पाण्यातील क्लोरीन वायु मिसळण्यासाठी लागणाऱ्या यंत्रणेचे उत्पादन कित्येक संस्था करतात. अशा विविध रसायन सामुग्रीची मार्गदर्शन सूची वा वर्णनात्मक माहिती त्या त्या उत्पादकांकडून मिळू शकते. कोणत्याही पाणी पुरवठयासाठी त्या ठिकाणच्या विशिष्ट स्थानिक परिस्थितीत मिळू शकते. कोणत्याही पाणी पुरवठ्यासाठी त्या ठिकाणी विशिष्ट स्थानिक परिस्थितीत उत्तम कार्य करील अशी यंत्रणा निवडण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करावा.
क्लोरीनकारक खालील घटकांचा बनलेला असतो.
(१) धातूच्या पडद्यामुळे वा पाण्यावरील तरण गोल्यामुळे उघडझाप होणाऱ्या, झडप या वायूचा दाब कमी करतात. या वायूचा दाब कमी करतात.
(२) वायूचा दाब कमी होऊन एकसारखा झाल्यावर वहाणाऱ्या वायूचा वेग मोजण्यासाठी वापरली जाणारी छिद्रे आणि
(३) पाण्याचा नळात वायु सोडण्यासाठी कलेली उपकरणे
क्लोरीन वायु संरक्षक झडपेवाटे नळीतून प्रक्रिया करावयाच्या पाण्यात तसाच सोडवता येतो मात्र यासाठी पाण्याच्या नळावर बसविलेल्या खास विसारकास नळी जोड लागते. खास भरणपेटी व कॉर्पोरेशन तोटी वाटे विसारकाचे तोंड सच्छिद्र चांदीच्या गोळ्याचे वा कोर्बोरंडम दगडाचे केलेले असते. पाण्याचा क्लोरीन सोडण्याची नेहमीची यंत्रणा वापरण्यासाठी आवश्यक असणारा दाब ज्याठिकाणी पाण्याला नसेल त्याठिकाणी पाण्याचा दाब, १.७ वातावरण दाबापेक्षा (२५ पौंड/ चौ. इंच) कमी असेल ज्या ठिकाणीच केवळ या यंत्रणेचा वापर करता येतो.
कोरडया वायूचा पुरवठा करणाऱ्या यंत्रणेच्या बाबतीत थंड हवामान असताना आणखी एक अडचण निर्माण होण्याची शक्यता असते. विसारकातून पाण्यात जाणाऱ्या क्लोरिनचा ज्यावेळी थंड पाण्याशी संपर्क होतो त्यावेळी क्लोरीन वायु गोठून ‘क्लोरिनचा बर्फ’ तयार होतो. हा त्रास कमी करण्यासाठी विसारकाचे तोंड गरम करण्याची सोय असणारे विसारक मिळू शकतात. सर्वसाधारणपणे, प्रक्रिया करावयाच्या पाण्यात क्लोरीन वायु मिसळणे त्रासाचे जात असल्याने द्रावण करावयाच्या पाण्याला दाब नसेल तर क्लोरीनचे द्रावण पाण्यात सोडणाऱ्या यत्रास छोटी मोटार ( जनित्र ) वा पाण्याच्या दाबावर चालणारे पंप जोडून क्लोरिनचे द्रावण जास्त वेगाने पाण्यात मिसळत येते. ज्यावेळी दाबयुक्त पाणी, द्रावण करावयास उपलब्ध असेल तेव्हा त्या पाण्याचा दाब ज्या पाण्यात द्रावण मिसळायचे त्या पाण्याच्या दाबापेक्षा तिप्पट असला तर क्लोरीन मिसळण्याची क्रिया परिणामकारक होते.
द्रावण स्वरुपात क्लोरिनचा पुरवठा करणाऱ्या यंत्रणेच्या कार्यावर लक्ष ठेवणे व तिची योग्य निगा ठेवणे आवश्यक असते. क्लोरीनिकरण करणाऱ्या यंत्रणेच्या परीचालनाबाबत मार्गदर्शन करणारे उत्पादकांचे सूचनापत्रक परिचालकास केव्हाही उपलब्ध असले पाहिजे. व परिचालकानीही त्याचा नीट अभ्यास करून यंत्रणेच्या कार्याची पूर्ण माहिती करून घेतली पाहिजे व यंत्रणेत आवश्यक ती जुळणी करणे किंवा लागेल तेव्हा किरकोळ दुरुस्ती करणे यात त्याने वाकबगार झाले पाहिजे.
क्लोरिनचे वजन करणे :- द्रावण यंत्रणेला जोडलेली क्लोरिनची नळकांडी योग्य श्रेणीत वजने असणाऱ्या वजन काट्यावर ठेवावी लागतात. क्लोरिनच्या नळकांड्याची वजने ठराविक कालांतराने व किमान दिवसातून एकदा तरी घेऊन नोंदवून ठेवली म्हणजे प्रत्यक्ष किती वायु वापरला जातो ते काढता येते. परीचालकांस या वजनाच्या नोंदीमुळे क्लोरिनचा प्रवाह थांबणे वगैरे सारख्या अडचणी ओळखू येतात व क्लोरिनची नळकांडी जवळजवळ रिकामी केव्हा झाली तेही कळू शकते. क्लोरिनचा प्रत्यक्ष प्रवाह किती वेगाने असतो ते नोंदवून कागदावर ठेवणारी वजन यंत्रेही मिळू शकतात. अशी यंत्रे वापरली की क्लोरिनचे किती प्रमाण वापरले याची कायमची नोंद होते. यातील लहानात लहान यंत्राच्या कागदावर ० ते ५ किग्र. पेक्षा (१ पौंड) कमी असते. त्या छोटया जलशुद्धीकरण केंद्रासाठी अशी यंत्रे वापरता येत नाहीत.
No comments:
Post a Comment