पाण्यात लोह व मॅगेनीज असेल तर त्यामुळे कपड्यांना व घरातील नळ व्यवस्थेस डाग पडतात व पाण्याचा रंगही बदलतो. (स्वरूपही बदलते) पिण्याच्या पाण्याच्या आंतरराष्ट्रीय कसोट्या या पुस्तकाप्रमाणे पाण्यातील लोहांचे इष्ट प्रमाण जास्तीत जास्त त्रासदायक असल्याने त्याच्या मर्यादा ०.१ भा/दलभा एवढे व कमाल अनुज्ञेय प्रमाण १.० भा/डलभा व ०.५ भा/दलभा एवढया असाव्यात. कापड, रंग, दारू व पांढरा कागद यांच्या कारखान्यासाठी वापरावयाच्या पाण्यात लोह किंवा मॅगेनीज ०.०५ भा/दलभा पेक्षा कमी प्रमाणात असावे.
मातीचा दगड वालुकाश्म किंवा इतर खडकात खोल विहिरी खोदल्या असतील तर त्या विहिरीतील पाण्यात ही खनिजे जास्त प्रमाणात आढळून येतात. कार्बनडायऑक्साईड असणाऱ्या पण ऑक्सिजन नसणाऱ्या भूजलात ही खनिजे विरघळतात कारण येथे अविद्राव्य ऑक्साईड क्षपण होऊन विद्राव्य बायकार्बोनेट संयुगे तयार होतात. लोह व मॅगेनीज असणाऱ्या जमिनी वा खडकावरून पाणी वाहत जलाशयात जात असेल तर त्या जलाशयाच्या खालच्या भागातही अशाच विक्रिया चालू असतात.विहिरीच्या पाण्यात लोह व मॅगेनीज विरघळलेल्या स्वरुपात असल्याने जमिनीतून पंपाने वर ते स्वच्छ असते पण हवेच्या संपर्कात आले की पाण्यातील लोहाचे मॅगेनीज यांचे ऑक्सिकरण होते व या खनिजांचा अविद्राव्य विक्षेप तयार होतो.
लोहयुक्त पाणी असणाऱ्या उथळ विहिरी किंवा जलाशय यांच्यात क्रेनोब्रिक्स व त्या सारख्या लोह जीवाणूमुळे प्रदुषण होण्याची शक्यता असते. या लोह जीवाणूंमुळे जाळ्या चोंदू शकतात. वा वितरणव्यवस्थेत त्यांची वाढ होऊ शकते असे झाल्यास फार त्रासदायक अडचणी उपस्थित होतात. जर पाण्यात सल्फेट असेल तर आणखीनच अवघड परिस्थिती निर्माण होते कारण बंद टोकाच्या नळांमध्ये लोह व सल्फेट संयुगाचे क्षपण होऊन पाण्यास दुर्गंधी येते व नळात काळ्या रंगाच्या सल्फाईडच्या सांका साचून राहतो.
लोह व मॅगेनीज या खनिजांचा विचार करता, वितरण व्यवस्थेत पंपाने सोडले जाणारे पाणी चांगल्या दर्जाचे असावे यासाठी ही खनिजांचा विचार करता, वितरण व्यवस्थेत पंपाने सोडले जाणारे पाणी चांगल्या दर्जाचे असावे यासाठी खनिजांचे निष्कासन करण्याची पद्धती जाते.
ऑक्सिजन नसलेल्या विहिरीच्या पाण्यातील लोह व मॅगेनीज यांचे निष्कासन करण्याच्या प्रक्रियेस पुरेसा पैसा उपलब्ध नसेल तर वितरणव्यवस्थेतून पाणी वाहत असता लोह व मॅगेनीज यांचा अविद्राव्य विक्षेप प्रतिबंधक सोडियम हेक्झानेटॉफास्फेट वापरले जाते. पाण्यातील लोह व मॅगेनीज यांच्या प्रमाणापेक्षा दुप्पट किंवा दोहोपैकी कोणतेही एक प्रमाणात हे रसायन पाण्यात मिसळावे लागते. तथापि लोह व मॅगेनीज थोडया प्रमाणात असतानाच घ्या पद्धतीचा अवलंब करावा अन्यथा खनिजांमुळे धुण्यामध्ये कपड्यांना डाग पडतात.
No comments:
Post a Comment