Thursday, November 16, 2017

क्लोरिनची गळती, दुरुस्ती आणि व्यवस्थापन

 एका नळकांड्यातून पुरवायची क्लोरिनचे प्रमाण:- 
    कोणत्याही ५० कि.ग्रॅ. (१०० पौंड) धारणक्षमतेच्या एका नळकांड्यातून दिवसांत १६ कि.ग्रॅ. (३५ पौंड) पेक्षा जास्त क्लोरिन घेण्याची आवशकता पडू नये. अन्यथा नळकांड्यांच्या तापमानात बरीच घट होऊन द्रव क्लोरिनचे बाष्पीभवन होणार नाही. जर वर सांगितल्यापेक्षा जास्त क्लोरिन घरण्याची आवश्यक असेल तर जास्त असणाऱ्या प्रत्येक १६ कि.ग्रॅ. (३५ पौंड) वा त्याच्या हिश्श्यासाठी एकेक नळकांडे यंत्रनणेस जास्त जोडावे लागते.

 क्लोरिनचा राखीव पुरवठा :- क्लोरिनची नळकांडी मिळण्यात वा त्यांच्या वहातूकीत विलंब झाल्यास काम अडू नये म्हणून नेहमीच भरपूर क्लोरिनचा साठा हाताशी ठेवावा. 

कामचलाऊ प्रतियंत्रणा :- यंत्रनणेत काही मोड तोड झाल्यास वा दुरुस्ती करावयाची असल्यास यंत्रणेचे काम थांबते यावेळी लोकांना पुरवायच्या पाण्यात क्लोरिन मिसळण्याच्या कामात खंड पडणार नाही याची काळजी घ्यावी लागते. यासाठी कामचलाऊ यंत्रणा तयार असणे आवश्यक असते. यंत्रणेतील वायु मोजणाऱ्या नळ्या, नियंत्रक झडपा व नळ जोडताना लागणाऱ्या रबरीचकत्या हे भाग वेगळे उपलब्ध असले म्हणजे यंत्रणेत ताबडतोब दुरुस्ती करणे शक्य होते. जलतत्वावर चालणाऱ्या पंपांसारखी साधने आवश्यकतेपेक्षा एक एक जास्त उपलब्ध असावीत किंवा कामचलाऊ म्हणून विजेची म्हणून विजेच्या मोटरवर चालणारा पंप उपल्ब्ध असावा. क्लोरिनकारक वा विजेच्या मोटरवर चालणारे पंप यांच्यासाठी विजेचा प्रवाह खात्रीचा असावा लागतो. अन्यथा विजेच्या प्रवाहातील फेरबदलामुळे वा वादळामुळे क्लोरिनीकारक बंद पडतात. यासाठी दुसरा एक पर्याय म्हणजे वीज पुरवठा बंद असेपर्यत थोडावेळ पाण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या संपीडीत हे साठवलेल्या टाकीच्या सहाय्याने क्लोरिन पाण्यात मिसळणे.

यंत्रणेचे तापमान :- क्लोरिनीकारकाची खोली उबदार ठेवावी लागते. क्लोरिनची नळकांडी व यंत्रणा यांचे तापमान १० अंश सेल्सियस (५० सें.) पेक्षा खाली जाणार नाही अशी व्यवस्था करावी लागते. परिचालन फलकाचे तापमान नेहमी नळकांड्याच्या तापमान इतकेच तात्वापेक्षा जास्त असावे लागते मात्र ते कधीही कमी असू नये अन्यथा जास्त तापमान असणारा वायु कमी तपमान असणाऱ्या यंत्रणेत शिरताना त्यांच्या सांद्रीभवन होईल व यंत्रणेचे कार्य व्यवस्थित चालणार नाही. 

    दुरुस्ती आणि व्यवस्थापन :- यंत्रणेची दुरुस्ती करण्यापूर्वी क्लोरीनीकारकास होणारा क्लोरिनचा पुरवठा क्लोरिनच्या टाकीपाशीच बंद करावा व यंत्रणेतील क्लोरिनच्या टाकीपाशीच बंद करावा व यंत्रणेतील सर्व क्लोरिन, हवेच्या तोटीवाटे बाहेर जाऊ द्यावा. सर्व जोड, रबराच्या नव्या चकत्यांनी पुन्हा घट्टबसवावेत व त्यातून गळती होत नाहीना त्याची तपासणी करवी या जोडांच्या आतील पृष्ठभागावर लिथार्ज व ग्लिसरीन यांच्या मिश्रणाच्या पातळ थर द्यावा म्हणजे पक्के जोड तयार होतील. 

