Tuesday, January 16, 2024

ज्ञानदीपच्या सहकार्याने आपल्या गावाची वेबसाईट बनवून आयटी व्यावसायिक बना.

 ज्ञानदीप इन्फोटेक प्रा. लि. या वेबडिझाईन कंपनीने इ.स. २००० पासून मराठीमाध्यमास आपल्या वेबसाईट, सॉफ्टवेअर व मोबाईल सुविधांमध्ये महत्वाचे स्थान दिले आहे तसेच मायमराठी व संस्कृतदीपिका या वेबसाईट स्वखर्चाने तयार केल्या आहेत. 


महाराष्ट्रात आज बहुतेक शहरांच्या वेबसाईट इंग्रजीत असून सर्वसामान्य जनतेला त्याचा काही फायदा होत नाही. प्रसिद्ध मराठी वृत्तपत्रांच्या वेबसाईटवर गुगलसारख्या आंतरराष्ट्रीय कंपन्या आपल्या जाहिराती देत असल्याने स्थानिक उद्योग व व्यावसायिकांना आपल्या वस्तू वा सेवा यांची जाहिरात या माध्यमातून करता येत नाही.


ज्ञानदीपने  मायसांगली, मायकोल्हापूर या शहरांच्या वेबसाईट तयार करून त्यात शहरांचा इतिहास, भूगोल, नकाशे तसेच जिल्ह्यातील प्रेक्षणीय स्थळे व इतर माहिती दिली असून त्यावर स्थानिक जाहिरातींसाठी सुविधा उपलब्ध करून दिली आहे.



याच धर्तीवर  जुळेवाडी ह्या छोट्या खेडेगावाची वेबसाईट ज्ञानदीपने नमुन्यादाखल तयार केली असून सर्व गावांच्या मराठीतून वेबसाईट तयार करण्याचे भव्य महत्वाकांक्षी उद्दिष्ट आपल्यासमोर ठेवले आहे.

अशा वेबसाईटवर जाहिराती मिळवून व्यवसाय करण्याची मोठी संधी डिजिटल मार्केटिंगच्या क्षेत्रातील विद्यार्थ्यांना उपलब्ध झाली असून त्याचा संबंधितांनी फायदा घ्यावा. 


आयटी क्षेत्रात आणि महाराष्ट्रात सध्या मराठीची होत असलेली उपेक्षा लक्षात घेऊन सर्वांनी ज्ञानदीपच्या या कार्यात सहभागी व्हावे आणि ज्ञानदीपच्या मार्गदर्शनाखाली वेबडिझाईन शिकून या नव्या क्षेत्रात आपल्या शहराचे वा गावाचे नेतृत्व करण्याची संधी घ्यावी.

अधिक माहितीसाठी ज्ञानदीपशी संपर्क साधावा.  info@dnyandeep.com / +919422410520

No comments:

Post a Comment