Thursday, August 14, 2025

डॉल्फिन लॅब्सचे इलेक्ट्रॉनिक सर्किट किट - भाग - १

 ज्ञानदीप फौंडेशनने आपल्या अटल ज्ञानदीप प्रशिक्षण संचात पुण्यातील डॉल्फिन लॅब्सने विकसित केलेल्या  इलेक्ट्रॉनिक सर्किट किट व रोबोटिक किट याचा समावेश केला आहे.

आज इंटरनेट व बाजारात अनेक प्रकारचे आकर्षक चायनीज मेड इलेक्ट्रॉनिक व रोबोटिक किट अत्यंत कमी खर्चात उपलब्ध आहेत. मात्र  कोणतेही पूर्वशिक्षण नसताना इलेक्ट्रॉनिक्स व रोबोटिक तंत्रज्ञानाची शैक्षणिक माहिती सहज समजेल व प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांनाही  प्रत्यक्ष प्रयोग करून पाहता येतील व या विषयाची गोडी लागेल असे अभिनव डिझाईन डॉल्फिन लॅब्सच्या किटमध्ये आहे. डॉल्फिन लॅब्सचे संचालक प्रा. चित्तरंजन महाजन यांनी  बारा वर्षांच्या संशोधन व प्रशिक्षण अनुभवातून या किटची निर्मिती केली आहे.

इलेक्ट्रॉनिक सर्किट किट-


वरचा थर 

आपण इलेक्ट्रॉनिक किटची बॉक्स उघडली की वरच्या थरात खालील वस्तू दिसतात  जंक्शन बॉक्स, स्क्रू ड्रायव्हर, बॅटरी , आणि मातीतील ओलावा सेन्सॉर 

खालचा थर



जंक्शन बॉक्स बोर्ड 

बोर्डची रचना

बॅटरी स्नॅपर व कपॅसिटर आणि एक्स्टेन्शन फिटींगनंतरचा तयार जंक्शन बोर्ड

इलेक्ट्रॉनिक्स विषय शिकण्यासाठी साधारणपणे ब्रेडबोर्ड, वायर व कॉम्पोनंट यांचा वापर करून सर्किट तयार केले जाते मात्र यासाठी कॉम्पोनंटची माहिती असावी लागते व  प्रत्यक्ष जोडणी करताना बारीक ब्रेडबोर्डच्या छिद्रांमध्ये  कॉम्पोनंट तारांची टोके योग्यप्रकारे घालणे अवघड जाते. यावर उपाय म्हणून डॉल्फिन लॅब्सने इलेक्ट्रॉनिक्स सर्किटमध्ये असणा-या रेझिस्टर, कपॅसिटर, ट्रॅन्झिस्टर व आयसी चिप या महत्वाच्या कॉम्पोनंट जोडलेल्या स्थितीत असणारा एक जंक्शन बॉक्स बोर्ड तयार केला आहे. आणि हे या किटचे महत्वाचे वैशिष्ठ्य आहे. शिवाय कॉम्पोनंटचा प्रकार व मूल्य माहित नसतानाही योग्य सर्किट जोडता यावे यासाठी दोन्ही टोकांना नावे दिली आहेत. एलईडीची + आणि - टोके लाल आणि काळ्या वायरीला जोडली असल्यामुळे चूक होत नाही. स्पीकर तसेच सेन्सॉर घट्ट जोडण्यासाठी विशेष स्क्रूची व्यवस्था केली आहे.












No comments:

Post a Comment