Saturday, December 31, 2011

भारतापुढील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रमुख आव्हाने

भारत हा विकसनशील देश असून लोकसंख्येत तॊ जगातील दुसर्‍या क्रमांकाचा देश आहे. प्राचीन काळी ‘भारतात सोन्याचा धूर निघत असे’ असे म्हटले जात असले तरी आधी मोंगलांच्या चढायांमुळे व नंतर दीडशे वर्षे ब्रिटीश गुलामगिरीत रहावे लागल्याने येथील आर्थिक स्थिती फार खालावलेली आहे. भारत सरकारवर परदेशी कर्जाचे डॊगर आहेत. वाढती लोकसंख्या, गरिबी, अंधश्रद्धा, जातीभेद, भाषाभेद, अज्ञान अशा विविध समस्यांनी भारताची प्रगती रोखून ठेवली आहे. त्यातच परकीय आंतरराष्ट्रीय कंपन्या आपल्या आर्थिक सत्तेच्या जोरावर येथील स्थानिक बाजारात आपले बस्तान बसवित आहेत. राजकीय अस्थिरता, भ्रष्टाचार, अंतर्गत व सीमेपलीकडून होणारा हिंसाचार यांनी लोकशाहीलाच धोका पोहोचत आहे.

यावर प्रभावी उपाय शोधण्यासाठी सर्वांनी गांभीर्याने व एकात्म भावाने प्रयत्न करण्याची गरज आहे.सुदैवाने आपली बौद्धीक संपदा अपार आहे. त्यात या समस्यावर मात करण्याचे सामर्थ्य निश्चितच आहे. गरज आहे ती ध्येय निश्चितीची व या बौद्धीक संपदेस हे कार्य करण्याची संधी मिळण्याची.

सर्वप्रथम शिक्षण, आरोग्य, शेती, उद्योग, व्यापार अशा विविध क्षेत्रातील प्रगतीसाठी कामांची प्राथमिकता निश्चित करणे व त्यासाठी कालमर्यादा, मनुष्यबळ, आर्थिक साहाय्य यांचे नियोजन करणे आवश्यक आहे.

स्व. राजीव गांधी यांनी आयटी तज्ज्ञ सॅम पित्रोदा यांच्यावर अशीच जबाबदारी टाकली होती. आता भारत सरकारने आयटी क्षेत्रातील मान्यवर तज्ज्ञ श्री नंदन निलेकाणी यांच्याकडे आधार योजनेचे काम सोपविले. तसेच इन्फोसिसचे अध्वर्यु डॉ. नारायण मूर्ती यांना गुजराथ सरकारने नियोजनबद्ध विकासासाठी निमंत्रित केले या घटना आयटी क्षेत्राच्या वाढत्या सहभागाच्या द्योतक आहेत.

मात्र केवळ व्यक्तीगत मार्गदर्शक न नेमता भारतातील मोठ्या आयटी कंपन्यांना प्रकल्प योजना व उभारणीचे काम प्राधान्य क्रमाने देऊन भारतात उपलब्ध असणार्‍या बौद्धिक संपदेचा भारताच्या विकासासाठी उपयोग करणॆ अत्यावश्यक आहे.

भारतात अनेक भाषा बोलल्या जातात. वैश्विक ज्ञानाचा साठा इंटरनेटवर प्रामुख्याने इंग्रजी भाषेत उपलब्ध असल्याने बहुतांश जनतेपर्यंत तो पोहोचत नाही यासाठी आय टी कंपन्यांना भारतीय भाषांत हे ज्ञान आणण्यासाठी उद्युक्त करण्याची गरज आहे. आज गुगल, याहू व मायक्रोसॉफ्ट असे प्रयत्न मोठ्या प्रमाणावर करीत आहे. मात्र त्यांचा त्यामागील उद्देश येथील ग्राहक बाजारावर नियंत्रण मिळविणे हा असल्याने त्याचा परदेशी उत्पादक व सेवा पुरविणार्‍या कंपन्यांना फायदा होणार आहे.

आयटी कुशल कर्मचारी भारताचा सर्व भागात, उपलब्ध व्हावेत. त्याना शहराकडे धावण्याचा मोह होणार नाही अशा प्रकारे रोजगारनिर्मिती करण्याची आवश्यकता आहे. सध्या अशा व्यक्तींना शहराशिवाय रोजगार मिळणेही मुष्कील होत आहे.असे शिकलेले लोक शहरात गेले की ग्रामीण छोट्या गावात आयटी शिक्षित व्यक्तींचा तीव्र तुटवडा निर्माण झाला आहे. परिणामी माहिती तंत्रज्ञानातील प्रगतीचा ग्रामीण विकसासाठी वा तेथील समस्या सोडाविण्यासाठी काहीही उपयोग होत नाही. शिवाय मोठ्या शहरांच्या समस्याही अशा शहरीकरणामुळे वाढत आहेत. घरांचे भाव गगनाला भिडले आहेत.शहरी सुविधांवर व दळणवळण व्यवस्थेवर तसेच पर्यावरण दर्जावर याचा प्रचंड ताण पडत आहे.

या सर्व समस्या विकेंद्रित विकासाने सुटू शकतील व हे विकेंद्रीकरण सर्वप्रथम आयटी क्षेत्राचे व्हावयास हवे व ते शासनाने घडवून आणणे आवश्यक आहे. असे झाले तर ग्रामीण व्यवस्थेत व अन्नधान्य उत्पादनात बिघाड न होता सर्व क्षेत्राचा विकास होईल. घरातील महिला वर्गाला नवा रोजगार उपलब्ध होईल. व भारताचे सर्वंकष प्रगतीचे लक्ष्य माहिती तंत्रज्ञानाच्या या क्रांतीने साध्य होईल. आमच्या ज्ञानदीप फौंडेशनने सर्व शाळा कॉलेजात या माहिती तंत्रज्ञान प्रसारासाठी ज्ञानदीप मंडळे स्थापन करण्याचे व माहिती तंत्रज्ञानाचे विकेंद्रीकरण करण्याचे योजिले आहे. नव्या वर्षातील ह्या ज्ञानदीपच्या उपक्रमास सर्वांचे सक्रीय सहकार्य मिळेल अशी अपेक्षा आहे.

बौद्धिक गुलाम (कोड मंकी)

(कोड मंकी यानावाने लिहिलेल्या माझ्या इंग्रजी लेखाचे रूपांतर)

भारतात माहिती तंत्रज्ञानाची प्रगती वेगाने हॊत असल्याने व त्याद्वारे भारतात मोठ्या प्रमाणावर परकीय चलन उपलब्ध होत असल्याने माझ्या मनात भारतीय आय. टी. कंपन्यांबद्दल अतीव आदराची भावना होती. भारतात सर्वत्र गरिबी, दुष्काळ, महागाई व रोजगाराची बिकट अवस्था असतानाही आय.टी. कंपन्यांची भरभराट, त्यांच्या नफ्याची चढती कमान व मोठ्या प्रमाणावर गलेलठ्ठ पगार देऊन रोजगार उपलब्ध करणार्‍या या कंपन्या म्हणजे भारताला एक वरदानच आहे असे मला वाटत होते. या कंपन्यातून नोकरी सोड्णार्‍यांचे प्रमाण इतर कंपन्यांच्या तुलनेत बरेच जास्त असते तरीदेखील या कंपन्यात जी वारेमाप नोकरभरती होते यात काय गौडबंगाल आहे. याचा मला उलगडा होत नव्हता.

सुदैवाने एका स्नेहमेळाव्यात मला अशा कंपन्यांतील अनुभवी सॉफ्टवेअर इंजिनिअर लोकांच्यासमवेत चर्चा करण्याची संधी मिळाली. सध्या इंजिनिअरिंग कॉलेजातील शिक्षणाचा दर्जा तितकासा चांगला नाही व नवीन पदवीधारकाना सध्याच्या सॉफ्टवेअरविषयी फारशी माहिती नसते तरीही यांना प्रसिद्ध आय.टी कंपन्यांत मोठ्या पगाराच्या नोकर्‍या लगेच कशा मिळतात व या कंपन्यांना त्यांचा कितपत फायदा होतो असा प्रश्ने मी त्यांना विचारला. त्यांनी अगदी सहजपणे सांगितले की आमच्या कंपन्यांना आंतराष्ट्रीय स्पर्धेस तोंड द्यावे लागत असल्याने आमच्या कुशल कर्मचारी वर्गाची संख्या जास्त ठेवावी लागते. नोकरीवर घेतल्यावर पहिल्या सहा महिन्यात त्यांना विवक्षित काम सहज शिकविता येते. शिवाय त्यांनी काम केले अथवा नाही केले तरी फारसे बिघडत नाही कारण त्यांच्या डिग्री व संख्या यांच्या आधारे कामाचे मोठे एस्टीमेट केले जाते. या उत्तराने माझे समाधान झाले नाही.

एखादे सॉफ्टवेअर तयार करायचे म्हणजे किती तयारी लागते, प्लॅनिंग, डिझाईन हे किती गुंतागुंतीचे कां असते हे मला ठाऊक होते. मी त्याबद्दल विचारले असता त्यातील एकाने सांगितले की आमची कंपनी फक्त कुशल माणसे पुरविते. आंतरराष्ट्रीय मोठ्या प्रकल्पाचे मुख्य डिझाईन, आखणी, कामाचे विभाजन वगैरे सर्व गोष्टी विकसित राष्ट्रातील आंतरराष्ट्रीय कंपन्या ठरवितात. आम्हाला त्याच्याशी काही देणे घेणे नसते. प्रत्येकाला काम आखून दिले असते व तो मोठ्या प्रकल्पाचा छोटासा हिस्सा असतो. उदा. एकाकडे ठराविक कार्यासाठी प्रोग्रॅम लिहिण्याचे काम अस्ते तर दुसर्‍याकडे ते तपासून चुका दुरुस्त करण्याचे, एखाद्याकडे केवळ मांडणीचे तर एखाद्याकडे जुळणीचे काम असते. संपूर्ण प्रोजेक्ट काय आहे व त्याचा उद्देश काय आहे याचीही आम्हाला माहिती नसते. एक सॉफ्टवेअर इंजिनीअरने तर स्पष्ट सांगितले की विकसित देशातील प्रोजेक्ट्चे मालक आम्हाला कोडमंकी (बौद्धिक गुलाम) समजतात. तिथल्या राहणीमानाप्रमाणे द्याव्या लागणार्‍या पगाराच्या मानाने भारतात स्वस्तात असे लोक मिळ्तात. यामुळेच आमच्या कंपनीला एवढा फायदा मिळतो.


मी हतबुद्धच झालो. माझ्या डोळ्यापुढे सोनेरी पिंजर्‍यात साखळीने बांधलेली सांगकामी माकडे दिसू लागली. ब्रिटिशांच्या काळात आपल्याकडे बाबूराज होते. इंग्रजी जाणणारी माणसे ब्रिटिशांची नोकरी करीत एतद्देशियांच्यावर जुलूम करीत ब्रिटिशांची संपत्ती वाढवत असत. तसाच हा प्रकार नाही ना. या विचाराने मी बेचैन झालो. विकिपिडिआत ‘कोडमंकी’ याचा काही चांगला अर्थ असेल अशा आशेने मी शोध घेतला. तेथे ‘कोडमंकी’ या नावाचा संगीतप्रधान प्रसिद्ध व्हिडिओगेम असल्याचे मला समजले. मात्र त्यातील पात्रे कोडमंकीच्याच खालच्या दर्जाची रंगवलेली मला दिसली.


आंतरराष्ट्रीय कंपन्या आपलेच बुद्धीवैभव वापरून आपल्यावर सत्ता गाजवीत नसतील कशावरून. सध्या भारतातील बहुतेक सर्व मोठे प्रकल्प भांडवल पुरविण्याच्या आमिषाने आंतराष्ट्रीय कंपन्या बळकावत आहेत. बीओटी हा भारत सरकारपासून ते स्थानिक संस्थेपर्यंत परवलीचाअ शब्द झाला आहे. बीओटीमध्ये आंरराष्ट्रीय मोठ्या कंपन्या पैसा उभा करतात या गोड स्वप्नात आपण असतो. मात्र या कंपन्या हे भांडवल स्वत: कधीच घालत नाहीत. ते भांडवल आपल्या पतीवर त्या येथील बँकांतूनच मिळवितात. प्रकल्पाचे कामही त्या येथील संस्थांच्यामार्फत करवितात.त्यांच्या देशातील साधनसामुग्री येथे चढ्या भावाने विकतात. अशा प्रकल्पाचे सर्व काम ते तिकडे बसून व इथल्या आय टी कंपन्यातील कुशल कर्मचार्‍यांच्या साहाय्याने करतात. येथे त्यामुळे पैसा येत असला व प्रकल्प होत असले तरी फायद्याचा मोठा हिस्सा त्यांना मिळतो.


इकडे भारतात भेडसावणार्‍या अनेक समस्यांवर प्रभावी उपाय काढण्यासाठी आय टी तज्ज्ञ मिळत नाहीत कारण ते सर्व आंतरराष्ट्रीय कंपन्यांत जाणे पसंत करतात. भारत सरकार आय टी कंपन्यांना आपली कामे देत नाही. आय़टी कंपन्याही याबाबतीत संघर्ष करीत नाहीत.आय टी कंपन्यात नोकरी करणारा कर्मचारी वर्ग सामाजिक चळवळीत सहभागी न होता समाजापासून वेगळा होत आहे व आलिशान जीवनशैली व सुखोपभोगाला आपली संस्कृती मानू लागला आहे. ही समाजधुरिणांनी काळजी करण्यासारखी गोष्ट आहे. कारण यामुळे शहरीकरण, चंगळवाद व महागाई वाढत चालली आहे. यावर वेळीच उपाययोजना करणे आवश्यक आहे.


अन्यथा भारत भविष्यात महासत्ता होणार या स्वप्नात आपण गुरफटून राहू व प्रत्यक्षात आपण विकसित राष्ट्रांचे गुलाम बनू व त्यांच्यावर आश्रित व अवलंबून राहू.

Thursday, December 22, 2011

Protect your children from violent & destructive games

With the development of powerful mobile devices, entertainment industry has leaped forward with numerous video games. DFC intelligence has estimated a growth of gaming industry world over to the tune of $60.4 billion, a figure that spans console, PC, portable, and online games, from boxed products and subscription fees. Whereas according to Paul Heydon, the total market capitalization of all public game companies stands between $100 billion to $105 billion.

Such high growth of game industry is financed by advertisements. Due to steep competition in advertising, the companies devise means to make the games more aggressive and addictive to attract more customers. As such, a majority of these games are based on war tactics and are full of episodes of destruction, bomb blasts, shooting, rash driving, violence and deaths of personnel. Action movies of superman, spiderman, star wars and like make use of such scenes on large scale.

To site a recent example, now a days, there is a popular game of angry birds being played by net users, where the birds try to destroy the towers and castles where the pigs stay. Player is taken through various stages and reward points as he succeeds in destroying the towers. What is the lesson that gets transmitted. Destroy and Win. Instead, why not have a game of building peace towers with a lesson that build with patience against all odds to succeed with no destructive motives.

Playing such games might be helping in developing quick response, decision making and action synchronization, but they have far reaching negative impacts, which must be attended to seriously. First, such games are addictive, consume time and lead to inaction. More serious impact is the desensitization of player towards violence and destruction. Unfortunately the majority of players of such games come from young generation. Their mindset gets changed and they start feeling that justice and success can be achieved only through destruction and violence. Increase in incidences of social unrest becoming violent may be tracked back to such war mongering games.

The impact of such games on children may be termed as disastrous. Young children are very innocent, sensitive and possessive in nature. They fall pray to such attractive action games easily. They can't comprehend the destructive power of weapons, pain of injuries inflicted in fighting and damage in destruction. They also do not realize that there is vast difference between virtual scenes and actual life. This may lead to unforeseen accidents, violent clashes and loss of property or even innocent lives, just due to ignorance of children.

In developed countries, the toys and books for preschool children are designed carefully by taking all precautions to protect them from physical damage or harm their feeling. However, for elder children, this concept is totally neglected leading to harmful consequences and sporadic violent episodes. In fact, there should be a rating system to grade the entertainment products like games based on their positive & negative impacts and educational value.

We can change this situation, if we publicly voice our displeasure over violent games, stop their purchase and demand their replacement with high quality innovative educational games. Fortunately common man or the consumer has now many forums available on the net to express their views and game companies also would respond positively, as they are interested in the consumer of product they wish to sell and not the game.

Monday, December 19, 2011

Indian Priorities for IT Sector

Potential of IT human resource in India is highest in the world both as regards quality and quantity. However, it is being harnessed by developed countries for their international businesses through money power. As such the development of India by IT sector has remained only in terms of foreign exchange we get through their growth.

India is facing acute shortage of IT brainpower to solve its own problems and they are plenty. Education, Health, Agriculture, Industry and Environment need huge and all out efforts from IT sector in field of conceptualization, planning, design and implementation of development projects. Unfortunately, the government seeks foreign help in terms of finance and expertise in many such mega projects, which ironically are being managed by Indian IT resource on subcontract basis. The major share of pie goes to international firms.

The international firms are bent on grabbing such projects in India and are busy in capturing large client base ‌ India for growth of their empire. The money power with which they overpower small businesses in India is enabled not by their own investment of money, but manipulation of finance raised through Indian banks.

