Friday, September 10, 2010

फुकट श्रीमंत करणार्‍या स्पॅममेलची शोधकथा

नवीन उद्योजकांना भांडवलाची गरज असते. परदेशातून भांडवल देणार्‍या बिझिनेस प्रपोजलची मेल वाचली की त्यामागे ते धावतात. परदेशी श्रीमंत लोक नव्या उद्योगासाठी विनातारण पैसा पुरवितात. आंतरराष्ट्रीय बॅंकात वारस नसलेल्या मृत व्यक्तींच्या नावे खूप काळा पैसा पडून आहे. जपानी बॅंक कोणत्याही प्रकल्पाला अत्यंत कमी दरात प्रचंड भांडवल पुरविते अशा बातम्या आपण ऎकलेल्या असतात. या परिस्थितीचा फायदा घेऊनबॅंकेच्या मुख्य अधिकार्‍याच्या नावाने सर्व तांत्रिक बाबींची माहिती देणारी मेल पाठवून अशा संपत्तीचा वारसदार करण्याचे आमिष दाखविले जाते. नंतर कायदेशीर बाबींची पूर्तता करण्यासाठी पैसे मागविले जातात. हे सर्व गोपनीय रहावे म्हणून वेगळा इमेल वापरल्याचेही मुद्दाम सांगितले जाते. अधिक विचारना केलीच तर बॅंकेच्या मुख्य अधिकार्‍याच्या इंटरनेटवरील फोटो अल्बमचा व त्याच्या माहितीचा उपयोग करून ओळख पटविली जाते. यात माणूस फसला की पैसे पाठवितो व नंतर त्याला फसविले गेल्याचे कळते. नंतरही बदनामी होईल या भीतीने तो पोलिसात तक्रार करीत नाही.

अशीच एक बिझिनेस प्रपोजलची मेल मला आली. मग मी त्याच्या प्लॅन मध्ये सामील व्हायचे कळवून त्याच्याकडून माहिती काढण्याचा प्रयत्न केला. त्या सर्व मेल खाली इमेज स्वरुपात देत आहे.अशा मेलमध्ये काय असते याची माहिती आपल्याला त्यातून मिळेल.












शेवटी मृत व्यक्तीच्याबद्दल माहिती विचारल्यावर मात्र त्याच्या मेल थांबल्या. लोकांनी अशा फसवणुकीच्य़ा प्रकारापासून सावध रहावे.

No comments:

Post a Comment