हायपोक्लोराईटचे द्रावण पाण्यात मिसळण्याची यंत्रणा:-
हायपोक्लोराईटची द्रावणे (व वायू पोषक क्लोरिनीकारकातील क्लोरिनचे पाणी) फार संक्षारक असते द्रावणपोषक म्हणून सिरॅमिक, काच, फायबर ग्लास प्लॅस्टिक किंवा विशिष्ट रबर यासारख्या निवडक पदार्थांचा वापर केलेला असतो. ज्या ठिकाणी मागणी भरपूर असेल त्या ठिकाणी अशी तयार यंत्रणा बाजारात विकत मिळू शकते. बाजारात मिळणाऱ्या यंत्रणेची निवड करताना खालील गोष्टींची विचार करावा लागतो. (१) जलशास्त्रा नुसार पाण्याची स्थानिक परिस्थिती (२) द्रावण मिसळण्याची जागा (३) यंत्रणेचा प्रकार व दर्जा आणि (४) यंत्रणा पुरवणाऱ्याकडून त्याच्या दुरुस्तीसाठी वा निगा राखण्यासाठी उपलब्ध असणारी सेवा.
सर्वसाधारणपणे यंत्रणा खलील घटकांची बनलेली असते. (अ) मोटार चालवणारे पडद्याचे पंप या पंपातील पडदा कमी जास्त अंतरापर्यत हलू शकतो व काही प्रकारच्या पंपांचा वेगही कमी जास्त होऊ शकतो (आ) पाण्यावर चालणाऱ्या व मोठया आकाराच्या पडद्यांचे पंप ज्या ठिकाणी वीजपुरवठा उपलब्ध नसेल त्याठिकाणी त्या पंपाचा उपयोग करता येतो. (इ) द्रावणाची पातळी कायम असताना कार्य करणाऱ्या रेखांकित छीद्रांचे द्रावण पोषक (ई) द्रावणाच्या वर्चसीय शक्तीत बदल होत असता कार्य करणाऱ्या छिद्रांचे द्रावण पोषक ज्या ठिकाणी प्रक्रिया करावयाच्या पाण्याच्या प्रवाहात फारसे बदल होत नाहीत त्या ठिकाणी पडद्याचे पंप असणारे द्रावण पोषक हाताने नियंत्रित करता येतात.
ज्या ठिकाणी प्रवाहात फेरबदल होत असतील तेथे प्रक्रिया करावयाच्या पाण्याचा प्रवाह मोजणारी यंत्रे बसवून प्रवाहातील बदलाप्रमाणे द्रावणाच्या प्रमाणातही आपोआप बदल होईल अशी सोय करता येते. ज्या ठिकाणी वीज पुरवठ्यात व्यत्यय येण्याची शक्यता असते व त्या काळातही पाण्याचा पुरवठा चालूच असतो. तेथे विजेच्या घरगुती स्वरूपाची यंत्रना:- आणीबाणीच्या वेळी किंवा बाजारातील तयार यंत्रना विकत घेण्याइतका पैसा उपलब्ध नसेल तेव्हा उपयोगी पडतील अशा अनेक प्रकारच्या घरगुती यंत्रणा वापरात आल्या आहेत. त्यापैकी अगदी सोप्या दोन यंत्रणांचे खाली वर्णन केले आहे. ज्या ठिकाणी हाताने नियंत्रण केले तरी चालू शकते तेथे या यंत्रणाचा वापर करता येतो. मात्र ज्या ठिकाणी पाण्याचा प्रवाह बदलता असेल त्या ठिकाणी स्वयंचलित नियंत्रण करणारी कोणतीही सोपी यंत्रणा मात्र अजून उपलब्ध झालेली नाही.
एका घरगुती साधनामुळे अगदी बरोबर नियंत्रण साधता येते व द्रावणाचा पुरवठाही फार कमी वेगाने करता येतो. या साधनांतसुमारे ४० लिटर (१० गॅलन) धारणक्षमतेच्या बाटलीचा उपयोग केलेला असतो व बाटलीच्या बुचाच्या जागी दोन भोके पाडलेले रबरी बूच बसवलेली असते.
बुचाच्या एका भोकातून एक काचेची नळी घालून तिचे खालील टोक बाटलीच्या तळापासून १० सें.मी. (४ इंच) पेक्षा कमी अंतरावर राहील. अशा रीतीने ती बसलेली असते. नळीच्या वरच्या टोकाला एक छोटी रबरी नळी जोडलेली असून त्याला प्रयोगशाळेतील स्क्रूचा चिमटा बसविलेला असतो. दुसरी काचेची नळी बुचाच्या दुसऱ्या भोकांतून बाटलीच्या नळापर्यत नेलेली असते व या नळीची वरची बाजू ९० अंशाच दोन कोनात वाकविलेली असते व टोकाला रबरी नळी बसविलेली असते. या रबरी नळीचे दुसरे टोक बाटलीच्या तळाच्या पातळीपेक्षा खाली काही इंच अंतरापर्यत नेऊन सोडलेले असते तेथे काचेच्या नळांऐवजी कठीण प्लॅस्टिकच्या नळांचाही वापर करणे शक्य असते. यांचे कार्य खलील तत्वावर चालते.
सरळ काचेच्या नळीच्या वरच्या टोकास असणाऱ्या चिमट्यामुळे बाटलीत येणारी हवा नियंत्रित करता येते. याच नळीचे खालचे टोक ज्या पातळीवर वक्रनलिकेच्या कार्यासाठी मिळणारी निव्वळ वर्चसीय शक्ती नियंत्रित होते. दुसरी काचेची नळी व तिला लावलेली रबरी नळी यांची वक्रनलिका तयार होते. यामुळे निव्वळ वर्चसीय शक्तीतफेरबदल करून किंवा आत येणारी हवा नियंत्रित करून प्रवाह वेगावर नियंत्रण ठेवता येते.
यापैकी हवा नियंत्रित करूनच प्रवाह वेग बदलण्याची पद्धत वापरली जाते कारण प्रत्येक वेळी वर किंवा खाली करणे फारसे सोयीस्कर ठरत नाही. कोणत्याही विशिष्ट पाणी पुरवठ्यासाठी द्रावणाचा जेवढा जास्तीत जास्त प्रवाह वेग लागू शकेल तेवढा प्रवाह वेग येण्यासाठी आवश्यक असणारी वर्चसीय शक्ती उपलब्ध होईल अशारीतीने प्रथम साधनाची जुळणी केली जाते व नंतर आवश्यकतेप्रमाणे नळीवाटे हवा आत सोडून प्रवाह वेगावर नियंत्रण ठेवले जाते.
No comments:
Post a Comment