Thursday, November 16, 2017

क्लोरिन साठा आणि दक्षता


वायुवीजन :- क्लोरिन वायू हवेपेक्षा २ १/२ पटीने जड आहे त्यामुळे त्याची गळती सुरु होऊन टो बाहेर पडतो त्यावेळी तो खाली जाऊन जमिनीलगत रहातो. क्लोरिनची नळकांडी साठवण्यासाठी खोली व क्लोरिनीकारकाभोवतालची छोटी खोली यांच्या भींती हवाबंद असाव्यात व एक मात्र इमारतीच्या बाहेर नेणारे दार या भिंतीत असावे. या खोल्यांना तळाशी जमिनीलगत क्लोरिन बाहेर सोडण्यासाठी नळ बसवावेत व छताशी शुद्ध हवा आत येण्यासाठी खिडक्या व भोके असावीत. 

मोठया केंद्रामध्ये शुद्ध हवा जोराने क्लोरिनीकारकाच्या बंद जागेत सोडण्यासाठी छताशी पंखे असणे किवा गळती असेल तर क्लोरिन वायू बाहेर निघून जावा यासाठी तळाशी क्लोरिनचा परिणाम ण होणारा पंखा असणे फार आवश्यक असते. खालच्या भोकात वाफेच्या सहाय्याने हवा बाहेर ढकलला जातो. एवढेच नव्हेतर वाफेशी संयोग झाल्याने क्लोरिनचे कमी त्रासदायक अशा हायपोक्लोरस आणि हायपोक्लोरिक आम्लांत  रुपांतर होते व सांद्रीभूत झालेली ही वाफ गटाराला सोडण्याची व्यवस्था करावी लागत. अवमिश्रणासाठी वापरलेले पाणी त्याच गटारातून वा नळातून सोडणे इष्ट असते.
आणीबाणीच्या वेळी घ्यावयाची दक्षता
 प्रथमोपचार:- क्लोरिन वायुमुळे गंभीर स्वरूपाचा त्रास झाला असेल तर डॉक्टरांना बोलवावे. व रोग्यास दवाखान्यात हलवावे डॉक्टर येईपर्यत रोग्यास उबदार मोकळ्या हवेत ठेवावे व शांत निजू द्यावे. त्याच्या अंगावर उबदार पांघरून घालावे. गरम कॉफी सारखे काहीतरी सौम्य उत्तेजक पेय गरम पाण्यात चहाचा चमचा ब्रँडी घातलेले पाणी योग्यता फायदेशीर ठरते. नाक व घसा यांच्यावर आणीबाणीच्या वेळी इलाज करण्यासाठी अॅटीडोंट, अँटीक्लोर यासारखी औषधे, तयार ठेवण्याचा सल्ला देणे येथे उचित ठरते. अँटीकोर हे औषध कोणीही औषधतज्ञ खालील सूत्राच्या आधारे तयार करू शकेल.

    अँटीक्लोर (२ लिटर)
    पाणी...........१४८५ मि.लि.
    साखर..........४५.  मि.लि.
लव्हेंडर ट्र. संयुग.........३७ मि. लि.
अमोनिया अरोमॅटीकचे 
स्पिरीट.............५६ मि. लि.
अल्कोहोल(इथाईल)........३३३ मि. लि.
पेपरमिटचे तेल.........३७ मि.लि. 
क्लोरोफॉर्मचे स्पिरीट........५५ मि. लि.
    अल्कोहोलमध्ये पेपरमिंटचे तेल घालावे. नंतर क्लोरोफॉर्मचे स्पिरीट, नंतर अमोनियाचे स्पिरीट व त्यानंतर लव्हेंडर संयुग अशा क्रमाने या गोष्टी यात घालाव्या प्रत्येक पदार्थ घातल्यानंतर नीट ढवळावे. पाण्यात साखर विरघळवून नंतर त्यात वरील मिश्रण ओतावे.

१ प्रथमोपचारावरील ही टिपणे खालील लिखाणांवरून तयार केलेली आहेत. (अ) एल. एल. हेजपेथ (१९३४) ‘धोका टाळून क्लोरीन वापरण्याची पद्धत’ अमें. पाणी पुरवठा संघटनेचे मासिक २६ क्र. ११ नोव्हें. १९३४ (आ) पाणी पुरवठा केंद्रातील रसायनांचा 
औषधाच्या बाटलीतील चिठ्ठी :- ‘अँटीक्लोर’ वापरण्यापूर्वी चांगले हलवून घेणे.
मात्रा :- १ मोठा चमचा भरून औषध दर १५ मिनिटांनी तोंडावाटे घ्यावे बरे वाटेपर्यंत किवा चार चमचे औषध पोटात जाईपर्यत असे औषध घ्यावे.
       

    क्लोरीन वायुमुळे डोळ्यांची आग होते. बेरिक आम्लाचा वापर केल्याने बहुधा अशी आग थांबते. क्लोरीन वायू बऱ्याच प्रमाणात असल्यास शरीराची त्वचाही भाजते. अशावेळी भाजलेल्या भागावर सोडियम बायकार्बोनेटच्या अवमिश्रित द्रावण लावावे. व नंतर त्यावर कॅरोन तेलाची पट्टी सैलसर बांधावी. नाक व घसा यांची आग होत असल्यास अँटीक्लोरचा उपयोग होतो पण हे औषध उपलब्ध नसेल तर रोग्याला, मेंथील सॉल्व गरम करून त्याच्या वाफा हुंगण्यास घ्याव्यात व घशाची आग थांबवण्यासाठी त्याला थंड केलेली मलई वा दूध पिण्यास द्यावे. 

No comments:

Post a Comment