This entire exercise is smoothly managed by elaborate mechanisms of project feasibility, financial return possibilities and strong business proposal developed through IT programs. The heavy reliance on BOT concept is an escape from responsibility of project management which provides opportunity to big players to intrude Indian business. The specifications and conditions formulated in award of project contracts is generally heavily biased towards companies with international linkages. The small deserving Indian firms are not allowed to compete with these firms on the basis of financial assets. The actual job is again carried out by the same rejected companies but as a subcontractor to main bidder. This situation must change and the change can be achieved if both government and Indian IT companies come together in spirit and action.

Induction of Nandan Nilekani in government administrative sector for Aadhar project is good step in this direction. Cooperative formed by small pharmacy vendors to fight against big companies also is a sign of new hope. Such initiatives will help India immensely rather than depending on multinationals for solution of our discrete and all pervasive problems created by population, lack of education and poverty.


There is an urgent need for development of web based multimedia resources in regional languages for creating awareness and effective dissemination of knowledge at much lower cost as a first step towards real IT revolution for development of India. Sector wise priorities for development of suitable simple and decentralized IT solutions in education, health, agriculture and industry can be worked out. However, these solutions must be easy for operation by small agents of change like teachers, doctors, individual professionals , experts and small businesses in various fields. Then only the development will become more harmonious and sustainable.

Friday, December 9, 2011

Rise above Material World

Today man is engrossed in material world composed of variety of amenities and resources which are directly and continuously affecting the senses to the extend that he has forgotten the purpose of his existence in the life.He has lost his own identity and the treasure of pure joy one can get just by imagination, curiosity and creativity.

Population growth, development of science and technology, commerce and politics have added to the complexity of sensual world and empowered the forces of greed to influence the thought process of human being establishing new false concepts about happiness, success and achievement.

Even religions, who had inherent capacity to guide and control mind have become distributors of material pleasures and are used to build communities and tools for gains in physical world.

If one goes out of the madding crowd, disconnecting all links of communication and spend some time in open natural world for himself, he would be able to see the present objective world in real perspective. He will also be able to evaluate the worth of material pleasures and compare them with the peace of mind and satisfaction one gets by blending his thoughts with the eternal beauty and simplicity of nature.

Try to comprehend the secret of happiness in the life of saints and scientists. They did not require any outside resource for inner mental pleasure. Probe into your mind to search the happiness rather than outside appliances.Man is an animal who thinks but we have either forgotten to think for ourself or do not find any time for it.

Help the needy without any discrimination, encourage curiosity and creativity in children, observe the nature and learn its simplicity, do anything with dedication and selfless motive, disseminate the knowledge and information to all who need it and you will find that you have achieved something which will be a source of joy forever. To train your mind progressively in this direction, always find some time for introspection and write down your thoughts regularly as writing creates a permanent store of your feelings and ideas and crystallizes your thoughts.

If you rise yourself above the material world, you will see a far reaching sea of happiness spread around your conscious mind.
.

Friday, November 25, 2011

Event and Activity

Today's management seems to be heavily inclined to event management. This may be due to stiff competition between companies to increase client base. However, it may give temporary success if routine activity is not managed properly and effectively. Many a times, it is observed that there is a long gap of inaction between two successive events. The enthusiasm and services offered at the time of new enrollment soon become dry, after the work order by customer.
I came across words event and activity in project planning network diagrams. PERT and CPM networks recognize events as start or end of activity, the activity being of supreme importance. Activity consumes time, money and other resources, whereas event is only a junction point between two activities.
Today nobody talks about activity but celebrates events with huge expenditure and publicity. Sustainable management requires other way round. Many successful companies are running smoothly and progressing well without publicity stunts and advertisements.
In the initial stages, it may be beneficial to have exposure through events, but it should not be forgotten that real work lies in planning and executing regular business.
We notice that young engineers are interested in production R. & D. or development work, but not in maintenance as it does not carry any glamor. But the maintenance department has stability and bears the load of additional financial burden of development activities.
Any failure in maintenance of functioning, service or quality assurance leads to collapse of the empire created by event promises.

Thursday, October 20, 2011

संशोधनाचे स्फूर्तीकेद्र - विज्ञान छंदगृह

(१९८४ साली मराठी विज्ञान प्रबोधिनीच्या म्हैसाळ येथील संमेलनाच्या निमित्ताने काढलेल्या स्मरणिकेतील लेख -
विज्ञान छंदगृहाचे माझे त्यावेळचे स्वप्न आजही अपूर्णच राहिले आहे.)
’साधे कागदाचे विमान. ते पण आता खर्‍या विमानासारखे आकाशात झेपावणार होते. सारी मुले डोळे विस्फारुन विमानाकडे पाहात होती. प्रत्येकाच्या हातात विमान करण्याचे साहित्य होते. आपनही तसेच विमान करावे अशी तीव्र इच्चा सर्वांच्या मनात निर्माण झाली होती. त्यांच्या अनेक शंकांना मोठ्या आत्मविश्वासाने उत्तरे देत एक विद्यार्थी विमानाचा तोल आणि पंखांचा बाक तपासून पाहात. होता.दुसर्‍या बाजूला एका टेबलाभोवती बरीच मुले कोंडाळे करून उभी होतॊ. इलेक्ट्रिकल उपकरणातून चित्रविचित्र आवाज येत होते. त्याचे सर्कीट समजावून सांगण्यात एक कॉलेज विद्यार्थी गर्क झाला होता. प्रभावी विज्ञान शिक्षणाचा एक अभिनव प्रयोग सुरू झाला होता. ’

ज्या कल्पनेने मराठी विज्ञान प्रबोधिनीने हा विज्ञान छंदवर्ग सुरू केला त्यात केवळ करमणूक वा पूरक अभ्यासाची सोय एवढाच उद्देश नाही तर आजच्या विज्ञानयुगातील ते महत्वाचे राष्ट्रीय कार्य आहे ही भावना त्यामागे आहे.

विकसित राष्ट्रांत आज विज्ञान व तंत्रज्ञान यांची इतक्या झपाट्याने प्रगती होत आहे की भारतासारख्या विकसनसशील राष्ट्राला तो वेग गाठणे दिवसेंदिवस अवघड होत चालले आहे. त्यातच गरीबी, अज्ञान, अंधश्रद्धा व वाढती लोकसंख्या असे अनेक प्रश्न या विज्ञानप्रगतीत , खीळ घालत आहेत. परदेशात विकसित झालेले तंत्रज्ञान व आधुनिक साधने यांचा देशात येणारा ओघ एवढा वाढला आहे की, स्वदेशी उद्योग त्यामुळे धोक्यात आले आहेत. यावर जर वेळीच उपाययोजना केली नाही तर आधुनिक तंत्रज्ञानाच्या या आक्रमणामुळे आपण पुन्हा एका वेगळ्या अर्थाने परतंत्र आनि परावलंबी होण्याची भीती आहे.
उदाहरणच द्यायचे झाले तर परदेशी घड्याळे, गणकयंत्रे, टेप व व्हिडिओ कॅसेट्स अत्यंत स्वस्त किंमतीत आपल्या देशात मिळू लागल्या आहेत.या वस्तूंच्या स्वदेशी उत्पादनाचा खर्च परदेशी मालापेक्षा बराच जास्त आहे. शिवाय तांत्रिक गुणवत्ताही तेवढी सरस नाही. साहजिकच स्वदेशी वस्तूंची विक्री पूर्णपणे परदेशी वस्तूंच्या आयातीवर अवलंबून राहणार आहे. सध्याच्या काळात स्वदेशी मालाबद्दल आग्रह कोठेच दिसत नसल्याने हा धोका अधिकच संभवतो.

यासाठी परदेशी वस्तूंच्या एवढी तांत्रिक गुणवत्ता व किंमत असणार्‍या वस्तूंची निर्मिती हाच एकमेव प्रभावी उपाय आहे. अर्थात त्यासाठी विज्ञान, तंत्रज्ञान यांचा जलद गतीने विकास करणे व त्यासाठी बुद्धीमान विद्यार्थ्याम्मधून तंत्रकुशल सण्शोधक निर्माण होण्यासाठी लहानपणापासून संशोधनाच्या सोयी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.

शाळा, कॉलेजात विज्ञान शिक्षण मिळत असले तरी परीक्षा पद्धतीस अवास्तव महत्व दिले गेल्याने जिज्ञासू व धडपड्या मुलांची फार कुचंबणा होते. यावर उपाय म्हणजे केवळ मुलांसाठी विज्ञान छंदगृहांची उभारणी. या विज्ञान छंदगृहातून महत्वाचे संशोधन वा नवीन तंत्रज्ञानाचा विकास होणे असंभवनीय असले तरी उद्य़ाचे संशोधक तयार करण्यासाठी मुलांवर योग्य ते संस्कार करण्याचे कार्य या छंदगृहांमुळे निश्चितच साध्य होईल.

या विज्ञान छंदगृहामध्ये मुलांना त्यांच्या कल्पनेनुसार प्रयोग करण्याचे व उपकरणे बनविण्याचे स्वातंत्र्य दिले जाईल. तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन पक्त आवश्यक भासेल त्यावेळीच दिले जाईल. अन्यथा सर्व मार्गदर्शन मोथि मुले छोट्या मुलांना करतील. संदर्भ ग्रंथालय, कार्यशाळा व इतर साधनसामुग्री यांची सोय येथे करावी लागेल. विज्ञानाच्या विविध शाखा लक्षात घेता सर्व साधनसामुग्री या छंदगृहात सुरुवातीपासून उपलब्ध करून देणे अवघड आहे यात शंका नाही. परंतु टप्प्याटप्प्याने जागा व साधनांचि तरतूद करत गेल्यास मुलांच्या आवाक्यात असणार्‍या बहुतेक सर्व प्रयोगांसाठी सोय करणे शक्य आहे. अर्थात हे सर्व जनतेकडून आणि विशेषकरून मुलांच्याकडून किती प्रतिसाद मिळतो यावर अवलंबून आहे.

मुलांच्या मनांत अशा छंदगृहाबद्दल कुतुहल व आकर्षण निर्मान होण्यासाठी सर्वप्रथम काही मोजक्या पण अत्याधुनिक अशा तयार उपकरणांचा वापर करावयास हवा. उदाहरण द्यायचे झाले तर प्रकाश, रंग व आवाज यांची आतषबाजी करणारी इलेक्ट्रॉनिक उपकरणे दूर राहून नियंत्रित करता येणार्‍या ( रिमोट कंट्रोल्ड) मोटारी, आकाश दर्शनासाठी मोठी दुर्बीण शिक्षणाच्या दृष्टीने याचा उपयोग थोडा असला तरी मुलांना आकर्षित करण्याचे सामर्थ्य या उपकरणात निश्चितच आहे. प्रथम केवळ करमणूक म्हणून मुले आली तरी तशी उपकरणे बनविण्याची ओढ त्यांच्या मनात निर्माण होईल व त्यासाठी सर्व मदत छंदगृहात मिळेल हे कळल्यावर कुतुहलातून शिक्षण, शिक्षणातून प्रयोग व प्रयोगातून संशोधन ही साखळी प्रक्रिया सुरू होईल.

त्यामुळे पहिल्या टप्प्यात एक मोकळा हॉल, दोन टेबले व इलेक्ट्रॉनिकची काही सर्कीट यावर छंदगृहाची सुरुवात होऊ शकेल. याच हॉलचा उपयोग तज्ज्ञांचे मार्गदर्शन, चर्चासत्र, फिल्म वा स्लाईडशो यासाठी होऊ शकेल. १० ते १५ वर्षे वयोगटातील मुलांसाठी काही सोपी सर्कीत तयार करण्यास सांगणे शक्य आहे. यास साधने कमी लागतात. खर्च कमी येतो. यापुधचा टप्पा म्हणजे फेविकॉल, प्लॅस्टिक, पत्रा व लाकूड यांचा वपर करून उपकरणे बनविण्याची सोय करणे. त्यासाठी आवश्यक असणारि सामुग्री व हत्यारे विकत घेऊन काही उपकरणे मुलांच्याकडून करवून घेणे. यामध्ये प्रथम भर द्यायचा तो स्प्रिंग, लोहचुंबक आणि बॅटरी सेल यांच्या साहाय्याने स्वयंचलित खेळणी बनविण्यावर. कारण खेळण्याचे आकर्षण मुलांना स्वभावतःच असते. शिवाय खेळणे बनविताना वस्तूचे गुणधर्म व वैज्ञानिक तत्व यांचीही मुलांना माहिती होते.

मनोरंजनातून पुढची पायरी म्हणजे नेहमीच्या वापरातील उपयुक्त साधने व उपकरणे बनविणे. ताणकाटा, विजेची घंटा, कारंजे,रॉकेलचा पंप यासारख्या वस्तू बनविताना दैनंदिन व्यवहारात विज्ञानाचा कसा उपयोग होतो हे समजेलच शिवाय ही उपकरणे स्वतः तयार केल्याने प्रयत्न केल्यास आपण मोठे कारखानदार होऊ असा आत्मविश्वास मुलांच्या मनात निर्माण होईल.
यानंतरचा टप्पा म्हणजे सूर्यशक्टीवर चालणारी आधुनिक साधने, पवनचक्की, बायोगॅस संयंत्र यासारख्या उपकरणांची कार्यपद्धती, तांत्रिक ज्ञान आणि निर्मिती याविषयी माहिती उपलब्ध करून देणे. विज्ञानविषयक मराठी, इंग्रजी पुस्तके, मासिके व इंटरनेट यावरून अशी माहिती मिळू शकते. तज्ज्ञाम्चे मार्गदर्शन व प्रत्यक्ष प्रतिकृती व साधनांचे निरीक्षण यातून मुलांना हे तंत्रज्ञान आत्मसात करणे सहज शक्य होईल.

या छंदगृहासाठी जनमानसात कुतुहल व आकर्षण निर्माण करण्यासाठी एक प्रभावी उपकरण म्हणजे दुर्बीण. छंदगृहातून या दुर्बिणीच्या साहाय्याने नियमितपणे आकाशदर्शनाचे कार्यक्रम व्हावेत. त्याद्वारे चंद्राचा पृष्ठभाग, गुरूचे गृह आणि शनीची कडी, सूर्य व चंद्र ग्रहण क्वचितप्रसंगी धूमकेतू पहायला मिळतात असे कळल्यावर सर्वसामान्य जनताही छंदगृहाकडे आकर्षित होईल.

माझ्या डोळ्यासमोर जे उद्याच्या भारताचे स्वप्न आहे त्यात गावोगावी मध्यवर्ती ठिकाणी अशी विज्ञान संशओधन छंदगृअहे आहेत व नव्या पिढीची स्फूर्तीकेंद्रे म्हणून ती काय करीत आहेत. आपल्या फुरसतीच्या वेळात, सुट्टीत व रात्रीदेखील छोटे संशोधक त्यात उपकरणे बनवीत आहेत. प्रयोग करीत आहेत. स्वतः धडपडत शिकत आहेत. कुशल तंत्र वैज्ञानिक व शास्त्रज्ञ बनण्याची ईर्षा त्यांच्या मनाम्त निर्मान होत आहे. त्यातूनच ग्रामविज्ञानाच्या कल्पनेने भारलेले काही तरूण दूर दुर्गम ग्रामीण भागांत जाऊन तेथे विज्ञानाचा नवा प्रकाश पोहोचवीत आहेत. इतर काही प्रयोगशाळातील संशोधनातून निसर्गाची रहस्ये उलगडण्याची उमेद बाळगून आहेत. काही तंत्रज्ञ बनून विविध वस्तूंच्या निर्मितीप्रक्रियांचे ज्ञान मिळविण्याच्या मागे आहेत. तर काही जीवरासायनिक, वैद्यकीय वा पर्यावरण शास्त्रात नवे संशोधन करण्यात रंगून गेले आहेत.

या छंदगृहातील प्रयोगांचे व चर्चांचे पडसाद मोठ्या माणसांच्या सुस्त प्रयोगशाळा, संथ कारखाने आणि मंद उत्पादन केंद्रे यावर आदळून नवी क्रांती घडवून आणित आहेत.छोट्या संशोधकांच्या कार्याने सारे खडबडून जागे झाले आहेत आणि नवा विज्ञानाधिष्ठित बलशाली भारत उदयास येत आहे.

हे स्वप्न तर खरेच, पण विस्फारलेल्या डोळ्याम्नी उपकरणे पाहणार्‍या मुलांच्या नजरेतून, बुद्धी गुंग करणार्‍या त्यांच्या प्रश्नांमधून आणि वक्तृत्वातील जोषात हे स्वप्न वास्तव सृष्टीत येणे सहज शक्य आहे असा मला विश्वास वाटतो.

Monday, October 17, 2011

मराठीतून नेटद्वारे प्रशिक्षण

पाडव्याच्या सुमुहूर्तावर ज्ञानदीप वेबडिझाईन, फ्लॅश/अ‍ॅनिमेशनचे मराठीतून नेटद्वारे प्रशिक्षण वर्ग सुरू करीत आहे. घरबसल्या आपल्या फावल्या वेळात हे कोर्सेस करून स्वत:च्या नव्या व्यवसायाची सुरुवात करा वा ज्ञानदीपच्या परिवारात सामील होऊन उद्योगी बना.

