Saturday, October 31, 2020

वेबसाईटच्या माध्यमातून सामाजिक समरसता

 अमेरिकेत भय  चोरांचे, पोलिसांचे आणि शेजा-यांचेही

 आपण निर्जन ठिकाणी वा जंगलात हिंडताना एखादे श्वापद आपल्यावर हल्ला करेल का अशी एक अनामिक भीती मनात असते. नेमकी त्याच प्रकारची भीती अमेरिकेत राहणा-या स्थलांतरित कुटुंबांत पहावयास मिळते.  पण ही भीती प्राण्याची नसून अनोळखी माणसांची असते. आपले शेजारी कोण आहेत याची माहितीच बहुतेक लोकांना नसते. 

 माझ्या मुलाच्या अपार्टमेंटमध्ये रात्री खिडकीच्या काचेवर दगडासारख्या काही वस्तूचा आघात होऊन काच फुटली. कशामुळे काच फुटली हे पाहण्यासाठी दार उघडायला भीती वाटल्याने त्याने  जवळच्या एका भारतीय कुटुंबाकडे फोन केला. कोणीच येईना पाहून त्याने सरळ पोलिसांना ९११ वरून फोन केला. थोड्या वेळाने दारावर थप थप असा आवाज आला. आता दार उघडावे की नाही या शंकेने त्याने परत पोलिस लाईनला फोन लावला तिकडून सांगण्यात आले की फोन चालू ठेवा आम्ही कळविल्या शिवाय दार उघडू नका. नंतर फोन आला की दार उघडा बाहेर पोलीसच आहेत. 

दार उघडल्यावर पिस्तूल रोखलेले पोलीस आत आले त्यांनी घराचा काना कोपरा व मागची मोकळी जागा तपासली व कोणी न दिसल्याने परत जाऊ लागले तेवढ्यात पुन्हा दारावर थपथप असा आवाज आला पोलिसांनी पिस्तूल रोखतच दार किलकिले उघडले. बाहेर आधी फोन केलेल्या घरातील मुलगा काय झाले विचारायला आला होता. मग पोलिसांनी त्याला सुरक्षित घरी सोडण्यासाठी त्याच्याबरोबर गेले. काच कशाने फुटली याचा शोध लागलाच नाही. दुसरे दिवशी पोलीस पुन्हा येऊन पाहणी करून गेले.  अपार्टमेंटमध्ये १०० ब्लॉक्स असूनही ही स्थिती बाकी कोणालाच समजली नाही. भारतात असे होईल का

बागेत कुत्र्याला घेऊन फिरायला आलेल्या एका महिलेला एक आफ्रिकन माणूस हातात काही वस्तू घेऊन फिरताना दिसला तिने पोलिसांना फोन केला तो माणूस पक्षी निरिक्षणासाठी कॅमेरा घेऊन हिंडत होता असे नंतर समजले.
पोलिसांना काही संशय आला तर स्वसंरक्षणासाठी गोळी घालण्याचे अधिकार असल्याने गैरसमजुतीतूनही एखाद्याची हत्या होते.

 मध्यंतरी एका आफ्रिकन वंशाच्या व्यक्तीला खाली पाडून पकडताना त्या व्यक्तीचा मृत्यू झाला तो वर्णद्वेषातून  खून झाला असा आरोप होऊन मोठी दंगल उसळली व तिचे लोण अनेक शहरात पसरले. 

भारतातील संवेदनशील व सहयोगी समाज

आपल्याकडे समाजव्यवस्था बरीच सोशीक आणि परस्पर दुःख जाणणारी  असल्याने अनोळखी शहरात वा गर्दीतही लोक परस्परांना मदत करतात.  छोट्या गावात तर सर्व माणसे माहितीची असल्याने सारे गावच कुटुंबासारखे मिळून मिसळून असते. त्यामुळे सुरक्षिततेची व अर्ध्या रात्रीही गरज पडल्यास मदतीसाठी शेजारी धावून येतील अशी खात्री असते. त्यामुळे पोलिसांना बोलाविण्याची वेळच येत नाही.

आपण एखाद्या भिका-याला हाकलले किंवा भीक दिली नाही तर तो काही आपल्यावर हल्ला करीत नाही. मात्र येते तशी भीती लोकांना वाटते. रहायला घर नसणारी माणसे आपल्या देशाप्रमाणेच कोठेकोठे आपला बिस्तारा टाकून असतात. त्यात व्यसनी व हिंसक लोक असणार या समजुतीने अशा लोकांच्या निवारा स्थानांना लोकांचा विरोध असतो.

आपल्याकडे इतक्या झोपडपट्ट्या असून त्यात हलाखीचे जीवन जगणारे लोक असले तरी आपला त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन सहानभूतीचा असतो. तेथालच अनेक लोक श्रीमंतांच्या घरी कामास जातात वा कचेरीत नोकरी करतात. अमेरिकेत परवाना असल्याशिवाय असे काम करता येत नाही व बेघर लोकांना कोणीच थारा देत नाहीत. चर्चमध्ये त्याना काही सुविधा मिळतात. काही सामाजिक संघटना त्यांचे पुनर्वसनासाठी काम करतात पण ती संख्या फारच कमी आहे.

विखुरलेली समाजव्यवस्था

एकंदरित पाहता अमेरिकेत मला सारा समाज पूर्णपणे विखुरलेला जाणवतो. प्रत्येक देशातील लोक, व भारतातील लोकांत प्रत्येक प्रांतातील वा भाषा बोलणा-यांचे गट असतात. येथील स्थानिक समाजातही सर्वच लोक बाहेरच्या देशांतून पूर्वी येथे आलेले असल्याने त्यांच्यातही फार विविधता आढळते.

विविधतेतून एकता हे भारतात आपण अभिमानाने सिद्ध करू शकतो मात्र अमेरिकेत हे घडणे फार अवघड आहे. शाळा वा व्यवसायाच्या निमित्ताने लोक एकत्र येत असले आणि ओळखी होत असल्या तरी त्यामुळे भौगोलिक प्रदेशाची फारशी माहिती नसल्याने त्यांना आपल्या भागाविषयी आत्मियता वाटत नाही. शाळेत अशा किटुंबातील मुले जाऊ लागली की त्यांना इतिहास, भूगोल, पर्यावरण, समाज व संस्कृती यांचे शिक्षण मिळू लागते. मग मुलांच्या माध्यमातून समरसतेची वाटचाल सुरू होते यात १०-१५ वर्षांचा काळ संघर्षाचा व अविश्वासाचा जातो.

ज्ञानदीप फौंडेशनमार्फत मी मायसिलिकॉनव्हॅली नावाची वेबसाईट करून सर्वांना स्थानिक इतिहास, भूगोल,पर्यावरणाची तसेच स्थानिक जनतेचे प्रश्न आशा आकांक्षा यांची माहिती देऊन नवे बंध निर्माण करण्याची योजना आखली आहे.

http://mysiliconvalley.net  ही वेबसाईट मी दोन वर्षांपूर्वीच सुरू केली.


 

अजून ही वेबसाईट बाल्यावस्थेत असून येथाल लोकांच्या सक्रीय सहभागाची मी प्रतीक्षा करीत आहे.


यात जर मी यशस्वी झालो तर स्थलांतरितांना एकत्र गुंफण्याचा व त्यांचे स्थानिकांशी नाते जोडण्याचा एक नवा अध्याय सुरू करण्याचा मान ज्ञानदीप फौंडेशनला मिळेल असे वाटते.

Dr. H. K. Abhyankar to lead Walchand Heritage Website

 I am happy to inform you that Dr. ( Prof.) H. K. Abhyankar has accepted my request to act as Editor of http://walchandalumni.com website.

He is coordinating Walchand Alumni Meet for his batchmates ( 1971 Batch) to be held in Jan. 2021

Dr. Hemant Abhyankar was instrumental in building a strong organisation of Past Students Association of Walchand College of Engineering. He is past president of the association ( 2008-2013. ) and has an active Pune chapter still functioning with regular events. He has contacts with many educational institutes and providing guidance in management of private engineering colleges. He is associate with Dnyandeep Foundation since its inception through his colleagues in college and various social groups. 

I personally have great respects for him and expectations from him in networking of Dnyandeep Foundation with different Education Institutes.

He is authorized to take any other members on his panel and make changes in design and updations necessary to make the website more resourceful, dynamic and serve as main platform for all past students and retired teachers of Walchand College of Engineering, Sangli

I give below his profile.



Profile of Prof. H. K. ABHYANKAR.

Date of birth - May 21, 1949.

