आता वेबपेजविषयी माहिती (metadata) देण्यासाठी मेटा टॅगचा कसा वापर करतात ते खालील उदाहरणावरून स्पष्ट होईल.

REFRESH
ब्राउजरला वेबपेज उघडण्यास वेळ लागत असेल तर आपण रिफ्रेश बटन दाबून पुनः पेज लोड करतो. हे कार्य १० सेकंदानी आपोआप व्हावे यासाठी खालील मेटाटॅग वापरतात.
meta http-equiv="refresh" content="5; url=http://www.dnyandeep.net"
ताज्या बातम्या, शेअरचे भाव इत्यादी सतत बदलती माहिती वेबपेजवर लोड केली जात असेल तरी नवी माहिती लगेच दिसण्यासाठी या टॅगचा वापर करून पेज रिफ्रेश केले जाते.
REDIRECT
काही वेळा वेबसाईट वा वेबपेजचे नाव व जागा बदलली असल्यास जुन्या वेबपेजवर जाणार्या ग्राहकाला वेबपेज दिसत नाही. अशावेळी या वेबपेजवरून नव्या वेबपेज वा वेबसाईटकडे ग्राहकाला रिडायरेक्ट करण्यासाठी (आपोआप नेण्यासाठी) वरीलप्रमाणेच रिफ्रेश मेटाटॅग वापरतात. मात्र वेबपेजचे नाव वेगळे नवे देतात.
meta http-equiv="refresh" content="5; url=http://www.mymarathi.com"
याचा अर्थ ब्राउजरने ५ सेकंदानी http://www.mymarathi.com हे नवे वेबपेज उघडावे.
NOINDEX
काहीवेळा शोधयंत्राने हे पान शोधू नये असे आपणास वाटत असेल तर meta name="ROBOTS" CONTENT="NOINDEX" असा मेटा टॅग वापरावा.
आपण इतरही काही माहिती मेटा टॅगने देऊ शकता मात्र त्याची दखल शोधयंत्राद्वारे घेतली जात नाही.
No comments:
Post a Comment