हे प्रशिक्षणवर्ग सुरू करण्याचा उद्देश ज्यांना या क्षेत्रात नोकरी वा स्वतःचा व्यवसाय सुरू करावयाचा आहे अशांसाठीच आहेत. त्यामुळे हे प्रशिक्षण घेण्यासाठी आवश्यक तेवढा वेळ देण्याची तयारी असणार्‍यांनीच या कोर्ससाठी नावे नोंदवावीत.

विषयातील धड्यांची आखणी क्रमवार केलेली असून धड्यातील माहितीचे पूर्ण आकलन झाले आहे की नाही याची खातरजमा करण्यासाठी पूरक प्रश्नावली व गृहपाठ पूर्ण करणे अनिवार्य राहील. गृहपाठासाठी दिलेली सर्व उदाहरणे स्वतः सोडवून ज्ञानदीपकडे तपासण्यासाठी पाठवावी लागतील. अर्थात त्यासाठी वेळेचे बंधन असणार नाही. आपल्या फुरसतीच्या वेळेत कोर्स करणार्‍या विद्यार्थ्यास आपल्या सवडीप्रमाणे गृहपाठ पूर्ण करता येतील मात्र सर्व प्रश्नांची उत्तरे बरोबर आल्यानंतरच पुढील धडा देण्यात येईल. साहजिकच कोर्ससाठी शेवटी वेगळी परीक्षा असणार नाही. कोर्स समाप्तीनंतर ज्ञानदीप फौंडेशन तर्फे कोर्स यशस्वीरीत्या पूर्ण केल्याचे प्रशस्तीपत्रक देण्यात येईल. ज्ञानदीप इन्फोटेक प्रा. लि. या वेबडिझाईन कंपनीचे सर्टिफिकेट आवश्यक असल्यास वेगळे परीक्षाशुल्क भरून त्यांच्या ऑनलाईन परिक्षेत पास व्हावे लागेल.

प्रत्येक विद्यार्थ्यास स्वतःचा ब्लॉग, ट्विटर अकौंट सुरू करून आपली प्रगती व स्वतःचे लेख प्रसिद्ध करण्यास प्रोत्साहन देण्यात येईल. तसेच सार्वत्रिक उपयोगाच्या लेखांना ज्ञानदीपच्या वेबसाईटवर प्रसिद्धी देण्यात येईल.
अधिक माहितीसाठी संपर्क साधा.( info@dnyandeep.net)

Sunday, July 3, 2011

वेबसाईटचे आधुनिकीकरण

गेल्या दोन दशकात इंटरनेटने अभूतपूर्व प्रगती करून जगातील सार्‍या लोकांना एकत्र आणण्याचे महत्वाचे कार्य केले आहे. केवळ परस्पर संपर्कच नव्हॆ तर धर्म, भाषा, रूढी या कृत्रिम भेदांच्या व स्थान व वेळ या नैसर्गिक बंधनांच्या बेड्या तोडून जगातील ज्ञानाचे भांडार सर्वांसाठी खुले केले आहे. साहजिकच यामुळे सर्व क्षेत्रांतील ज्ञानाच्या कक्षा रुंदावत असून उद्योग व्यवसायासाठी अमर्याद संधी उपलब्ध झाल्या आहेत. अर्थात स्पर्धाही तेवढ्याच प्रमाणात वाढली आहे. टेक्नॉलॊजीमध्ये विलक्षण वेगाने बदल होत असून जुन्या पद्धती नामशेष होत आहेत.

इतर क्षेत्राप्रमाणे खुद्द इंटरनेट टेक्नॉलॉजीमध्येदेखील फार फेरबदल होत आहेत. कॅमेरा, टीव्ही, मोबाईल, नोटबुक, आयपॅड, लॅपटॉप यासारखी नवी संगणक उपकरणे व त्यासाठी लागणारे सॉफ्टवेअर प्रोग्रॅम, माहिती साठविण्याच्या व वितरण करण्याच्या पद्धती यात सतत नूतनीकरण होत असल्याने या क्षेत्राच्या अभ्यासक्रमात व पुस्तकांत असलेले ज्ञान प्रत्यही कालबाह्य होत आहे. त्यामुळे इंटरनेट हेच ज्ञानप्राप्तीचे एकमेव माध्यम बनले आहे. संपर्कासाठी इमेल व संवादसुविधा पुरेशी ठरली तरी माहितीसाठी वेबसाईट हेच इंटरनेटचे महत्वाचे साधन आहे.

सुमारे दहा वर्षांपूर्वी ज्ञानदीपने आपली पहिली वेबसाईट तयार केली. त्यावेळी ती तयार करण्यासाठी, सर्व्हरवर ठेवण्यासाठी व नंतर ती इतरांना (त्यावेळी फारच थोड्या लोकांकडे कॉम्प्युटर होते) त्यांच्या संगणकावर दाखविण्यासाठी किती प्रयास पडले याचा मोठा इतिहास आहे. साधे एचटीएमएल टॅग व रंगीबेरंगी जावा अप्लेटची तयार बटने वापरून केलेल्या त्या वेबसाईटचे लोकांना त्यावेळी किती अप्रूप वाटले होते. व्हीएसएनएलच्या नेटवर्कमधील रूटरची कॅशे मेमरी फ्लश करण्यात विलंब लागत असल्याने वेबसाईटवरील बदलही सर्व ठिकाणी दिसण्यास वेळ लागत असे. सर्व जगभर ही वेबसाईट पाहता येते यावर लोकांचा विश्वास बसत नसे. आता ज्ञानदीपची सध्याची वेबसाईट खूपच वेगळी व आधुनिक आहे.

रोज नवनवे प्रयोग करून वेबसाईट अधिक चांगली व कार्यक्षम करण्याचा आम्ही प्रयत्न करीत होतो. त्या काळात शाळा कॉलेजच्या केलेल्या आमच्या सार्‍या वेबसाईट स्टॅटिक होत्या. फ्लॅश तंत्रज्ञानाचा वापर करून वालचंद कॉलेजच्या नकाशाचे मोड्यूल बनविले व कॉलेजच्या लायब्ररीतील सर्व पुस्तकांची यादी वालचंदसांगली (walchandsangli.org) या वेबसाईटवर पाहण्याची सोय अक्सेस डाटाबेसचा वापर करून केली. परंतु केवळ चमत्कृती व कुतुहल या भावनेतून त्याकडे पाहिले गेल्याने त्याचे महत्व लोकांना उमगले नाही. श्री लिपी डायनॅमिक फॉंट व डाटाबेसव एक़एमल यांचा वापर करून मराठी माध्यमातील संस्कृतदीपिका (sanskritdeepika.org) ही वेबसाईट बनविली तेव्हा तीही पुढे कालबाह्य ठरेल याची आम्हाला कल्पना आली नव्हती.

वेबसाईटच्या डिझाईन पद्धतीमध्ये नवनव्या सुधारणा होत होत्या. स्टाईल शीटचा वापर, व्हीबी स्क्रीप्ट वापरून (asp code) वेबसाईटचे सुटे भाग एकत्र जोडणे, अभिप्राय, इमेल व गेस्टबुकची सोय, फ्लॅश फोटोगॅलरी यामुळे ज्ञानदीपच्या वेबडिझाईन दर्जात बरीच सुधारणा झाली होती. तरीदेखील लोकांना या प्रभावी प्रसार व संपर्क माध्यमाची माहिती नसल्याने वेबसाईटकडे केवळ एखाद्या छापील जाहिरातीच्या दृष्टीने पाहिले गेल्याने कमी खर्चात कामचलावू वेबसाईट करण्याकडे लोकांचा ओढा होता. आजही ज्ञानदीपच्या अनेक जुन्या वेबसाईट त्याच जुन्या कालबाह्य स्वरुपात चालू आहेत. त्यांचे त्वरित आधुनिकीकरण करण्याची गरज ग्राहकांना पटवून देण्याचे अवघड काम ज्ञानदीपला आता करावे लागत आहे.

सुदैवाने नवनव्या आकर्षक डायनॅमिक वेबसाईट लोकांच्या पाहण्यात आल्याने, व्यावसायिक स्पर्धा वाढल्याने, शासकीय स्तरावर इ गव्हर्नन्सचा वापर वाढल्याने व इंटरनेटचा स्पीड वाढल्याने परिस्थितीत लवकरच सुधारणा होईल अशी चिन्हे दिसत आहेत.

मात्र वेबसाईट डिझाईन करणार्‍यांच्या संख्येतही वाढ झाल्याने येथेही तीव्र स्पर्धेला तोंड द्यावे लागणार याची ज्ञानदीपला कल्पना आहे. अनेक वर्षांचा अनुभव ही शिदोरी वेबडिझाईन क्षेत्रात पुरेशी नाही याची ज्ञानदीपला पुरेपूर जाणीव आहे. याच दृष्टीकोनातून नवे तंत्रज्ञान शिकून वेबडिझाईनमध्ये कालानुरूप सतत बदल करण्याचे धोरण आम्ही अंमलात आणले आहे.अर्थात शिकलेले वेबडिझायनर नोकरी सोडून पुण्या-मुंबईकडे गेले की पुन्हा नव्या उमेदवारांच्या शिक्षण व संशोधनासाठी वेळ खर्च करणे क्रमप्राप्त ठरते. आतापर्यंत असे १५ अनुभवी वेबडिझायनर ज्ञानदीपने इतर संस्थांना मिळवून दिले आहेत.

विषयाला अनुरूप आकर्षक रंगसंगती व मजकुराची मांडणी यावर वेबसाईटचे यश अवलंबून असते. त्यामुळे ग्राफिक डिझाईनला फार महत्व आहे.वेबसाईट सर्व ब्राऊजरमध्ये व्यवस्थित एकसारखी दिसावी यासाठी विषेश प्रयत्न करावे लागतात. w3c या संस्थेकडून वेबसाईटचे परिक्षण करून तिचे प्रमाणपत्र घेता येते.

डायनॅमिक मेनू, सरकत्या चित्रपट्ट्या, आकर्षक फोटो व व्हिडिओगॅलरी, साईटमॅप, टॅग क्लाऊड, विजेट, ट्विटर, फेसबुक, पिकासा इत्यादी (web 2.0) समूह संपर्क साधनांचा, गुगल मॅप, गुगल ऍड, मतपेटी, शॉपिंग कार्ट यासारख्या मोड्यूल्सचा समावेश अशा अनेक अपेक्षा आधुनिक वेबडिझाईनमध्ये पूर्ण करण्याची जबाबदारी वेब डिझाईनवर असते.सर्च इंजिन हे इंटरनेटवर माहिती शोधण्याचे मुख्य साधन आहे. त्याच्या शोधयादीत वेबसाईटचे स्थान वर येण्यासाठी सर्च इंजिन ऑफ्टिमायझेशन ही काळाची गरज बनली आहे.

याशिवाय वेबसाईटवर माहिती, चित्रे वा व्हिडिओ टाकण्याचे व रंगसंगती व मांडणी बदलण्याचे काम कोणतीही टेक्निकल माहिती नसणार्‍या वेबसाईट मालकाला करता यावी यासाठी ब्लॉग, वर्डप्रेस, जुमला, द्रुपल यासारख्या विविध वेबसाईट व्यवस्थापन प्रणाली विकसित झाल्या आहेत. डॉट नेट, कोड इग्नायटर, कोहाना, सिंफनी, पायरोसीएमएस यासारखे आकृतीबंधही (frameworks) अधिकाधिक वापरात येत आहेत. त्यातील योग्य पर्यायाची निवड करणेही आवश्यक असते. वेबसाईटवरील माहितीत उपर्‍या व्यक्तीने फेरफार करू नयेत यासाठी वेबसाईटला योग्य ती सुरक्षायंत्रणाही बसवावी लागते.

गेल्या काही वर्षांत ज्ञानदीपने पीएचपी, अजॅक्सचा वापर करून टेबललेस डिआयव्ही बेस्ड वेबसाईट तयार केल्या आहेत. जुमला, वर्डप्रेस व कोहाना मध्ये वेबसाईट तयार करून त्याचे व्यवस्थापन वेबसाईट मालकांकडे सुपूर्त केले आहे.बंगलोर महाराष्ट्र मंडळ, बंगलोर (mmbangalore.org.in) व लायन्स नॅब, मिरज(lneh.org) या संस्थांनी आपल्या बेबसाईट ज्ञानदीपकडून आधुनिक करून घेतल्या आहेत. उगारशुगर वर्क्सच्या वेबसाईटचे नूतनीकरण चालू आहे. इतरांनीही सध्याच्या काळातील वेबसाईटचे महत्व जाणून आपल्या आवश्यकतेनुसार वेबसाईटचे नूतनीकरण करून घ्यावे व आपल्या व्यवसाय वा उद्योगास आधुनिकतेची जोड द्यावयास हवी.

आता द्विमिती तंत्रज्ञानातून त्रिमिती तंत्रज्ञानाकडे व कॉम्प्यूटरकडून मोबाईलकडे वेबसाईटची वाटचाल चालू आहे. फ्लॅश/फ्लेक्स/ एक्शन्स्क्रीप्ट ३.० याचा वापर वाढला आहे. ज्ञानदीप या क्षेत्रातही आपले स्थान मजबूत करण्याचा प्रयत्न करीत आहे. सध्या चालू असलेला परदेशातील बांधकाम क्षेत्रातील एक त्रिमिती प्रकल्प त्यादृष्टीने एक महत्वाचा टप्पा ठरणार आहे.

Thursday, June 30, 2011

'1984' by George Orwel (एकोणिसशे चौर्‍याऎंशी)


कम्युनिस्ट राजवटीविरोधात लिहिलेल्या Animal farm या कादंबरीनंतर जॉर्ज ऑर्वेलने लिहिलेली एकोणिसशे चौर्‍याऎंशी (1984) ही रुपकात्मक दुसरी कादंबरी त्याच्या मृत्युपूर्वी एक वर्ष अगोदर म्हणजे १९५० मध्ये प्रसिद्ध झाली व थोड्याच कालावधीत ती सार्‍या जगात लोकप्रिय ठरली. सत्ताधीश भविष्यामध्ये आधुनिक विज्ञान तंत्रज्ञानाच्या साहाय्याने व्यक्तीस्वातंत्र्याची कशी गळचेपी करतील व सामान्य माणसाला अगतिक व गुलाम बनवतील याचे विदारक दर्शन या कादंबरीत पहावयास मिळते.

सध्याच्या काळातही त्या कादंबरीत वर्णन केलेली स्थिती येण्याची भीती सामान्य माणसास भेडसावत आहे.

सर्व छोटी राष्ट्रे मोठ्या राष्ट्रांनी गिळंकृत केल्याने पृथ्वीवर ओशनिया, एस्टेशिया व युरेशिया ही तीनच बलाढ्य राष्ट्रे अस्तित्वात आहेत ( स्टॅलिन, मुसोलिनी व हिटलर या सत्ताधीशांचे प्रतीक) व ती एकमेकांशी संघर्ष करून आपापली राज्ये वाढविण्याचा प्रयत्न करीत आहेत अशी पार्श्वभूमी १९८४ मध्ये तयार होईल अशी कल्पना या कादंबरीत लेखकाने केली आहे. ही सर्व राष्ट्रे आपापल्या देशातील प्रत्येक नागरिकावर पाळत ठेवून सत्तेविरुद्ध क्रांती होणार नाही याची पुरेपूर दक्षता घेत आहे. या कादंबरीचा नायक विन्स्टन स्मिथ हा त्यातील ओशनिया या राष्ट्रातील सामान्य माणूस आहे. विन्स्टनला आपल्या देशाच्या एकाधिकारशाही जुलमी राजसत्तेविरुद्ध संघर्ष करावा असे वाटत असते. त्याच्या संघर्षाची कथा हे या कादंबरीचे मुख्य सूत्र आहे.

ओशनिया राज्यात बिगब्रदर ( दादा) या नावाने हा सत्ताधीश ओळखला जातो. ( आपण दादागिरी हा शब्द याच अर्थाने वापरतो.) न्यूस्पीक ही नवी भाषा व टेलीस्क्रीन यंत्रणा यांच्या माध्यमातून सर्व जनतेवर लक्ष ठेवण्याचेच नव्हे तर त्यांच्या विचारांना योग्य वळण देण्याचे काम या देशातील शासनाद्वारे केले जाते. राज्याची अधिकृत व सक्तीची भाषा न्यूस्पीक असून त्यात जुन्या पारंपरिक शब्दांऎवजी नवे शब्द वापरले जातात.

(Newspeak language applies different meanings to things by referencing the ends instead of their means; hence the Ministry of Peace ie Minipax deals with war, and the Ministry of Love ie Miniluv deals with torture. However the Ministries do attempt to achieve that goal; peace through war, and love of Big Brother through brainwashing and torture.)

प्रत्येक घरातील एक भिंत टेलीस्क्रीनची असून त्यातून बिगब्रदर प्रत्येक माणसाला शिक्षण देण्याचे ( व त्याच्या हालचालींवर व बोलण्यावर लक्ष ठेवण्याचे ) काम करतो.