E Mail - hkabhyankar12@rediffmail.com

Education - B .E.(Elec) , M.E.(Control Systems), Ph .D . (Management) Executive  Director, VIT, Pune.
❑ Working in Teaching & Research, since 1971. Guiding Masters' & PhD students since 1986
❑Headed Vishwakarma Institute of Technology,Pune, since 1994, first as a Principal & then as the Vice-President, till 2015. 

❑Currently working as an Executive Director, KJEI. 

❑Holding also the honorary position of Dean as well as Professor Emeritus of Management, at TMV, Pune

 ❑ Worked on a number of committees appointed by the Govt at State & National level.
❑ Worked for a long time on Boards of Governors(Management) of many Institutes of repute and Universities in India & abroad.
❑ worked as Member of committee for Norms & Standards for Engg institute at AICTE/ISTE & State level.
❑Worked as Executive Concil member on ISTE & other Professional Societies.

Honours & Awards :

-Best Engineering College Principal Award at national level by ISTE in the year 1999.

- Recipient of "PRA,' Maha Intrapreneur" Award in the year 2009.

-Life time Achievement award by MAEER's MIT, Pune

-Felicitated by Pune Municipal Corporation for contribution to Technical Education in the year 2000.

-Awarded by Lions Clubs International for "Yeoman's Service rendered in the field of education" in the year 1998.

- "Significant Contribution Award" by Rotary Club in the year 2001.

Current Positions held :
❑ Research Guide since 1986

❑ Hon. Dean-Faculty of Management, TMV, Pune

❑ Past-President & Member International Society of Automation (ISA), Pune Section.

❑ Member of Advisory Board of various technical institutions. ❑ Member, MCCIA — Research and Education Panel.

❑ Ex-Member, School of Engineering and Technology, Asian Institute of Technology, Bangkok, Thailand.

❑ Member, CII Task Force (WR) on higher education.

❑ President, Taal Chakra  in the year 2001.

Publications :
❑ Published more than 50 papers in research
journals/international conferences/national conferences.
❑ Books published recently —
Abhiyantrikiche Shikshan Ka Aani Kasey Road to Engineering (Facts Explained) Bridge (A Management Card Game) : Learning Guide for beginners.

Countries visited

Bangkok, Indonesia, Malaysia, Singapore, Kenya, Tanzania, Uganda, U.S .A., Portugal, France, South Korea, China, Canada, Poland, Austria, Ireland, Germany, Myanmar 

-------

I hope that under his leadership the Walchand Heritage  website will become central attraction for all past and current students of the college. We can make it financially sustainable by taking advertisements of businesses and professional services of past students. 

This will also provide a good opportunity for students to get admissions for higher studies and job postings. 

Dnyandeep Foundation thanks Dr. Abhyankar for accepting our request.

 


Friday, October 30, 2020

USA needs help from India in Social harmony and Environment Awareness


We in India are attracted to USA and try to send our children for study and career by spending huge amounts and suffering family separation. Our only hope is to see welfare of our future generation. We feel insecure in our own country due to social and political  agitations, poverty, unemployment and environment and health problems.

We feel that in USA, every thing is calm, quiet, free and people enjoy happy life.


But beware, all that glitters is not Gold.

You might be seeing the mighty companies, lavish architecture, specious houses, good cars and roads and NASA, Disney like tourist attractions.

But the ground situation for majority of immigrants is far from imagination. Their high salaries are grabbed by house rent, health insurence and income tax. They have more insecure jobs. As they are living in the world of global races, they do not know the culture, behaviour and intemsions and prefer to remain aloof from others.

Natives have reservations and oppose immigrant supremacy in career and education.
USA is a conglomeration of many states who have entirely different geophysical and social systems. Even though the buildings, roads and hotels are similar, the social lifestyles and political inclinations are different.
It is the country run by big corporates and government enforcement law. People are not in a position to change the national policies or law easily.

Majority of Indians staying in USA are somehow managing their finance. The bank rates are low and material attractions are many with credit card and discount facilities which keep people spending more than income.

The investment in house is a long time burden.  Though public schools are free, college education is very costly and people have to plan for finance right from kids level.
There is problem of  homeless people and gun violence.

In the corona outbreak, people in USA were very much scared and the life almost stood standstill even in California. There were many casualties and hospitals were full.

During last  four years I am alternatively staying in India and America for six months each and I found living in India far more safe, lively and with social interactions.

Even in Corona outbreak, India has recovered fast inspite of huge population density, poverty and poor sanitary provisions in houses. The people are moving around, helping each other, having gatherings, Morchas, political and social activities have remained unabated.

I feel, that the resilient nature and religious attitude of people along with national spirit and self sacrificing nature of society are the greatest virtues of India which need to calm down the tensions, feeling of suspission, hatred and  fear and create self curing and helpful social fabric in the advance nations.

In India, we have strong family system, social and religious traditions which help us to surmount any natural calamity or domination of wealth or body power.

The elections in USA showed the wide disparity in presumptions and aspirations of main political parties which can take the country entirely on different paths.

In spite of many parties and constant political activities, India has remained stable and has strong self healing mechanism.

Thus in my opinion, India may need financial help from USA but more basic human behaviour, social harmany and care of environment which in built in Indian society is the real need for USA. In return, we shall make our foreign Indians inclined to help India.  -- Dr. S. V. Ranade, Dnyandeep, Sangli

छोट्या डबीत मावणारे सूक्ष्म गीतरामायण

 सांगलीतील कै. रा. ग आपटे यांनी छोट्या डबीत मावेल एवढ्या सूक्ष्म आकारात स्वहस्ते  गीतरामायणाचे पुस्तक लिहून आपले नाव कलाक्षेत्रात अजरामर केले आहे.

श्री. रा. ग. आपटे माझ्या आत्तेबहिणीचे पती. घरीबामुळे कोकणातून  सांगलीत येऊन  गाडगीळ सराफ यांचे घरी आश्रित म्हणून रहावयास आले. शिक्षण पूर्ण करून गाडगीळ यांच्या सराफी दुकानात विक्री आणि जमाखर्च करीत आपले आयुष्याची उमेदीची वर्षे त्यांनी व्यतीत केली. सचोटी, सालस आणि सात्विक स्वभावामुळे त्यांनी  दुकानात मालक आणि ग्राहक दोहोंचा विश्वास संपादन केला होता. 

त्यांचे अक्षर सुवाच्च होते. घरी कलाकुसरीच्या वस्तू आणि चित्रे काढण्याचा त्याना छंद होता. गीतरामायणाची लोकप्रियता पाहून त्याना याची सूक्ष्म अक्षरांत हस्तलिखित प्रत करण्याची कल्पना सुचली. तग प्रत्यक्षात आणल्यावर ज्ञानदीपने आपल्या मायमराठी वेबसाईटवर त्याची बातमी प्रसिद्ध  केली आणि आपटे प्रसिद्धीच्या झोतात आले. 

 

 
वरील फोटोत या गीतरामायणातील एक पान मोठे करून दाखविले आहे. त्यावरून त्यांच्या हस्ताक्षराची आणि इतक्या लहान आकारात आपली लिहिण्याची पद्धत कायम ठेवलेली दिसते.

पुढे ते पुण्यातील सराफी दुकानात कामास लागले. गाडगीळ सराफांनी त्यांच्या पंचाहत्तरीनिमित्त चांदीची गीतरामायणासाठी डबी देऊन त्यांचा सत्कार केला. दोन वर्षांपूर्वी त्यांचे दुःखद निधन झाले. आता त्यांच्यामागे त्यांचा मुलगा राजेंद्र पुण्यात संगणक क्षेत्रात काम करीत आहे. त्याचेकडे हे गीतरामायण आपणास पहावयास मिळेल.

