Thursday, November 16, 2017

द्रवरूप क्लोरिन

क्लोरिन वायू ठराविक मर्यादेपर्यत संकोचित केली की द्रवक्लोरिन तयार होतो. द्रव क्लोरिन तयार होतो. द्रवीभवन होण्यासाठी आवश्यक असणारा बाष्पदाब 0 अंश सें (३२ अंश फॅ) २.६६ वातावरण दाब (३९ पौंड/ चौ इंच) व १०० अंश सें (२१२ अंश फॅ) तपमानास ४१ वातावरण दाब (६०२ पौंड/ चौ.इंच) इतका असतो. ६५ अंश सें (१५० अंश फॅ) तपमानास नळकांड्याने ८० टक्के आकारमान द्रवक्लोरिन व्यापेल अशा रीतीने क्लोरिनची नळकांडी भरलेली असतात. नळकांड्याने सुरक्षा झडप बसवलेली नसेल तर तापमान जास्त असताना बंद नळकांड्यातील दाब वाढून ते फुटण्यासाठी धोका असतो. म्हणून ही नळकांडी वाफेचे नळ, उष्णताउत्सर्जक (Radiators) स्टोव्ह व बाष्पक यांचे शेजारी ठेवू नयेत. या क्लोरिन नळकांड्यावर वितळबुचे बसवलेली असतात. त्यामुळे तापमान सुमारे  ६५ अंश सें (१५० अंश फॅ) पेक्षा की ही वितळबुच उघडली जाऊन वायू बाहेर जाण्याचा मार्ग खुला होता. 

    कोरडा क्लोरिन वायू हा संक्षारक नाही त्यामुळे लोखंडी नळकांड्यातून त्यांची वाहतूक करता येते वा लोखंडी नळातून टो कोठेही नेता येतो. क्लोरिन नळातून गलतीवाटे बाहेर येऊन आर्द्र हवेत मिसळावा किवा द्रावण क्लोरिनीकारकातीलपाण्यात मिसळला की आर्द्र क्लोरिन फारच संक्षारक असतो.

    पूर्वी द्रव क्लोरिन तितक्या शुद्ध स्वरुपात मिळत नव्हता त्यामुळे द्रव क्लोरिनची टाकी (नळकांडे) क्लोरिनीकारकास जोडण्यापुर्वी टाकीतील थोडा वायू तसाच बाहेर सोडून दिला जाई. आता सध्या मिळणारा द्रव क्लोरिन हा बहुतेक सर्व अशुद्ध द्रव्ये काढून टाकून शुद्ध केलेला असल्यामुळे प्रथम थोडा वायू सोकून देण्याची पद्धत वापरावी लागत नाही.

    द्रव क्लोरिन हा निरनिराळ्या आकाराच्या मानकीकृतलोखंडी (स्टील) नळकांड्यांतून विकत घेता येतो. मेट्रीक परिमाणातील नेहमीच्या आकारांच्या नळकांड्यात ५० ते १०० कि. ग्रॅ. फक्त क्लोरिनचे वजन असते. ब्रिटीश व अमेरिकन परिमाणातील नळकांड्यांत १०० किवा १५० पौंड निव्वळ क्लोरिन असतो. निव्वळ धारणक्षमता १ टन असणारी मोठी नळकांडीही मिळू शकतात. व ३० टनापर्यत धारणक्षमता असणाऱ्या टाकीच्या गाड्याही काही देशात वापरल्या जातात. अशा टनाच्यापंधरा टाक्या एकमेकांत जोडून साखळी पद्धतीने लावून मोटार मागे लावून या टाक्यांचे आकार प्रत्येक देशात निरनिराळे असतात. त्याची वहातूक केली जाते. क्लोरिनच्या नळकांड्यांचे अगदी अचूक वजन करणे इष्ट असते कारण त्यामुळे प्रत्येक दिवशी किती क्लोरिन वापरला गेला ते कळू शकते. क्लोरिनीकारकाचे कपाट तापविणाऱ्या साधनापासून हा वजन काटा इतक्या अंतरावर ठेवावा की क्लोरिनीकारकापेक्षा क्लोरिनचे नेहमी जास्त थंड राहील म्हणजे नळकांड्यातून सांद्रीभव क्लोरिनीकारकाडे क्लोरिन वायू वाहताना तेथे त्याचे पुन्हा सांद्रीभवन होणार नाही. यासाठी क्लोरिनीकारकाकडे कपाट तापविण्याचे साधन व क्लोरिनचे नळकांडे यांचे मध्ये एक उष्णतारोधक जाळीबसवावी लागते.


    क्लोरिनची नळकांडी उतरवण्यासाठी योग्य अभिकल्पना करून सपाट कट्टे तयार केले व साठवण्यासाठी खोली बांधली तर क्लोरिनीकरणाच्या यंत्रणेचे परिचालन जास्त सुलभतेने करता येते. एक टन धारणक्षमता असणारी नळकांडी हलविण्यासाठी खास यंत्रणेचा वापर करावा लागतो. द्रव क्लोरिनच्या उत्पादकांकडून या यंत्रणेविषयी माहिती मिळू शकते.

No comments:

Post a Comment