विंन्स्टन जिन्यावरून आपल्या घरात प्रवेश करतो व भितीवरील टेलीस्क्रीनवर दिसणार्‍या बिगब्रदरला वंदन करतो पण आपला चेहर्‍यावरील हताशपणा बिगब्रदरच्या ध्यानात येऊ नये यासाठी आपले तोंड फिरवतो येथपासून कादंबरीची सुरुवात होते. त्याला एक ओब्रिएन नावाचा त्याच्यासारखाच क्रांतीकारी सहकारी भेटतो. लपून छपून त्यांचे एकत्र भेटण्याचे व स्वातंत्र्यास उत्सुक व्यक्तींना जोडण्याचे काम तो करीत असतो. सत्य हे केवळ माणसाच्या मनात असते अन्यत्र नाही हे त्या संघटनेचे ब्रीदवाक्य असते. आपण एकटे नाही या कल्पनेने विन्स्टन उत्साही होतो व संघटनेच्या कार्यात सहभागी होतो. जुलिया नावाच्या मुलीशी त्याचे प्रेम जमते. तो तिच्यापुढे आपल्या सर्व भावना व विचार प्रकट करतो. त्याच्या विचारांशी जुलिया सहमती व्यक्त करते.

यानंतर मात्र बिगब्रदरची यंत्रणा त्याला अटक करते तेव्हा त्याला कळते की त्याला भेटलेली सर्व माणसे व जुलियासुद्धा बिगब्रदरनेच तयार केलेल्या जाळ्यातर्फे नेमलेली असतात. त्याच्याविरुद्धचे सर्व पुरावे ओब्रिएन बिगब्रदरला सादर करतो. विन्स्टनच्या मनातील स्वातंत्र्याच्या विचारांची लागण इतरत्र होऊ नये म्हणून त्याचे मन शुद्धीकरणाचे प्रयोग त्याच्यावर केले जातात. तुरुंगातील छळामुळे तो बिगब्रदर सांगतो तेच सत्य हे नवे तत्व स्वीकारतो. त्याच्याकडून ते दिवसरात्र वदवून घेतले जाते. मात्र रात्री झोपेत असतानाचे त्याचे बोलणे मॉनिटर केल्यानंतर त्याच्या मनात अजून स्वातंत्र्याची आस शिल्लक आहे हे बिगब्रदरच्या यंत्रणेस लक्षात येते व त्याच्यावर आणखी प्रभावी उपाय करण्याचे ठरते.

त्याला उंदरांची फार भीती वाटते हे जुलियाकडून कळले असल्याने त्याच्या डोक्यावर उपाशी उंदरांचा पिंजरा ठेवला जातो. अशा प्रकारच्या शारिरिक व मानसिक यातना देऊन विन्स्टनचे पूर्ण शुद्धीकरण करण्यात येते व त्याची सुटका होते. एक आज्ञाधारक व बिगब्रदरचा निष्टावंत माणूस बनविण्याचे कार्य बिगब्रदरने केलेले असते.

विन्स्टन एका क्लबमध्ये बुद्धीबळाचा खेळ खेळत आहे. सर्व बाजूनी चेक बसल्याने तॊ आपला राजा पटाबाहेर उचलून ठेवतो या प्रसंगाने कादंबरीचा शेवट केला आहे.

ज्या काळात टेलिव्हिजन हा शब्दही लोकांना माहीत नव्हता त्या काळात केलेली टेलीस्क्रीनची कल्पना, न्यूस्पीक या मानसशास्त्रावर आधारलेल्या नव्या भाषेची योजना जॉर्ज ऑर्वेलची भविष्यवेधी कल्पनाशक्ती दाखवितात. त्याच्या याच कल्पनांचा रशिया, चीन व अमेरिकेने वापर करून जनमानसावर आपल्या विचारांचा कसा पगडा बसविला हे सर्वज्ञात आहे.

Saturday, May 21, 2011

Far from the madding crowd


‘Far from the madding crowd’ (गर्दी व कोलाहलापासून दूर) या शीर्षकाचे थॉमस हार्डीचे पुस्तक मी पाहिले तेव्हा त्यात काय असेल याविषयी माझ्या मनात कुतुहल निर्माण झाले.

यापूर्वी मी ‘Two on a Tower’ ( मनोर्‍यावरील दोघे) ही याच लेखकाची कादंबरी वाचली होती. अवकाशातील तार्‍यांचे संशोधन करणारा स्विदिन व त्याच्यावर प्रेम करणारी व्हिवियन या दोघांच्या व्यक्तिचित्रणावर आधारलेली व आकाशदर्शनाची दुर्बीण असणार्‍या मनोर्‍याची पार्श्वभूमी असणारी ती कथा कादंबरीच्या नावाला साजेशी होती. तसेच काहीसे या नव्या कादंबरीत मला वाचायला मिळेल अशी माझी अपेक्षा होती. माझी त्याबाबतीत थोडी निराशा झाली मात्र कादंबरीच्या नावाने मात्र मला विलक्षण भुरळ घातली.
माझ्या डोळ्यासमोर उभे राहिले ते Monk who sold his Ferrari हे पुस्तक. मानसिक तणावांपासून मुक्ती मिळविण्यासाठी आपली संपत्ती सोडून हिमालयात जाणार्‍या माणसाची कथा त्यात सांगितली आहे. पूर्वी याच कारणासाठी आत्मज्ञानाचा शोध घेण्यासाठी साधु संन्यासी वनात वा लोकवस्तीपासून दूर जात असत.

गर्दी आणि कोलाहल यांनी माणसाचे सारे जीवन व्यापून टाकले आहे.सकाळी उठल्यापासून वर्तमानपत्रे, रेडिओ व दूरदर्शन यातील भडक बातम्या व जाहिराती यांचा मारा सुरू होतो. गडबडीने सर्व आवरून कामावर जायचे म्हटले की रस्त्यावरील वाहनांच्या गर्दीतून वाट काढावी लागते. बस स्टॉपवरील वा रेल्वे तिकिटांसाठी रांगा, बस वा लोकलमधील गर्दी नेहमीची असतेच. पण मोर्चे, रास्ता रोको, सभा वा नेत्यांचे दौरे असले की अशा प्रवासातही बराच मनस्ताप होतो.कामावरून येतानाही यापासून सुटका नसते. जेवणाचा डबा असला तर ठीक अन्यथा हॉटेल वा ठेल्यावरही गर्दी चुकत नाही. संध्याकाळी फिरायला वा देवळात जायचे म्हटले तरी तेथेही हातगाड्या, खेळ व खाद्याची दुकाने व माणसांची वर्दळ असतेच मार्केटिंगला जायचे म्हटले की झगमगाट करणार्‍या दिव्यांनी उजळून निघालेल्या दुकानातूनच फिरावे लागते. कामावरून घरी आले की टीव्ही आपली वाटच पहात असतो. रात्री झोपेपर्यंत तो आपल्याला सोडत नाही.

वर उल्लेखिलेली गर्दी व त्यामुळे होणारा मानसिक तणाव शहरी माणसाला अंगवळणी पडला आहे. शहरातील माणसे एखाद्या यंत्रातील भागाप्रमाणे बिनतक्रार असे तणाव सोसत असतात. सुटीच्या दिवशी पर्यटकांनी गजबजलेल्या ठिकाणी जाऊन ते मनःशांती मिळविण्याचा प्रयत्न करतात.

मला ज्या गर्दी व कोलाहलाबद्द्ल काळजी वाटते त्याचा वरील भौतिक पातळीवरील गर्दी व कोलाहलाशी काही संबंध नाही. आज राजकीय व समाजजीवनात फार वेगाने स्थित्यंतरे होत आहेत. पक्ष व निष्ठा सोयीनुसार बदलल्या जात आहेत. प्रसारमाध्यमांतून संस्कारक्षम, विधायक बातम्यांऎवजी अन्य भडक बातम्यांना व विषयांना अवास्तव महत्व दिले जात आहे व दुर्दैवाने समाज अशा कल्लोळात गुरफटला जाऊन भोगवादी व आत्मकेंद्रित बनत चालला आहे. सौहार्द, सहसंवेदना, प्रेम, आदर, विश्वासार्हता यांना वैयक्तिक जीवनात महत्व उरलेले नाही. आदर्श लोप पावत आहेत. ‘सर्वे गुणाः कांचनमाश्रयंती’ या उक्तीप्रमाणे पैसा व सत्ता असणारे लोकच आपले कल्याण करू शकतात हा समज दृढ होत आहे.
स्वार्थ, परस्पर हेवेदावे, भ्रष्टाचार, जुलूमजबरदस्ती व विध्वंसक कारवाया यामुळे समाज कधी नव्हे एवढा अस्थिर, असुरक्षित व विघटित झाला आहे.

लोकसंख्या वाढली, गर्दी वाढली तरी माणसे एकमेकांपासून दूर गेली आहेत. अपघात झाला, एखादा भूकबळी गेला, एखाद्याने आत्महत्या केली, कोठे आग लागली तर भोवताली मदतीसाठी गर्दी जमत नाही तर असलेली गर्दी विखरुन जाते. एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीवरही गुन्हेगारीचा शिक्का बसला की समाज त्या माणसाचे सारे गुण व कर्तृत्व विसरून त्याला प्राण्याहून हीन वागणूक देत आहे. चोरीत सापडलेल्यांना वा अपघात करणार्‍यांना वा मोर्चा काढणार्‍या लोकांना वा शासकीय नियम पाळणार्‍या अधिकार्‍यांना निर्दयपणे मारहाण करताना समाजाला माणुसकीचा विसर पडतो आहे.

भ्रष्टाचाराखाली बड्या नेत्यांना व अधिकार्‍यांना अटक झाल्याच्या बातम्या आवडीने वाचणारी व त्यावर तासन्‌ तास गप्पा मारणारी माणसे त्यांच्या स्वतःच्या व्यवसायात वा व्यवहारात पैसे देणे व घेणे निषिद्ध समजत नाहीत.त्यामुळे या चर्चा, मुलाखती, मेळावे व आंदोलने, बातम्या आणि भांडणे म्हणजे समाजाला शाश्वत जीवनमूल्यांपासून दूर ठेवण्यासाठी केलेला अर्थहीन कोलाहल वाटतो.

अशा गर्दीपासून व कोलाहलापासून दूर गेले तरच मनाला खरी शांतता मिळेल. मात्र आता परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. शांततेसाठी अशा जागाच नाहिशा होत आहेत व माणसेही तेथे जाण्यास सुरक्षेच्या कारणास्तव घाबरत आहेत. वाघसिंहांपेक्षा माणसांचीच भिती त्यांना वाटत आहे.

Ayn Rand च्या Atlos Shrugged या कादंबरीत ज्याप्रमाणे सर्व सृजनशील माणसे भ्रष्ट व स्वार्थी समाजापासून दूर जाऊन त्यांचे वेगळे विश्व तयार करतात व त्याचा परिणाम उरलेल्या समाजाचे सारे जीवनव्यवहार ठप्प होण्यात होतो हे दर्शविले आहे. त्याप्रमाणे सध्याच्या काळात ज्याला काही विधायक कार्य करायचे असेल, ज्ञान संपादन करायचे असेल वा नवनिर्मिती करायची असेल त्याने या कोलाहलापासून स्वतःला शरिराने शक्य झाले नाही तरी मनाने दूर रहावयास हवे.

Friday, May 20, 2011

गरिबांची जनगणना

भारतातील दारिद्र्यरेषेखालील सर्व गरिबांची जनगणना करण्याचा एक महत्वाकांक्षी कार्यक्रम शासन हाती घेणार आहे ही बातमी वाचली व मोठी गंमत वाटली. जंगलात किती वाघ वा सिंह आहेत किंवा कोठे व किती दुर्मिळ वनस्पती आहेत याचा शोध घेणे मी समजू शकतो. पण रस्तोरस्ती, गल्लीपासून दिल्लीपर्यंत भीक मागणारी माणसे, झोपडपट्ट्यात राहणारी, प्लॅटफार्मवर वा पदपथावर झोपणारी माणसे, छोट्या टपर्‍या वा हातगाडीवर व्यवसाय करणारी वा शेतात व उद्योगात तुटपुंज्या वेतनावर राबणारी माणसे सर्व ठिकाणी दिसत असूनही त्यांची संख्या मोजण्याने काय साध्य होणार आहे तेच कळत नाही.

मार्क ट्वेनने ‘स्टोलन व्हाईट एलेफंट’ नावाची एक रुपक कथा लिहिली आहे. चोरी गेलेल्या(?) पांढर्‍या हत्तीचा शोध घेण्यासाठी स्कॉटलंड यार्ड ही गुप्तहेर संघटना कसे प्रयत्न करते याचे मजेदार वर्णन त्यात आहे. तो हत्ती राजरोसपणे हिंडताना दिसल्याचे लोकांनी सागितले तरी त्यावर विश्वास ठेवला जात नाही.

अशा जनगणनेचा उद्देश गरिबांच्या विकासासाठी योजना आखण्यासाठी होईल असे सांगितले जाते. मात्र हे एवढे गरीब का निर्माण झाले याचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्याच्या भानगडीत कोणी पडत नाही. शोषणविरहित समाजरचना केल्याशिवाय व पैशाचे अनन्यसाधारण महत्व कमी केल्याशिवाय हे साध्य होणार नाही. गरिबांना मदत केवळ शासनाने न देता सभोवतालच्या समाजाने ती जबाबदारी उचलावयास हवी. आपल्या गावात कोणावरही भीक मागण्याची पाळी येऊ नये याची खबरदारी व तेवढी आर्थिक तरतूद प्रत्येक गावाला सहज करता येण्यासारखी आहे.

मात्र प्रत्यक्षात काय दिसते. कर्ज वा व्यसने व अंधश्रद्धा यांच्या विळख्यात ठेवून त्यांचे पैसे लुबाडण्याचे प्रयत्न सर्वत्र होत आहेत. याच गरजू गरिबांना हाताशी धरून पैसा व सत्ता मिळविण्याचे प्रयत्न होताना दिसतात. निवारा, अन्न, आरोग्य व शिक्षण या प्रत्येक क्षेत्राचे बाजारीकरण झाले आहे. गरिबीत पिचलेल्या व अन्यायाने चिडलेल्या गरिबांचा उपयोग केवळ दंगल, गुन्हेगारी, दहशत वा विध्वंसाच्या कामासाठी करून राजकीय पक्ष आपले महत्व वाढवतात.

कायद्याचा आपल्या फायद्यासाठी वापर करून गरिबांच्या जमिनी काढून घेणे, उच्च मध्यमवर्गीयांच्या सुखसोयी व व्यवसायासाठी अतिक्रमण हटावच्या साळसूद उद्देशाने व छोट्या टपर्‍या, हातगाड्या जप्त करणे, झोपडपट्ट्या हटविणे, शिस्तीच्या व स्वच्छ्तेच्या नावाखाली सार्वजनिक जागी झोपलेल्यांना व राहणार्‍यांना हुसकून लावणे या सर्व गोष्टी आपला समाज व शासन गरिबांविषयी कमालीचे उदासीन झाल्याचे दर्शवितात.

गरिबांचे प्रश्न जाणून घेण्याचा व त्यांना स्वाभिमानाने जगण्यासाठी प्रामाणिकपणे मदत करण्याचा प्रयत्न भोवतालच्या समाजाने केल्यासच गरिबी नाहिशी होईल. जनगणनेमुळे केवळ आपण त्यांच्यासाठी फार मोठे कार्य करीत आहोत असे समाधान मिळेल गरिबांनाही पुढील विकासाची स्वप्ने दाखवून गप्प करता येईल मात्र गरिबी अशीच वाढत राहील.

आजकाल अशा सर्वेक्षणांना फार महत्व आले आहे. कचर्‍याचे ढीग व घाण पाणी वाहणारे नदीनाले दिसत असूनही प्रदूषण शोधण्यासाठी गावागावातून नमुना तपासणीचे खर्चिक प्रकल्प राबविले जातात. मोठे प्रकल्प आखले जातात. पैशाच्या कमतरतेमुळे ते पूर्ण होण्यास बराच विलंब होतो व खर्च वाढल्याने ते तसेच प्रलंबित राहतात वा त्यास अनेक फाटे फुटून व विरोध होऊन ते गुंडाळले जातात. परिणामी आहे तीच स्थिती कायम राहते वा हळुहळू आणखी बिघडत जाते.

यासाठी प्रश्नांचे केवळ मूल्यमापन करण्यात वेळ व पैसा न घालवता प्रश्न त्वरित सोडविण्यावर भर दिला पाहिजे व मुळात प्रश्न निर्माणच होणार नाहीत यासाठी प्रभावी उपाययोजना करावयास हवी.

अशा सर्वेक्षणास बराच खर्च येतो. हा पैसा गरिबांना न मिळता इतरांनाच मिळतो. विकेद्रित विकास हा स्थायी असतो. गरीबी निर्मूलनासाठी वेगळा निधी ठेवण्यापेक्षा तो नजिकच्या आस्थापनांतून व उच्चभ्रू लोकवस्तीतून कसा उभा करता येल याचा विचार व्हावयास हवा. केवळ पैसा वा वेतन वाढविल्याने गरिबी हटणार नाही. तर त्या पैशाचा योग्य विनियोग होत आहे की नाही याची जबाबदारी निश्चित करणे व त्यासाठी मार्गदर्शक तत्वे विकसित करणे आवश्यक आहे.

उद्योग व व्यवसाय या सारख्या आस्थापनांवर केवळ किमान वेतनाचे नियम घालून चालणार नाही तर ते पैसे दारु, जुगार, चैनीसाठी खर्च होत नाहीत ना याची काळजी घेणे, कर्मचार्‍यांच्या घरात आरोग्य व स्वास्थ्य राखणे, अडीनडीला कमी व्याजाने पैसा उपलब्ध करणे याची जबाबदारीही त्यांच्यावर टाकावयास हवी.