Thursday, October 29, 2020

निखिलं नवतः चरमं दशतः ।

वेदिक गणित -सूत्र 1

आद्य संशोधक - ब्रह्मलीन स्वामी भारती कृष्ण तीर्थ -शंकराचार्य : गोवर्धन मठ

सूत्रांची यादी

(1) निखिलम्‌ नवतः चरमं दशतः ।
(2) आनुरुप्येण ।
(3) यावदूनम्‌ तावदूनीकृत्य वर्गं च योजयेत् ।
(4) एकाधिकेण पूर्वेण ।
(5) अन्त्ययोर्दशकेऽपि ।
(6) एकन्यूनेन पूर्वेण ।
(7) ऊर्ध्वतिर्यरभ्याम्‌ ।
(8) ऋणांक पद्धत ।


सूत्र 1- निखिलं नवतः चरमं दशतः ।

याचा अर्थ म्हणजे नऊतून सगळे आणि दहातून शेवटचे.
गुण्य - जिला गुणायचे ती संख्या
गुणक - जिने गुणायचे ती संख्या
गुणाकार = गुण्य x गुणाकार


उदा: 1
9x8
पहिली पायरी
गुण्य व गुणक यांच्या जवळचा 10 चा घातांक 10 आहे.
पाया = 10
म्हणून हा पाया धरून त्यातून गुण्य व गुणक वजा करायचे. गुण्य व गुणक यांच्यापुढे विसर्ग चिन्ह लि्हून त्यापुढॆ आलेली वजाबाकी लिहावी. 9:1
8:2

या अंकांच्या खाली आडवी रेघ व मध्यभागी तिरकी रेघ काढा.
------
/
दुसरी पायरी
तिरक्या रेघेच्या डावीकडचा उत्तराचा भाग काढण्यास चार पद्धती
1) 1+2=3 10-3=7
2) 9+8=17 17-10=7
3) 9-2=7
4) 8-1=7

तिरक्या रेघेच्या उजवीकडील उत्तराचा भाग मिळण्यासाठी 1,2 यांचा बैजिक गुणाकार करा.
गुणाकार= 7/2= 72

 
इतर उदाहरणे
9x9, 9x5,8x7,7x9
पाया मानलेल्या संख्येत जितकी शून्यं असतील तितके आणि तितकेच अंक तिरक्या रेघेच्या उजवीकडे ठेवायचे. जास्तीचे अंक हातचे समजून डावीकडच्या अंकात मिळवायचे
7x4
7:3
4:6
---

डावीकडील अंक 1
उजवीकडील अंकांचा बैजिक गुणाकार 3x6=18
10
18
---
28
हे उत्तर
उदाहरणे - 92x89,95x95,88x88
99x98
99:1
98:2
---
97 02 ( 972
नव्हे)
1000 पाया घेऊन काही उदाहरणे सोडवा
998x892, 695x997, 988x899, 999x997,991x996
 

गृहपाठ
(1) 7x9 (2) 95x89 (3)988x984 (4) 9998x9876 (5) 94 x92
(6) 99992 x99984 (7) 999x235 (8) 9995 x9898

 
गुणाकाराच्या संख्या पायापेक्षा मोठ्या असतील तर या सूत्राचा खालीलप्रमाणे उपयोग करावा.

उदा. 11x12 पाया 10
11:1
12:2

तिरक्या बेरजांनी डावीकडील संख्या काढा 11+2 किंवा 12+1 = 13
1 आणि 2 यांचा बैजिक गुणाकार करून उजवीकडील संख्या काढा. 1x2=2
उत्तर 13/2 = 132
10 पाया असणारी उदाहरणे (1) 14x12 (2) 19x12 (3) 17x17
याप्रमाणे 100, 1000 किंवा 10,000 पाया घेऊन उदाहरणे सोडवा
(1)111x102 (2)112x109 (3)105x101 (4) 1015x1010
(5) 1005x1001 (6) 1901x1002 (7)10,009x10,007 (8) 10,300x10,005
(9)15,001x10,010

गुण्य पायापेक्षा मोठा आणि गुणक पायापेक्षा लहान. उदा. 12x9.

12x9
12:2
9:1
---
11/2
110
2
-----
108

19x8
19:9
8:2
---
17/18
170
18
-----
152

21x5
21:11
5:5
---
16/55
160
55
-----
105

17x6
17:7
6:4
---
13/28
130
28
-----
102
100 हा पाया धरून खालील उदाहरणे सोडवा
(1)109x98 (2)115x92 (3) 103 x 99
(4)1027 x 998 (5) 1081x 995 (6) 1150 x 989
(7) 10,073x9999 (8) 10754x9998 (9) 9975x12500 

 

Wednesday, October 28, 2020

Dnyandeep Infotech enters Environmental Consultancy

 Dnyandeep Infotech Pvt. Ltd. has started Environmental Consultancy Division under the leadership of Dr. N. S. Raman, Dy. Director, NEERI, Nagpur and the company has tied up with many well known NABET approved Environmental Laboratories. 


Dr. N. S. Raman

Dr. N. S. Raman is a well known international authority in Environmental Impact Assessment and has worked on many projects of different category industries and has published  many research papers. He is member of environmental appraisal commodities in India and USA. 

I myself have an experience of over 30 years in Environmental Consultancy in Sugar and related agro-based industries in Maharashtra and Karnataka. prior to 2000. For last 15 years we have concentrated on Green Technology training seminars in India and abroad. We also have Prof. S. V. Kulkarni from KIT College and Shri Watve, Environmental Lab Incharge with 40 years experience as our directors.

Our approach to environmental consultancy shall be different than other consultants in the field which try to shield the industries from legal action by paperwork. We know by experience the pitfalls in the effective implementation of necessary measures for preventing environmental pollution.

Present Scenario

Industries, in general, are interested primarily their production and profit and try to minimize the cost of necessary pollution control equipment and appointment of skilled manpower to operate it properly. Naturally they install cheap untested or certified equipment and do not monitor the performance regularly. Due to strict environmental regulations, they have to get consent from pollution control agencies but  think it merely as a legal requirement and do not look to it as a social responsibility. This leads to preparation of project reports tailored to satisfy  Industry rather than ensuring sustained effective performance. As the projects are prepared by consultants appointed by industries by paying hefty fees, they have to safeguard the interests of the industry. Naturally the consultants skillfully highlight the positive aspects with scanty information about negative aspects and possible effects of improper management of systems they have suggested for pollution control.

Polltion Continues 

 The people fighting for environmental protection do not get competent engineers and scientists to scrutinize technical flaws in environmental protection measures taken by industries or force the negligent pollution control agencies to take effective steps to prevent environmental pollution. The affected people take the support of socialists and environmentalists who are branded by industries as trouble makers and against development. Sometimes political opponents provide help to strengthen their agitation. 

Many of the affected people are depending for their livelihood on the same polluting industries and do not complain. People get accustomed to smell, color or polluted air, water and heaps of solid wastes.I always wonder how pollution control agency overlooks it, believes the test reports sent by industry and takes decisions based on figures and promises in reports, without real assessment of situation. In case of pollution, individual complaints do not yield any results. Affected people have to come together and complain in writing or do agitation.

Failure of Pollution Control Agencies

The pollution control agencies have powers to inspect the premises, take samples, monitor the process and prosecute or deny permission to industry. Our legal systems are so sluggish and time consuming that the cases remain pending. The pollution control agencies have absolute powers in tackling the issue but this fact gives rise to corrupt practices. Industries prefer management of people concerned instead of effective management of pollution control process and meeting norms. 

Legal supremacy of Industries 

 For prosecution, affected people  have to appoint lawyer. There are very few lawyers, who can handle environmental related issues. People do not have money to provide dedicated manpower to pursue the cases, supply information, conduct investigation and fight cases in court. On the other hand, industries can appoint lawyers, spare special officers to protect interests of industry and can spend on media advertisement and do false propaganda about agitators. 

Problem remains unsolved

When incidence of large scale pollution occurs, it becomes a sensational news for media, opportunity for opponent political groups and money earning opportunity to lawyers, consultants and some people in control agencies. In few days, the news disappears importance as some new event comes up, people forget the issue and get carried away in the new wave. The pollution continues unabated.Fortunately, nature has such sustainable strength that it somehow survives sacrificing sensitive species. However, it definitely loses long term sustainability. 

.We propose to create public pressure for achieving following measures for effective control

 1. Free public access to inspection of the waste treatment facilities of industries 

2. Government or Pollution control agencies should provide finance to non-political environmental NGOs for research, monitoring and legal services. These NGOs shall be useful active resources for the pollution control agencies. 

 3. The consultants for feasibility studies or environmental impact should be appointed by government or pollution control agencies.The funds necessary may be pooled from industries by charging them accordingly. 

4. Provision of CCTV for remote inspection of ETP plants and remote data logging of effluent quality. 

5. Complete transparency of information regarding environmental management system, reports and consent conditions. 

We  hope that if above measures are taken, we shall be able to empower the people in controlling pollution and preserving nature.

As consultants Dnyandeep Infotech Pvt. Ltd. shall bear the responsibility of providing proper environment management plan to the industry indicating clearly the scope and limitations of design and necessity of strict operation and maintenance to safeguard the environmental quality. 

Tuesday, October 27, 2020

सिलिकॉन व्हॅलीतील झोहो कंपनी आता चेन्नईजवळच्या खेडेगावात

 झोहो आज क्लाऊड-आधारित ग्राहक संबंध व्यवस्थापन (सीआरएम), ऑनलाइन अकाउंटिंग, ह्यूमन रिसोर्स व्यवस्थापनासाठी 40 हून अधिक अॅप्स तयार करते.


