Monday, March 18, 2024

मुंबई पर्यावरण व संतुलित विकास

 ज्ञानदीपच्या मुंबई शाखेतर्फे ७ एप्रिल २०२४ रोजी नियोजित चर्चासत्र -

मुंबई पर्यावरण व संतुलित विकास

मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी. वेबसाईट व मोबाईल अॅपसाठी मराठी भाषेचा आवर्जून उपयोग करणा-या ज्ञानदीप फौंडेशनचे मुंबईत शाखा सुरू करण्याचे स्वप्न मुंबईचे निवृत्त मुख्य अभियंता श्री. सु. ना. पाटणकर यानी पूर्ण केले आहे. त्यांच्या मुलुंड येथील निवासस्थानी ज्ञानदीप फौंडेशनची मुंबई शाखा १५ ऑगस्ट २०२३ रोजी सुरू झाली.

मुंबई चे पर्यावरण, विकास तसेच सामाजिक व सांस्कृतिक कार्याची स्थानिक जनतेला माहिती व्हावी या उद्देशाने ज्ञानदीपने माय मुंबई डॉट नेट (https://mymumbai.net)या नावाची वेबसाईट सुरू केली आहे. त्याचे औपचारिक उदघाटन ७ एप्रिल २०२४ रोजी करण्यात येणार असून मुंबईचे पर्यावरण व संतुलित विकास या विषयावर तज्ज्ञांची व्याख्याने व मराठीतून नेटद्वारे प्रशिक्षण या संबंधी चर्चासत्र आयोजित करण्यात येत आहे.

श्री सुरेश ना. पाटणकर यानी इंडियन वाटर वर्क्स असोसिएशनच्या स्थापनेत महत्वाची भूमिका बजावली होती संस्थेला मुंबई महापालिकेत ऑफिससाठी जागा त्यांच्याच प्रयत्नातून उपलब्ध झाली. या संस्थेची पहिली वेबसाईट 2004 साली ज्ञानदीप इन्फोटेकला मिळण्यासही त्यानी पुढाकार घेतला. 2021 साली ही वेबसाईट उत्तरप्रदेशातील कंपनीकडे हस्तांतरित करण्यात आली. भारतीय भाषांतून या संस्थेच्या कार्याची प्रसारित करण्याची ज्ञानदीपची कल्पना फलद्रूप होऊ शकली नाही. या संस्थेच्या 2021च्या अधिवेशनात श्री. पाटणकर यांनी ज्ञानदीपसाठी आपल्या निवासस्थानी मोफत ऑफिस सुरू करण्याची सूचना मांडली. त्यातूनच मुंबई शाखेची निर्मिती झाली.श्री. पाटणकर यांनी 'करू या पर्यावरणाचा विविधांगी विचार' नावाचे पुस्तक मराठी विज्ञान परिषदेमार्फत प्रसिद्ध केले असून निवृत्तीनंतरही त्यांचे सामाजिक, सांस्कृतिक आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील कार्य सर्वानाच आदर्शवत आहे.

सकाळचे सत्र पर्यावरण तंत्रज्ञान व विकास या साठी तर दुपारचे सत्र मायमुंबई वेबसाईटच्या माध्यमातून जनजागृती व प्रशिक्षण यासाठी नियोजित केले असून  मुंबई शाखेच्या पुढील प्रगतीसाठी हे चर्चासत्र मार्गदर्शक ठरणार आहे.

या चर्चासत्रात सहभागी होण्यासाठी प्रतिव्यक्ती एक हजार रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. सदरचे चर्चासत्र श्री. सु. ना. पाटणकर यांनी आपल्या हॉलमध्ये घेण्यास अनुमती दिली आहे. सर्वसाधारणपणे पन्नास प्रतिनिधी येण्याचा अंदाजअसून प्रत्यक्ष नोंदणी नंतर कार्यक्रमाचे स्थळ व रूपरेषा ठरविण्यात येईल.

मराठी विज्ञान परिषद, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, इंडियन वाटर वर्क्स असोसिएशन, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण तसेच इतर पर्यावरण आणि मराठी शिक्षणक्षेत्रात कार्य करणा-या संस्थांनी आपले प्रतिनिधी पाठविले चर्चासत्राचे प्रायोजकत्व स्वीकारले तर ज्ञानदीपच्या मुंबई शाखेचे हे पहिलेच सेमिनार यशस्वी ठरेल आणि ज्ञानदीपच्या इतर अनेक त्रानप्रसार योजनेस बळ मिळेल असा मला विश्वास वाटतो.
संपर्क - ज्ञानदीप मुंबई शाखा
द्वारका, पुष्पधन्वा सोसायटी, पं. मालवीय रोड, मुलुंड ( पश्चिम)
मुंबई - 022-2567 9245
भ्रमणध्वनी - 9322272777
 - डॉ. सु. वि. रानडे, ज्ञानदीप, सांगली
इ मेल - info@dnyandeep.net / +818422310520

No comments:

Post a Comment