हीच व्यवस्था गल्ली व मोहल्यामोहल्यात केली मोठ्या अपार्टमेंट वा बिल्डिंगमधील लोकांवर भोवतालच्या झोपडपट्टीच्या विकासाची जबादारी टाकली तर ती स्थायी स्वरुपाची सहजीवनाची नांदी ठरेल.

सेवाभावी संस्था असे कार्य कोणताही गाजावाजा न करता करीत असतात. त्यांना मदत करून अधिक सक्षम बनविले तर हे साध्य होऊ शकेल.

Thursday, May 19, 2011

जॉर्ज ऑर्वेलची रूपक कथा ‘अ‍ॅनिमल फार्म’



स्वतः समाजवादी असूनही रशियातील स्टॅलिन राजवटीतील विदारक सत्य लोकांसमोर आणण्यासाठी जॉर्ज ऑर्वेल या लेखकाने ‘अ‍ॅनिमल फार्म’ या नावाची रुपक कथा १९४३ मध्ये लिहिली. मात्र त्यावेळी रशिया नाझी जर्मनीच्या विरुद्ध असल्याने इंग्लंड, अमेरिकेत स्टॅलिनची राजवट लोकप्रिय होती व कोणीही ते पुस्तक छापण्यास तयार होईना. दुसर्‍या महायुद्धानंतर ते छापले गेले.

अ‍ॅनिमल फार्म ही कथा इंग्लंडमधील मिस्टर जोन्स नावाच्या शेतकर्‍याच्या फार्ममध्ये असणार्‍या प्राण्यांच्या क्रांतीविषयी आहे. या फार्ममध्ये गाई, घोडे, डुकरे, कुत्री असे अनेक प्राणी असतात. आपण कष्ट करतो पण आपला मालक आयता बसून खातो व आपल्यावर हुकुमत गाजवतो हे मनोर नावाचे वृद्ध रानटी डुक्कर सर्वांना सांगते व ही सत्ता झुगारून देऊन स्वातंत्र्य मिळविण्याचा सल्ला देते. त्याप्रमाणे सर्व प्राणी एकत्र होऊन मालकाला पिटाळून लावतात.

नेपोलियन नावाचे डुक्कर त्यांचा नेता बनते. पण तेही हुकुमशहासारखे वागून स्वतः चैन करते व पोलिस कुत्र्यांच्या मदतीने इतर सर्व प्राण्यांवर जुलूम करते. त्याच्या राजवटीची भलावण करत स्क्वीलर हे हुशार डुक्कर आपल्या प्रचार यंत्रणेचा वापर करून सर्व प्राण्यांना नेपोलियनच त्यांचा उद्धारकर्ता आहे व त्याच्याशी एकनिष्ठ राहण्यातच त्यांचे कसे हित आहे हे पटवून देते. सर्व प्राणी समान आहेत पण त्यातले काही प्राणी जास्त समान आहेत हे नवे तत्व उदयास येते.

मिस्टर जोन्स पुनः फार्मवर कबजा करण्यासाठी येतो त्यावेळी स्नोबॉल हे उदारमतवादी डुक्कर सर्व प्राण्यांना एकत्र करून तो प्रयत्न हाणून पाडते. मात्र स्नोबॉल आपल्याला प्रतिस्पर्धी होईल या भितीने नेपोलियन त्याच्या सुधारणांना विरोध करून त्याच्यामागे त्याचे कुत्री सोडून त्याला फार्ममधून पळवून लावतो. त्याची सत्ता मग पूर्वीच्या स्थितीपेक्षाही अधिक वाईट आहे हे इतर प्राण्यांच्या लक्षात येते.

कथेचा शेवट फार मार्मिक केला आहे. नेपोलियन व त्याचे साथीदार दारु पीत व जुगार खेळत बसलेले इतर प्राण्यांना खिडकीतून दिसते. ही आपल्यातली डुकरे आहेत की पूर्वीच्या मालकाची माणसे आहेत असा त्यांना संभ्रम पडतो.

राज्य भांडवलशाही असो, साम्राज्यवादी असो वा समाजवादी विचारसरणीचे असो, राजकीय सत्तेतून भ्रष्टाचार कसा जन्माला येतो आणि खॊटे तत्वज्ञानही लोकांच्या गळ्यात उतरवण्यास भाषा व प्रचारयंत्रणा कशी साहाय्यभूत ठरते. हे या रुपकाचे सार आहे.

(Animal Farm’s commentary on the corruptive nature of political power and the power of language as a tool of ideology and control rings so true that it continues to play out in the political world as a sort of self-fulfilling prophecy.)

Sunday, May 8, 2011

ओझोनच्या थरातील घट

प्रास्तविक - पृथ्वीवरील वातावरण हा पर्यावरणाचा सर्वात गतीमान घटक आहे. वातावरणातील घटक, त्याचे तापमान आणि स्वयंशुद्धीकरण क्षमता यात पृथ्वीच्या जन्मापासून सतत बदल घडत आले आहेत. तरीदेखील मानवी इतिहासाच्या कालखंडातील या बदलाची गती गेल्या दोन शतकांत पूर्वी कधी नव्हती एवढी जास्त वाढली आहे.
हवा प्रदूषण
पावसाच्या पाण्याबरोबर आम्ल (अ‍ॅसिड) येणे व त्यामुळे सजीव सृष्टी व इतर साधनसंपत्तीवर विपरित परिणाम होणे, शहरातील विषारी धुके(SMOG), हरित गृह परिणाम ( ग्रीन हाऊस इफेक्ट) आणि स्ट्रॅटोस्फिअरमधील ओझोनचा थर कमी होणे ही त्यातली काही उदाहरणे होत.
हवेतील पाण्याच्या वाफेचे प्रमाण सोडले तर हवेतील ९९.९ टक्क्यांपेक्षा जास्त प्रमाण नायट्रोजन, ऑक्सिजन व इतर पूर्णपणे निष्क्रीय असणार्‍या वायूंचे असते व हे प्रमाण मनुष्यप्राण्याच्या जन्मापासूनच्या इतिहासात कायम राहिलेले दिसते. याचा अर्थ असा की हवेतील अत्यल्प प्रमाणात असणार्‍या दूषित वायूंच्या प्रमाणात वाढ झाल्याने हवा प्रदूषण होते. या वायूंमध्ये सल्फर डाय ऑक्साईड(SO2), नायट्रोजन ऑक्साईड्स ( ज्याना एकत्रितपणे एनोएक्स NOx म्हटले जाते ), नायट्रिक ऑक्साईड व नायट्रोजन डाय ऑक्साईड आणि अनेक प्रकारची क्लोरोफ्लोरोकार्बन संयुगे यांचा मुखत्वे समावेश होतो.
ओझोनच्या थरात घट
या दशकात पृथ्वीभोवतालच्या वातावरणातील ओझोनच्या थरात घट होणे हे नवे संकट निर्माण झाले असून त्यामुळे पृथ्वीवरील सजीव सृष्टीच्या अस्तित्वासच धोका पोहोचण्याची शक्यता आहे हे शास्त्रज्ञांच्या लक्षात आले आहे.

पृथ्वीच्या वातावरणात ट्रोपोस्फिअर, स्टॅटोस्फिअर, मेसोस्फिअर, थर्मोस्फिअर व एक्झोस्फिअर असे थर असतात.

त्यातील स्ट्रॅटोस्फिअरमध्ये ओझोन वायूचे प्रमाण जास्त आढळते. या वायूमुळे हानीकारक वैश्विक किरण ( मुख्यत्वे अल्ट्राव्हायोलेट किरण) थोपविले जात असल्याने ते जमिनीवर पोहोचू शकत नाहीत. या थराची जाडी कमी झाली तर हे किरण पृथ्वीच्या पृष्ठभागावर येण्याचे प्रमाण वाढेल व त्यामुळे सजीव सृष्टीस धोका पोहोचेल अशी शास्त्रज्ञांना भीती वाटते.ब्रिटीश अंटार्टिक सर्व्हेच्या शास्त्रज्ञांनी १९८५ मध्ये अंटार्टिकावरील ओझोनच्या थराला भोक असल्याचे ( तेथील थराची जाडी कमी असल्याचे) शोधून काढले.

ओझोनच्या थरात घट होण्याची कारणे
हवा प्रदूषणास कारणीभूत असणारे वायू ओझोनचे विघटन करतात असे आढळून आले आहे. यात क्लोरोफ्लोरोकार्बन संयुगे, विशेषतः CFC-11 (CFCL3) आणि CFC-12(CFCl2) ही संयुगे यांचा समावेश होतो.गेल्या काही दशकात अतिसूक्ष्म थेंबांच्या स्वरुपातील सुवासिक द्रव्ये, फेस निर्माण करणारी रसायने तयार करण्यासाठी या संयुगांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला गेला.शीतकामध्ये बाष्पशील वायू म्हणूनही फ्रिऑनचा वापर करण्यात आला. यांचा प्रत्यक्ष सजीव सृष्टीवर कोणताही दुष्परिणाम होत नाही मात्र ही संयुगे हवेतील मिश्रणामुळे स्ट्रॅटोस्फिअरमध्ये पोचली की तीव्र अल्ट्राव्हायोलेट किरणांचा त्यांच्यावर मारा होऊन त्यांचे विघटन होते ClOx आणि BrOx हे रॅडिकल तयार होतात व त्यातून क्लोरीन वायू सुटा होतो. क्लोरीन ओझोनचे विघटन होऊन त्याचे ऑक्सिजन मध्ये रुपांतर हॊण्यास साहाय्यक ठरतो. क्लोरीन वायू तसाच राहिल्याने एका क्लोरीनच्या अणुमुळे हजारो ओझोन रेणूंचे ऑक्सिजनमध्ये रुपांतर होते. ओझोनचे विघटन करणार्‍या या क्लोरिनेटेड संयुगांचे स्ट्रॅटोस्फिअरमधील प्रमाण पूर्वीच्या मानाने ४ ते ५ पटीने वाढले आहे व त्यात दरवर्षी ५ टक्क्यांनी वाढ होत आहे.
ओझोनच्या थरातील घट - दुष्परिणाम
जर ही स्थिती अशीच चालू राहिली तर नजिकच्या भविष्यकाळात अल्ट्राव्हायोलेट किरणांमुळे वनस्पती व प्राणीमात्रांवर त्याचा विपरित परिणाम होईल. अल्ट्राव्हायोलेट किरणांमुळे त्वचेच्या कॅन्सरचे प्रमाण वाढेल.

याशिवाय अल्ट्राव्हायोलेट किरण शोषले न गेल्याने उष्णता निर्माण होण्याची क्रिया थांबेल त्यामुळे वातावरण थराच्या तापमानात घट होऊन त्याचा परिणाम वातावरणातील वार्‍यांच्या दिशा व गतीवर हॊईल. सूनामीसारखी संकटे वाढलील व शेवटी सार्‍या जीवसृष्टीचा सर्वनाश होईल.

Wednesday, May 4, 2011

प्रदूषण निदर्शक जलपर्णी

पंचगंगा नदीतील जलपर्णी
महाराष्ट्रातील बहुतेक सर्व नद्यांमध्ये उन्हाळ्यात जलपर्णी वाढलेली दिसते. जलपर्णी असेल तर नदीचा प्रवाह खुंटतो. हवेतील ऑक्सिजन पाण्यात मिसळण्याची क्रिया मंदावते. डासांचा प्रादुर्भाव वाढतो व लोकांना प्रदूषण झाल्याचे लक्षात येते. मग जलपर्णी काढण्यासाठी मोहीम राबवली जाते. जलपर्णी पूर्ण काढून टाकली की नदी प्रदूषणमुक्त होईल अशी लोकांची समजूत असते. मात्र जलपर्णी समूळ नाहिशी करण्याचे काम अशक्यप्राय आहे हे नंतर दिसून येते. पावसाळा आला की जलपर्णी वाहून जाते. प्रदूषणाचा प्रश्नही विस्मृतीत जातो.
मुळा नदीतील जलपर्णी व जलपर्णी काढण्याची यंत्रणा


जलपर्णी म्हणजेच प्रदूषण व जलपर्णी काढली की नदी प्रदूषणमुक्त होईल हा समज मात्र पूर्ण चुकीचा आहे. जलपर्णी वाढणे हा प्रदूषणाचा परिणाम आहे कारण नव्हे हे लक्षात घेतले पाहिजे.

शहराच्या सांडपाण्यातून वा रासायनिक खतांचा वापर केलेल्या शेत जमिनीतून झिरपणार्‍या पाण्यातील वा कारखान्याच्या सांडपाण्यातील नायट्रोजन व फॉस्फरस ही पोषक द्रव्ये पाण्यात मिसळली की जलपर्णी वाढते. ही पोषक द्रव्ये पाण्यात मिसळणे जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत जलपर्णीची वाढ अनिर्बंधपणे होत राहते. याच पोषक द्रव्यांवर व इतर सेंद्रीय पदार्थांवर जीवाणूंची ही वाढ होत असते. अनेक रोगजंतू पाण्यात टिकून राहण्यात व त्यांची वाढ होण्यात या दूषित पदार्थांचा सहभाग असतो.हे आपल्या लक्षात येत नाही. कारण हे जीवाणू आपल्याला दिसत नाहीत.

जलपर्णीची वाढ ही त्या अर्थाने प्रदूषणाची निदर्शक आहे. जलपर्णी म्हणजे प्रदूषण नव्हे. जलपर्णी वाढलेली दिसली की जिवाणूंचा धोका वाढलेला आहे हे आपण ओळखले पाहिजे. व जलपर्णी काढण्याबरोबर या जीवाणूंची वाढ रोखण्यासाठी नायट्रोजन, फॉस्फरस व सेंद्रीय पदार्थांचे पाण्यात मिसळणे थांबवावयास हवे.

मात्र नायट्रोजन व फॉस्फरस ही पोषक द्रव्ये शोषून घेण्याच्या गुणधर्माचा उपयोग करून या जलपर्णीचा उपयोग सांडपाणी शुद्धीकरणासाठी केला जातो हे ऎकून आपल्याला आश्चर्य वाटेल. सूर्यप्रकाशाखेरीज वेगळ्या ऊर्जेची गरज नसणारी ही पद्धत आता अधिक प्रभावी व कमी खर्चाची असल्याने भारतात अधिक मान्यता पावत आहे.

Sunday, May 1, 2011

कृष्णा नदी प्रदूषणः कारणे

कृष्णा नदीः
कृष्णा नदीला दक्षिण भारताची गंगा म्हटले जाते. महाराष्ट्रातील ती एक महत्वाची नदी असून सातारा, सांगली व कोल्हापूर या जिल्ह्यात कृष्णा व तिच्या उपनद्यांचे खोरे आहे. कृष्णा नदी महाबळेश्वर येथे उगम पावून डोंगराळ भागातून मार्गक्रमण करीत ५० कि.मी नंतर वाईला येऊन पोचते तेथून पुढचा महाराष्ट्रातील सुमारे २७० कि. मी. चा प्रवास सपाट प्रदेशातून नागमोडी मार्गाने पार करीत ती नृसिहवाडी नंतर कर्नाटक राज्यांत शिरते. नदीच्या उगमापासून कराडपर्यत नदीचा प्रवाह कमी असून कराडला कोयना मिळाल्यावर कोयना धरणातील पाण्यामुळे नदीच्या प्रवाहात वाढ होते. कराड पासून सांगली पर्यतचा भाग बागायती शेती असून औद्योगिक दृष्टयाही अतिशय प्रगत आहे. कराड, इस्लामपूर, सांगली अशी मोठी शहरे व अनेक छोटी गावे या नदीच्या दोन्ही काठांना वसली आहेत. त्यामुळे या भागातील प्रदूषणाचा विचार या लेखात केला आहे.

बिगर मोसमी काळात कृष्णा नदीचा प्रवाह कृष्णेवरील वाई येथे असणारे धोम धरण व कोयनेवरील कोयना धरण यातून सोडल्या जाणार्‍या पाण्यावर अवलंबून असतो. पाणी साठविण्यासाठी नदीवर खोडशी, बहे, बोरगांव, नागठाणे, डिग्रज, सांगली येथे बांधारे बांधले आहेत. एका बंधार्‍याचे पाणी दुसर्‍या बंधार्‍यास टेकेल अशा रितीने बंधार्‍यांच्या जागा ठरविण्यात आल्या आहेत. पावसाळ्याचा काळ सोडला तर नदी ही नदी न राहता बंधार्‍यांमागे साठलेल्या तलावांची साखळी या स्वरुपात कार्य करते. त्यामुळे प्रवाह नसल्याने हवेतील ऑक्सिजन योग्य प्रमानात पाण्यात मिसळू शकत नाही व नैसर्गिक शुद्धीकरण प्रक्रियेस फार मोठी मर्यादा पडते.