झोहोचे प्रमुख श्रीधर वेंभू यांनी न्यू जर्सीच्या प्रिन्स्टन विद्यापीठात व नंतर  कॅलिफोर्नियामधील क्वालकॉम येथे शिक्षण घेतले. 1996 मध्ये सॉफ्टवेअर  तयार करण्यासाठी त्यांनी सॅन फ्रान्सिस्को बे एरियाच्या सिलिकॉन व्हॅलीमध्ये अ‍ॅडव्हेंटनेट कंपनीची  स्थापना केली. २००० मध्ये त्यांनी  कंपनीचे नाव झोहो कॉर्प ठेवले.

कोरोनाचा उद्रेक होण्यापूर्वीच ऑक्टोबर २०१९मध्ये त्यानी आपली कंपनी चेन्नईपासून ५० कि. मी. वर असणा-या टेनकासी या खेडेगावात नेली.  नऊ वर्षांपूर्वीच त्यानी यासाठी मथालंपराय या एका गावात  ४ एकर जमीन घेतली होती.

झोहोने पहिले सॉफ्टवेअर उत्पादन युनिकॉर्न असण्याचा मान मिळविला आहे आणि 2019 मध्ये फोर्ब्सने वेम्बूच्या ८८ टक्के भागभांडवलाचे मूल्य १.८३ अब्ज डॉलर होते. २०१९ मध्ये झोहोने ३४१० कोटींच्या एकूण उलाढालीत  516 कोटी कोटी रुपये  नफा नोंदविला. आपल्या अ‍ॅप्ससाठी जागतिक स्तरावर ५० दशलक्ष वापरकर्ते असल्याचा कंपनीचा दावा आहे,

 खेड्यांमधून शहरात लोक गेल्यामुळे खेड्यांचे व तेथाल शेती व समाजजीवनाचे  नुकसान होते शहरांवरही अधिक लोकसंख्येचा ताण पडतो. 


2004 मध्ये, संस्थापकांनी झोहो विद्यापीठ सुरू केले, जे आता झोहो स्कूल म्हणून ओळखले जाते. झोहो स्कूलचे  सरन बाबू परमशिवम यांना २००५ मध्ये कॉम्प्युटर कसा वापरायचा हे माहीत नव्हते परंतु आता झोहो येथे ते वरिष्ठ उत्पादन व्यवस्थापक म्हणून काम पहातात


 विद्यार्थ्यांना कौशल्य व क्षमता असलेले जहाज चालविण्यासाठी आणि प्रशिक्षित करण्यासाठी. विद्यार्थ्यांना फी आकारली जात नाही परंतु दोन वर्षाच्या कोर्सच्या कालावधीत त्यांना 10,000 डॉलरचे वेतन दिले जाते.

 ज्ञानदीप फौंडेशनसाठी हे एक अलौकिक दूरचे लक्ष ठरू शकेल. कदाचित भविष्यात ते साध्य होईलही. पण त्यासाठी महाराष्ट्रातील बुद्धीवंतांची आणि सिलिकॉन व्हॅलीतील मराठी संगणक तज्ज्ञांची मानसिकता बदलण्याचे मोठे अवघड काम करावे लागणार आहे.

मी असा प्रयत्न सुरू केला आहे पण अजूनतरी रात्रीचा अंधःकारच समोर दिसत आहे.  - डॉ. सु. वि. रानडे, ज्ञानदीप, सांगली

Sunday, October 25, 2020

ज्ञानदीपमध्ये ब्लॉग साईट करण्यास शिका

ज्ञानदीप फौंडेशनचे सदस्य झाल्यावर प्रथम प्रत्येकाला स्वतःचा ब्लॉग कसा करायचा हे शिक्षण देण्यात येणार आहे. आधी ब्लॉगर या गुगलच्या नोफत ब्लॉगर साईटवर ब्लॉग करून त्यात प्राविण्य मिळाले की वर्डप्रेस या अत्यंत लोकप्रिय व प्रभावी वेबप्रणालीवर सदस्यांना आपले ब्लॉग लिहिण्याची सुविधा करून देण्यात येईल. आपले शिक्षण, व्यवसाय व परिचय तसेच विविध विषयांवरील आपले लेख प्रसिद्ध करण्यास सक्षम करणे हे ज्ञानदीपचे प्राथमिुक उद्दिष्ट आहे. त्यानंतर फ्री लान्स पद्धतीने सदस्याला ज्ञानदीप फौंडेशनच्या माध्यमातून व्यवसाय सुरू करता येईल.

 इंटरनेटवर आपण आपली मते, लेख, फोटो प्रसिद्ध करण्यासाठी आपण ब्लॉग लिहू शकता.रेडिफ, मनोगत, उपक्रम, इसकाळ, महाराष्ट्र टाईम्स इत्यादी अनेक वेबसाईटवर मराठीत मोफत ब्लॉग प्रसिद्ध करण्याची सोय करण्यात आली आहे. ब्लॉगर डॉट कॉम(www.blogger.com) या गुगलच्या वेबसाईटवर आपल्याला आपला जीमेलचा युजरनेम, पासवर्ड वापरून स्वतःची ब्लॉग वेबसाईट सुरू करता येते.


 

आज आपण ब्लॉग वेबसाईटबद्दल माहिती घेणार आहोत. 

ब्लॉगसाईट सुरू करणे 

प्रथम ब्राउजरमध्ये http://www.blogger.com/ ही वेबसाईट उघडावी. ब्लॉगर वेबसाईटच्या बॅनर खाली डाव्या बाजूला ब्लॉग सुरू करण्यासाठी काय करावे याची लिंक, ब्लॉगसाईटच्या नमुन्यांची चित्रे तर उजव्या बाजूला गुगल मेल अकौंटचा बॉक्स दिसतो. त्यात आपला जीमेलचा युजरनेम व पासवर्ड भरावा. साईन इन बटन दाबले की नवे वेबपेज उघडते. ब्लॉगवर आपले नाव कसे असावे ते लिहावे. ब्लॉगर साईटच्या अटी व नियम वाचून त्याला मान्यता द्यावी. Create a Blog वर क्लिक करावे. नव्या पानावर ब्लॉगसाठी द्यावयाचे नाव (शीर्षक) नाव व ब्लॉगरसाईटच्या लिंकचे नाव लिहावे (ते यापूर्वी दुसर्‍या कोणी घेतले असेल तर वेगळे नाव निवडावे लागते.) त्या पानावर दिलेल्या ब्लॉग नमुन्यांमधून आपल्या पसंतीचा नमुना (Template) निवडावा.आपली स्वत;ची माहिती व फोटो घालावा. तसेच आवश्यक भासल्यास ब्लॉगच्या मांडणीत व दृश्य स्वरुपात आपणास हवे असणारे बदल सीएसएसमध्ये करावेत.

 ब्लॉगरसाईटच्या डॅशबोर्डवर नवा ब्लॉग पर्याय निवडावा. ब्लॉगचे शीर्षक लिहावे व खालच्या मोकळ्या रकान्यात आपल्या ब्लॉगचा मजकूर लिहावा. हा मजकूर आधी नोटपॅडमध्ये वा वर्डमध्ये टाईप करून कॉपी पेस्ट केला तरी चालतो. Preview बटन दाबून ब्लॉग कसा दिसेल ते पाहता येते व Edit बतन दाबून त्यात दुरुस्त्या करता येतात. खालच्या पट्टीत आपणास ब्लॉगसाठी काही शोधसूचक शब्द(Tag) द्यावयाचे असल्यास देता येतात. ब्लॊग व्यवस्थित तयार झाला की Publish बटन दाबावे व तो प्रसिद्ध करावा. आता आपला ब्लॉग प्रसिद्ध झाला आहे अशी सूचना व View Blog / Edit Blog असे पर्याय येतात. View Blog बटनावर क्लिक केले की ब्लॉग आपणास प्रसिद्ध झालेला दिसतो. असे अनेक ब्लॉग आपल्याला लिहिता येतात. त्यांचे संपादन करता येते. वाचकांचे त्यावर अभिप्राय घेता येतात.