    यंत्रणा वापरात नसेल तर ती बाकीच्या उपकरणापासून वेगळी करवी. पूर्णपणे स्वच्छ करावी त्याच्या भागांना तेल चोपडावे व ती कोरडया जागेत ठेवून द्यावी. या यंत्रणेला असणारी सर्व भोके बंद करावीत म्हणजे यंत्रणेचा आतील भाग हवेतील आद्रतेपासून सूरक्षित राहील. 
स्वच्छता :- या यंत्रणेतील जे भाग बाहेरून सहजासहजी शक्य नसेल ते भाग तंबाखूचीचिलीम साफ करायच्या साध्या ब्रशाचा उपयोग करून स्वच्छ करता येणे शक्य असते. दाबमापक वक्रनलिकेत बहुधा कार्बनट्रेटाक्लोराईड (CCL4) हा द्रव असतो. पदार्थ स्वच्छ बाजारात कार्बोना या नावाने हा द्रव ओळखला जातो. पदार्थ स्वच्छ करण्यासाठी याचा गुणधर्म असल्याने यंत्रणेचे भाग साफ करण्यासाठी या द्रवाचा उपयोय करता येतो. तथापि काही दाबमापक वक्रनलिकात तीव्र स्लफुरिक (स्फुरद) आम्ल भरलेले असते व ते वापरणे धोक्याचे व अयोग्य असते. 
    वायुरूपात वा द्रावण स्वरुपात क्लोरिन पाण्यात मिसळणे. ज्याठिकाणी प्रक्रिया करावयाचे सर्व पाणी क्लोरिन वायुच्या वा द्रावणाच्या सान्निध्यात येवू शकेल अशा ठिकाणी क्लोरिन पाण्यात मिसळावा लागतो. उघडया नालित वा नलिकेत १.२ मीटर (४ फुट) पेक्षा कमी खोलीवर क्लोरिन वायू पाण्यात मिसळू नये. अन्यथा तो पाण्यात शोषला जात नाही.

यंत्रणेतील जुळणी :- सर्व झडपांची उघडझाप काळजीपूर्वक व सावकाश करावी व त्यावर सगदी कमी दाब पडेल असे पहावे कारण वाजवीपेक्षा जास्त दाब दिल्यास त्यांच्यात बिघाड उत्पन्न होतो. वायूचा प्रवाह बंद वा चालू करण्यासाठी दुय्यम टाकीच्या झडपेचा वापर करावा आवश्यक वाटल्यास यंत्रणेवरील नियंत्रक झडप कमी जास्त उघडून प्रवाहाच्या वेगात फेरफार करावेत.
सर्व प्रकारच्या द्रावण पोषक यंत्रणा सुरु करण्यापूर्वी द्रावण करण्यासाठी लागणाऱ्या प्रवाह आधी चालू करावा यंत्रणेची नियंत्रक झडप त्यावेळी बंद ठेवावी. नंतर मुख्य टाकीची झडप व दुय्यम टाकीची झडप उघडावी व शेवटी यंत्रणेची नियंत्रक झडप आवश्यक तेवढा प्रवाह येईल अशा रीतीने उघडावी यंत्रणेवरील वक्रनलिका व प्रवाह प्रथम थांबवावा व यंत्रणेतील सर्व वायू निघून गेल्यावर मग द्रावण करण्यासाठी वापरावयाच्या पाण्याचा प्रवाह बंद करावा. वायू पोषक क्लोरिनीकारकाची परीचालनाची सारांशरुपाने माहिती क्लोरिनकारक चांगल्या स्थितीत राहील अशारीतीने त्याची निगा ठेवली जावी व परिचालन व्हावे यासाठी यंत्रणेच्या उत्पादकाकडून मिळालेल्या सूचना पुस्तिकेचा वापर करणे इष्ट असते या सूचना समजतील व वायू पोषक क्लोरिनीकारकांचे कार्य कळेल असा आत्मविश्वास परिचालकास असणे जरूर आहे अन्यथा यंत्रणेच्या दुरुस्तीकडे वा किरकोळ जुळणीकडे दुर्लक्ष होईल.
     उत्पादकाच्या प्रतिनिधीने परिचालकास प्रत्यक्ष सूचना देणे ही सर्वात उत्तम पद्धत होय. क्लोरिनचे गुणधर्म निश्चितपणे लक्षात ठेवले पाहिजेत प तो हाताळताना उगीचच जास्त घाबरण्याचेही काही कारण नाही पोषक क्लोरिनीकारकाच्या क्लिष्टतेमुळे पुष्कळ जण हायपोक्लोराईट द्रावणपोषकाचा उपयोग करणे अधिक पसंत करतात. मोठया पाणी पुरवठा केंद्राच्या बाबतीत परिस्थितीप्रमाणे याची निवड करावी लागते. 