१) शेतीसाठी पाण्याचा वापरः
नदीच्या एकूण पाण्याच्या वापरापैकी ८० ते ९० टक्के पाणी मुख्यत्वे शेतीसाठी वापरले जाते असे आढळून आले आहे. शेतीसाठी कृष्णा नदीवर अनेक उपसा जलसिंचन योजना असून कृष्णा कालव्याचाही उपयोग होतो. औद्योगिक वापरासाठी व शहरांसाठी लागणारे पाणीही या बंधार्‍यात साठणार्‍या पाण्यातून उचलण्यासाठी अनेक उपसा योजना कार्यान्वित आहेत. या सर्व कारणासाठी वापरलेल्या पाण्यातील काही भाग दूषित पदार्थ व क्षार यांच्यासह नदीच्या पाण्यात ठिकठिकाणाच्या नाल्यांद्वारे मिसळतो व प्रदूषणास कारणीभूत ठरतो.पाण्याची उपलब्धता भरपूर असली तरी ती अनिश्चित असल्याने शेतकरी मिळेल तेंव्हा शेतीला भरपूर पाणी पाजतो. यामुळे शेतीला फायदा न होता उलट नुकसानच होते. शिवाय जादा झालेले पाणी जमीन खराब करते. वा परत वाहत येऊन नदीस मिळते. अशावेळी या पाण्याबरोबर खते, कीटकनाशके, सांडपाणी व क्षारही पाण्यात मिसळतात. डिग्रज भागातील हजारो एकर जमीन पाण्याच्या जादा वापराने क्षारपड व नापीक झाली आहे. हे प्रत्यक्ष उदाहरण शेतकर्‍यांपुढे असूनही पाण्याचा शास्त्रीय व काटकसरीने वापर करण्याबाबत अजून, फारशी प्रगती झालेली नाही

२) औद्योगिक प्रदुषण
अ) साखर कारखाने : उसापासून साखर तयार करताना बाहेर पडणार्‍याम सांडपाण्यात तेले, चिपडाचे कण व १००० ते १५०० मि. ग्रॅ/लि. पर्यत बी. ओ. डी (सेंद्रीय पदार्थ) हे दूषित पदार्थ असतात. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अटींप्रमाणे या भागातील सर्व साखर कारखान्यांनी सांडपाणी शुध्दीकरण यंत्रणा बसविल्या आहेत. प्रक्रिया केलेले सांडपाणी, चांगल्या पाण्याने सौंम्य करून शेतीसाठी वापरले जाते. यावेळी सांडपाण्याचा बी. ओ. डी. १०० मि. ग्रॅ/लि पेक्षा कमी असावा लागतो. सांडपाणी शुध्दीकरण यंत्रणा योग्यरितीने कार्य करीत नसेल तर जमीन व पाण्याचे प्रदूषण होऊ शकते. नादुरुस्त यंत्रणा, विद्युत पुरवठयात खंड वा पुरेसे प्रशिक्षण नसलेला चालकवर्ग असल्यास असे प्रदूषण होते. शेतीस वापरलेले अतिरिक्त पाणी नदीस प्रदूषित करू शकते.

ब) आसवनी-साखर कारखान्यातून बाहेर पडणार्‍या मळीपासून अल्कोहोल तयार करणार्‍या. आसवनीमधून स्पॅटवॉश नावाचे अतिशय दाहक, लालभडक, आणि अतिशय जास्त आम्लयुक्त, सेंद्रीय पदार्थ व क्षार असणारे सांडपाणी बाहेर पडते. याचा बी. ओ. डी.४०००० ते ५०,००० मि. ग्रॅ / लि. इतका जास्त असतो त्यामुळे प्रदूषणाचा सर्वात जास्त धोका संभवतो. पारंपारिक पध्दती ह्या स्पेटंवॉशवर मोठया खड्ड्यामध्ये जीवाणू प्रक्रिया केली जात असे. परंतू आता शुध्दीकरणाच्या नव्या पध्दतींचा वापर करने आवश्यक ठरत आहे. साखर कारखान्यातून बाहेर पडणार्‍या ’प्रेसमड’ या टाकाऊ घन पदार्थाच्या मिश्रणातून कंपोस्ट करून चांगले खत बनविणे हा प्रकल्प आता बहुतेक साखर कारखान्यांनी हाती घेतला आहे.

क) अ‍ॅसेटोन व अ‍ॅसेटिक आम्ल प्रकल्प यांचे सांडपाणी आम्लयुक्त असल्याने त्याचे चुन्याने उदासिनीकरण करून साखर कारखान्याच्या सांडपाण्याबरोबर त्यावर प्रक्रिया केली जाते.

३) शहरांचे सांडपाणीः शहरांच्या सांडपाण्याच्या प्रश्नाकडे अजून म्हणावे तितके लक्ष दिले जात नाही असे खेदपूर्वक म्हणावेसे वाटते. कराड, इस्लामपूर, सांगली येथील सांडपाणी एकत्रीकरण, उपसा व शुध्दीकरण यात अनेक त्रुटी असून सांडपाण्याचा बराच भाग प्रक्रिया न होता नदीत मिसळण्याची परिस्थिती कायम आहे. अशा सांडपाण्यामध्ये रोगजंतूंचा समावेश असण्याची व त्यामुळे साथीचे रोग पसरण्याची शक्यता असते. सांडपाणी शुध्दीकरणासाठी आधुनिक व यांत्रिक पध्दतीचा वापर करावा असे येथे सुचवावयाचे नाही. आधुनिक ख्रर्चिक पध्दतीमुळे चांगले शुध्दीकरण होत असले तरी वीजखर्चामुळे अशी यंत्रणा नियमित चालविणे स्थानिक संस्थांच्या आवाक्याबाहेरचे काम आहे. परिणामी यंत्रणा बंद पडण्याचा धोका अधिक असतो. त्यापेक्षा कमी खर्चाच्या ऑक्सिकरण तलावासारख्या योजनाही चांगले कार्य करू शकतात. मात्र यासाठी जागा नदीपासून व शहरापासून खूप दूर प्रक्रिया केलेले सांडपाणी केवळ शेतीसच वापरले जाईल याची व्यवस्था करावयास हवी.

प्रदूषणाची सद्यस्थितीः
कृष्णा नदीच्या कराड पासून सांगली पर्यंतच्या प्रदूषणाबाबत १९८६ पासून सातत्याने सर्वेक्षण झाले असून त्यांच्या निष्कर्षानुसार पाण्यात सर्वसाधारणपणे बी. ओ. डी. चे प्रमाण २ ते २.६ मि. ग्रॅ/लि इतका कमी असला तरी जीवाणूंचे प्रमाण (एम.पी.एन) जास्त आढळते. रेठरे नाला व शेरीनाला या दोन प्रमुख नाल्यातील पाणी दूषित असून नदीला जेथे हे पाणी मिळते तेथे पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण फार कमी आढळते. क्षारांचे प्रमाण कराडपासून वाळव्यापर्यत सामान्य (कठीणपणा १००-१५०मि. ग्रॅ.लि) असले तरी सांगलीत त्यामध्ये फार वाढ (कठीणपणा ३२५ ते ६०० मि.ग्रॅ/लि) होते. वाळवा ते सांगली दरम्यान बागायती शेतीचे प्रमाण व पाण्याचा वापर जास्त असल्याने तसेच नदीकाठच्या डिग्रजजवळील जमिनी क्षारयुक्त झाल्याने नदीच्या पाण्यात क्षार उतरत असावेत असे वाटते.

कराड पासून सांगली पर्यतचा भाग औद्योगिक दृष्टया विकसित झाला असला तरी तो प्रदुषणाच्या दृष्टीने अधिक नाजूका बनला आहे. प्रत्येक भागाची प्रदूषण सहन करण्याची काही विशिष्ट क्षमता असते. त्यापेक्षा प्रदुषणाची पातळी वाढली की ती विकासात मारक ठरते. त्यामुळे या भागात नवे उद्योगधंदे आणताना फार काळजी पुर्वक विचार करावयास हवा. प्रदुषण नियंत्रणासाठी अशा नव्या उद्योगावर अधिक कडक बंधने घालावयास हवीत.

वाढती लोकसंख्या, शहरीकरण, उद्योगधंद्यांची वाढ आणि शेतीविकास यामुळे पाण्याची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. महाराष्ट्रातील बहुतेक नद्या केवळ पावसाळ्यात वाहणार्‍याह असल्याने बिगर मोसमी काळात पाण्याची गरज भागविण्यासाठी धरणातून सोडलेल्या. पाण्यावर किंवा बंधार्‍यामागे साठलेल्या पाण्यावर सर्वस्वी अवलंबून रहावे लागते. नदी म्हणजे जणू तलावांची साखळीच असते. नदीच्या पाण्याचे प्रदूषण व त्याचे स्वंयशुध्दीकरण याबाबतीत केले जाणारे वैज्ञानिक आडाखे अशा साठविलेल्या पाण्याच्या बाबतीत लागू पडत नाहीत. बहुतेक वेळा हे पाणी स्थिर असल्याने शुध्दीकरणाचा वेग अतिशय कमी असतो. पाण्याच्या वाढत्या मागणीमुळे व जलप्रदूषणामुळे नव्या समस्या निर्माण होत आहेत. जलप्रदूषणाच्या कारणांचा शोध घेऊन योग्य ते उपाय केले नाहीत तर नजिकच्या भविष्यकाळात पिण्याच्यां पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होईलच पण दूषित पाण्यचा जमीन व इतर पर्यावरण घटकांचाही फार हानीकारक प्रभाव पडेल अशी शक्यता आहे.

फ्लॅश प्रोग्रॅमिंगसाठी अ‍ॅक्शनस्क्रिप्ट

फ्लॅशच्या साहाय्याने आकर्षक जाहिराती तयार करता येतात हे लक्षात आल्यावर फ्लॅश तंत्रज्ञानाकडे जाहिरातक्षेत्राचे लक्ष वळले. फ्लॅशचा उपयोग करून आपल्या उत्पादनाची वा सेवेची जाहिरात इंटरनेटच्या माध्यमातून करण्यासाठी पैसा उपलब्ध झाल्याने फ्लॅश तंत्रज्ञानातील सुधारणांस अधिक गती मिळाली. कार्टून फिल्म तयार करताना पूर्वी ज्याप्रमाणे आर्टिस्ट अनेक चित्रे काढत असत, त्याप्रमाणे अनेक लेअर्स व फ्रेम्सवर आकृत्या, चित्रे व मजकूर घालून त्यापासून आकर्षक फ्लॅश मुव्ही करण्याचे तंत्र अनेक व्यावसायिकांनी हस्तगत केले. आजही या पद्धतीने जाहिराती तयार करून देश परदेशातील कामे करणार्‍या कंपन्या भरपूर नफा मिळवीत आहेत.

मात्र अशा पद्धतीमध्ये फ्लॅश मुव्ही करण्यास फार वेळ लागतो. कुशल चित्रकाराची वा ग्राफिक डिझायनरची आवश्यकता असते व केलेल्या मुव्हीत बदल करणे कठीण असते. यावर उपाय म्हणून फ्लॅश मुव्ही करण्याचे काम प्रोग्रॅम लिहून करता यावे यासाठी प्रयत्न सुरू झाले. यातूनच अ‍ॅक्शनस्क्रिप्टचा जन्म झाला.

व्हेक्टर व रास्टर इमेज
चित्रांमध्ये दोन प्रकार असतात. एक व्हेक्टर इमेज व दुसरा रास्टर इमेज. चौकोन, त्रिकोण,वर्तुळ यासारख्या आकृत्या काढण्यासाठी त्याचे गणिती सूत्र वापरता येते. याना व्हेक्टर इमेज असे म्हणतात. याउलट फोटोमध्ये चित्रातील प्रत्येक बिंदूला महत्व असते व त्या बिंदूंच्या गुणविशेषांमुळे पूर्ण चित्र साकार होत असते. अशा चित्राला रास्टर इमेज असे म्हणतात. व्हेक्टर इमेजेस काढण्यासाठी गणिती सूत्र वापरावे लागत असल्याने त्यास खूप कमी मेमरी लागते. तसेच त्यात बदलही सहज करता येतात. रास्टर इमेजमध्ये स्थान, आकार व रंगात बदल करता येत असला तरी गणिती सूत्रांचा फारसा उपयोग करता येत नाही. अ‍ॅक्शनस्क्रिप्टमध्ये व्हेक्टर इमेजेस तयार करणे वा त्यात हवे तसे हवे तेव्हा बदल करणे शक्य असते. रास्टर इमेजच्या बाबतीत मात्र यावर मर्यादा पदतात.
अ‍ॅक्शनस्क्रिप्ट - १
अ‍ॅक्शनस्क्रिप्ट - १ मध्ये चित्रातील बदल वा कृती याविषयीचा प्रोग्रॅम संबंधित फ्रेममध्ये समाविष्ट केला जात असे. त्यामुळे प्रोग्रॅमचे अनेक तुकडे फ्लॅश मुव्हीमध्ये अनेक ठिकाणी विखुरलेले असत व त्यामुळे प्रोग्रॅम समजणे वा त्यात बदल करणे अवघड व जिकीरीचे काम असे.
अ‍ॅक्शनस्क्रिप्ट - २
अ‍ॅक्शनस्क्रिप्ट - २ मध्ये फ्लॅश मुव्हीतील सर्व प्रोग्रॅम एकत्र एकाच ठिकाणी लिहिण्याची सोय उपलब्ध झाली. एवढेच नव्हे तर प्रोग्रॅमची फाईल .as या दुय्यम नावाने वेगळी काढून ऊप पद्धतीने क्लास व ऑब्जेक्टच्या परिभाषेत वापरता येऊ लागली. साहजिकच ही भाषा शिकण्यासाठी फ्लॅश सॉफ्टवेअर तसेच प्रोग्रॅमिंग यांचा अभ्यास असणे आवश्यक झाले. मात्र या पद्धतीने केलेली फ्लॅश मुव्ही वापरणे वा त्यात बदल करणे सोपे झाले.
अ‍ॅक्शनस्क्रिप्ट - ३
अ‍ॅक्शनस्क्रिप्ट - ३ मध्ये फ्लॅश मुव्हीसाठी लागणार्‍या सर्व फाईल, डाटा व इतर साधने यांचे xml फाईलच्या स्वरुपात संकलन करून ती अधिक व्यवस्थित, फ्लेक्झीबल ( बदल करण्यास सोपी) व मेमरीचा सुयोग्य उपयोग करणारी बनविण्यात आली.

फ्लॅशचा उपयोगही केवळ जाहिरातीसाठी न राहता शिक्षणासाठी व डाटाबेसवर आधारित माहिती विश्लेषणासाठी एक प्रभावी रॅपिड वेब अ‍ॅप्लिकेशनच्या स्वरूपात होऊ लागला आहे.

नजिकच्या भविष्यकाळात त्रिमिती तंत्रज्ञानाच्या आधारे बांधकाम वा अभियांत्रिकी क्षेत्रातील प्रकल्पांचे इंटरनेटच्या माध्यमातून सादरीकरण करण्यासाठी फ्लॅश / फ्लेक्स आधारित तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. यासाठी हे तंत्रज्ञान शिकणे फायद्याचे ठरणार आहे. ज्ञानदीपने या क्षेत्रात भरीव कामगिरी केली असून सध्या परदेशातील एका महत्वाकांक्षी प्रकल्पावर ज्ञानदीपमध्ये काम चालू आहे.

Saturday, April 30, 2011

आकर्षक वेबसाईटसाठी फ्लॅश(Flash) तंत्रज्ञान

वेबसाईटवर गद्य मजकुरापेक्षा चित्रे चटकन्‌ लक्ष वेधून घेतात. हलती चित्रे असल्यास वेबसाईटच्या आकर्षकतेत अधिकच भर पडते. फ्लॅश तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आपल्याला अशी चित्रे वा ध्वनी-चित्रफिती बनविता येतात.यामुळे बहुधा जाहिरातींसाठी फ्लॅशचा वापर करण्यात येतो.

मॅक्रोमिडिया या कंपनीने वेबसाईट डिझाईनसाठी फ्लॅश, ड्रीमव्हीवर व फायरवर्क्स यांचा विकास केला. आता ती कंपनी फोटोशॉप व अ‍ॅक्रोबॅट रीडर बनविणार्‍या अडॊब कंपनीत विलीन झाली आहे.

फ्लॅश ५ पासून सुरुवात झालेले तंत्रज्ञान आता फार प्रगत झाले असून त्याच्या फ्लॅश १० पर्यंत सुधारित आवृत्या निघाल्या. त्यातून फ्लेक्स या आधुनिक तंत्रज्ञानाची निर्मिती झाली आहे.

फ्लॅश तंत्रज्ञानाचा परिचय

फ्लॅशमध्ये चित्रे काढण्यासाठी एक स्टेज (फलक) असते. काढलेली चित्रे वेगवेगळ्या लेअर्सवर (पातळ्यांवर) साठवून ठेवता येतात व त्यांची एकावर एक रचना करता येते. पारदर्शक कागदांवर वेगवेगळी चित्रे काढून व त्यांचा गठ्ठा करून सर्वसमावेशक एकच चित्र करता येते तशीच ही सोय असते.


याशिवाय स्टेजच्या वरच्या बाजूला टाईमलाईन दिसते. त्याच्यावर अनेक फ्रेम्स (चित्रचौकटी) आपण तयार करू शकतो.प्रत्येक फ्रेममध्ये अनेक लेअर्सचे चित्र असते.अशी चित्रे अनेक फ्रेम्समध्ये घातली की त्यांची एक चित्रफीत तयार होते. चित्रफीत तयार करण्याच्या या फाईलला .fla हे दुय्यम नाव असते. ही फाईल फ्लॅश मुव्ही (.swf हे दुय्यम नाव) म्हणून एक्स्पोर्ट केली की चित्रफीत कार्यान्वित होते. वेबपेजमध्ये याचा समावेश केला की ही चित्रफीत दिसू लागते. मात्र त्यासाठी कॉम्प्युटरवर फ्लॅश प्लेअर असावा लागतो. अन्यथा इंटरनेटवरून तो डाऊनलोड होऊन फ्लॅश मुव्ही दिसण्याची व्यवस्था वेबपेजच्या प्रोग्रॅममध्ये केलेली असते.