 ब्लॉगवर फोटो वा चित्र घालणे 

ब्लॉगच्या टूलबारमधील Add Image असा टॅग असणार्‍या चित्रावर क्लिक करावे. नव्या पॉप अप विंडोमध्ये हवा तो फोटो वा चित्र आपल्या कॉम्प्युटरवरून ब्राऊज करून निवडावे त्याची जागा ( डावीकडे, उजवीकडे वा मध्यात) ठरवावी व Upload Image या बटनावर व नंतर Done या बटनावर क्लिक करावे.त्याचे कोड मजकुराच्या विंडोमध्ये दिसू लागते. ते काढून मजकुरात आवश्यक त्या ठिकाणी पेस्ट करावे. इतर अनेक सोयी ब्लॉगर साईटवर आहेत. त्याव आपण गुगल अ‍ॅड्ची वा अन्य जाहिरात करू शकतो व त्यातून आपल्याला पैसेही मिळविता येतात.

णी स्वतः २००७ पासून ब्लॉग लिहीत आहे. माझे सर्व लेख आपल्याला https://dnyandeep.blogspot.com  या वेबसाईटवर पहावयास मिळतील आता मी वर्डप्रेसमध्ये यातील काही लेख प्रसिद्ध करमार आहे.

 ज्ञानदीप फौंडेशनचे सदस्य (https://dnyandeep.net) होऊन आपण सर्वजण या  उपयुक्त कार्यक्रमात सहभागी व्हाल असा मला विश्वास वाटतो.  - डॉ. सु. वि. रानडे, ज्ञानदीप, सांगली.

विजयादशमीच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा

 राक्षसांचा राजा दुर्गासूर यानं तप करून ब्रह्मदेवाकडून असा वर मिळवला की, `त्रिभुवनात तुला कोणीही वीर पुरूष जिंकू शकणार नाही. या वरामुळे दुर्गासुर एवढा प्रबल झाला की, त्याने इंद्र, चंद्र, वरूण, व यम यांना बंदी केले.' अखेर दुर्गासुराच्या वधासाठी पार्वतीने वेगळे रूप घेतलं व त्या रूपाला `विजया' असे नांव दिले. तिला विविध शस्त्रांनी सज्ज केले. शंकराने आपला त्रिशुळ दिला. विष्णुने आपले सुदर्शन चक्र व कवच दिले. अशाप्रकारे प्रत्येक देवाने आपली वेगवेगळी शस्त्रे दिली.

 ही सर्व शस्त्रे पेलण्यासाठी पार्वतीने आठ बाहू धारण केले. या अष्टभुजा धारण केलेल्या पार्वतीने नऊ दिवस लढून दहाव्या दिवशी दुर्गासूराचा नाश केला. सगळीकडे आनंद झाला. तो आनंद प्रकट करण्याकरिता नवरात्र व दसरा साजरा करतात.

आपणही एकत्रितपणे आयटी क्षेत्रातील आधुनिक शस्त्रे  प्राप्त करून परकीय आक्रमणावर विजय मिळविण्याचा संकल्प करूया. 

सर्वांच्या सामूहिक प्रयत्नातून ज्ञान व धन लाभाच्या या ज्ञानदीप फौंडेशनच्या नव्या योजनेत सामील व्हावे ही विनंती.
-डॉ. सु. वि. रानडे, ज्ञानदीप, सांगली

In defense of Cooperatives

There is generally a large hue and cry about corruption in cooperative movement. People openly criticize the corrupt practices being followed by those in control of cooperative society and prefer the attractive and efficient services offered by private businesses and large corporate firms. 

Even government machinery feels comfortable while dealing with private firms as they are more flexible in approach, ready to invest capital and very efficient in fulfilling conditions stipulated in contract. Due to such scenario, cooperatives are fast loosing their stake in the business world. Sugar factories, textile mills, Dairies, Service agencies in Maharashtra are getting converted from cooperative sector to private sector. Government and Semi-government agencies are helping this trend as they could push through development schemes without necessary financial provisions. 

 But I have come to conclusion that cooperative movement is the best and truly democratic way of running business. There are many drawbacks in cooperative rules and regulations which make functioning of the business sluggish and inefficient leading to corruption. Still one should not forget that they are open to public and there is significant transparency to expose the corruption. 

Recent exposure of corruption in cooperatives with right to information has smeared the cooperative movement. But we should not think that all is well in private sector. There is a mantle of secrecy in management of corporate, which harbors many unlawful activities conducted solely to succeed in the stiff competition and lust of expanding business. The employees are more strictly and secretly monitored for their loyalty with company, work efficiency and are governed by reward and punishment strategy. Hire or fire is the rule of governance. 

Cooperative society is an organization built by the final beneficiaries or contributors. They have freedom to complain, get information or oppose the decisions. The ruling party in cooperative industry cannot conceal the decisions from it’s members and there is always a risk of information leakage, party switch over by members and fear of loosing power through elections. 

 Late Dr. Vasantdada Patil gave a boost to cooperative movement in Maharashtra and achieved all out progress in agriculture, banking and education. Cooperative is a via media solution between communist and capitalist systems, for preserving and ensuring democracy in governance. 

 Let us not destroy that development model with the fear of corruption or inefficiency. No doubt there is urgent need to remove these drawbacks in present cooperative system, but we should not reject the system and allow private sector to grab all cooperatives and turn the society in dictatorial regime of private business owners and corporate bodies. 

 Prosperity of cooperative movement shall ensure development through democratic process of equitable participation without infringing on freedom of individual.

IT sector in India has remained away from co-operative sector and is governed mainly by big private companies which are merely providing skilled human resources to MNCs. There is no security of service, constant burden of work assignments, stress and tension in the recruits.

Dnyandeep Infotech Pvt. Ltd. a company established in 2000 could not grow due to continuous exodus of trained software engineers to mega cities due to attractive salary offers.

Now that glamour is getting converted in to dark shadow with future downfall in IT industry.

Dnyandeep Foundation has decided to start a new experiment to bring all  individual software engineers and small firms under co-operative platform with backing of Dnyandeep Infotech Pvt. Ltd. 


Saturday, October 24, 2020

आत्महत्या की खून ? - भारतीय उद्योजकाची दुर्लक्षित बातमी

 


 ऑटोमोबाईल क्षेत्रातील व्यावसायिक असलेले पाषाणकर  बेपत्ता झाले त्यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत ते आत्महत्या करण्यास जात असल्याचा उल्लेख आहे ही बातमी वाचली आणि माझ्या मनात चर्र झाले. पुण्यात लक्ष्मीरोडवर गोखले हॉलशेजारी पाषाणकर वाडा आहे. 

माझ्या लहानपणी म्हणजे १९५०-५५ च्या सुमारास माझी मावशी या भल्या मोठ्या चौसोपी दुमजली पाषाणकर वाड्याच्या आतल्या चौकात माडीवर रहात होती. त्यवेळी पाषाणकर कुटुंब तेथे, तळमजल्यावर रहात होते. माझी पुण्याची आठवण या पाषाणकर वाड्याशी निगडीत आहे. मला या वाड्याचा तसेच आमच्या मावशीच्या दूध डेअरीचा फार अभिमान वाटे. माझ्या साता-यातील बालमित्रांना मी या वाड्याचे वर्णन जणु आपलाच वाडा आहे अशा थाटात सांगत असे. आज त्या आठवणीवर कधी न पुसला जाणारा एक  काळा डाग पडला आहे.

तीन पिढ्यांपूर्वीपासून श्रीमंत असणा-या कुटुंबातील तेवढ्याच कर्तृत्ववान उद्योजकाला आत्महत्या करावी लागली हे वाचून अतिशय वाईट वाटले व यासाठी आपला सारा समाजच यास कारणीभूत आहे असे मला वाटले.

 सत्यम कॉम्प्युटरचे निर्माते राजू यांच्या आणि कष्टातून मोठे उद्योजक बनलेले डी. एस. कुलकर्णी यांच्या तुरुंगवासाच्या बातम्या ऐकून माझी अशीच अवस्था झाली होती. ते तुरुंगात गेले तेंव्हा लोकांनी लगेच त्यांच्या प्रतिमेला काळे फासले. त्यांचे सर्व कर्तृत्व विलरले गेले.    

वालचंद कॉलेजमधील माझे ज्येष्ठ सहकारी प्रा. भालबा केळकर यांची एआरई, काकासाहेब मराठेंची कापडगिरणी, रोहिणी पंप व इतर अनेक उद्योग बंद पडल्यावरही मला असेच वाटले होते.

