Friday, December 22, 2023

मने हरवलेला समाज

 भौतिक समृद्धीच्या मागे धावणा-या नव्या पिढीला आपली मने सांभाळून ठेवण्यासाठी आता विशेष प्रयत्न करावे लागत आहेत. भारतीय समाजाला  गेली अनेक वर्षे गुलामगिरीत काढावी लागली तरी धार्मिक परंपरा आमि अध्यात्मिक मनोवृत्तीमुळे समाजमन कायम सुदृढ राहिले. आता नव्या पिढीचा देवावर आणि अध्यात्म्यवरील विश्वास उडाल्यामुळे त्यांची मने उध्वस्त होण्याची शक्यता आहे.

रेल्वे प्लॅटफॉर्मवर गाडीची वाट पहात असताना एकमेकांशी प्रेमाने वागणारी माणसे गाडीत शिरताना एकमेकांशी धक्काबुक्की करतात. एवढेच नव्हे तर वर चढायला मिळाले की आत येणा-या या थोड्या काळापूर्वी असणा-या मित्रांना खाली ढकलण्याचा प्रयत्न करतात.

अस्पृष्यांची घरे गावाच्या वेशीबाहेर असल्याबद्दल आपण जुन्या पिढीला दोष देतो. पण आतादेखील  आपल्या बंगल्या शेजारी वा अपार्टमेंट कॉम्प्लेक्स भोवती असलेल्या झोपडपट्टीतील लोकांना आपण अस्पृशांप्रमाणेच वागणूक देतो हे आपल्या लक्षात येत नाही.

या झोपडपट्टीतील दारिद्र्य, अस्वच्छता, रोगराई, गुन्हेगारग व व्यसनाधीनता यामुळे आपल्याला या परिसराचीच भीती वाटते.  झोपडपट्टी निर्मूलनासारख्या अनेक योजना शासन सुरू करते पण त्यांची जागा कामाच्या जागेपासून दूर असल्याने हे गरीब लोक ती घरे भाड्याने देऊन पुन्हा आहे त्याच ठिकाणी बेकायदा राहणे पसंत करतात. पोरिसांना हप्ता देऊन वा गुंडांचे वा प्रतिपक्षाचे साहाय्य घेऊन त्यांना याबाबतीत यशही येते.

बहुतेक मोठ्या शहरांत प्रचंड प्रमाणात वाढत राहणा-या अशा झोपडपट्ट्या स्मार्ट सिटीच्या आकर्षक कल्पनाविश्वाला सत्य परिस्थितीचे कुंपण घालतात.

मध्यम वर्गातील लोक आपल्या संरक्षित मर्यादित परिसरात आपले संसार करतात. श्रीमंत होण्याची स्वप्ने बघतात.समाज सुधारणेसाठी आग्रही असतात पण प्रत्यक्ष स्वतः त्यात सहभागी होत नाहीत.

नाही म्हणायला घरातील कामे करण्यासाठी या झोपडपट्टीतील लोकांना आपल्या घरात प्रवेश देतात. आर्थिक मदतही करतात. पण त्यांच्या घरी जाऊन तेथील परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न करीत नाहीत. याचे कारण म्हणजे त्यांना तेथल्या समाजाची आणि रोगराईची भीती वाटते.

त्यांच्या संवेदनशील मनाला यातील दुटप्पीपणा जाणवू लागतो. मग हे लोक निसर्गसंवर्धनाच्या कार्याला वाहून घेतात.
कारण निसर्ग निखळ आनंद देऊ शकतो.

आपणही मोठ्या कंपन्यांच्या दृष्टीने गुलाम व झोपडपट्टीतील माणसेच आहोत हे कबूल करायला त्यांचे मन तयार होत नाही.

यातीलच काही कुशाग्र, हळवे व संवेदनशील या मानसिक गुलामगिरीविरुद्ध  बंड करून उठतात. त्यांच्या मनावर होणारे गुलामगिरीचे आघात त्यांना सहन होत नाहीत. मने दुभंगतात. मानसिक रोग बळावतात. मग मानसिक सल्लागार नेमले जातात.

परदेशात बहुतेक सर्व मध्यमर्गीय असल्याने झोपडपट्टीचा एवढा विळखा तेथे पडत नाही.