Friday, April 29, 2011

जुमला( Joomla) भाग-२

जुमला सीएमएस(माहिती व्यवस्थापन प्रणाली) वेबसाईटच्या डिझाईनसाठी वापरण्यात काय फायदे आहेत हे आपण जुमला परिचय या धड्यात पाहिले. जुमलाचे कार्य कसे चालते हे खालील चित्रात दाखविले आहे.


डाटाबेसमध्ये सर्व माहिती ठेवली जाते. पीएचपी प्रोग्रॅममार्फत ही माहिती घेऊन व टेम्प्लेट ( नमुना डिझाईन)च्या सीएसएसप्रमाणे सर्व्हरवर वेबपेज तयार केले जाते व ते युजरच्या ब्राउजर कडे पाठविले जाते.

आता जुमलाचा व्यवस्थापन कक्ष (बॅक एण्ड अ‍ॅड्मिनिस्ट्रेशन) कसा असतो ते पाहू.

व्यवस्थापन कक्ष
जूमलामध्ये डिझाईन केलेल्या वेबसाईटच्या व्यवस्थापन कक्षात प्रवेश करण्यासाठी वेबसाईतवरील लॉगिन बॉक्समध्ये यूजरनेम, पासवर्ड लिहून अथवा ब्राउजरच्या अ‍ॅड्रेसबारमध्ये वेबसाईटचे नाव व पुढे /administrator असे लिहून लिंक उघडावी लागते, उदा http://www.mysangli.com/administrator

व्यवस्थापन कक्ष वापरण्याचे अधिकार तीन प्रकारचे असतात.

१. सुपर अ‍ॅड्‌मिनिस्ट्रेटर - सुपर अ‍ॅड्‌मिनिस्ट्रेटरचे वेबसाईटवर पूर्ण नियंत्रण असते. त्याला वेबसाईटमध्ये सर्व प्रकारचे बदल करण्याचे अधिकार असतात.तसेच इतर प्रकारच्या युजर्सच्या अकौंटमध्ये फेरफार करण्याचे स्वातंत्र्य असते.
२. अ‍ॅड्‌मिनिस्ट्रेटर - अ‍ॅड्‌मिनिस्ट्रेटरला वेबसाईटमध्ये सर्व प्रकारचे बदल करण्याचे अधिकार असतात परंतु .सुपर अ‍ॅड्‌मिनिस्ट्रेटरच्या अकौंटमध्ये त्याला फेरफार करता येत नाहीत.
३. मॅनेजर - मॅनेजरला वेबसाईटवरील मजकूर व विभाग, व मेनू बदलण्याचे वा नवीन घालण्याचे अधिकार असतात. मात्र त्याला वेबसाईटच्या मांडणी वा पूरक प्रोग्रॅम वा सुविधांमध्ये बदल करता येत नाहीत.
अ‍ॅड्‌मिनिस्ट्रेटरने Admin विंडोमध्ये युजरनेम ( शक्यतो admin हेच नाव वापरले जाते) व पासवर्ड घातला की व्यवस्थापन कक्ष उघडतो.

यात वरच्या बाजूला आडवा मेनू दिसतो. त्यात साईट(वेबसाईटची सेटींग्ज), मेनू ( वेबपेजवरील विभाग), कंटेंट(वेबपेजवरील माहिती), कांपोनंट्स ( जुमला प्रणालीत जोडता येणारे प्रोग्रॅम), एक्स्टेंशन्स(बाहेरचे प्रोग्रॅम वा सुविधा), टूल्स (इतर साधने) व हेल्प ( मदत कक्ष) अशी शीर्षके दिसतात. या शीर्षकावर माउसने क्लिक केले की उभा मेनू उघडतो व त्यातील पर्याय दिसतात. यातिल योग्य पर्याय निवडून वेबसाईटचे मुख्य पान डिझाईन करणे(टेम्प्लेट निवडणे), मेनू ठरविणे, टेम्प्लेट निवडणे, नवे मोड्यूल्स वा कांपोनंट इन्स्टॉल करणे इत्यादी कामे करता येतात.

या मेनूच्या खाली Add New Article (नवी माहिती), Article Manager(विभागवार माहिती घालण्याची सुविधा), Front Page Manager (मुख्य पानावरील मजकुराची मांडणी), Section Manager (मुख्य विभाग व्यवस्थापन), Category Manager(उपविभाग व्यवस्थापन), Media Manager( चित्रे, ध्वनी, वा ध्वनी-चित्रफिती व्यवस्थापन), Language Manager( वेबसाईट वरील भाषेचा उपयोग), User Manager(नोंदणीकृत सभासदांचे व्यवस्थापन) Global Configuration( सर्व वेबपेजेससाठी समान सेटिंग्ज व्यवस्थापन ) असे पर्याय दिसतात. वरच्या आडव्या मेनूमधूनही हे पर्याय निवडता येतात फक्त सुलभतेसाठी हे मुख्य पर्याय ्चित्राद्वारे दर्शविलेले असतात.

यातील आवश्यक तो पर्याय निवडून वेबसाईटवर विभाग वा उपविभाग घालणे, नवी माहिती घालणे, फोटो अपलोड करणे, भाषा निवडणे यासारखी कामे करता येतात.

Thursday, April 28, 2011

वर्डप्रेस (Wordpress)भाग - १ - एक लोकप्रिय प्रभावी सीएमएस

वेबसाईट डिझाईनसाठी वर्डप्रेस ही एक प्रभावी व मुक्त माहिती व्यवस्थापन प्रणाली आहे. मायएसक्यूएल डाटाबेस व पीएचपी प्रोग्रॅम यांचा यात वापर केला आहे. ब्लॉग वेबसाईटपेक्षा अधिक सुविधा असणारी मात्र जुमला व द्रुपलपेक्षा खूप कमी मेमरी लागणारी व अधिक सुटसुटीत प्रणाली असून तिची रचना व कार्य समजण्यास अगदी सोपे आहे.

वर्डप्रेस प्रणालीमध्ये वाचकांच्या अभिप्रायासाठी व वेगवेगळ्या विषयांवर गटचर्चा करण्यासाठी विशेष सुविधा असल्याने व डिझाईनचे अनेक तयार नमुने ( टेम्प्लेट्स) वापरता येत असल्याने ही प्रणाली अत्यंत लोकप्रिय ठरली आहे.वर्डप्रेसची माहिती देणारी अनेक संकेतस्थळे आहेत.मात्र वर्डप्रेसची आधुनिक आवृत्ती मिळविण्यासाठी http://www.wordpress.org या वेबसाईटवरून वर्डप्रेसची झिप फाईल डाऊन लोड करावी.

कोणत्याही प्लॅटफॉर्मच्या सर्व्हरवर याचे इन्स्टालेशन करता येते. डोमेनसाठी होस्टींगस्पेस घेतल्यानंतर सीपॅनेल कंट्रोलमधून फाईल मॅनेजर उघडून त्यात वर्डप्रेसची झिप फाईल (wordpress-3.1.2.zip) अपलोड करावी. व तेथेच अनझिप करावी (त्यातील फाईल्स सुट्या कराव्यात.) फाईल मॅनेजरच्या पीएचपी सर्व्हरवर एक मायएसक्यूल डाटाबेस तयार करावा लागतो. नंतर त्या डाटाबेसचे नाव, युजरचे नाव, डाटाबेससाठी पासवर्ड, सर्व्हरचा आय. पी अ‍ॅड्रेस (वा वेबसाईटचे नाव) ही सर्व माहिती जमा केली की केवळ पाच मिनिटात आपल्याला ही नवी वेबसाईट कार्यान्वित करता येते.


वेबसाईटचे नाव ब्राउजरच्या अ‍ॅड्रेस बारमध्ये घातले की इन्श्टॉलेशन फोल्डरमधील फाईल कार्यान्वित होतात व इन्स्टॉलेशनसाठी सूचना दिल्या जातात. वेबसाईट व्यवस्थापन कक्षात प्रवेशासाठी admin व पासवर्ड द्यावा लागतो. तीन चार टप्प्यात सर्व माहिती भरून झाली की इन्स्टॉलेशन फोल्डरचे नाव बदलावे लागते. आता पुन्हा वेबसाईटचे नाव ब्राउजरच्या अ‍ॅड्रेस बारमध्ये घातले की वेबसाईट आपल्याला दिसू लागते.या वेबसाईटची रचना व चित्रे वर्डप्रेसच्या ठराविक नमुन्याप्रमाणे असतात. यात बदल करण्यासाठी तसेच वेबपेजेसमधे माहिती भरण्यासाठी आपल्याला वेबसाईटच्या व्यवस्थापन कक्षात प्रवेश करावा लागतो. यासाठी वेबसाईटचे नाव व पुढे /wp-admin असे लिहावे लागते. येणार्‍या तक्त्यात admin व पासवर्ड घातला की व्यवस्थापन कक्ष ( Administration panel -Dashboard) दिसू लागतो.

आता डाव्या रकान्यामध्ये मजकूर लिहिण्यासाठी पोस्ट्स(Posts), चित्रे, फोटो वा ध्वनीचित्रफीत घालण्यासाठी मिडिया(Media), लिंक्स(Links), पेजेस(Pages) व अभिप्रायासाठी कॉमेट्स(Comments) अशी नावे दिसतात. यावर क्लिक केले की संबंधित माहितीचे पान उघडते.. आपल्याला वेगवेगळ्या विषयांवर लेखन करावयाचे असल्यास व विभाग -उपविभागात ते ठेवायचे असल्यास वेगवेगळ्या कॅटेगरी (Categories) तयार करता येतात व पोस्ट केलेल्या वेबपेजेसचे विभागवार वर्गीकरण करता येते.
ज्ञानदीपने http://svranade.dnyandeep.com http://shubhangi.dnyandeep.com या ब्लॉग वेबसाईट वर्डप्रेसमध्ये केल्या आहेत त्या पहाव्यात.

Sunday, April 24, 2011

कोड इग्नायटर (Codeigniter) भाग -२

व्ह्यू (Views)
व्ह्यू म्हणजे साधे वेबपेज किंवा वेबपेजचा एखादा भाग, उदा. हेडर किंवा बॅनर, मेनू वा तळटीप. हे व्ह्यूज पाहिजे त्याप्रकारे दुसर्‍या व्ह्यूत समाविष्ट करता येतात. व्ह्यू हे स्वतंत्रपणे कार्यान्वित करता येत नाहीत. कंट्रोलरमार्फत त्यांचे संचालन होते. येथे कंट्रोलरचे काम एखाद्या ट्रॅफिक पोलिसासारखे असते. कोणता व्ह्यू दाखवायचा व कोणता नाही ते कंट्रोलर ठरवितो.

व्ह्यू तयार करणे
blogview.php हा व्ह्यू तयार करण्यासाठी खालील प्रोग्रॅम लिहावा.
(येथे html टॅगसाठी * हे चिन्ह वापरले आहे.)
*html*
*head*
*title* ज्ञानदीप ब्लॉग*/title*
*/head*
*body*
*h1*माझ्या ज्ञानदीप ब्लॉगवर आपले स्वागत आहे!*/h1*
*/body*
*/html*

आता ही फाईल कोड इग्नायटरच्या application/views/ या फोल्डरमध्ये सेव्ह करावी.
मागच्या धड्यातील उदाहरणात ज्याप्रमाणे blog.php फाईल कंट्रोलरच्या साहाय्याने प्रकाशित केली होती त्याप्रमाणे blogview.php फाईल खालील क्लासद्वारे प्रकाशित करता येईल.
class Blog extends CI_Controller {

function index()
{
$this->load->view('blogview');
}
}
ब्राउजरमध्ये ती पाहण्यासाठी मागच्या उदाहरणाप्रमाणे
example.com/index.php/blogview/
अशी लिंक वापरावी लागेल.
एका वेबपेजचे अनेक सुटे भाग एकत्र जोडून वेबपेज (class Page ) करण्यासाठी खालीलप्रमाणे प्रोग्रॅम लिहिता येतो.

class Page extends CI_Controller {

function index()
{
$data['page_title'] = 'Your title';
$this->load->view('header');
$this->load->view('menu');
$this->load->view('content', $data);
$this->load->view('footer');
}

}
वरील उदाहरणात Page नावाचा क्लास तयार करून त्यात वेबपेजचे शीर्षक, हेडर, मेनू, $data या माहितीसंचातून घेतलेला मजकूर व तळटीप हे व्ह्यू एकत्र जोडता येतात.

कोड इग्नायटर (Codeigniter) भाग -१

पीएचपी प्रोग्रॅमिंग भाषा वापरून वेबसाईट डिझाईन करण्यासाठी आवश्यक असणार्‍या सर्व सुविधांच्या लायब्ररी व सोप्या पद्धती असणारे कोड इग्नायटर हे एक प्रभावी फ्रेमवर्क आहे.कोहाना हे फ्रेमवर्क कोड इग्नायटरचे फ्रेमवर्क वापरून विकसित केले आहे.


कोड इग्नायटरची वैशिष्ठ्ये
१. कमी मेमरी लागणारे छोटेखानी फ्रेमवर्क
२. उत्तम कार्यक्षमता
३. पीएचपीच्या वेगवेगळ्या आवृत्तीवर व होस्टींग प्लॅटफॉर्मवर चा्लू शकणारे फ्रेमवर्क
४. इन्स्टॉल करताना अगदी कमी सेटींग्ज आवश्यक
५. पीअरसारख्या मोठ्या लायब्ररीची आवश्यकता नसेल तर कोड इग्नायटर अधिक योग्य पर्याय
६. गुंतागुंतीचे प्रोग्रॅम लागत नाहीत. टेम्प्लेट(वेबसाईट मांडणी)चे कोड शिकावे लागत नाही.
७. फ्रेमवर्कविषयी सर्व तांत्रिक माहिती सहज समजण्याजोगी
कंट्रोलर
कंट्रोलर म्हणजे क्लास फाईलचे असे नाव की जे वेबपेज URI (Universal Resource Indicator) शी जोडून शोधता येईल. उदाहरणार्थ blog.php हा क्लास
example.com/index.php/blog/
असा लिहिला तर कोड इग्नायटर त्याचा अर्थ blog.php असा घेतो.

खाली दिलेले Blog या क्लासचे उदाहरण पीएचपीच्या टॅगमध्ये लिहिले की blog.php हा क्लास तयार होईल.
class Blog extends CI_Controller {

public function index()
{
echo 'Hello World!';
}
}

यात CI_Controller म्हणजे कोड इग्नायटरचा मुख्य क्लास. या क्लासपासून Blog हा क्लास तयार केला आहे. क्लासच्या नावातील पहिले अक्षर नेहमी कॅपिटल असावे लागते.
कोड इग्नायटर कंट्रोलरसाठी राखीव नावे
कोड इग्नायटर कंट्रोलरमध्ये अनेक नावे व फंक्शन्स वापरली जातात. आपले सर्व क्लास त्या मुख्य कंट्रोलरपासून बनविले जाणार असल्याने आपल्या प्रोग्रॅममध्ये ती नावे क्लाससाठी वा इतरत्र वापरता येत नाहीत.
या राखीव नावांची यादी.

* Controller
* CI_Base
* _ci_initialize
* Default
* index

Functions


* is_really_writable()
* load_class()
* get_config()
* config_item()
* show_error()
* show_404()
* log_message()
* _exception_handler()
* get_instance()

Variables


* $config
* $mimes
* $lang

Constants

* EXT
* FCPATH
* SELF
* BASEPATH
* APPPATH
* CI_VERSION
* FILE_READ_MODE
* FILE_WRITE_MODE
* DIR_READ_MODE
* DIR_WRITE_MODE
* FOPEN_READ
* FOPEN_READ_WRITE
* FOPEN_WRITE_CREATE_DESTRUCTIVE
* FOPEN_READ_WRITE_CREATE_DESTRUCTIVE
* FOPEN_WRITE_CREATE
* FOPEN_READ_WRITE_CREATE
* FOPEN_WRITE_CREATE_STRICT
* FOPEN_READ_WRITE_CREATE_STRICT

Thursday, April 21, 2011

With malice toward none

"With malice toward none, with charity for all, with firmness in the right as God gives us to see the right, let us strive on to finish the work we are in; to bind up the nation's wounds; to care for him who shall have borne the battle, and for his widow and his orphan - to do all which may achieve and cherish a just and lasting peace, among ourselves, and with all nations."
---- Abraham Lincoln's Second Inaugural Address, March 4, 1865.

"You have been my eyes
Things I didn't know I saw
You showed me were there

The soft wind that soothes
Is, at root, the hurricane
Which can destroy you

It's your firing squad
But I don't need a blindfold
I have died before

Wit should not be used
As a sword to inflict scars
Till its edge is honed"

--- Like Haiku Tanka other Verse
By Don Raye

Faith is like glass. Once broken, it can't be joined.

Occasions do not make man either good or bad
They only show what he is.

I do not want to continue in the post of authority in any social service when there is a speck of doubt in anybody's mind about my character.