आज प्रकर्षाने हे जाणवण्याचे कारण म्हणजे मुंबईतील सुशांतसिंग रजपूत याच्या संशयास्पद आत्महत्येवर प्रसारमाध्यमांत,  राजकीय व सामाजिक स्तरावर जो भडक प्रचार व शोध चालू आहे आणि टीव्ही, मोबाईलवर सर्वजण त्याच चर्चा करीत आहेत.  या गदारोळात पाषाणकरांच्या बातमी केव्हाच लुप्त होईल अशी भीती वाटली. मन खिन्न झाले पण त्यापेक्षाही समाजाच्या व शासनाच्या उद्योगविश्वाकडे पाहण्याच्या संशयी आणि बेफिकीरीच्या दृष्टीकोनाची मनस्वी चीड आली.

राजू, डीएसके यांनी आर्थिक घोटाळे केले व त्यांना शिक्षा होणे योग्य असले तरी त्यामागच्या कारणांचा कोणी बारकाईने शोध घेतला नाही. आपले उद्योग बॅंकांच्या कर्जावर वा लोकांकडून घेतलेल्या पैशांवर अवलंबून असतात. भारतात बॅंक व्याजदर १० ते १५ टक्के असतो लोकांना त्यपेक्षाही जास्त व्याज द्यावे लागते.


शासकीय अधिकारी, उद्योग नियंत्रणाच्या विविध संस्था यांच्या ससेमि-यातून निलटून उद्योग फायद्यात चालवावा लागतो. जरा फायदा जास्त झाल्याचे दिसले की इनकमटॅक्स मागे लागतो. कमी झाल्याचे दिसले की लोक आपले पैसे परत मागतात. 

फायदा व तोटा हा मागणी -पुरवठा यापेक्षा स्पर्धकांच्या कामगिरीवर बदलता राहतो. आंतरराष्ट्रीय कंपन्या आपल्या प्रचंड धनशक्तीच्या जोरावर छोट्या स्वदेशी कंपन्यांना वाढू देत नाहीत. त्या करीत असलेला भ्रष्ठाचार लोकांपर्यंत कधीच येत नाही.

मग मोठ्या उमेदीने स्वतःचा उद्योग सुरू करणारे काही यातही नेटाने लढत राहतात. कामगार संघटना पगारवाढीसाठी संघर्ष करतात. सामाजिक व राजकीय गटही त्यांना साथ देतात.
परिणामी एकतर आर्थिक अफरातफर करून उद्योग वाचविणे, दिवाळे काढणे वा काहीच जमले नाही तर आत्महत्येस प्रवृत्त होणे यापेक्षा य़ा उद्योदकांपुढे दुसरा पर्याय रहात नाही.


अफरातफर करून कुटुंबावर बट्टा लावण्याऐवजी काहीजण आपला जीव देतात. मग लोक हळहळ करतात. पण या परिस्थितीला आपणच कारणीभूत आहोत हे सोयीस्करपणे विसरतात.

मी स्वतः उद्योगाच्या विविध छटा जवळून पाहिलेल्या आहेत. भ्रष्टाचाराला सामोरे गेलो आहे व लोकांची नकारात्मक प्रतिक्रियाही अनुभवली आहे.


 आता मात्र वाटते की आपण गप्प बसले तर हे असेच चालू राहणार. निदान उद्योजकासाठी न्याय असा हॅशटॅग लावून ब्लॉग तरी लिहायला काय हरकत आहे.

 निदान तो मनाला दिलासा देणारा व निर्धोक पर्याय आपल्या हाती आहे.

 ज्ञानदीप फौंडेशनमध्ये माझ्या पूर्वअनुभवाच्या संचितावर मी आता शहाणा झालो आहे. उद्योगाला जगवण्याची वा मारण्याची जबाबदारी अंगावर घेणा-यांना एकत्र करूनच मी उद्योग करणार आहे. सर्वांनीच गुंरवणूक करावी, सर्वांनीच काम करावे जगावे वा मरावेही एकत्रच. जे येतील ते येतील निदान माझी तरी इतर उद्योजकांसारखी अवस्था होणार नाही.



 

Friday, October 23, 2020

No TRP scam for Suicide of industrialist

Political and social media is experiencing huge turmoil over the suicide of Sushantsing Rajput. People, political parties and government have taken a great interest in this case. Big MNCs are pouring money through advertisements in keeping the fire burning the time and all other very serious issues facing the country.


 

A small news of suicide note by Shri. Pashankar, an industrialist in Pune occupied a tiny space in news and is swept away in turbulent flow of other  sensational news. But I became very restless, sad and alarmed over the neglect of this news by public.  I shot a note on our CISTED FOUNDATION whatsapp group promoting innovation and entrepreneurship as follows--

 Why not do research on failures of Indian industries

Sangli was known to be town with industrialists. Now all are  dealers. The news of Pashankar suicide, jail to D. S.  K. and Raju of Satyam suggest that Indian industry is in great danger of survival due to bank loans and public deposit burden. Big corporates crush these small businesses. Our innovators prosper only if they join MNCs. I had creamed Death of Dyanausores due to collective resistance by small creatures. Is it possible?

 Low interest rates for banks in foreign countries and people untrust on industrialists are main causes more than lack of nationalist attitude.

Corruption by regulating authorities and govt agencies also is responsible. The economic and management theories do not consider these dominating factors.

People are very cautious about their own investments in industries but do not support industries in difficult times even though they had deposited the money  for higher returns than banks.

There is political and social turmoil due to suicide or death of Sushantsing but no sad remark about DSK or Pashankar. Even the TRP war is supported by ads by MNCs. There are no Indian ads.
People have become suspicious of industrialists but try to get salaried jobs there.

Even Govt. is not industry friendly and is interested in foreign investments without careful study of adverse consequences.

My thoughts may look like leftists but I am for small private industries and businesses in India which strengthen the social sustainability in rural and local community.

That is the reason why I have asked Dnyandeep Foundation members to invest equally and share responsibility in business. 

I felt that new TRP war can be started whether Pashankar did suicide or society killed him.

 -Dr. S. V. Ranade, Dnyandeep, Sangli

Thursday, October 22, 2020

पब्लिक ट्रस्टमध्ये विश्वस्त मालक नसून पालक असतो

 पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट किंवा सार्वजनिक धर्मादाय विश्वस्त संस्था यामध्ये ट्रस्टी कंवा विश्वस्त यांच्यावर संस्थेचे पालक म्हणून फार मोठी जबाबदारी असते. नावातील सार्वजनिक शब्द व्यवहारातील पारदर्शकता तर धर्मादाय हा शब्द समाजोपयोगी कार्य यांचे निदर्शक आहेत. भारतात सर्व शैक्षणिक संस्थांची नोंदणी सार्वजनिक  विश्वस्त संस्था  आणि सहकारी संस्था ( सोसायटी अॅक्ट) म्हणून करावी लागते. शिक्षण संस्थेच्या उद्देशास हे अनुरूपच आहे.

प्रत्यक्षात असे दिसते की आज बहुतेक सर्व सहकारी संस्था खाजगी उद्योगासारख्या चालविल्या जातात व विश्वस्तांना आपणच मालक असल्यासारखे वाटते. साहजिकच स्वतःच्या फायद्यासाठी मनमानी निर्णय घेणे, निर्णय प्रक्रियेत कमालीची गुप्तता पाळणे, खोटे इतिवृत्त लिहिणे, आर्थिक उलाढालींची माहिती सभासदांपासून लपवून ठेवणे अशा गोष्टी घडतात.  नामांकित सहकारी उद्योग, बॅंका, शिक्षणसंस्था या संस्थांमध्ये होत असलेले घोटाळे कोणीतरी तक्रार केल्याशिवाय लोकांच्या लक्षात येत नाहीत. सत्तेचे राजकारण यातूनच जन्मास येते. मग सभासदांचे गट करून आर्थिक घोटाळ्यांचे आरोप करून सत्ता काबीज करण्याची कारस्थाने सुरू होतात. यदाकदाचित विरोधी गटाला यात यश आले की पुन्हा जुन्या सत्ताधारी पक्षाच्या पावलावर पाऊल टाकून तशाच प्रकारे शिरजोरीने संस्था चालविली जाते.

सर्वसामान्य सभासदाला या साठमारीत पडण्याची भीती वाटते. सत्ताधा-यांनाच खूष करून आपले काम करता येते का यासाठी त्याचे प्रयत्न असतात. बंडखोर सभासदांना वठणीवर आणण्यासाठी बळाचाही वापर केला जातो. अनेकांचा विरोध सुरू झाला की त्याला हिंसक  वळण लागते आणि मूळ प्रश्नाऐवजी सामाजिक सुरक्षेचा मुद्दा महत्वाचा ठरतो.

या सर्व गदारोळात सहकारी संस्थेचा उदात्त हेतू केव्हाच लुप्त होतो आणि मग लोक खाजगी उद्योगास पसंती देऊ लागतात. मोठे आंतरराष्ट्रीय उद्योग याचा फायदा घेतात.

