
येथे सर्व शब्द एकाच ओळीत आलेले दिसतात. याचे कारण की ओळ बदलण्यासाठी लागणारा BR टॅग आपण दिला नव्हता.
secondpage.htm
आता नोटपॅडमध्ये खाली दाखविल्याप्रमाणे टाईप करा.

दुसरे पान secondpage.htm या नावाने सेव्ह करा.

या वेबपेजमध्ये h1 ते h6 म्हणजे (h1,h2,h3,h4,h5,h6) या हेडींग (शीर्षक)टॅग चे उदाहरण दाखविले आहे. जरी h1 व h6 हे दोनच टॅग प्रत्यक्ष दाखविले असले तरी इतर टॅग वापरुन काय बदल होतो ते पहा. तसेच ठळक (b), तिरके (i) व अधोरेखित (u) शब्द कसे लिहायचे ते दाखविले आहे. येथेही br टॅग वापरला व न वापरला तर काय होते ते दाखविले आहे. b, i, u हे टॅग एकानंतर एक असे लिहिले तर ठळक तिरके, ठळक अधोरेखित वा ठळक तिरके अधोरेखित असे शब्द लिहिता येतात. प्रोग्रॅम मध्ये वरिलप्रमाणे निरनिराले बदल करून पहा.
आता तुम्हाला कोणताही मजकूर वा पत्र हव्या त्या प्रकारे वेबपेजमध्ये दाखविता येईल.
No comments:
Post a Comment