Wednesday, November 15, 2017

घरातील नळव्यवस्थेचे संक्षारण

वितरण व्यवस्थेचे संक्षारण होऊ नये म्हणून पाणी पुरवठ्यावर जी प्रक्रिया करण्यात येते त्यामुळे घरांतील नळव्यवस्थेच्या संक्षारणाचे प्रमाण फार कमी होते पण ज्यावेळी त्यापैकी थोडे पाणी गरम केले जाते त्यावेळी संक्षारणापासून नळव्यवस्थेचे पूर्ण संरक्षण होणे अशक्य असते. कारण कल्शियम कार्बोनेट थंड पाण्यापेक्षा गरम पाण्यात कमी विद्राव्य असते. त्यामुळे वितरण व्यवस्थेचे संक्षारण होऊ नये म्हणून केलेली उपाय योजना घरातील नळ व्यवस्थेसाठी हिवाळ्यात फक्त अंशत:च कार्यक्षम ठरते कारण थंड पाण्यात समतोल स्थितीसाठी आवश्यक तेवढ्या प्रमाणात प्रक्रिया केली तरी पाणी गरम केले की कल्शियम कार्बोनेटचे प्रमाण संपृक्ततेपेक्षा जास्त होऊन पाणी तापविणाऱ्या उष्णकां (Heater) वर कल्शियम कार्बोनेटचा वाजवीपेक्षा जास्त थर बसतो. त्यावर उपाय म्हणजे हिवाळ्यात समतोल स्थितीसाठी लागणाऱ्या प्रमाणापेक्षा कमी संक्षारणापासून प्रमाणात अल्कलीचा वापर करणे यामुळे वितरण व्यवस्थेचे अंशत: संरक्षण झाले तर गरम पाणी पुरविण्याच्या व्यवस्थेवर विशेष हानिकारक परिणाम होणार नाही हिवाळयानंतर वसंत ऋतूमध्ये अल्कलीचे प्रमाण, समतोल स्थितीसाठी लागणाऱ्या प्रमाणापेक्षा थोडेसे जास्त करावे लागते म्हणजे नळाच्या पृष्ठभागावर उन्हाळ्यात पुरेशी जाडीचा थर तयार होतो व नंतरच्या हिवाळ्यात नळांचे संरक्षणापासून संरक्षण करण्यास तो थर उपयोगी पडतो.

याशिवाय लोखंडाचे संक्षारण होऊ नये म्हणून पाण्यावर अल्कलीची किली असली तरी ते पाणी जास्त, जस्तीकरण केलेले लोखंड वा पितळ यांना संक्षारक असू शकते कारण पी.एच. ७.५ पेक्षा कमी किंवा ८.५ पेक्षा जास्त असेल तर जस्ताचे फार संक्षारण होते. यासाठी ज्या पाण्याचे पी.एच. ७.५ ते ८.५ पर्यंत असेल त्या पाण्यासाठीच फक्त जस्ताचा थर दिलेल्या लोखंडाचे वा पितळ्याचे नळ वापरावे लागतात. ज्या पाण्याची अलक्ता ३० भा/दलभा पेक्षा पी.एच. ७.८ पेक्षा जास्त असतो अशा पाण्यामुळे तांबे वा तांबडे पितळ यांचे फारसे संक्षारण होत नाही. काही प्रकारच्या पिवळ्या पितळातील (ड्युप्लेक्स) पितळ) जस्त, संक्षारक पाण्यामुळे निघून जाते. पाण्यात ताब्यांचे प्रमाण १ ते ३ भा/दलभा पेक्षा जास्त असेल तर पाण्याला धातूची चव येते व तांब्याचा रंगही येतो. यासाठी ताब्यांचे १ भा/दलभा हे पाण्यातील प्रमाण अंदाजे मार्गदर्शक म्हणून धरण्यास हरकत नाही पाण्यात जस्ताचे प्रमाण ५ भा/दलभा पेक्षा कमी असावे.