तरीदेखील बेघर लोकांना आपल्या घरी प्रवेश देण्याचे धाडस कोण करीत नाही. कारण या लोकांची काहीच माहिती त्यांना नसते. ड्रग अडीक्ट वा माथेफिरू हिंसक मनोवृत्तीचे लोक असतील या भीतीने अशा लोकांना आपल्या वस्तीपासून दूर ठेवण्यास ते प्राधान्य देतात.

प्राण्यांवर प्रेम करणे परदेशात जास्त असण्याचे कारण मला पूर्वीच्या गुलामगिरीचेच सुधारित रूप वाटते. माणसांना नाहीतर प्राण्यांना आपण गुलाम म्हणून वागवू शकतो  त्यांच्याकडून क्रांतीचा धोका नसतो.

पर्यावरणाबाबतची वाढलेली जागरुकता हादेखील स्वातंत्र्य उपभोगण्याचा एक हक्काचा मार्ग मानवी मनाला सापडला आहे.

धार्मिक श्रद्धा नसणा-यांसाठी निसर्ग हाच परमेश्वर आहे. माणसांच्या दमनवृत्तीविरूद्ध मोकळेपणाने संघर्ष करण्याचे स्वातंत्र्य निसर्गाने आपणास देऊ केले आहे. सध्याच्या समाजव्यवस्थेविरूद्धचा आपला राग व्यक्त करण्यासाठी तरी निसर्गसंवर्धनाच्या कार्यात सहभागी व्हा व आपल्या मनाचे संतुलन राखा - डॉ. सु. वि. रानडे, ज्ञानदीप, सांगली.


Instead of Facebook Page build your own Website

 


Facebook has provided a very easy method to post your photos, write blogs and even market your products and that also completely FREE. Naturally, almost everybody has started using this media for communication. Facebook also has created a special Facebook page feature to resemble website with menus and media publishing facilities.

It is to be understood that Facebook is providing this facility with a sound business model of advertisements. Large corporate and many foreign traders are using this platform to showcase their products and services by paying heavy fees to Facebook. We do not bother about this fact as we don’t have to pay anything. However, we are becoming customers or clients to these paid advertisers unknowingly. We expose our personal data, likes unlike, views and feed-backs which helps the advertisers to decide their strategy and sell their products and services.

Those who use free facebook page for selling their products  are at a loss as comparable, cheaper and more attractive offers are displayed just adjoining these pages and the customers are naturally get diverted from the page of local business. 

Everyday I get requests from my friends to like their page. I do it promptly even without seeong the page properly as a respect to request. But the purpose of liking page and inreasing hit count is lost as the likes are mainly from those who know you.

Imagine the difference between a shop in great mall with separate privately owned shop. Even the product in displayed in mall has to face tough competition from similar products with more attractive features but unreliable quality.

Design and hosting of our website has become very easy and cheap due to advancement in technology. The cost of hosting it on server is also very less. There is full control on content to be displayed and freedom of changing it any time. The website can be accessed from its address without login by anybody and from anywhere. Hence, instead of people visiting your facebook page with request where you can reach only to known contacts and they also need login to see your information.

Hence, in order to protect small businesses in India, we should promote and adopt individual websites rather than free display in Facebook.

 Our own webpage has our brand logo, color scheme and design as we like and more than that it is exclusively displaying products and services of the owner. Companies are graded by their web presence and separate website is a status  symbol. Hence, if you wish to do business seriously, you should not rely on free media facilities. If you have to give advertisement in newspaper or magazine the costs are higher than total website building cost. Cost on TV or You tube channels are exorbitant. All sports and news channels mainly earn money by paid advertisements.

Dnyandeep is ready to provide training to design and maintain the website to small businesses within the cost of website design. You can work with Dnyandeep team and learn how to design the webpages, insert photogallery or video and provide flexible access levels to viewers.

We hope that all web design companies in India should start such a drive and protect businesses from invasion by multinationals.