Tuesday, April 19, 2011

माझ्या मना बन दगड

'











Translation of Marathi poem by Vinda Karanadikar
माझ्या मना बन दगड Oh my mind. Become a stone
माझ्या मना बन दगड
हा रस्ता अटळ आहे !
अन्नाशिवाय, कपड्याशिवाय
ज्ञानाशिवाय, मानाशिवाय
कुडकुडणारे हे जीव
पाहू नको, डोळे शिव!
नको पाहू जिणे भकास,
ऐन रात्री होतील भास
छातीमधे अडेल श्वास,
विसर यांना दाब कढ
माझ्या मना बन दगड!

हा रस्ता अटळ आहे !
ऐकू नको हा आक्रोश
तुझ्या गळ्याला पडेल शोष
कानांवरती हात धर
त्यांतूनही येतील स्वर
म्हणून म्हणतो ओत शिसे
संभाळ, संभाळ, लागेल पिसे!
रडणाऱ्या रडशील किती?
झुरणाऱ्या झुरशील किती?
पिचणाऱ्या पिचशील किती?
ऐकू नको असला टाहो
माझ्या मना दगड हो!

हा रस्ता अटळ आहे !
येथेच असतात निशाचर
जागोजाग रस्त्यावर
असतात नाचत काळोखात;
हसतात विचकून काळे दात
आणि म्हणतात, कर हिंमत
आत्मा विक उचल किंमत!
माणूस मिथ्या, सोने सत्य
स्मरा त्याला स्मरा नित्य!
भिशील ऐकून असले वेद
बन दगड नको खेद!

बन दगड आजपासून
काय अडेल तुझ्यावाचून
गालावरचे खारे पाणी
पिऊन काय जगेल कोणी?
काय तुझे हे निःश्वास
मरणाऱ्याला देतील श्वास?
आणिक दुःख छातीफोडे
देईल त्यांना सुख थोडे?
आहे तेवढे दुःखच फार
माझ्या मना कर विचार
कर विचार हास रगड
माझ्या मना बन दगड

हा रस्ता अटळ आहे !
अटळ आहे घाण सारी
अटळ आहे ही शिसारी
एक वेळ अशी येईल
घाणीचेच खत होईल
अन्यायाची सारी शिते
उठतील पुन्हा, होतील भुते
या सोन्याचे बनतील सूळ
सुळी जाईल सारे कूळ
ऐका टापा! ऐका आवाज!
लाल धूळ उडते आज
त्याच्यामागून येईल स्वार
या दगडावर लावील धार!
इतके यश तुला रगड
माझ्या मना बन दगड
Oh my mind. Become a stone
This road is unavoidable
People shuddering , without food, without clothes
Without knowledge, without status
Do not see, stich your eyes
Don't see the the life without meaning
There would be shocking dreams in night
Your breath would get choked
Forget them, suppress your feeling
Oh my mind, become a stone

This road is unavoidable
Do not hear their cry
Your throat would become dry
Close your ears by hands
Still the sounds will enter the ears
Hence I say pour hot lead into them
Keep calm, control yourself
Otherwise you will become mad
If you are cryer, how long you can cry
If you keep expecting, how long you will expect
If you getting broken, how long will you get broken
Hence do not hear such cries
Oh my mind, become a stone

This road is unavoidable
The nightwalkers live here
Dancing in the black night
Laugh with their black teeth
And say, become bold
Sell your soul, get the money
Man is fake, gold is truth
Remember this remember this
You will be afraid hearing such scriptures
Instead become a stone, No regrets

From today become a stone
What would stop without you?
Can anybody live by drinking
Tears on the cheeks?
Can your exhaust air
give breath to dying person?
And your utter sorrow
can it give them any comfort?
The pains are too large
Oh my mind, think over
Think more, laugh more
Oh my mind become a stone

This road is unavoidable
The dirt here is unavoidable
The nausa here is unavoidable
But a time will come
When the dirt will become manure
Small specks of injustice with grow wild
This gold will become cross
All will get crucified
Hear sounds of horse
Red dust has started floating in the air
The warrior will come after that
He will sharpen his weapons on you stone
This much success is plenty for you
Oh my mind, become a stone.

Sunday, April 17, 2011

कोहाना फ्रेमवर्क

जुमला(Joomla), द्रुपल(Drupal)सारख्या या माहिती व्यवस्थापन प्रणालींसाठी जास्त मेमरी, पीएचपी व वेगळ्या डाटाबेसची आवश्यकता असते. शिवाय या प्रणाली मोठ्या व गुंतागुंतीच्या असल्याने त्यांचा वापर सहसा मोठ्या वेबसाईटसाठी करण्यात येतो.वर्डप्रेस (Wordpress) आकाराने सुटसुटीत व छोट्या वेबसाईटसाठी योग्य सीएमएस (CMS) आहे पण यासाठीही वेगळ्या डाटाबेसची आवश्यकता राहते.

कोहाना हे पीएचपी प्रोग्रॅमिंग भाषेवर आधारित एक ऑब्जेक्ट ओरिएन्टेड फ्रेमवर्क आहे.त्याची रचना कोड इग्नायटर नावाच्या मोड्यूल, व्ह्यू, कंट्रोलर(HMVC-Hierarchical Model View Controller) पद्धतीवरून तयार केली आहे. ते ओपनसोर्स (मुक्त) प्रकारचे असल्याने त्याचे लायसन्स घ्यावे लागत नाही.

कोहाना फाईल सिस्टीम
कोहाना फाईल सिस्टीम कास्केडिंग (उतरंड प्राधान्यक्रमावर आधारित) प्रकारची असून त्यात तीन प्रमुख थर आहेत.
1.अ‍ॅप्लिकेशन (Application Path)
2. मोड्यूल (Module Paths) कोहाना मोड्यूल्सची यादी
3. सिस्टीम(System Path) यात सर्व महत्वाच्या फाईल्स व क्लास नोंदलेले असतात.

कोहानाची फाईल सिस्टीम अशा प्रकारे बनवलेली आहे की त्याची व्याप्ती पाहिजे तेवढी वाढविता येते. त्यासाठी वेगळ्या डाटाबेसची गरज नसते. ते कॉम्प्युटरवर इन्स्टाल करताना विशेष सेटींग्ज (कॉन्फिगरेशन) करावी लागत नाहीत. कोहानामध्ये आवश्यक ते सर्व कोहाना क्लास आहेत. कोहानामध्ये पीएचपी 5 प्रोग्रॅमच्या आटोलोडींग (__autoload function) सुविधेचा उपयोग केलेला असल्याने(Kohana::autoload) बाहेरच्या क्लास फाईल समाविष्ट करण्यासाठी प्रत्येकवेळी include() वा require() यांचा वापर करावा लागत नाही

युजरकडून भरली जाणारी माहिती तपासण्याची (व्हॅलिडेशन) व्यवस्था, अनधिकृत माहिती प्रवेश होऊ नये यासाठी योग्य ती सुरक्षा व्यवस्था, प्रोग्रॅममधील चुका पाहून दुरुस्तीची सोय इत्यादी आवश्यक वैशिष्ठ्यांनी कोहाना परिपूर्ण आहे.त्यामुळे आधुनिक वेबसाईट डिझाईन क्षेत्रात ते मान्यता पावले आहे.

ज्ञानदीपने काव्य झाले गाणे (kavyazalegane.com), महाराष्ट्र टेक्निकल एज्युकेशन सोसायटीची वेबसाईट (mtesociety.org) कोहाना फ्रेमवर्क वापरून डिझाईन केल्या आहेत.

Saturday, April 16, 2011

ऊप (OOP) ऑब्जेक्ट ओरिंएन्टेड प्रोग्रॅमिंग

बेसिक(Basic) व सी (C) या कॉम्प्युटर प्रोग्रॅमिंगच्या भाषा प्रोसिजर ओरिंएन्टेड भाषा आहेत. म्हणजे येथे प्रोग्रॅमिगचे कार्य पहिल्या ओळीपासून सुरू होऊन शेवटच्या ओळीपर्यंत एका क्रमाने होते. याउलट सी++(C++) ही ऑब्जेक्ट ओरिंएन्टेड प्रोग्रॅमिंग भाषा आहे.आता बहुतेक नव्या प्रोग्रॅमिंगसाठी प्रोसीजरऎवजी ऑब्जेक्ट ओरिंएन्टेड पद्धत वापरली जाते.

हे ऑब्जेक्ट ओरिंएन्टेड प्रोग्रॅमिंग किंवा `ऊप' म्हणजे काय?

प्रोग्रॅमचे छोटे छोटे भाग क्रमवार एकानंतर एक असे न लिहिता प्रत्येक भागासाठी एक विशिष्ट नावाचा स्वयंपूर्ण प्रोग्रॅम वस्तुसंकल्पना (ऑब्जेक्ट) या स्वरुपात मांडला जातो. ही संकल्पना समजण्यासाठी काही उदाहरणे पाहू.

आपणास पशु, पक्षी, माणूस, देव या शब्दांचे अर्थ माहीत आहेत. माणूस म्हटले की आपल्या मनात त्याचे विशिष्ट गुणधर्म व कार्यपद्धती लगेच लक्षात येतात. आपण माणूस ओळखूही शकतो. सजीव वस्तूंप्रमाणे मोटार, पंखा, यासारख्या वस्तू वा बँक, शाळा, दवाखाना यासारख्या संकल्पना आपल्याला समजतात. मात्र यातील कोणतीही गोष्ट केवळ त्या संकल्पनेच्या स्वरुपात अस्तित्वात नसते तर त्याचे प्रत्यक्षातील अस्तित्व विशिष्ठ नावाच्या प्रतिरूपात आपणास पाहता येते. उदाहरणार्थ देव संकल्पना स्पष्ट करण्यासाठी आपल्याला राम, गणपती असे प्रत्यक्षातील देवाचे रूप सांगावे लागते. माणसाचे उदाहरण देताना विशिष्ठ नाव असणारी व्यक्ती वा शाळा संकल्पना मांडताना प्रत्यक्षातील उदाहरण द्यावे लागते.

वस्तूची(ऑब्जेक्टची) मूळ संकल्पना क्लास(Class) या संज्ञेने प्रोग्रॅमिंगमध्ये व्यक्त केली जाते. क्लासमध्ये त्या वस्तूचे गुणधर्म(Properties), कार्यपद्धती(Methods) व घटना(Events) यांची माहिती दिलेली असते. क्लास स्वतः काही कार्य करू शकत नाही तर त्यापासून बनलेली प्रत्यक्ष वस्तू ( ऑब्जेक्ट) कार्य करू शकते. म्हणजे क्लासपासून प्रत्यक्ष नाव असलेली वस्तू तयार करून त्या वस्तूकडे कार्य होते.

ऑब्जेक्ट स्वरुपातील प्रोग्रॅम करण्यासाठी क्लास लिहावा लागतो. व त्याचा वापर करण्यासाठी त्याचा प्रत्यक्ष अवतार(Instant) विशिष्ठ नावाच्या ऑब्जेक्टच्या स्वरुपात मांडावा लागतो. उदाहरणार्थ कुत्रा या शब्दावरून आपल्याला प्राण्याच्या प्रकाराविषयी माहिती झाली तरी मोत्या हा एक कुत्रा आहे या वाक्यावरून मोत्याचे गुणधर्म आपणास प्रत्यक्ष दाखविता येतात.एका ऑब्जेक्टचे असे अनेक अवतार ( प्रतिरुपे) निरनिराळ्या नावाने तयार करता येतात. त्यांच्या गुणधर्मात फरक असले तरी त्या सर्वांचे कुत्रा या संकल्पनेचे गुणधर्म एकच असतात.

अशा पद्धतीचा प्रोग्रॅमिंगमध्ये काय उपयोग ? अशी शंका येणे स्वाभाविक आहे. आता दंडगोलाकृती ठोकळ्याचे घनफळ काढण्यासाठी लागणार्‍या प्रोग्रॅमचा क्लास तयार केला व त्यापासून वेगअवेगळ्या विशिष्ठ त्रिज्या व लांबी असणार्‍या ठोकळ्यांसाठी या क्लासपासून केलेल्या ऑब्जेक्टचा वापर केला तर त्यांची घनफळे काढता येईल.याठिकाणी घनफळ काढण्याचा क्लास (प्रोग्रॅम) मुख्य प्रोग्रॅमपासून वेगळा ठेवता येईल. असेच वेगवेगळ्या कामासाठी अनेक क्लास तयार करून ठेवलेले असतील तर मुख्य प्रोग्रॅम करताना फक्त या क्लासच्या ऑब्जेक्ट्चा वापर करावा लागेल. प्रोग्रॅम समजण्यास सोपा होईलच शिवाय घनफळ कसे काढले जाते याचा प्रोग्रॅम गुप्त राहील. ब्लॅक बॉक्स वा जादूची पेटी असते त्याप्रमाणे याचे दिलेल्या माहितीवर गुप्तपणे प्रक्रिया करून उत्तर देण्याचे कार्य राहील.

ऊप प्रोग्रॅमिंगची पद्धत एकदा समजली की शास्त्रशुद्ध व प्रभावी प्रोग्रॅमिंग करणे सहज शक्य होते.

जुमला - परिचय

जुमला(Joomla) ही एक वेबसाईट डिझाईन करण्यासाठी, पीएचपी(PHP) व मायएसक्यूएल ( MySQL) डाटाबेसवर आधारित बनवलेली सुरक्षित (Secured)व मुक्त (Free) माहिती व्यवस्थापन प्रणाली (Content Management System) आहे.

स्वयंपाक करताना लागणारे पदार्थ निरनिराळ्या ड्ब्यात वा भांड्यात ठेवलेले असतात. आवश्यकतेनुसार व आवश्यक त्या प्रमाणात ते पदार्थ घेऊन त्यावर प्रक्रिया करून खाद्य्पदार्थ बनविला जातो. तशाचप्रकारे वेबपेजसाठी लागणारी सर्व माहिती वेबपेजमध्ये स्थायी स्वरुपात न ठेवता वेगळ्या डाटाबेसच्या वेगवेगळ्या टेबल्समध्ये ठेवली जाते व पीएचपी प्रोग्रॅमच्या साहाय्याने आवश्यकतेनुसार ती डाटाबेसमधून घेऊन व त्याचे योग्य संकलन करून वेबपेज बनविले जाते.

वेबपेजचे वेगवेगळे भाग स्वतंत्र फाईलमध्ये तयार करून पीएचपीद्वारे ते कसे एकत्र जोडता येतात हे आपण पाहिले. त्याचप्रमाणे संकेतस्थळावरील माहितीची मांडणी वेगळ्या सीएसएस फाईलमध्ये ठेवून ती वेबपेजला लिंक कशी करतात हेही आपण शिकलो आहे. जुमलामध्ये केवळ वेबपेज नव्हे तर सम्पूर्ण वेबसाईटमधील सर्व पानांचे डिझाईन असणारी टेम्प्लेट (संकेतस्थळ आराखडा) बाहेरून जोडण्याची व्यवस्था केलेली असते. त्यामुळे वेबसाईटचे संपूर्ण स्वरूप चटकन बदलता येते. पीएचपी आधारित वेबसाईट पूर्णपणे सुरक्षित नसते व त्यात हॅकरकडून पीएचपी प्रोग्रॅममध्ये बदल करून विकृत माहिती प्रसिद्ध होण्याचा वा वेबसाईट बंद होण्याचा धोका संभवतो. जुमला प्रणालीमध्ये प्रत्येक पीएचपी प्रोग्रॅमला सम्रक्षक कवच असते व अधिकृत मार्गाखेरिज दुसर्‍या कोणत्याही मार्गाने हॅकरला प्रवेश करता येत नाही.

जुमलाचे आणखी एक वैशिष्ठ्य म्हणजे जुमलाच्या मूळ सुविधांशिवाय अनेक छोटे उपयुक्त प्रोग्रॅम त्याला जोडता येतात व वेबसाईट अधिक परिपूर्ण करता येते. मोड्यूल्स, कांपोनंट्स व प्लगिन या प्रकारचे अनेक जोडप्रोग्रॅम मोफत वा अगदी कमी किमतीत मिळतात. यामुळे वेबसाईट डिझाईनचे काम सोपे होते.

जुमला सॉफ्टवेअर सर्व्हरवर इन्स्टॉल करावे लागते. जुमलाची झिप फाईल सर्व्हरवर टाकून ती तेथे उघडली की जुमला इन्स्टालेशनसाठी आवश्यक माहिती भरण्यास सांगितले जाते. जुमला इन्स्टॉल झाल्यावर इन्स्टालेशन फोल्डरचे नाव बदलावे लागते. असे केले की जुमला वेबसाईट कार्यान्वित होते.

जुमला वेबसाईटचा मुख्य फायदा म्हणजे वेबसाईट अपडेट करण्यासाठी एफटीपी न लागता युजर पासवर्ड वापरून युजरला त्यातील माहितीत बदल करता येतात. त्यामुळे वेबडिझाईनची तांत्रिक माहिती नसतानाही व्यवस्थापकास वा युजरला वेबसाईटवर बदल करता येतात.

ज्ञानदीपच्या बर्‍याच वेबसाईट जुमला प्रणाली वापरून तयार केल्या आहेत. उदा. मायसांगली डॉट कॉम(www.mysangli.com), मायमराठी डॉट कॉम (www.mymarathi.com), संस्कृतदीपिका डॉट ओआरजी(www.sanskritdeepika.org), विज्ञान डॉट नेट (www.vidnyan.net)इत्यादी.

आता जुमलाची रचना कशी असते ते पाहू.