Saturday, February 5, 2022

एकच प्याला - दुसरा अंक - निवडक मजकूर

 प्रवेश पहिला -(स्थळ: सुधाकराचे घर. पात्रे: सिंधू व सुधाकर.)

सुधाकर : अगं, या सनदेच्या कामासाठी खटपट करायची असते तर चारचौघांकडे जाऊन, तेव्हा हिंडावं लागतं असं सारखं! कुणाच्या तरी घरी फराळाचा होतोच आग्रह. काम सोडून फराळासाठी घरी तर उठून यायचं नाही! रात्री दोन दोन वाजेपर्यंत बसावं लागतं आताशा! तेवढयावरून तुझा रागच मला आला आहे हे कसं ठरविलंस?

गीता  रामलालला सांगते: आताशा त्यांनी प्यायला सुरुवात केली आहे- (हळूच) दारू प्यायला!

प्रवेश दुसरा -(स्थळ: रस्ता. पात्रे: भगीरथ व रामलाल)

भगीरथ : (स्वगत) दारूपासून सुख नाही हे खरं; पण दु:खी जिवाला दारू सुखाचं स्वप्न तरी दाखविते खास! या पापपूर्ण संसारात कधी कधी दु:खाचा अर्क वाटेल त्या रीतीनं कोळून प्यावा लागतो, हेच खरं!

रामलाल : (स्वगत) यांच्याशी एकदम बोलायला सुरुवात केली आणि गीतानं सांगितलेलं खरं नसलं तर- नाही पण- तिचं म्हणणं हजार हिश्श्यांनी खोटं नाहीच! त्याच्या नकळत शोधावे

(प्रकट): आज संध्याकाळी आम्हालाही तुमच्या मंडळात दाखल करून घ्या! अगदी सुरुवातीपासूनच नको! मंडळी रंगात आली म्हणजे गेलेलं बरं! म्हणजे दुसर्‍याला संकोच नाही, आपल्यालाही संकोच नाही!

भगीरथ : मी दुर्दैवाची दिशाभूल होऊन या आडवाटेला लागलो आहे! संसाराच्या सुरुवातीलाच माझा प्रेमभंग झालेला आहे. ज्या मुलीवर माझं प्रेम होतं, तिचं दुसर्‍याशी लग्न लागलं आणि संसाराला रामराम ठोकून मी असा फकीर बनलो!

प्रवेश तिसरा - स्थळ: आर्यमदिरामंडळ

(सुधाकर पितो व गुंगत पडतो. सर्वांचे पेले तयार होतात. इतक्यात रामलाल व भगीरथ एका बाजूने येतात.)

रामलाल : (भगीरथास एकीकडे) भगीरथ, पाहा या एकमेकांच्या लीला! आश्चर्याने माझ्याकडे पाहता भगीरथ? एका कार्यासाठी मघाशी तुमच्याजवळ खोटं बोललो त्याची मला क्षमा करा. मी मद्यपी नाही! माझ्या एका मित्राला- जो या शहराची केवळ शोभा- त्याला- सुधाकराला इथून परत नेण्यासाठी म्हणून मी तुमच्याबरोबर आलो. तुमची फसवणूक केली याबद्दल मला क्षमा करा.

दारु पिणा-यांची चर्चा

जनूभाऊ : सोन्याला कंठ फुटला वाटतं हा! या सुधारकांना प्रत्येक बाबतीत बायकांचे देव्हारे माजविण्याची मोठी हौस! कसला रे कपाळाचा स्त्रीवर्ग? यामुळेच या सुधारकांची चीड येते!

शास्त्री : नाही, माझा सुधारकांच्यावर कटाक्ष या मुद्दयावर नाही! सुधारणेच्या नावाखाली सुधारकांनी जो सावळागोंधळ मांडला आहे, धर्माचा जो उच्छाद मांडला आहे, तो आम्हाला नको आहे! सुधारणेचे नाव सांगून उद्या तुम्ही जर अपेयपान करू लागलात, अभक्ष्य भक्षण करू लागलात, सुधारक म्हणून मांसाहार करू लागलात- खुदाबक्ष, आज मटण शिजलं आहे चांगलं नाही?-

रामलाल : अरेरे, भगीरथ, संस्काराने पवित्र मानलेल्या आपापल्या धर्मासाठी पूर्वीच्या हिंदू-मुसलमानांचं वैरसुध्दा या नरपशूंच्या स्नेहापेक्षा जास्त आनंददायक वाटतं. कुठं पवित्र योग्यतेचा गीतारहस्य ग्रंथ, कुठं श्रीशंकराचार्य, कुठं सनातनधर्म आणि कुठं हे रौरवातले कीटक! आगरकर आणखी टिळक या महात्म्यांचा परस्परविरोध म्हणजे आकाशातल्या नक्षत्रांच्या शर्यती! तुमच्या-आमच्यासारख्या पामरांनी भूलोकावरूनच त्यांच्याकडे पहावं, आणखी त्यांच्या तेजानं आपला मार्ग शोधून काढावा! शूचिर्भूत ब्राह्मणांनासुध्दा संध्येच्या चोवीस नावांबरोबरच टिळक-आगरकर यांची नावं भरतीला घालावी, भगीरथ पाहा, या कंगालांचा किळसवाणा प्रकार! भगीरथ, भगीरथ, पुरे झाला हा प्रसंग!

