व्ह्यू (Views)
व्ह्यू म्हणजे साधे वेबपेज किंवा वेबपेजचा एखादा भाग, उदा. हेडर किंवा बॅनर, मेनू वा तळटीप. हे व्ह्यूज पाहिजे त्याप्रकारे दुसर्या व्ह्यूत समाविष्ट करता येतात. व्ह्यू हे स्वतंत्रपणे कार्यान्वित करता येत नाहीत. कंट्रोलरमार्फत त्यांचे संचालन होते. येथे कंट्रोलरचे काम एखाद्या ट्रॅफिक पोलिसासारखे असते. कोणता व्ह्यू दाखवायचा व कोणता नाही ते कंट्रोलर ठरवितो.
व्ह्यू तयार करणे
blogview.php हा व्ह्यू तयार करण्यासाठी खालील प्रोग्रॅम लिहावा.
(येथे html टॅगसाठी * हे चिन्ह वापरले आहे.)
*html*
*head*
*title* ज्ञानदीप ब्लॉग*/title*
*/head*
*body*
*h1*माझ्या ज्ञानदीप ब्लॉगवर आपले स्वागत आहे!*/h1*
*/body*
*/html*
आता ही फाईल कोड इग्नायटरच्या application/views/ या फोल्डरमध्ये सेव्ह करावी.
मागच्या धड्यातील उदाहरणात ज्याप्रमाणे blog.php फाईल कंट्रोलरच्या साहाय्याने प्रकाशित केली होती त्याप्रमाणे blogview.php फाईल खालील क्लासद्वारे प्रकाशित करता येईल.
class Blog extends CI_Controller {
function index()
{
$this->load->view('blogview');
}
}
ब्राउजरमध्ये ती पाहण्यासाठी मागच्या उदाहरणाप्रमाणे
example.com/index.php/blogview/
अशी लिंक वापरावी लागेल.
एका वेबपेजचे अनेक सुटे भाग एकत्र जोडून वेबपेज (class Page ) करण्यासाठी खालीलप्रमाणे प्रोग्रॅम लिहिता येतो.
class Page extends CI_Controller {
function index()
{
$data['page_title'] = 'Your title';
$this->load->view('header');
$this->load->view('menu');
$this->load->view('content', $data);
$this->load->view('footer');
}
}
वरील उदाहरणात Page नावाचा क्लास तयार करून त्यात वेबपेजचे शीर्षक, हेडर, मेनू, $data या माहितीसंचातून घेतलेला मजकूर व तळटीप हे व्ह्यू एकत्र जोडता येतात.
No comments:
Post a Comment