प्रवेश पहिला -(स्थळ: सुधाकराचे घर.)
सुधाकर - मी सोळा वर्षांचा असेन नसेन, माझी प्रवेश परीक्षा उतरण्याच्या आधीच बाबांनी स्वर्गप्रवेश केला; आपला वृध्दापकाळ झाला असं पाहून आपल्या पश्चात् शरद्च्या संगोपनाची जबाबदारी माझ्यावर पडू नये म्हणून बाबांनी तिच्या आठव्या वर्षीच तिचं लग्न लावून दिलं. परंतु लग्नाच्या सोळाव्या दिवशीच तिचं दुर्दैव तिच्या पुढं उभं राहिलं; नवर्याच्या मुळावर आलेली मुलगी, म्हणून तिच्या सासर्यानं तिला आमच्या घरी कायमची परत लावून दिली!
आईबापावेगळी आम्ही दोन परकी मुलं! पैशाचं पाठबळ नाही आणि आप्तेष्टांचा आधार नाही! त्या वेळी रामलाल देवासारखा माझ्या पुढं उभा राहिला! माझ्या मानी स्वभावामुळं माझ्या शिक्षणासाठी मी त्याची प्रत्यक्ष मदत कधी घेतली नाही हे खरं; परंतु शरद्ला सांभाळण्याची जबाबदारी मात्र त्यानं माझ्यावर फारशी पडू दिली नाही; पुढं शिकवण्या वगैरे पत्करून माझ्या शिक्षणक्रमातून शेवटपर्यंत मी यशस्वी रीतीनं पार पडलो;
रामलाल मानलेला का होईना, पण तिचा भाऊ शोभतोस खरा! सिंधूताई,
रामलाल - वकिलीच्या धंद्यात सुधाकर हल्ली या स्थितीत आहे. सर्वांनी एकच परीक्षा दिली असल्या कारणानं त्याच्या जोडीला वकिलांना तो आपल्यापैकीच एक वाटत आहे.
मला या वेळी आज नजरेपुढून जात असलेलं हिंदुस्थानचं दारिद्रय आणि उद्या दिसणारं इंग्लंड देशाचं वैभव, दोन्ही दिसताहेत.
या भूमीवर तुझा, माझा, त्याचा, याचा, कोणाचाही प्रेमाचा हक्क अगदी सारखा आहे. ऋषीश्वरांच्या यज्ञकर्माची योगभूमी, शिबिगौतमांसारख्या महात्म्यांची त्यागभूमी, प्रतापशाली वीरांची जी कर्मभूमी, युधिष्ठिर- अशोक यांसारख्या पुण्यश्लोकांची जी धर्मभूमी, तीच आपली ही जन्मभूमी! तिच्याकडे पाहून श्रीशिवछत्रपतींनी मागं जितक्या अधिकारानं म्हटलं असेल की, ही माझी जन्मभूमी- तिच्याकडे पाहून लोकमान्य टिळक जितक्या अधिकारानं आज म्हणत आहेत की, ही माझी जन्मभूमी- उद्या इंग्लंडहून परत आल्यावर तिच्याकडे पाहून माझ्यासारख्या पामरालाही तितक्याच अधिकारानं म्हणता येईल की, ही माझी जन्मभूमी!
प्रवेश दुसरा -(स्थळ : तळीरामाचे घर. पात्रें : तळीराम व भगीरथ)
तळीराम याचे तत्वज्ञान
- खरंच दारू एकदा घेतली म्हणजे सुटत नाही! पण तेवढयानं दारू वाईट कशी ठरते? !
- इंग्रजी अंमल सुरू झाल्यामुळं आमच्या हतभागी देशात ज्या अनेक आपत्ती आल्या, त्यात पदवी आणि प्रेम या अग्रगण्य आहेत.
- काव्यात कमल, नाटकात सूड, कादंबरीत भुयार, मासिक पुस्तकांत खास अंक, वर्तमानपत्रांत खास बातमीदार, संसारात प्रेम, औद्योगिक चळवळीत सहकारिता, सुधारणेत देशभक्तीत स्वार्थत्याग आणि वेदान्तात परब्रह्म यांचा धुमाकूळ माजला नसता, तर त्या त्या गोष्टींची थट्टा करायला जागाच उरली नसती प्रेमात राजासुध्दा अगदी गुलाम होतो, पण मदिरेत गुलामसुध्दा अगदी राजासारखा स्वतंत्र होतो.
- मद्यपान नीतिमत्तेला फार पोषक आहे. ऐका कसं ते. मद्यपी कधी खोटं बोलत नाही. कारण खोटं रचून त्याला कधी सांगताच येत नाही! मद्यपी कधी कुणाची कुणाजवळ चहाडी करीत नाही. कारण, मागं कोण काय बोलला याची त्याला आठवण नसते! तो कधी कुणाचा विश्वासघात करीत नाही, कारण, त्याच्यावर कुणी विश्वासच ठेवीत नाही!
