऱ्या टक्का तीव्रतेच्या द्रावणाचे वा घट्ट द्रावणाचे आकारमान लिटर/ १००० घनमीटर किंवा गॅ./ दशलक्ष गॅलन 



टक्का तीव्रतेच्या द्रावणाचे पी.एच.    संतृप्त द्रावणाचा पी.एच.
      
NAF
४२
बारीक भुकटी वा दाणेदार 

९५


४३
१२००

७५




.३२
२३.
१९.

.




.१९





४४.
.४४
.३७







५०.







१०. 
.१०४
.०८७






२३२










.

. 

NaSiF6               
१८८
बारीक भुकटी

९९


६०
११५०Bulk 

७२Dinsity 




.६७
१६.
१४.

.४३




.६२





.
.०६२
.०५२







२६९








संतृप्तेपेक्षा जास्त
   तीव्र 






१६७










-

.


फ्लूओसिलीसीक आम्ल रबरांचे अस्तरअसलेल्या स्टीलच्या पिपांतून किंवा काचेच्या बरण्यांतून विकत मिळते. हे आम्ल एकतर अवमिश्रित नसावे किंवा १ भाग आम्लास २० किंवा जास्त भाग पाणी घालून त्याचे अवमिश्रण केलेले असावे. अन्यथा त्याचा अविद्राव्य सांका तयार होतो म्हणून पिपांतून वा बरणीतून बंद नळीवाटे हे पाण्यात मिळणेच इष्ट असते कारण त्यामुळे या आम्लाच्या वाफा बाहेर पडत नाहीत. जर काही अवमिश्रण करावयाचे असेल तेही बंद टाक्यांत करावे लागते. हायपोक्लोराईट पोषक यंत्रणा टोपी पट्ट्यांचे पंप असणारी पोषक यंत्रणा वापरावी लागते.

 सर्वसाधारणपणे सांगायचे तर लहान केंद्रासाठी दाणेदार सोडियम फ्लोराईड वापरणे जास्त योग्य असते कारण धूळ नियंत्रक यंत्रणेचा वापर करावा न लागता द्रावण पोषक यंत्रणेचा वापर करता येतो. तथापि जर आवश्यक असणारे प्रमाण तशी १० ग्रॅम (ताशी ४ औंस) पेक्षा म्हणजे कोरडया स्वरुपात पुरवठा करणाऱ्या यंत्रणेच्या खात्रीच्या किमान क्षमतेपेक्षा जास्त असेल तर सोडियम फ्लोराईडपेक्षा स्वस्त असणारे सोडियम सिलोकोफ्लोराईड वापरणे इष्ट ठरते. फ्लूओसिलीसीक आम्ल कोणत्याही लहान मोठया पाणीपुरवठ्यास योग्य असते फक्त त्याची उपलब्धता, व त्यास येणारा खर्च यावर त्याचा वापर अवलंबून असतो.

No comments:

Post a Comment