Thursday, October 14, 2010

वेबसाईट टेबल टॅग्स

वेबपेजवर टेबलचा वापर करून माहिती वा चित्रे घातली तर ती व्यवस्थित दिसण्यासाठी टेबलमधील attributesचा योग्य वापर करणे आवश्यक असते. टेबलमधील प्रत्येक आडवी ऒळ(tr) व उभा रकाना (td) यामुळे जो कप्पा किंवा सेल (cell) तयार होतो त्यासाठी cellpadding व cellspacing हे दोन महत्वाचे attributes आहेत.cellpadding हे सेलच्या आतल्या बाजूस मजकूर वा चित्राच्या भोवताली ठेवायची मोकळी जागा दर्शविते. तर cellspacing हे टेबल व सेल किंवा दोन सेलमधील मोकळी जागा दर्शविते. खालील उदाहरणात ४०० पिक्सेल रुंदीचे व २ पिक्सेल जाडीच्या बॉर्डरचे टेबल करण्यासाठी खालील कोड वापरले आहे. ( < व > या खुणा वगळल्या आहेत.)

table width="400" border="2" cellpadding="10" cellspacing="20" bgcolor="#003366"

येथे cellspacing वेगळे कळण्यासाठी table या टॅगला निळा रंग bgcolor="#003366" दिला आहे. cellpadding वेगळे कळण्यासाठी tr व td साठी तपकिरी रंग (bgcolor="#993300") वापरला आहे व
या सेलमध्ये वेबसाईटचे छोटे चित्र दाखविण्यासाठी खालीलप्रमाणे img टॅगला attributes दिले आहेत. ( < व > या खुणा वगळल्या आहेत.)

img src="debonair.jpg" width="150" height="100" alt="Debonair equipments" longdesc="http://www.debonairequipments.com"

खालील वेबपेजवरून आपल्याला सेल पॅडींग ( तपकिरी १० पिक्सेल रुंदी) व सेल स्पेसिंग (निळे २० पिक्सेल रुंदी) यातील फरक समजून येईल.

सेल पॅडींग नसेल तर मजकूर सेलबॉर्डरला चिकटून दिसतो. म्हणून सेल पॅडींगचा उपयोग लिखित मजकुराला मार्जिन देण्यासाठी केला जातो. तसेच चित्रासाठी हव्या त्या प्रकारची बॉर्डर दाखविण्यासाठी त्याचा उअपयोग होतो. सेल स्पेसिंगचा वापर बहुदा केला जात नाही. अर्थात त्याचा वापर करून खाली दाखविल्य़ाप्रमाणे चित्रांना उठावदारपणा येण्यासाठी योग्य बॅकग्राउंड देता येते.

No comments:

Post a Comment