Tuesday, February 27, 2024

भारतातील छोट्या व्यावसायिकांसाठी वेबसाईट आवश्यक


 इंटरनेटच्या वाढत्या प्रसाराबरोबर अनेक परदेशी कंपन्या वेबसाईटच्या माध्यमातून येथील बाजारपेठ काबीज करीत आहेत. जागतिकीकरणाच्या या लाटेचा अमेरिका, चीन, सिंगापूर, कोरिया या देशांनी फायदा घेतला असून आपला माल येथील ग्राहकांना विकण्यात ते यशस्वी झाले आहेत व त्याचा येथील उद्योगांवर विपरीत परिणाम होत आहे. दूरदर्शन, वृत्तपत्रे, मोबाईल  व इतर प्रसारमाध्यमे यावर जाहिराती देऊन येथील बाजारपेठ काबीज करण्यात ते यशस्वी झाले आहेत.

आज भारतात  प्रत्येक प्रौढ व्यक्तीच्या हातात मोबाईल असून परदेशी कंपन्यांच्या आकर्षक जाहिराती, वस्तू खरेदीच्या ऑनलाईन सुविधेमुळे ग्राहक स्थानिक दुकानांपेक्षा वेबसाईटवरून खरेदी करीत आहेत

 भारतीय वस्तूना बाजारपेठ मिळावी यासाठी परदेशी कंपन्यांवर शासकीय बंधने घालून हा प्रश्न सुटणार नाही. तर येथील उद्योगांनीही इंटरनेटच्या माध्यमातून आपली जाहिरात केवळ येथील ग्राहकांसाटी नव्हे तर जगभरातील ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न सुरू केले पाहिजेत.

आपण आपल्या व्यवसायाची / उद्योगाची वेबसाईट तयार केल्यास परदेशी कंपन्यांच्या येथील आक्रमणास यशस्वीपणे तोंड देऊ शकाल. एवढेच नव्हे तर आपल्या मालाची परदेशात निर्यात करू शकाल. रंगीत आकर्षक माहिती पत्रके, दरपत्रक वा मॅन्युअल छापण्यास व ती ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यास बराच खर्च येतो. ही सर्व माहिती आपल्या वेबसाईटवर टेवल्यास कोणासही व कोठेही पाहता येते वा छापून घेता येते. यामुळे छपाईचा वा पोस्टेजचा खर्च वाचतो. याशिवाय वेबसाईटवर फोटो, ध्वनी वा चित्रफिती अथवा संदर्भ साहित्य ठेवता येत असल्याने ग्राहकास उद्योग, उत्पादन व सेवा यांचे प्रत्यक्ष भेटीसारखे सर्वार्थाने ज्ञान होऊ शकते.

वेबसाईटवरूनच संपर्क साधण्याची व अधिक माहिती, शंका वा मागणी नोंदविण्याची सोय असल्याने ग्राहकास ते फार सोयीचे ठरते. क्रेडिट कार्डसारखी व्यवस्था असल्यास वेबसाईटवरूनच जागतिक स्तरावर खरेदी विक्रीचे व्यवहार होऊ शकतात. 

ज्ञानदीप इन्फोटेक या सांगलीतील कंपनीने गेल्या वीस वर्षात अनेक वेबसाईट आमि मोबाईल एप विकसित केले असून अत्यंत माफक दरात छोट्या व्यवसायांसाठी वेबसाईटची योजना ज्ञानदीपने जाहीर केली आहे.


याशिवाय मोठ्या उद्योगातील अधिकारी व्यक्तींना वेबसाईट डिझाईन वा वेबसाईटवरील माहिती अद्ययावत करण्याचे ऑनलाईन शिक्षण देण्याची सोय केली आहे.

विद्यार्थ्यांना हे तंत्रज्ञान मराठीतून  शिकविण्यासाठी    वेगळ्या ऑनलाईन पोर्टलची व्यवस्था करण्यात आली आहे. 

सर्वांनी याचा अवश्य फायदा घ्यावा. ही विनंती.

संपर्क - ज्ञानदीप, 18 शिल्प चिंतामणी सोसायटी, विजयनगर, सांगली 

फोन -  +91 9422410520 इमेल - info@dnyandeep.com

No comments:

Post a Comment