- रंगभूमीच्या आणखी प्रेक्षकांच्या मध्ये दिव्यांची एक धगधगीत अग्निरेषा असते. नाटयसृष्टीची ही मर्यादा ओलांडून प्रीतिविवाह सत्यसृष्टीत उतरला, म्हणजे त्याचे पोरखेळ निम्मे दरानंसुध्दा पाहण्याच्या लायकीचे नसतात. लोक म्हणतात, नाटक हे संसाराचं चित्र आहे. पण मी म्हणतो की, हल्ली संसार हे नाटकाचं चित्र बनत चाललं आहे! प्रीतिविवाहाच्या पूर्वार्धाचा उत्तरार्धाशी काडीइतकाही संबंध नसतो; किंवा काडीइतकाच संबंध असतो. प्रीतिविवाह हा द्वंद्वसमास असून वकिलामार्फत त्याचा विग्रह करून घ्यावा लागतो.
- कोटयान्कोटी अस्सल आर्यांची कर्तबगारी कारकुनी पेशानं साहेबांच्या भेटीसाठी बंगल्याबाहेर उभी आहे व बंगल्याच्या आत पेल्यावर पेले घेणा-या कामामुळं सत्ताधारी साहेबांना बाहेर येण्याची फुरसत नाही!
- एकटयादुकटया दागिन्याची मिरवणूक काढली म्हणजे आपल्या गरिबीबरोबरच मनाचा हलकेपणाही लोकांच्या नजरेला येतो. सर्वांग सजलेल्या श्रीमंतांच्या ठिकाणी एखाद्या दागिन्याची उणीव चंद्राच्या कलंकाप्रमाणे शोभिवंत दिसते. पण उघडयाबागडया गरिबांना एकच दागिना घातला म्हणजे तो काळया कुळकुळीत अंगावरील पांढ-या कोडासारखा किळसवाणा दिसतो.
प्रवेश तिसरा -(स्थळ: सुधाकराचे घर. पात्रे: सुधाकर, पद्माकर, सिंधू आणि शरद्.)
पद्माकर : श्रीमंतांच्या आणखी आमच्या घराचा ऋणानुबंध किती आहे तो! इंदिराबाई म्हणजे संस्थानिकांची मुलगी, त्यातून एकुलती एक, पोरवय आणि नव्यानं सासरी जायला निघालेली. आमची सिंधूताई म्हणजे तिची जिवाभावाची सोबतीण. तेव्हा घेतला हट्ट, की सिंधूताईच पाठराखणी पाहिजे म्हणून! दादासाहेब, एक म्हण आहे, राजहट्ट, बालहट्ट आणि स्त्रीहट्ट, विधात्यालासुध्दा पुरवावे लागतात,
निदान चार महिने तरी मला या बदलीवर राहावं लागणार
प्रवेश चवथा (स्थळ : आर्यमदिरामंडळ.
पात्रे: शास्त्री, खुदाबक्ष, मन्याबापू मवाळ, जनुभाऊ जहाल,सोन्याबापू सुधारक, यल्लप्पा, मगन, रावसाहेब, दादासाहेब, भाऊसाहेब वगैरे मंडळी.
पात्रांची निवड प्रातिनिधिक स्वरुपाची - हिंदू, मुस्लीम, मवाळ, जहाल, सुधारक, मारवाडी,इतर प्रतिष्ठित
.)
तळीराम - आज आमच्या दादासाहेबांची सनद मुन्सफांनी सहा महिने रद्द केली.
कुठल्याशा मुद्दयावर यांचं म्हणणं मुन्सफांना पटेना; दादासाहेबांनी नीट समजावून द्यायला पाहिजे होतं; पण नव्या दमात एवढा पोच कुठून राहणार? हे रागारागानं बोलू लागले. चारचौघांनी हसून हेटाळणी करायला सुरुवात केली. झालं, दादासाहेबांचा सुमार सुटला, अन् मुन्सफाला होय नव्हे वाटेल ते बोलू लागले. तेव्हा मुन्सफांना असं करणं भाग आलं. तरी बरं म्हातारा पुष्कळ पोक्त, म्हणून सहा महिन्यांच्या मुदतीपुरतीच त्यानं सनद रद्द केली;
आर्यमदिरामंडळ - स्थापना चर्चा
प्रवेश पाचवा -(स्थळ : सुधाकराचे घर. पात्रे: सुधाकर व तळीराम.)
सुधाकर : (स्वगत) चोवीस तास झाले, मस्तकावर नुसते घणाचे घाव बसताहेत! काही सुचत नाही, काही नाही.
तळीराम - व्यसन म्हणून दारू अति भयंकर आणि निंद्य आहे हे मलाही कबूल आहे. पण आपणाला ती केवळ औषधाकरता म्हणून घ्यायची आहे आणि तीसुध्दा अगदी किती अगदी थोडी! एवढीशी घेतल्याने सवय लागेल अशी नादानपणाची धास्ती आपल्याला वाटायचं काही कारण नाही.
सुधाकर पिऊ लागतो.
No comments:
Post a Comment