Sunday, September 7, 2025

रात्र वै-याची - जागे रहा

बुद्धीमत्तेची देवता असणा-या श्री गणेशाचे भारतातील गणेश चतुर्थीला आगमन झाल्याने सर्वत्र आनंदाचे व उत्साहाचे वातावरण आहे. मात्र याचवेळी   टेरिफ   आणि कृत्रिम बुद्धीमत्तेच्या यंत्रमानवांचे आक्रमण दोहोंचा भारतीय अर्थव्यवस्थेवर आणि रोजगार क्षमतेवर पडणा-या भावी परिमाणांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

सण, समारंभ, मेळावे, सांस्कृतिक कार्यक्रम यांची रेलचेल गणेशोत्सवात होत असली तरी यावेळी जागरूक राहून  या अरिष्टाशी धैर्याने सामना करण्यासाठी अहोरात्र धडपड, खर्चात काटकसर  आणि नवसंशोधन व शिक्षण याची कास धरली पाहिजे. तरच हा गणेशोत्सव आपणास समृद्धीकडे नेईल.

ज्ञानदीप इन्फोटेक प्रा. लि. आणि ज्ञानदीप फौंडेशन या दोन्ही संस्था गेली वीस पंचवीस  वर्षे  शिक्षण व सॉफ्टवेअर क्षेत्रात    कार्य करीत असूनही आर्थिकदृष्ट्या कमकुवत का राहिल्या आणि याच काळात नव्याने उदयास आलेल्या पैशाचे भक्कम पाठबळ असणा-या संस्था अल्पावधीत सुस्थिर, मोठ्या व फायदेशीर कशा बनल्या याची कारणे शोधताना व्यावसायिक शिस्तीचा अभाव आणि माझी शिक्षकी मनोवृत्ती आणि उद्योगातील भांडवलाचे महत्व याबाबतचे अज्ञान यांचाी मला जाणीव झाली.




No comments:

Post a Comment