समजा आपले कॉम्प्युटर पार्ट चे दुकान आहे व आपल्याला इंटरनेटवरून त्याच्या विक्रीसाठी वेबसाईट करावयाची आहे. html form व पीएचपीच्या साहाय़्य़ाने अशी वेबसाईट आपल्याला करता येईल.
.
यासाठी प्रथम फॉर्म भरण्यासाठी order.html हे वेबपेज करावे. यात मराठी युनिकोड अक्षरे लिहिता यावीत यासाठी मेटा टॅगमध्ये UTF-8 चा उल्लेख केला आहे.खालील प्रोग्रॅम पहा.

हे पेज स्क्रीनवर खालीलप्रमाणे दिसेल.

फॉर्ममध्ये भरलेली माहिती name,email,item आणि quantity फॉर्मवरून सर्व्हरकडे पोस्ट झाली की ती पीएचपी च्या $_POST या व्हेरिएबलमध्ये तात्पुरती साठविली जाते. process.php मध्ये $name, $email,$item व $quantity या व्हेरिएबलमध्ये साठविली जाते.
$name=$_POST['name'];
$email=$_POST['email']
$quantity = $_POST['quantity'];
$item = $_POST['item'];

वरील पीएचपी प्रोग्रॅम खालीलप्रमाणे युजरकडे प्रतिसाद पाठवेल.

वरील उदाहरणात form साठी order.html आणि व php process साठी process.php या दोन प्रोग्रॅम वापरले आहेत.
आता याप्रमाणे आपण कोणत्याही प्रकारचा फॉर्म डिझाईन करून युजरची माहिती पीएचपी प्रोग्रॅमच्या साहाय्याने मिळवू शकाल.
No comments:
Post a Comment