    वायूपोषक क्लोरिनीकारकाचे परीचालन करताना खालील गोष्टी लक्षात ठेवणे जरूरी असते.नळकांडी हलविण्यापूर्वी त्या नियंत्रक झडपावर धातूची झाकणे बसविणे आवश्यक असते. नळकांड्यांचे तापमान १० अशं सें (५० अशं फॅ) पेक्षा नेहमी जास्त राहील अशा रीतीने त्यांचा साठा करावा लागतो मात्र वाफेचे नळ किवा उष्णताउत्सर्जन यंत्र यासारख्या तापलेल्या वस्तूंच्या उष्णतेचा नळकांड्याना संपर्क होणार नाही अशी काळजी घ्यावी लागते. 
   क्लोरिनची गळती
गळती ओळखणे व संक्षारणास प्रतिबंधकरणे यंत्रणेचे संक्षारण होऊ नये म्हणून यंत्रणेच्या सर्व बाहेरील भागांना कोणतेही योग्य तेल किंवा ग्रीस चोपडावे लागते. पेट्रोलियम जेलीमध्ये गॅसोलिन घालून त्याच्या मिश्रणाचा या कमी उपयोग करता येतो. संक्षारण क्रिया वाढू नये म्हणून यंत्रणेमध्ये निर्माण होणारी सर्व गळती लगेच थांबवावी लागते. अमोनिया असणाऱ्या बाटलीचे बुच काढून तिचे तोंड यंत्रणेच्या सर्व भागाजवळ नेले कीगळतीची जागा लगेच शोधून काढता येते कारण जेथे गळती असेल तेथून बाहेर पडणाऱ्या क्लोरिनचा अमोनियाशी संयोग झाला की अमोनिया क्लोराईड तयार होऊन त्याच्या पांढर्या वाफा दिसू लागतात. 
 क्लोरिनची गळती कधीही वासावरून शोधून काढू नये अमोनियाचे पाणी या कमी वापरावे म्हणजे वर वर्णन केल्याप्रमाणे गळतीच्या जागी अमोनियम क्लोराईडचे पांढरे ढग तयार झालेले दिसतील नळकांडी व क्लोरिनीकारक शक्यतो जमिनीच्या पातळीपेक्षा वरच्या पातळीवर असणाऱ्या स्वतंत्र खोल्यांमध्ये ठेवावेत व त्या खोल्यात वायुविजनाची सोय करावी. भींतीमध्ये छताइतक्या उंचीवर हवा आत सोडणारे पंखे बसविणे व खोलीतील हवा एकदम इमारती बाहेर जावी यासाठी जमिनीलगत भोके ठेवणे ही वायुविजनाची सर्वात उत्तम पद्धत होय कारण पद्धतीत क्लोरिन वायूच्या वाफा खालच्या भोकातून खोली बाहेर ढकलल्या जात असल्याने पंखे वा त्यांच्या मोटारी या वायूच्या संपर्कात येत नाहीत. क्लोरिनीकारक व त्याची काम चलाऊ प्रतीयंत्रना दोन्हीही कार्यक्षम असली पाहिजेत. अर्थात त्यापैकी एकाची दुरुस्ती चालू असेल तर हे शक्य नसते. दुरुस्तीसाठी आवश्यक असणारे यंत्रणेचे सुटे भाग राखीव म्हणून ठेवलेले असले म्हणजे लगेच दुरुस्ती आठवड्यास आलटून पालटून दोन्ही क्लोरिनीकारकांचा उप्याग करणे ही सर्वात उत्तम पद्धत होय.

No comments:

Post a Comment