या सर्वांवर उपाय म्हणजे पब्लिक ट्रस्ट कायदा अधिक कडक करणे. निनावी तक्रारीचीही दखल घेऊन तपासणी करणे आणि वार्षिक आर्थिक ताळेबंद सभासदांना उपलब्ध करून देणे ह्या गोष्टी करणे आवश्यक आहे.

 सहकारी संस्था, शिक्षणसंस्था व आंतरराष्ट्रीय संस्था यांचेबाबतीत मला स्वतःला आणि ज्ञानदीपला अशा अनेक हानीकारक प्रसंगांना तोंड द्यावे लागले आहे.  तरीदेखील सर्व पर्यायांचा विचार करता सहकारी संस्था  याच लोकशाहीची खरी जपणूक करू शकतात असा मला विश्वास वाटतो. त्यामुळेत  जनतेला व शासनाला  निकोप सहकारी चळवळीचे महत्व पटवून देण्याची गरज आहे.

ज्ञानदीप फौंडेशनने ज्यावेळी सहकार तत्वावर आयटी उद्योग सुरू करण्याची कल्पना मांडली त्यावेळी सहकाराविषयी लोकांच्या मनात असणारी नकारात्मक अढी काढण्याचे काम सर्वप्रथम करणे आवश्यक वाटल्याने  मी हे विचार मांडले आहेत.  डॉ. सु. वि. रानडे, ज्ञानदीप, सांगली.


Wednesday, October 21, 2020

अभ्यास कसा करावा?

सध्या कोरोनाच्या सुट्टीमुळे आणि टीव्हीच्या करमणुकीमुळे मुलांचे अभ्यासाकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. त्याला पालकही तितकेच जबाबदार आहेत. मी पूर्वी लिहिलेला एक लेख खाली देत आहे. त्यात भर घालण्यासाठी आता माझ्याकडे अनेक नवे मुद्दे मिळाले आहेत. त्यापैकी स्वयंशिस्त आणि स्वतःसाठी आचारसंहिता आखणे आणि दररोज आठ तासांचे बंधन घालणे  हे मला विशेष महत्वाचे वाटतात. त्याबद्दलही पुढेमागे लिहीनच.


अभ्यास कसा करावा?

लाख मोलाचा प्रश्न. अभ्यास कसा करावा या विषयावर अनेक पुस्तके असली तरी हा प्रश्न अजूनही विद्यार्थी व पालक नेहमी विचारतात.



परवाच माझ्या अमेरिकेत असणार्‍या नातवाने मला हाच प्रश्न विचारला. नेहमीच्या पद्धतीने मी त्याला उत्त्तर दिले की रोज नियमितपणे वाचन, लेखन व चित्र काढणे या तिन्ही गोष्टींचा वापर करून विषय समजाऊन घे.


हे सांगणे फार सोपे आहे पण आचरणात आणणे किती कठीण आहे हे मला स्वानुभवाने माहीत होते. आपण कसा अभ्यास करू शकलो याची माहिती दिली तर ते अधिक उपयुक्त ठरेल असे मला वाटले म्हणून हा लेखन प्रपंच.

लहानपणी मला आईने नव्या पाटीवर माझा हात धरून अक्षरे गिरवायला शिकवल्याचे माझ्या चांगले लक्षात आहे. बालपणीचे सर्व शिक्षण मी तिच्याशेजारी बसून घेतले. त्यानंतरच्या अभ्यासाच्या बाबतीतल्या सगळ्या आठवणी आहेत त्या वडिलांनी मला शिकविल्याच्या.

माझ्या वडिलांना सर्वजण ’तात्या’ म्हणत. त्यांना स्वतःला अभ्यासाची फार आवड होती. स्वतः तीन तीन नोकर्‍या करीत असूनही ते माझ्या अभ्यासासाठी आवर्जून वेळ काढत. माझ्या शेजारी बसून पुस्तक वाचून दाखवीत. निबंध लिहायला मदत करत. दर शनिवारी आमची चाचणी परीक्षा असे त्यासाठी कोर्‍या कागदांचा आडवा पेपर दोर्‍याने शिवून ते तयार करीत. माझे नाव, इयत्ता, शाळेचे नाव आपल्या सुवाच्च अक्षरात ते लिहून देत. सर्व पुस्तकांना ब्राउन पेपरची कव्हर घालून नाव घालणे हे त्यांचे आवडीचे काम असे.त्यांनी कधीही मला अभ्यास कर असे सांगितल्याचे मला आठवत नाही. ते स्वतःच लहान मुलाच्या उत्साहाने माझ्या सोबत जणु स्वतःच्याच अभ्यासास बसत. अभ्यास करण्यात आनंद कसा मिळतो हे त्यांनी मला कृतीतून दाखवून दिले.

शाळेत विषय शिकवला जाण्याअगोदरच तात्या मला त्या विषयाची ओळख करून देत.त्यासाठी ते स्वतः पुस्तकातील धडे मला मोठ्याने वाचून दाखवत. मग मलाही त्यात काय लिहिले आहे हे जाणून घ्यायची उत्सुकता वाटे व मला काय नवे कळले हे त्यांना सांगावेसे मला वाटू लागे. निबंध स्पर्धा असो वा वक्तृत्व स्पर्धा असो. ते मला त्यात भाग घ्यायला सांगत व माझ्याकडून त्याची तयारी करून घेत. मला अभ्यासाची गोडी लावली ती त्यानीच.

म्हणजे अभ्यासास महत्वाची गरज म्हणजे त्याची आवड निर्माण करण्याची. आजकाल मुलांसाठी त्यांचे आईवडील असा वेळ काढू शकत नाहीत व त्यामुळे मुलांत अभ्यासाची आवडच निर्माण होत नाही असे मला वाटते. यासाठी आई वा वडील यांनी मुलाशेजारी शेजारी बसून शिक्षकाच्या भूमिकेतून नव्हे तर मित्राच्या भूमिकेतून अभ्यासाची त्याला गोडी लावावयास हवी.

अभ्यास हा नेहमीच आनंददायी असतो. कोणतीही नवी गोष्ट आपल्याला आवडते, नवी वस्तू हवीशी वाटते, नवी माहिती कळली की आनंद होतो. अभ्यास केल्यानंतरही असाच आनंद आपल्याला मिळतो याची जाणीव पालकांनी आपल्या उदाहरणातून मुलांना करून द्यावयास हवी.म्हणजे अभ्यासाचा मुले कंटाळा करणार नाहीत.

दुसरी गोष्ट म्हणजे स्पर्धा. इतर मुलांशी स्पर्धा करून आपण सर्वांच्या पुढे जाण्याची ईर्षा व जिद्द मुलांच्यात निर्माण करणे अतिशय आवश्यक आहे. मात्र यश नाही मिळाले तरी निराश न होता अधिक जोमाने अभ्यास करण्याची गरज त्यांना वाटली पाहिजे. काहीवेळा आपला नंबर खाली गेला वा आपण नापास झालो की मुले हाय खातात. अशावेळी दाबलेली स्प्रिंग जशी संधी मिळताच वर उसळी घेते त्याप्रमाणे ईर्षा व नवी जिद्द मुलांत निर्माण व्हावयास हवी.

मी अभ्यासाची डायरी लिहीत असे. हीहि सवय मला तात्यांनीच लावली. एकूण विषय व अभ्यासाची गरज पाहून आठवड्यातील उपलब्ध वेळाचे कोष्टक मी करीत असे. आपल्याला आवडणारे विषयच आपण जास्त वेळ करतो व अवघड व न समजणार्‍या विषयांना टाळण्याचा प्रयत्न करतो हे लक्षात आल्याने मी निग्रहाने पसंतीचा क्रम बदलण्यास सुरुवात केली. सर्व विषय झाले नाहीत तरी चालेल पण मला हा अवघड भाग समजलाच पाहिजे अशा जिद्दीने मी तो प्रथम अभ्यासास घेई.

नुसते वाचून पुष्कळ वेळा काहीच बोध होत नाही अशा वेळी मागचे संदर्भ पुनः वाचणे उपयोगी ठरू शकते. वाचताना आपले लक्ष वा मनातील विचार दुसरीकडे जाण्याची फार शक्यता असते. यासाठी मोठ्याने वाचणे, मनन करून पुस्तक न पाहता कागदावर मुद्दे लिहिणे, आकृत्या काढणे व आपल्य़ाला समजलेले दुसर्‍याला सांगण्याचा प्रयत्न करणे फार फायदेशीर ठरते.