रामलाल : अरेरे, भगीरथ, संस्काराने पवित्र मानलेल्या आपापल्या धर्मासाठी पूर्वीच्या हिंदू-मुसलमानांचं वैरसुध्दा या नरपशूंच्या स्नेहापेक्षा जास्त आनंददायक वाटतं. कुठं पवित्र योग्यतेचा गीतारहस्य ग्रंथ, कुठं श्रीशंकराचार्य, कुठं सनातनधर्म आणि कुठं हे रौरवातले कीटक! आगरकर आणखी टिळक या महात्म्यांचा परस्परविरोध म्हणजे आकाशातल्या नक्षत्रांच्या शर्यती! तुमच्या-आमच्यासारख्या पामरांनी भूलोकावरूनच त्यांच्याकडे पहावं, आणखी त्यांच्या तेजानं आपला मार्ग शोधून काढावा! शूचिर्भूत ब्राह्मणांनासुध्दा संध्येच्या चोवीस नावांबरोबरच टिळक-आगरकर यांची नावं भरतीला घालावी, भगीरथ पाहा, या कंगालांचा किळसवाणा प्रकार! भगीरथ, भगीरथ, पुरे झाला हा प्रसंग!

भगीरथ : रोज सुरुवातीपासून यांच्याबरोबर पीत गेल्यामुळं हा सर्वस्वी निंद्य प्रकार माझ्या कधीही लक्षात आला नाही.

रामलाल : भगीरथ, पाहा या प्रेतांच्याकडे! यांच्याबरोबर तुम्ही दारू पिऊन बसता? हतभागी महाभागा, तू ताज्या रक्ताचा तरुण आहेस, तीव्र बुध्दीचा आहेस, थोर अंत:करणाचा आहेस, रोमारोमात जिवंत आहेस आणि म्हणूनच तुझ्यासाठी अंतरात्मा तळमळून मी बोलतो आहे. संसारात प्रेमभंग झाला म्हणून तू या दारूच्या व्यसनाकडे वळलास?

एकोणीसशे मैल लांबीचा आणि अठराशे मैल रुंदीचा, नाना प्रकारच्या आपदांनी भरलेला, हजारो पीडांनी हैराण झालेला, तुझा स्वदेश तेहतीस कोटी केविलवाण्या किंकाळयांनी तुला हाका मारीत असताना प्रेमभंगामुळं अनाठायी पडलेलं जीवित सार्थकी लावायला तुला दारूखेरीज दुसरा मार्गच सापडला नाही का?

असल्या प्रेमभंगानं स्वार्थाच्या संसारातून तुला मोकळं केल्याबद्दल, तुझ्या जन्मभूमीची अशा अवनतकाली सेवा करायची तुला संधी दिल्याबद्दल भाग्यशाली भगीरथ, आनंदाच्या भरात परमेश्वराचे आभार मानायच्या ऐवजी तू वैतागून दारू प्यायला लागलास, आणखी या नरपशूंच्या पतित झालास?

पवित्र आणखी प्रियतम गोष्टींना संकटकाली साहाय्य करण्याचं भाग्य पूर्वपुण्याई बळकट असल्याखेरीज प्राणिमात्रांना लाभत नाही.

पतितांच्या उध्दारासाठी, साधूंच्या परित्राणासाठी वारंवार अवतार घेण्याचा मोह प्रत्यक्ष भगवंतालासुध्दा आवरत नाही. भगीरथ, दीन, हीन, पंगू, अनाथ, अशी ही आपली भारतमाता तुम्हा तरुणांच्या तोंडाकडे आशेने पाहात आहे. पाणिग्रहणांवाचून रिकामा असलेला तुझा हात- चुकलेल्या बाळा, जन्मदात्री स्त्रीजात गुलामगिरीत पडली आहे, लक्षावधी निरक्षर शूद्र ज्ञानप्राप्तीसाठी तळमळत आहेत, साडेसहा कोटी माणसांसारखी माणसं नुसत्या हस्तस्पर्शासाठी तळमळत आहेत, या बुडत्यांपैकी कोणाला तरी जाऊन हात दे-

भगीरथ : रामलाल, भगीरथाला पुनर्जन्म देणार्‍या परमेश्वरा, मी अजाण आहे, रस्ता चुकलो आहे; यापुढं मला मार्गदर्शक व्हा. आजपासून हा भगीरथ भारतमातेचा दासानुदास झाला आहे.

No comments:

Post a Comment