पाण्याची पी.एच. कमी असेल तर शिशिचे संरक्षण होते. व पाण्यातील शिशाचे प्रमाण ०.०५ भा/दलभा पेक्षा जास्त झाले की त्याचे विषारी गुणधर्म जाणवू लागतात म्हणून पी.एच. अंदाजे ७.८ पेक्षा कमी असणाऱ्या पाण्यासाठी शिशाचे नळ वापरणे इष्ट नसते जास्त चुना मिसळल्याने पाणी अल्कधर्मी (दाहक) झाले असेल तर त्या पाण्यामुळे शिशांचे संरक्षण होते म्हणून चुन्याचा वापर करून मृदू केलेल्या पाण्यासाठी शिशाचे नळ वापरू नयेत जर अशा मृदू पाण्यात पुन्हा कार्बोनीकरण (कार्बनडायऑक्साईड मिसळणे) करून पाण्याची पी.एच. सुमारे ९.६ पेक्षा कमी केला तर शिशाचे नळ वापरले तरी चालतात. यामुळे पी.एच. ७.८ ते ९.६ च्या सीमांन्तरात असणाऱ्या पाण्यासाठी शिशाच्या नळांचा वापर केला तरी चालतो फक्त पाण्याचा पी.एच. नेहमी वरील सीमान्तरात राहील अशी  खात्री असावी लागते पिण्याच्या पाण्याच्या युरोपियन कसोट्या या पुस्तकातील पान २८ वर असे लिहिले आहे की पाणी १६ तास शिशाच्या नळात राहिले तरी लोकांच्या घरातील तोटीतून येणाऱ्या पाण्यात ०.१ मि.ग्रॅ.लि. पेक्षा प्रमाणात शिसे असू नये.

सिमेंटचा थर दिलेल्या लोखंडाचे वा स्टीलचे नळ जस्ताचा थर दिलेल्या लोखंडी वा स्टीलच्या नळांपेक्षा अंतर्गत संक्षारणच्या क्रियेस जास्त प्रतिकारक्षम असतात पाण्यात कार्बनडायऑक्साईड बऱ्याच प्रमाणात असेल तर त्याची सिमेंटवर थोडीफार क्रिया होत असली तरी ज्यावेळी संक्षारण नियंत्रणाची पद्धत वापरलेली नसते व लोकांना पुरविलेल्या संक्षारक पाण्याचा वर उल्लेखिलेल्या नळांवर क्रिया होण्याची शक्यता असते. अशा वेळी सर्वसाधारणपणे सिमेंटचा थर असणारे नळ चांगले कार्यक्षम राहतात. शिसे, पितळ किंवा तांबे या धातूंचे नळ ताबोडतोब मिळू शकत नसतील तर त्याऐवजी सिमेंटचा थर असेले लोखंडी नळ वापरले तरी चालतात ते नळ वापरल्यास सिमेंटच्या थराच्या संपर्कात असण्याच्या पाण्याची अल्कता वाढते.

हल्ली बऱ्याच उत्पादकांनी प्लॅस्टीकच्या नळांचे उत्पादन सुरु केले आहे एकंदरीत असे दिसते की नळांचे संक्षारण होत नसल्याने व ते हाताळणे सोपे असल्याने त्यांचे वापर दिवसेंदिवस अधिकाधिक होत जाईल.


बऱ्याच प्रकारची माती धातूच्या नळांचे संक्षारण करू शकते. विशेषतः चिकणमाती व कार्बन पदार्थ जास्त प्रमाणात असणारी माती यांच्यात हा संक्षारक गुणधर्म प्रकर्षाने दिसून येतो निरनिराळ्या धातूंच्या नळांच्या बाह्य संक्षारणास होणारा प्रतिकार वर विशद केल्याप्रमाणे असतो. विद्युत विश्लेषण घरातील नळव्यवस्था संक्षारित झाली असेल तर प्रत्येक वेळी स्वतंत्रपणे त्या नळव्यवस्थेचा अभ्यास करावा लागतो व संक्षारण क्रिया विद्युत विश्लेषणामुळे होत आहे काय हे पहावे लागते विजेची साधने, रेडीओ इत्यादीचे जमिनीला जोडावयाची तार नळव्यवस्थेस जोडली असेल तर तुरळक वीजप्रवाह वाहातो व त्यामुळे विद्युत विश्लेषण होऊन नळाचे संक्षारण होते वीजपुरवठा केंद्रे व तत्सम ठिकाणांजवळची वितरण व्यवस्था यांचे जास्त संक्षारण झालेले आढळल्यास त्याचे कारणही विद्युत विश्लेषण असू शकते व अशावेळी ही जबाबदारी वीजपुरवठा अधिकाऱ्यांची असते. नळव्यवस्थेसाठी लोखंड व तांबे असे निरनिराळ्या प्रकारचे धातू एकत्र वापरले असतील तरी विद्युत विश्लेषण होऊन नळांचे संक्षारण होते. पाण्याचे पी.एच. कमी असेल तर ही संक्षरण क्रिया प्रकर्षाने होते.

No comments:

Post a Comment