Thursday, October 7, 2010

साध्या वेबसाईटचे डिझाईन भाग - १

(संकेतस्थळ हा मराठी शब्द वेबसाईटसाठी समर्पक असला तरी वेबसाईट हा शब्द सर्वांच्या परिचयाचा आहे. अजून इंटरनेटसाठी इंग्रजीचा वापर करावा लागत असल्याने तांत्रिक बाबी नीट समजाव्यात या दृष्टीने इंग्रजी नावांचा वापर केला आहे.)

वेबसाईटची रचना -
वेबसाईटची रचना नेहमीच्या पुस्तकापेक्षा वेगळ्या पद्धतीची असते. पुस्तकात सर्वप्रथम अनुक्रमणिका असते व त्याचा वापर करून आपण कोणतेही प्रकरण पाहू शकतो. पुस्तकातील सर्व पानांना ओळीने सलग क्रमांक दिलेले असतात त्यामुळे आपण कोणत्याही पानावर सहज जाऊ शकतो. कॉम्युटरच्या स्क्रीनवर एकच पान एकावेळी पाहता येत असल्याने प्रत्येक पानावर अनुक्रमणिका ठेवावी लागते. यालाच नेव्हीगेशन मेनू म्हणतात. या मेनूतील कोणत्याही विषयाची माहिती पाहता यावी यासाठी तेथील नावाला संबंधित माहितीच्या पानाची ( वेबपेजची) लिंक दिलेली असते. असते. वेबसाईटवरील लिंक माहितीशी निगडित असल्याने पुस्तकातील पान क्रमांकापेक्षा अधिक उपयुक्त असते.त्यामुळे कोणतीही माहिती संबंधित शब्दावरील एका माउसक्लिकने पाहणे शक्य होते. वेबसाईट आपण इंटरनेट एक्स्प्लोअरर (Internet Explorer ), फायरफॉक्स (Fire Fox), गुगल क्रोम (Google Chrome) यासारख्या ब्राउजरमध्ये पाहू शकतो.

एचटीएमएल (HTML)
वेबसाईटचे डिझाईन करण्यासाठी एचटीएमएल (HTML) ही लिखाणाची पद्धत वापरली जाते. या भाषेचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक मजकूर वा माहितीचा घटक दोन विशिष्ठ खुणांचा वापर करून लिहिला जातो. याला टॅग (TAG) म्हणतात. उदाहरणार्थ पॅरेग्राफ दर्शविण्यासाठी P हे अक्षर < > या दोन चिन्हांमध्ये लिहिले की तो एक सुरुवातीचा टॅग झाला. हा टॅग संपल्याचे दर्शविण्यासाठी / असे चिन्ह वापरले जाते.

म्हणजे एका पॅरेग्राफमधील मजकूर
(सुरुवातीचा टॅग) व (शेवटचा टॅग)
या टॅगमध्ये खालीलप्रमाणे लिहावा लागतो.

एका पॅरेग्राफमधील मजकूर एका पॅरेग्राफमधील मजकूर एका पॅरेग्राफमधील मजकूर एका पॅरेग्राफमधील मजकूर एका पॅरेग्राफमधील मजकूर एका पॅरेग्राफमधील मजकूर एका पॅरेग्राफमधील मजकूर


तसेच विषयासंबंधीत माहितीच्या पानाचा संदर्भ देण्यासाठी लिंक(LINK) चा वापर केला जातो. यामुळेच या भाषेला एचटीएमएल (HTML - Hyper Text Markup Language) म्हणजे लिंक असलेल्या मजकुराची भाषा असे म्हटले जाते.

शरिराचे जसे डोके व धड असे भाग असतात त्याप्रमाणेच एचटीएमएलचे हेड(HEAD) व बॉडी(BODY) असे दोन भाग असतात. म्हणजे कोणताही मजकूर नसला तरी रिकामे HTML पेज खालीलप्रमाणे लिहावे लागते.

ब्राउजरला वेबपेज कळावे यासाठी या डॉक्युमेंटच्या नावास .html किंवा .htm असा जोड द्यावा लागतो.

HEAD विभागात वेबपेजविषयी व त्यातील मजकुराविषयी माहिती असते. उदाहरणार्थ मजकुराचे शीर्षक लिहिण्यासाठी TITLE हा टॅग वापरतात. मजकुराच्या लेखकाचे नाव लिहिण्यासाठी AUTHOR हा टॅग वापरतात. अशाच प्रकारची मजकुराविषयी माहिती लिहिण्यासाठी META टॅग वापरतात.

असे वेबपेज आपल्याला साध्या नोटपॅड(Notepad)मध्ये करता येते.ते कसे करायचे ते आता पाहू.

My First Webpage

नोटपॅड उघडून त्यात खालील मजकूर टाईप करा.


वरील फाईल firstpage.html या नावाने सेव्ह करा. सेव्ह करताना फाईल टाईप दाखविणार्‍या रकान्यातील txt या ऎवजी All Files असा पर्याय निवडा.

आता आपल्या कॉम्प्युटरवरील कोणताही ब्राउजर उघडा. वरच्या डाव्या कोपर्‍यातील File मधील Open मेनूवर क्लिक करा. ब्राउज करून आपली फाईल लोड करा व उघडा.

तुम्हाला वेबपेजमध्ये Web design is very easy. I wish to design website myself. Thanks to Dnyandeep Foundation. असा मजकूर दिसेल. व My First Webpage हे शीर्षक वरच्या कोपर्‍यात दिसेल.

तुम्ही पहिले वेबपेज स्वतः तयार करण्यात यशस्वी झालात. अभिनंदन ! आता यापुढील ब्लॉगमध्ये दुसरे अधिक माहितीचे व नवे टॅग असलेले वेबपेज कसे तयार करायचे ते शिकूया.

3 comments:

  1. Sir Chan mahiti aahe. mala sudha upyaogi Tharel..

    Thanks A loat

    Nandkumar

    ReplyDelete
  2. माझा पहिला लेसन उत्‍कृष्‍ट झाला आहे. श्री रानडे सरांना धन्‍यवाद. आपल्‍यामुळे माझे वेबसाईट डिझाईनिंगचे स्‍वप्‍न पूर्ण होऊ शकते असे वाटते.

    ReplyDelete