-          Dr. S. V. Ranade, Dnyandeep, Sangli

 

Thursday, December 21, 2023

बलाढ्य अडोबला छोट्या फिग्माचे आव्हान

मोठा मोसा लहान माशांना गिळून मोठा होतो तसे व्यापारातही प्रतिस्पर्धी कंपनी विकत घेऊन मोठ्या कंपन्या आपले वर्चस्व कायम राखतात.फोटोशॉप, फ्लॅश, ग्राफिक डिझईन आणि इलस्ट्रेटर तंत्रज्ञानात आघाडीवर असणारी अडोब संगणक कंपनी जागतिक बाजारात सर्वात जुनी, महत्वाची व मोठी कंपनी असूनही युरोपमधील फिग्मीच्या यशामुळे त्यांच्या ग्राहक वर्गात प पर्यायाने फायद्यात घट होत होती. 


यावर उपाय म्हणून अडोबने नुकताच युरोपमधील फिग्मा ही याच क्षेत्रातील छोटी कंपनी 20 बिलियन डॉलरला विकत घेण्याचा  प्रस्ताव मांडला होता.फिग्मा कंपनीचा ताळेबंद 400 मिलियन डॉलर इतका कमी असूनही एवढी मोठी किंमत अडोबने देऊ केली होती. साहजिकच फिग्माने या विलिनीकरणास आनंदाने मान्यता दिली होती. 


Ref:https://www.wsj.com/tech/adobes-20b-purchase-of-figma-would-harm-innovation-u-k-regulator-provisionally-finds-19f28b72?mod=WTRN_pos7&cx_testId=3&cx_testVariant=cx_164&cx_artPos=6
 

मात्र   युरोपियन स्पर्धा आणि बाजार प्राधिकरणाला  असे लक्षात आले की फिग्मा हे कमी किंमतीचे सॉफ्टवेअर युरोपमधील अनेक डिजिटल डिझायनर्स व छोट्या कंपन्या  वापरत आहेत. त्याना अडोबच्या अटी व किमती स्वीकारायला लागतील शिवाय फिग्माच्या नवनिर्मितीच्या व प्रगतीच्या  प्रयत्नांना खीळ बसेल.त्यामुळे युरोपियन कायदेतज्ज्ञांनी त्यास अटकाव केला. त्यामुळे फिग्माचे निलिनीकरण थांबले. 

माझ्या मनात आले की यावर एक कल्पनारम्य गोष्ट रचता येईल ---- अमेरिकेतील अडोब राजाने युरोपमधील रूपसुंदरी फिग्मा हिला मागणी घातली. अडोबची संपत्ती पाहून फिग्माने या मागणीला होकार दिला. पम युरोपच्या जनतेला फिग्मा आपल्यातून जाण्याची भिती वाटली. फिग्माबद्दलचे त्यांचे प्रेम उफाळून आले त्यांनी तिला राजकन्या म्हणून मान देण्याचे ठरविले, मग फिग्मानेही युरोपची राजकन्या म्हणून राहण्याचे मान्य केले व अडोबला नकार दिला.
 
भारतानेही आपल्या छोट्या स्वदेशी कंपन्यांना संरक्षण देऊन त्यांच्या प्रगतीसाठी आर्थिक मदत आणि प्रकल्प दिले तरच त्या प्रबल आंतरराष्ट्रीय संस्थांपुढे तग 
धरू शकतील.

ॲमेझॉनची मीटींग - पॉवरपॉईंट प्रेझेंटेशनपेक्षा अनोखी पण प्रभावशाली पद्धत

मी बिंगच्या स्क्रीनवर पॉवरपॉईंट प्रेझेंटेशनबद्दल माहिती विचारल्यावर मला खालील उत्तर मिळाले,

मीटिंगमध्ये पॉवरपॉइंट किंवा नोट्स वापरण्यासाठी 

  •  वेळेपूर्वी तुमच्या सादरीकरणाची योजना करा आणि तुमच्या नोट्ससह त्याची तालीम करा. · 
  • तुमच्या स्लाइड्स साध्या आणि स्पष्ट ठेवा आणि तुमच्या संदेशाला समर्थन देण्यासाठी व्हिज्युअल वापरा. ·
  • स्क्रिप्टमधून वाचण्याऐवजी तुमच्या नोट्समध्ये बुलेट पॉइंट्स, कीवर्ड किंवा संकेत वापरा. 
  •  श्रोत्यांशी डोळसपणे संपर्क साधा आणि आत्मविश्वासाने आणि उत्साहाने बोला. 
  •  प्रश्न, मतदान किंवा कथांसह प्रेक्षकांना गुंतवून ठेवा आणि अभिप्राय आणि चर्चा आमंत्रित करा.

