सध्याच्या इंटरनेट युगात प्रत्येक संस्थेची स्वत:ची वेबसाईट असणे ही एक आवश्यक गोष्ट बनली आहे. वेबसाईट डिझाईन हे एक नव्याने उदयास आलेले व सतत बदलणारे तंत्रज्ञान आहे. गेली चोवीस वर्षे वेबडिझाईन क्षेत्रात कार्य करीत असलेल्या ज्ञानदीप इन्फोटेक प्रा. लि. या सांगलीतील सॉफ्टवेअर कंपनीने शाळा, कॉलेज व इतर अनेक संस्थांच्या वेबसाईट डिझाईन केल्या असून वेबडिझाईनचे प्रशिक्षणही या संस्थेतर्फे दिले जाते.
वेबसाईट तयार झाली तरी त्यात नियमितपणे नवी माहिती घालणे आवश्यक असते. या कामासाठी वेबडिझाईन प्रशिक्षित व्यक्तीची गरज भासते. संस्थांकडे अशा व्यक्ती उपलब्ध नसल्याने वेबसाईटचे नूतनीकरण करण्याचे कामही ज्ञानदीप इन्फोटेक कंपनीकडून केले जाते. मात्र यासाठी वेबसाईट व्यवस्थापनासाठी जबाबदारी निश्चित न केल्याने, नवी माहिती संकलित करणे व नियमितपणे वेबसाईटवरील माहितीचे नूतनीकरण करणे राहून जाते. परिणामी अनेक वेबसाईटवरील माहिती जुनी व कालबाह्य राहते. साहजिकच वेबसाईटचा मुख्य उद्देश सफल होत नाही.
या परिस्थितीचा विचार करून ज्ञानदीप एज्युकेशन अँड रिसर्च फौंडेशनने वेबडिझाईन व त्याचे नूतनीकरण यांचे दूरस्थ पद्धतीने प्रशिक्षण देण्याची एक अभिनव योजना सुरू केली आहे. सहा महिन्याच्या या कोर्सची फी १२००० रुपये असून अभ्यासाचे साहित्य प्रत्येक प्रशिक्षणार्थीस एका स्वतंत्र सबडोमेनवर टप्प्याटप्प्याने दिले जाईल. प्रत्येक धड्यावरील प्रश्नांची योग्य उत्तरे आल्यानंतरच पुढील धड्याचे साहित्य पाठविले जाईल. अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर एका वेबसाईटचे पूर्ण डिझाईन प्रशिक्षणार्थीकडून करवून घेतले जाईल. प्रत्येक कोर्स यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यावर ज्ञानदीप एज्युकेशन अँड रिसर्च फौंडेशनतर्फे ‘वेबमास्टर’ सर्टिफिकेट देण्यात येईल. शाळा, कॉलेज वा इतर उद्योग व संस्थांत काम करणार्या व्यक्तींना आपली नोकरी सांभाळून घरबसल्या आपल्या फावल्या वेळेत हा कोर्स पूर्ण करता येईल. हा कोर्स पूर्ण झाल्यावर आपल्या संस्थेची साधी (स्टॅटिक) वेबसाईट डिझाईन करणे व त्यातील माहिती अद्ययावत करणे या गोष्टी प्रशिक्षित व्यक्तीस करता येतील एवढेच नव्हे तर इतर संस्थांच्या वेबसाईट डिझाईन करून त्याला अर्थार्जन करता येईल.
कोर्सबद्दल अधिक माहितीसाठी इमेलने info@dnyandeep.net या पत्त्यावर संपर्क साधावा.

No comments:
Post a Comment