एखाद्या गणिती सूत्राचा आपल्याला बोध होत नसेल तर त्याचे पृथ्थ्करण करून त्यातील प्रत्येक पदाचा सूत्रात काय संबंध आहे हे शोधावयास हवे. कोणत्याही अवघड वाटणार्‍या सूत्रात वा परिच्छेदातील काही कठीण संज्ञा वा दुर्बोध शब्द यामुळे आपल्याला काहीच समजू शकत नाही अशी आपली भावना होते. उदा. संस्कृत लेखनातील संधी व समास, वा गणितातील काही क्रियादर्शक चिन्हे. यांचा नीट उलगडा आधी केला की सर्व भाग आपल्याला समजू शकतो.

दोर्‍याचा गुंता सोडविताना ज्याप्रमाणे आपण हलक्या हाताने निरगाठी उसविण्याचा प्रयत्न करतो तसाच प्रयत्न अवघड भाग समजावून घेण्यासाठी करावा लागतो.

आजकाल पुस्तकांपेक्षा गाईडचे प्रस्थ फार वाढले आहे. पण यात उत्तराचा नेमका भागच दिल्याने संदर्भ नसल्याने अशी उत्तरे आपण होऊन लक्षात रहात नाहीत. शिवाय जरा प्रश्नाचा रोख बदलला की ते उत्तर उपयोगी पडत नाही.फळ खाण्यातील आनंद रस पिऊन होत नाही त्याप्रमाणे मूळ पुस्तक वाचल्याशिवाय खरा अर्थ समजत नाही.

एका विषयासाठी अनेक लेखकांची पुस्तके व गाईडे मुले जमा करतात. पण प्रत्येक पुस्तकातील लिखाणाची पद्धत वेगळी असल्याने विषयाचा संपूर्ण आवाका एकसंधपणे आपल्या लक्षात राहू शकत नाही. यासाठी शक्यतो एकच पुस्तक मुख्य अभ्यासासाठी वापरावे व इतर पुस्तकातील वेगळी माहिती वहीत लिहून ठेवावी म्हणजे ते पुस्तक पुनः हाताळावे लागत नाही.

इंटरनॆटवर सध्या सर्व विषयांवर इत्थंभूत माहिती विविध प्रकारे दिलेली असते. मात्र बर्‍याच वेळा आपण त्या माहितीच्या जंजाळात आपल्याला नक्की काय हवे होते हे विसरून जातो. व भलत्याच माहितीचा वा चित्रविचित्र जाहिरातींचा आस्वाद घेण्यात आपण कधी गुंगून जातो. हे आपल्याला कळत नाही. यासाठी अनावश्यक माहिती पाहणे कटाक्षाने टाळायला हवे.

आपला वेळ मौल्यवान आहे व त्याचा आपण काटकसरीने व सुयोग्यपणे वापर करावयाची गरज आहे हे एकदा लक्षात आले की आपण होऊनच मग आपण फालतु गप्पा, टीव्हीवरील करमणुकीचे कार्यक्रम पाहण्याचे टाळतो व तो वेळ आपल्या ध्येयसिद्धीसाठी वापरण्यास तयार होतो. माझ्या आवडीच्या बुद्धिबळ, अवांतर वाचन या छंदांना मी अभ्यासाच्या आड येऊ दिले नाही.

जगात अवघड असे काहीही नाही. मला प्रयत्न केल्यास कोणतीही गोष्ट समजू शकेल असा विश्वास आपण मनाशी बाळगायला हवा. अभ्यासाची गोडी व हा विश्वास असला की अभ्यास हा नकोसा वाटणार विषय न ठरता तो करमणुकीचा सर्वात महत्वाचा पर्याय होऊ शकतो.

Tuesday, October 20, 2020

भडक बातम्यांच्या आतषबाजीत भावी संकटाकडे दुर्लक्ष

 भारतात कोरोना, राजकारण आणि वृत्तवाहिन्यांच्या टीआरपी चढाओढीत भविष्यात येऊ घातलेल्या बेरोजगारीच्या महासंकटाकडे सध्या कोणाचेच लक्ष नाही.

 शिक्षण थांबल्यामुळे विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे भवितव्य अनिश्चित झाले आहे. छोटे उद्योगधंदे व दुकाने अनेक दिवस बंद असल्याने कामगारांना आणि वाहतूक व्यवस्था बंद असल्याने इतर सर्व क्षेत्रातील व्यवसाय ठप्प झाले आहेत.


यावर रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग  या उक्तीनुसार दिवसरात्र संघर्षाची गरज असताना प्रत्यक्षात करमणूक व  आभासी स्वप्नरंजनात सारी जनता आपला अमूल्य वेळ घालवीत आहे असे दृष्टोत्पत्तीस येते.

पुढील संकटाची जाणीव झालेल्या विचारवंतांनी आणि समाजधुरिणांनी याबाबतीत समाजाचे प्रबोधन करण्याची नितांत आवश्यकता आहे.

मी स्वतः अमेरिकेत रहात असलो तरी कायम भारतातील वृत्तपत्रे आणि टीव्ही चॅनल वरून भारतातील परिस्थितीचा मागोवा घेत असतो व सामूहित बेरोजगारीतून पुढे उदभवू शकणा-या दंगली, गुन्हेगारी वा अराजकतेच्या कल्पनेने अस्वस्थ होतो.

मात्र याही परिस्थितीत  सा-या  जनमानसात स्वयंस्फूर्तीने काही करण्याबाबत असणारी कमालीची उदासीनता पाहून मन विषण्ण होते.

परदेशात राहणारे भारतीयही केवळ आपल्या  नातेवाईकांच्या हितसंबंधांची काळजी करण्यात गुंतले असून ढासळणा-या समाजस्वास्थ्याविषयी अनभिज्ञ असल्याचे जाणवल्याने ज्ञानदीप फौंडेशनच्या माध्यमातून उद्योग निर्मिती आणि दूरस्थ शिक्षण योजना सुरू करण्याचा संकल्प केला आहे. त्यासाठी  उद्योग भांडवलात सहभाग या नात्याने तासदोनतासाच्या येथल्या मानधनाएवढी वार्षिक वर्गणी ठेवली तरी  त्यास मिळणारा थंडा प्रतिसाद अत्यंत निराशादायक आहे.

अर्थात काहीही झाले तरी   हा संकल्प तडीला नेण्यासाठी ज्ञानदीप आपली सर्व शक्ती पणाला लावणार आहे. कदाचित काही कालावधीनंतर इतरांची या उपक्रमास साथ मिळू शकेल असे वाटते.

Monday, October 19, 2020

New Business Model of Dnyandeep Foundation

 Community Run Business Incubation Center in India

Dnyandeep Education & Research Foundation

Public Charitable Trust registered under Public Trust Act(1950)

Vide No. E/1530/Sangli dated 16-3-2005.

This foundation was established for undertaking Research & Development projects in Information Technology for speedy transfer knowledge about advances in science and Technology and to promote their implementation for the overall development of India.  

Considering the difficulty in raising  Seed Capital for Starting New Business, it is decided to operate Dnyandeep Foundation as a community run  activity of subscribing members who wish to start their business or training as entrepreneur under Dnyandeep Foundation Banner enjoying the community support and portfolio of Foundation.

Individual Member

 ·        Annual subscription of Rs.5000/-( India) or $100/-( Foreign Country)

·        Life Membership - Rs. 25000/-

·        Organisation Member ( only for India)

·        Annual subscription Rs. 25000/-

·        Life Membership — Rs. One lakh/- 

Note –All the money will be used for supporting members in their research, education and business activities.

As it is a public trust, the approach will be to provide services with No Loss No Profit principle and collect 30% of share from revenue for building central infrastructure, office correspondence, marketing and administration services. 

There will be complete transparency as regards functioning, activities and accounts. The members can view the activity details and accounts and can suggest / modifications in working of foundation. The managing body shall be elected by election through life members.

This is a new concept evolved after studying the incubation requirements for entrepreneurs having no financial backing or experience portfolio to start with.

The foundation will be assisted by Dnyandeep Infotech Pvt. Ltd. company which is a well established IT company with track record of 20 years. The company has started Environmental Consultancy division and opened a new branch in Nagpur.  The chairman of the company Drt. S. V. Ranade is staying in California on Green Card Status and hopes to get the projects from USA for Dnyandeep Foundation  members in India and Indians living in foreign countries.

All the activities of Dnyandeep Foundation will be published on https://dnyandeep.net, an official website of Dnyandeep Foundation.

I think this is the first attempt of this kind to give stimulus in promoting start-ups  by financially weaker unemployed educated youth in India.