 

मेझॉन या जगप्रसिद्ध कंपनीचे  संस्थापक जेफ बेझोस यानी आपल्या कार्यकारी मंडळाच्या मीटींगमध्ये पॉवरपॉईंट प्रेझेंटेशनऐवजी एक वेगळी पद्धत सुरू केली. त्यांच्यामते पॉवरपॉईंट हे एक विक्रीचे साधन आहे. आपला मुद्दा इतरांना पटवून देण्यासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो परंतू  पाहणा-यांना स्वतः विचार करण्यास उद्युक्तत करण्याऐवजी त्यांना फक्त श्रोते व्हावे लागते. त्यामुळे विचारविनिमय किंवा नवनिर्मितीसाठी ते मारक ठरते.

 

यासाठी पॉवरपॉईंट प्रेझेंटेशनऐवजी अमेझॉनमध्ये मीटींगच्या सुरुवातीस एक सहा पानी आराखडा सर्व उपस्थितांना वाचायला देतात. पहिला अर्धा तास सर्वजण  तो आराखडा वाचून आपल्या शंका, सूचना व कल्पना समासामध्ये लिहून ठेवतात. 

सर्वांचे वाचून झाले की मीटींगला सुरुवात होते. आता प्रत्येकाला एकूण काय मुद्दे आहेत याची  सविस्तर माहिती झाल्याने  आपल्या विभागाशी संदर्भित प्रश्न विचारणे, माहिती देणे व परस्पर संवाद साधणे केव्हा करायचे हे लक्षात येते.

नेहमीच्या पॉवरपॉईंट प्रेझेंटेशनमध्ये पुढील स्लाईडची माहिती नसल्याने अनावश्यक शंका उपस्थित होउन विषयांतर होते.

आता कोणी म्हणेल की मीटींग विषयाची सविस्तर माहिती मीटींगपूर्वीच का पाठविली तर मीटींगचा वेळ वाचेल. पण जेफ बेझोस यांच्यामते बहुतेकवेळा मीटींगला येणारे ते वाचत नाहीत शिवाय आयत्या वेळेला वाचण्यास वेळ दिल्याने त्याचे गांभीर्य वाढते व सर्वांचा सहभाग अधिक चांगला हेऊन नवीन कल्पनांना वाव मिळतो.

मला ही पद्धत खरेच अधिक चांगली वाटली. शाळा कॉलेजात शिकविण्यासाठी देखील ही पद्धत अधिक प्रभावी ठरेल.

सध्या व्हिडीओचा जमाना असल्याने नवीन विषय शिकण्यासाठी यूट्यूबवरील व्हिडिओ पाहण्याकडे बहुतेकांचा कल असतो.

मला व्हिडिओपेक्षा पुस्तक वापरणे अधिक चांगले वाटते. कारण पुस्तक वाचताना आपण मालक असतो व वाचताना आपल्या कल्पनाशक्तीने आपण दृश्य डोळ्यासमोर आणू शकतो पुढे मागे पाने उलटून पुस्तकातील   हवा तो मजकूर वा संदर्भ वाचू शकतो. ती सोय व्हिडिओत नसते. व्हिडिओ करणा-याच्या इच्छेनुसार व त्याने आखलेल्या क्रमानेच आपल्याला  शिकावे लागते.

आता व्हिडिओतही पुढेमागे करणे, स्पीड बदलणे, सबटायटल वाचणे या सोय़ी असतात.

 मी पुस्तक वाचताना पहिल्यांदा लेखक परिचय व त्याने दिलेली पार्श्वभूमी आवर्जून वाचतो. त्यामुळे लेखकाबद्दल व विषयाबद्दल माझ्या मनात एक स्पष्ट प्रतिमा तयार होते. माझ्या स्मृतीतील पूर्वीच्या अनुभवांचे मिश्रण होऊन पुस्तक वाचन एक आनंददायी अनुभव ठरतो.

मला वाटते अमेझॉनच्या मीटींगमध्ये वाचनाची पार्श्वभूमी अशीच उपस्थितांना विषयाशी मनाने जोडण्यास मदत करीत असेल.